प्रेमगंध... (भाग - ८) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - ८)

(आपण मागच्या भागात पाहिलं की राधिका अजयला टाळायचा प्रयत्न करतेय हे अजयच्या लक्षात आलं होतं. तरीही अजय राधिकाशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण ती मात्र त्याच्याशी जेवढ्यास तेवढंच बोलत होती. राधिकाचं अजयशी असं वागणं आता अर्चनाच्या पण लक्षात आलं होतं...
आता पुढे...)

एके दिवशी असेच बसले असताना अर्चनाने अजयला विचारलं.
अर्चना- "अजय, राधिकाला काही बोललास का तू ? बर्‍याच दिवसांपासून पाहते मी, ती तुझ्याशी जास्त बोलत नाही. काय झालंय नक्की सांगशील का मला ?" 🤔🤔

अजय- "मी काय बोलू तिला सांग...? आणि मी काही बोलण्या अगोदर आधी तिने तर माझ्याशी बोलायला हवं ना... " 😊😊

अर्चना- "अरे पण तू तर सांगत होतास की तुझी खुप छान मैत्री झालंय तिच्याशी म्हणून. आणि आता मध्येच काय झालं...?" 🤔🤔
अजय- "अगं खरंच तू पाहीलं असशील ना... आधी तर ती खुप छान बोलायची माझ्याशी. आताच तिला काय झालंय काय माहिती...?🤔🤔 हे ना तू आल्यापासूनच माझ्याशी ती कमी बोलतेय. तूच माझ्याबद्दल तिला काहीतरी बोलली असशील..." अजय हसतच म्हणाला. 😀😀
तसं अर्चनाने अजयला हातावर एक फटकाच मारला.

"मी काय बोलू तुझ्याबद्दल तिला ? आणि जरी बोलली तरी चांगलंच बोलेन मी कळलं ना...." अर्चना लटका राग दाखवतच अजयला बोलली. 🙄🙄😡

अजय- "हो गं माहिती आहे मला, तू माझ्याबद्दल चांगलंच बोलशील ते... पण तिला माझा कसला तरी राग आलाय असं वाटते." 🙂🙂
अर्चना- "तुझा कसला राग आलाय तिला ?" 🤔🤔
अजय- "कदाचित मी तुझ्याशी इतका चांगला वागतो, बोलतो, ते तिला आवडत नसेल." तो हसतच म्हणाला.
😀😀

अर्चना- "ए चल, काहीही बोलतोयस तू... असं काहीही नाही कळलं ना... आणि राधिका तशी नाही. चांगली मुलगी आहे ती." 🙂🙂

अजय- "अगं खरंच सांगतोय... तुला माहिती आहे का काही मुली ना पक्क्या जळक्या स्वभावाच्या असतात... 😅😅 आपला मित्र जर एखाद्या दुसऱ्या मुलीशी चांगला वागत बोलत असेल ना तर त्यांना ते आवडत नाही, लगेच राग येतो त्यांना. राधिकाच्या बाबतीत पण असंच काहीतरी झालंय..." आणि तो जोरजोरात हसू लागला. 😂😂😅 अर्चनाला पण त्याचं बोलणं ऐकून हसू आलं. 😅😅
थोड्या वेळाने अर्चना अजयला म्हणाली.

अर्चना- "पण मला खरं खरं सांग तुला राधिका आवडते ना..." 😊😊
"हो." अजय लाजतच म्हणाला.😌 तसं अर्चनाला हसूच आलं. 😄😄
अर्चना- "छान आहे चाॅईस तुझी, आवडली मला. आणि अजून किती दिवस वाट पाहणार आहेस, लवकरच लग्नासाठी विचारून टाक ना तिला..." 🙂🙂

अजय- "एवढ्यांत नको गं, भिती वाटते मला. एकतर आधीच माझ्याशी नीट बोलत नाही आणि त्यांतच तिला विचारलं ना तर मला ती कपड्यांसारखी धुवून काढेल."
हे ऐकून अर्चना खुप हसू लागली. 😂😅
अर्चना- "असं काही नाही करणार ती कळलं ना..." 🙄

तसं अजयने तीला त्याच्या बाबांनी सांगितलेला राधिकासोबत घडलेला बसमधला प्रकार सांगितला.
ते ऐकून अर्चनाला अजूनच हसायला आलं. 😂😅
अजय- "अगं हसतेस काय खरं तेच सांगतोय तुला..."
अर्चना- "अरे हसू नको तर काय करू... म्हणून घाबरतोस तिला तू...?" अर्चनाला हसू आवरतच नव्हतं, हे बघून अजयपण हसू लागला. 😂😅

असेच एक दोन महिने निघून गेले. आज राधिकालापण शाळेत यायला उशीर झाला होता. कारण तिची बसपण लेट आली होती. ती शाळेत आली तेव्हा प्रार्थना झालेली होती. त्यामुळे ती स्टाफरूममध्ये न जाता डायरेक्ट तिच्या वर्गात निघून गेली. तिला आज स्टाफरूममध्ये पण जाण्याची इच्छा नव्हती म्हणून तिने वर्गात बसूनच नाश्ता करून घेतला. बेल झाल्यानंतर ती तिची बॅग आणि डबा घेऊन स्टाफरूममध्ये गेली. तिने पाहिलं तर अजय काहितरी लिहीत बसला होता. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती बॅग ठेवायला निघून गेली. तसं अजयने तिला आवाज दिला.

