प्रेमगंध... (भाग - १३) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - १३)

(आपण मागच्या भागात पाहिलं की,
अजय- "राधिका, आता तुझी मैत्रीण पण येईल परत..."
अंजली बाई- "हो ना, कधीपासून जाॅईन होणार आहे अर्चना... आणि बाळ कसं आहे तिचं...?"
अजय- "आता या सोमवारपासूनच जाॅईन होईल ती. आणि दोघंही एकदम टकाटक आहेत..." तो हसतच म्हणाला.
"असू दे, दोघेही टकाटकच असू दे", सरीता बाई पण हसतच म्हणाल्या.
अशाच सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या...
आता पुढे...)

अर्चना- "अजून किती दिवस थांबणार आहेस तू...??
अजय- "कशाबद्दल बोलतेयस तू अर्चू...?"
अर्चना- "कशाबद्दल काय...? राधिकाला लग्नाबद्दल कधी विचारणार आहेस तू...? आता अजून उशीर नकोय... कळलं ना. नाहीतर मीच विचारून टाकते तीला."

अजय- "अर्चू लग्न झालंय तुझं आणि एका बाळाची आई आहेस तू... आणि परत तुला आता राधिकाशी लग्न करायचं आहे...? अजय डिव्होर्स घेईल तुझ्याकडून..." अजय हसतच म्हणाला...😜😝😁
तसं अर्चना त्याला हातावर फटके मारू लागली... आणि रागानेच बघू लागली. तसं अजय तिला बघून अजूनच हसू लागला...😅😅😅

अर्चना- "अजय आता पुरे झाली मस्करी हा... सिरीयसली सांगते मी तुला, कधी प्रपोज करणार आहेस राधिकाला ...? त्यादिवशी आई आणि मावशी पण विचारत होते मला की तू कधी विचारतोस राधिकाला असं... नाहीतर डायरेक्ट तिच्या घरी आपण लग्नाची मागणीच घालायला जाऊ असं मावशी म्हणत होती..."

अजय- "तुम्ही तर सगळे मिळून मला तिच्या हातचे फटके खाववणार आहेत खरंच... एवढी कसली घाई झालंय गं तुम्हा सगळ्यांना...?"

अर्चना- "घाई काय बोलतोयस... अजून किती दिवस थांबणार आहेस सांग...? आपल्या घरात सगळ्यांनाच आवडलंय राधिका, मग कशाला उगाचच उशीर करायचा...? आणि तुला तर माहितीच आहे ना, राधिकापण तुझ्यावर प्रेम करते ते... ती फक्त तुझ्या बोलण्याची वाट बघतेय रे... आणि तू कशाला घाबरतोस...? मी आहे ना तुझ्यासोबत... ही तुझी बहीण कधी कामाला येणार मग...?"

अजय- "खरंय गं तू आहेस म्हणून मला बरं आहे... तुझ्यासारखी बहीण प्रत्येक भावाला मिळायला हवी... म्हणजे कसं प्रेयसीला प्रपोज करायला जाताना बाॅडीगार्ड सोबत असला कि तेवढी हिंमत येते नाही का...?" आणि तो हसू लागला... 😁😁😁

अर्चना त्याला परत मारू लागली...
अजय- "अगं मारतेस काय सारखी मारक्या म्हशीसारखी.."
अर्चना- "हं, तू बोलून घे मला आता... एकदा तुझं लग्न होऊदे राधिकाशी, मग आम्ही दोघी मिळून तुझी चंपी कशी करतो बघ..."

अजय- "नाही गं नाही माते साॅरी हा... चुकलं माझं, एक बहीण आहे ती सतत मारत असते मला, अजून मारकी बायको नकोय मला..." अजय कान पकडून लहानसं तोंड करून तिची माफी मागू लागला... त्याचं असं वागणं बघून अर्चना पण हसू लागली... अजयही हसु लागला. 😅😁😁

अर्चना- "बरं ठिक आहे, मग उद्यापासून येतेय ना मी... लगेच उद्याच विचारून टाक तीला... अजून उशीर नकोय समजलं ना..."

अजय- "काय...? उद्याच विचारू...? वेड लागलंय का तुला...? तू तर मला लगेच घोड्यावरच बसवायला निघालीस... आणि प्रपोज करणं काय इतकं सोपं असते का...? त्या टिव्ही सिरियल मध्ये दाखवतात तसं..."

अर्चना- "देवा... कसं होणार आहे रे माझ्या भावाचं...? घोड्यावर नाही रे... नवर्‍याला घोडीवर बसून वरात घेऊन जातात..." ती हसतच म्हणाली. 😊😊
अजय- "राधिकाने माझीच वरात काढली नाही म्हणजे झालं..." 😊😊
अर्चना- "अरे नाही काढत ती वरात तुझी... आपण डायरेक्ट तुमच्या लग्नाची वरातच घेऊन जाऊ तिच्या घरी चालेल ना..." 😁😁
अजय गालातल्या गालातच हसू लागला...😊😊
त्याला बघून अर्चना म्हणाली.

अर्चना- "असं बोललं की मनातल्या मनातच खुप लाडू फुटत असतील ना तुझ्या..." ती हसतच म्हणाली. तीचं बोलणं ऐकून तो फक्त हसत होता...

अर्चना- "अरे असा हसतोस काय बोल काहीतरी..."

तसा तो शांतपणे तीला समजावत म्हणाला...
अजय- "मी काय सांगतो अर्चू... उद्या तुझा पहिलाच दिवस शाळेचा बरोबर ना... मग उद्याचा दिवस तू मस्त एन्जॉय कर ना... मस्त सगळ्यांना भेट... गप्पा मार त्यांच्याशी... नंतर विचारू राधिकाला चालेल ना...?"

तशी अर्चू कमरेवर हात ठेवून डोळे मोठे करून रागाने त्याच्याकडे बघू लागली...
अजय- "अशी काय बघतेस माझ्याकडे... अगं खरं तेच सांगतोय ना तुला मी..."

अर्चना- "एक लक्षात ठेव तू... उद्याच्या उद्या तू नाही विचारलंस राधिकाला तर मीच डायरेक्ट सांगेन तीला की अजय तुझ्यावर प्रेम करतो... लग्न करशील का त्याच्याशी...? आणि तेही तुझ्या समोरच विचारेन... बघच तू उद्या... मग पुढे काय ते तुझं तू बघून घे..." ती त्याला बोट दाखवतच म्हणाली.

अजय- "तू तर मला डायरेक्ट धमकीच देतेस ती गं... देवा काय माझे दिवस आलेत...?" त्याने डोक्यालाच हात मारला... 🤦🤦

अर्चना- "अजय कसं कळत नाही रे तुला... आता शाळेच्या वार्षिक परिक्षा चालू होतील... मग शाळा बंद झाल्या की तिच्या घरी जाऊन प्रपोज करणार आहेस का तिला...?"

तसं तो थोडा विचार करतच म्हणाला...
अजय- "हो गं, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं... अगदी बरोबर बोलतेयस तू... ठिक आहे, उद्याच विचारतो तिला... आणि असं पण तू आहेस ना माझ्यासोबत..." तो हसूनच म्हणाला. 😁😁

अर्चना- "हो रे मी आहे तुझ्यासोबत तू टेन्शन नको घेऊस..."
अजय- "चल मग मी घरी जातो आता..."

अर्चना- "अरे लगेच कुठे निघालास, आताच तर आलायस ना, चहा तरी घेऊन जा... आणि आता घरी जाऊन काय करणार आहेस..."

अजय- "अगं काय म्हणजे...? उद्या आयुष्यातली एवढी मोठी परीक्षा द्यायची आहे... मग त्याची पुर्वतयारी नको का करायला..." तो हसतच म्हणाला...😅😅

अर्चना- "अरे देवा... कसं होणार आहे तुझं कोण जाणे...?" तिने डोक्यालाच हात लावला...🤦🤦

-------------------------------------------------------------

रजेनंतर आज अर्चना शाळेत पुन्हा जाॅईन झाली होती... सगळे शिक्षक तिची आणि बाळाची चौकशी करत होते... अर्चनाने राधिकाला येऊन मिठीच मारली... दोघीही खुप खुश होत्या...