अजय- "राधिका, आज तू सकाळी दिसली नाहीस आणि नाश्ता करायला पण आली नाहीस... एनी प्रॉब्लेम ?

राधिका- "नाही असं काही नाही, सकाळी बस लेट आली ना म्हणून यायला उशीर झाला थोडा आणि वर्गातच नाश्ता करून घेतला मी."
अजय- "ओके."
राधिका- "अर्चू नाही आली आज, तिची तब्येत बरी आहे ना..."
तसं अजयने तिच्यासमोर पेढ्यांचा बाॅक्स धरला.
अजय- "हे घे पेढे."
राधिका- "काही गुड न्यूज आहे का...? आज पेढे घेऊन आलास...?"
अजय- "हो, गुड न्यूजच आहे. अर्चूला मुलगा झाला त्याचेच पेढे हे." तो एकदम खुश होऊन म्हणाला. 😊😊
राधिका- "वाव खरंच, आणि कधी, ती आणि बाळ कसे आहेत...?" ती एकदम एक्साईट होत म्हणाली. तिला खुपच आनंद झाला. 😃 राधिकाने बाॅक्समधला एक पेढा उचलला आणि तोंडात टाकला.
राधिका- "अरे मग तू इथे काय करतोयस ? तू तर आता हॉस्पिटल मध्ये असायला हवं होतं ना..."

अजय- "अगं काल संध्याकाळपासूनच आम्ही हॉस्पिटल मध्ये होतो. पण पेढे द्यायचे होते ना सगळ्यांना म्हणून मग आलो. आणि आई, मावशी वगैरे आहेत हॉस्पिटल मध्ये. शाळा सुटल्यावर जाईन मग मी. आणि अर्चनाने निरोप द्यायला सांगितलाय तुला. तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना ती, तुला बोलवलंय तिने..." अजय हसतच म्हणाला. 😊

राधिका- "हो, म्हणजे काय... नक्कीच येईन मी आणि आज शाळा सुटल्यावरच येईन मी, तिला आणि तुमच्या बाळाला बघायला." राधिकाने शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला, तसं अजयनेही हात पुढे केला आणि ती हसतच अजयला म्हणाली. 😊😊
राधिका- "Congratulations as you became father."

राधिकाचे हे बोलणे ऐकून अजयने डोळेच मोठे केले.
🙄😲
अजय- "काय बोललीस तू आता...? परत बोल."

राधिका- "अरे तू एका बाळाचा बाप झालास ना... त्याबद्दल तुझे खुप खुप अभिनंदन..."💐💐

हे ऐकून अजय तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.
राधिका- "असं काय बघतोयस ? मी काही चुकीचं बोलली का ? तूला आश्चर्य वाटलं ना की मला कसं माहिती म्हणून, तू आणि अर्चू हजबंड वाईफ आहात असं."
तिच्या ह्या बोलण्यावर अजयने शांतपणे तिला विचारलं.
अजय- "हो, पण तुला कसं काय कळलं ?

राधिका- "त्यादिवशी मी अर्चूच्या लाॅकरवर नाव पाहिलं. सौ. अर्चना अजय मोहीते म्हणून, तेव्हा मला कळलं."
अजय- "ओह... असं आहे तर..." 🤔🤔

राधिका- "अजय, तू माझा इतका चांगला मित्र आहेस ना, मग तू एकदा पण मला बोलला नाहीस की अर्चना तुझी बायको आहे म्हणून. तुम्ही दोघंही माझे चांगले फ्रेंड आहात आणि तुमच्या नात्याबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नव्हतं." ती थोडी नाराज होतच म्हणाली. 😔😔

राधिकाला असं नाराज झालेलं पाहून त्याला थोडं वाईट वाटलं.
अजय- "अगं राधिका, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझं थोडंसं ऐकून घेशील का तू...?"

राधिका- "अजय, खरंच आता बोलायला अजिबात वेळ नाही. बेल होऊन गेलंय कधीचीच, सगळी मुलं गोंधळ घालत असतील वर्गात. हवं तर नंतर बोलू आपण, मी निघते आता."
आणि ती घाईघाईने तिच्या वर्गात निघून गेली. अजय क्षणभर ती पाठमोरी जात असताना तिला बघतच राहिला. आणि नंतर तिचं बोलणं आठवून जोरजोरात हसू लागला. त्याला राधिकाचं खुप हसु येत होतं. 😀😀

"हि राधिकापण ना किती वेडी मुलगी आहे खरंच. आमच्याबद्दल पुर्ण जाणून न घेता उगाचच तिने गैरसमज करुन घेतला. त्या गोष्टीचा स्वतःला तर त्रास करून घेतलाच आणि इतके दिवस माझ्याशी अबोला धरून मलाही त्रास दिला." असं तो स्वतःशीच विचार करू लागला. 🤔🤔

अजयला आता सगळी परिस्थिती लक्षात येत होती. त्याला राधिकाचं त्याच्यासोबतचं सगळं वागणं आठवू लागलं. इतके दिवस ती मला का टाळत होती....? हे त्याच्या आता लक्षात आलं होतं. तो पुन्हा हसू लागला. 😀😀

क्रमशः-

(या भागात पण अर्चना आणि अजयच्या नात्याबद्दल काहीच कळलं नाही. मात्र पुढच्या भागात त्यांचं दोघांचं नातं काय आहे, ते नक्कीच कळेल...😊)

💕💕🌹@Ritu Patil 🌹💕💕

💕💕 प्रेमगंध... 💕💕
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
-----------------------------------------------------------