राधिका- "लाडू कसा आहे गं...?"
अर्चना- "एकदम लाडूसारखाच गोलमटोल झालाय तो..." ती हसतच म्हणाली. 😁😊
राधिका- "हो का, छानच आहे मग... मी वेळ काढून मध्येच येऊन जाईन त्याला बघायला..."
अर्चना- "हो नक्की ये..."
अजय- "चला तुमचा भरतमिलाप झाला असेल तर वर्गात जायला हवं..." तसे सगळे शिक्षक हसू लागले... 😁😁

मधल्या सुट्टीत अर्चना, अजय आणि राधिका तिघेही शाळेच्या प्रांगणात गप्पा मारत बसले होते. अर्चना हाताच्या कोपर्‍यानेच इशारा करत होती... त्याच्या कानात हळूच काहीतरी पुटपुटत होती... राधिकाने ते पाहिले...
"यांचं दोघांचं काय चाललंय..." ती मनातच विचार करू लागली.

अर्चना- "राधिका बाबांची तब्येत कशी आहे गं आता...? बाबांना बघायला यायचं होतं तुझ्या घरी..."

राधिका- "अगं लाडू अजून लहान आहे ना, त्याला एकट्याला सोडून कशी काय येशील तू...? आणि बाबा आता बरे आहेत गं... फक्त आजारामुळे त्यांना अशक्तपणा आलाय बस... बाकी काही प्रॉब्लेम नाही त्यांना... असं छोट्या बाळाला सोडून नको येऊस तू एवढ्या लांब..."

अर्चना- "अगं मी शाळेत आल्यावर आई सांभाळेलच ना त्याला... आणि असं पण आईकडे खुप छान खेळतो तो... राहेल तो थोडा वेळ, मी आणि अजय बस थोड्या वेळासाठी येऊन जाऊ... हवं तर जास्त वेळ नाही थांबणार बस... त्यानिमित्ताने तुझ्या आईबाबांशी पण ओळख होईल ना गं, हो की नाही रे अजय..."

अजय- "हो राधिका... अर्चू बरोबर बोलतेय... जास्त वेळ नाही थांबणार आम्ही... मी लगेच घेऊन येईन तीला घरी..."

राधिका- "बरं ठिक आहे मग... रविवारी या तुम्ही घरी..."

अर्चना- "बरं..." आणि अर्चना परत अजय कडे बघून डोळ्यांनीच इशारे करून त्याला राधिकाशी बोलायला सांगू लागली...

अजय- "राधिका तुझ्या लग्नाचे लाडू कधी देशील गं आम्हाला...?" अजय हसतच म्हणाला. 😁 अर्चनाने डोक्याला हातच लावला... 🤦🤦

राधिका- "आज कसं काय अचानकच माझ्या लग्नाबद्दल विचारतोस...? आणि आधी तू दे मला तुझ्या लग्नाचे लाडू नंतर मी देईन..." 😁😁

अर्चना- "काय रे अजय तुला कोणी मुलगी आवडलंय की काय...?" अर्चनाने मध्येच युक्ती लढवली...
अजय- "हो गं अर्चू, एकजण आवडते मला... पण तिला बोलण्याची हिंमत होत नाही..." तो राधिकाकडे बघतच म्हणाला. राधिकाने पण त्याच्याकडे पाहिलं... दोघांची नजरानजर झाली... राधिकाने एकदमच आपली नजर चोरली... अजयने पण आपली नजर दुसरीकडे वळवली...

अर्चना- "हो का, मग विचारून टाक ना... घाबरतोस का तिला विचारायला...?"
अजय- "हो मग घाबरतोच मी तिला... तीला मी विचारलं आणि आवडलं नाही तर धरून मारेल ना मला ती..."
तो हसतच म्हणाला... राधिका आणि अर्चना पण हसू लागल्या... 😂😂😂

अर्चना- "अरे सांग तरी कोण आहे ती...? आम्हाला पण कळू दे... हो की नाही गं राधिका...?"

राधिका- "हो ना..."

आणि राधिकाने लाजून मान खाली घातली. अर्चना दोघांची पण गंमत बघत होती... अजयपण स्पष्ट काही बोलत नव्हता... आणि अजय आता पुढे काय बोलतो हे ऐकण्यासाठी राधिकाचे कान आतुरले होते... तिचे हार्ट बिट्स वाढले होते... ती हातात पेन घेऊन पेनाशी चाळे करत बसली होती... अर्चना मात्र त्याला बोलण्यासाठी खुणावत होती... पण अजय काही बोलत नव्हता... अर्चनाने डोक्याला हातच लावून घेतला... 🤦🤦 शेवटी अर्चनाच न राहवून राधिकाला बोलली...

अर्चना- "राधिका, माझं एक काम होतं तुझ्याकडे..."
राधिका- "हं बोल ना काय काम होतं...?"
अर्चना- "अगं इथे नाही बोलता येणार... शाळा सुटल्यावर बाहेर भेट मला, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी..."

राधिका- "बरं ठिक आहे, नंतर भेटते तुला..."
आणि राधिका आपल्या वर्गात निघून गेली. तसं अर्चनाने अजयच्या हाताला जोराचा चिमटा काढला...

अजय- "आई गं लागते ना, किती जोराचा चिमटा काढते बावळट..." तो हात चोळतच म्हणाला.

अर्चना- "शेवटचं सांगते तुला मी... आता शाळा सुटल्यावर बाहेर भेटणार आहे ना ती, तेव्हा शिस्तीत विचारायचं तिला... नाहीतर मीच डायरेक्ट विचारून टाकेन सांगून ठेवते तूला..." ती मोठे डोळे करून त्याला बोट दाखवतच म्हणाली...

अजय- "हो गं माझे माते विचारतो तिला..." तो हात जोडतच म्हणाला.
"एक माया आणि एक महामाया दोघीपण माझ्याच नशिबात आलेत... देवा कसं होणार आहे माझं कोण जाणे...?" तो हात जोडतच अर्चनाला पाठमोरी जाताना बघतच मनातच म्हणाला...
"चला अजयराव आज तर तुमची पुर्णच वाट लागणार आहे... *इकडे आड तिकडे विहीर* अशी परिस्थिती झालंय तुमची" तो स्वतःशीच पुटपुटत होता...

शाळा सुटल्यावर अजय बाहेर एका झाडाखाली उभा राहून अर्चना आणि राधिकाची वाट बघू लागला. दोघीही समोरून येताना दिसल्या... अजयच्या हृदयाची धडधड मात्र वाढली... आणि मनातून थोडी भीती पण वाटली. दोघीही समोर येऊन उभ्या राहिल्या...

राधिका- "अर्चू, अगं एवढं काय महत्वाचं बोलायचं आहे तुला... शाळेत बसून पण बोलू शकलो असतो ना आपण..."

अर्चना- "राधिका मला नाही, खरं तर अजयला महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी... हो ना अजय..."

अजय- "अं... हं... हो... म्हणजे तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मला..." तो थोडं अडखळतच बोलला.

राधिका- "अरे मग बोल ना... काय बोलायचं होतं तुला...?"
अजय थोडा विचार करतच बोलला...

अजय- "राधिका... मी बोलतो पण, त्यामुळे आपली मैत्री तुटणार नाही, असं आधी मला तू प्रॉमिस कर..."

तसं राधिका अर्चना कडे बघू लागली... अर्चनाने तिला फक्त स्माईल दिली...😊
राधिका- "अरे प्राॅमिस कशासाठी आता..." ती अजयला हसतच म्हणाली. तसं अजयने हात पुढे केला आणि म्हणाला.
अजय- "आधी प्राॅमिस कर तू मला..."

राधिका- "बरं ठिक आहे... आपली मैत्री नाही तुटणार, प्राॅमिस करते मी तूला... आता तरी बोलशील का...?" ती अजयच्या हातावर हात ठेवून म्हणाली.

अर्चना आणि राधिका दोघीही त्याच्या कडेच बघत होत्या. अजयने डोळे बंद केले आणि मोठ्ठा श्वास घेतला... आणि थोडासा घाबरतच राधिकाला म्हणाला.

अजय- "राधिका... तू मला खुप आवडतेस... लग्न करशील का माझ्याशी...?"

दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या... थोडावेळ दोघीही चेहर्‍यावर काहीही हावभाव न आणता शांतच उभ्या होत्या. अजयला तर चांगलाच घाम फुटला होता. तो खुप घाबरला होता... तो मनातच विचार करत होता की आता राधिका चिडेल आणि रागाने निघून जाईल... त्याने खिशातून रूमाल काढला आणि चेहर्‍यावरचा घाम पुसू लागला... त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती... तो राधिकाच्या बोलण्याची वाट बघत होता...

(आता राधिकाचं उत्तर काय असेल बघुया पुढच्या भागात...)

क्रमशः-

💕💕@Ritu Patil... 💕💕

💕💕 प्रेमगंध... 💕💕

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
-----------------------------------------------------------