(आपण मागच्या भागात पाहिलं की,
राधिका- "हे काय आहे अजय..."
अजय- "तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे... पहिल्यांदाच मुलीला असं गिफ्ट देतोय... काही सुचत नव्हतं मला काय गिफ्ट आणू ते... तूझी आवडनिवड नाही माहिती मला... पण यांत जे काही आहे... ते तुला नक्कीच खुप आवडेल... प्लीज नाही म्हणू नकोस..."
राधिकाने ते गिफ्ट घेतलं...
राधिका- "थँक्यू अजय..." आणि एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही आपापल्या मार्गाला निघून गेले....
आता पुढे...)
अजय, अर्चना, राधिका तिघेही आज खुप खुश होते.... अजय आणि अर्चना घरी पोहोचले. अर्चना घरात गेली, तर अर्चनाची आई पण बाळाला घेऊन अजयच्या घरी बसली होती. अजयची आई पण बाजूला बसली होती. अर्चनाने अजयच्या आईचे दोन्ही हात पकडले आणि तीला गोलगोल फिरवू लागली.
अजयची आई- "अगं हळूहळू, काय करतेस तू...? आता चक्कर येईल मला."
अर्चनाची आई- "अगं अर्चू, वेडी झालीस का तू काय करतेस...?"
अजय तीला बघून हसत होता. अर्चना थांबली आणि तीने अजयच्या आईला खुर्चीवर बसवलं. आई डोक्याला हात पकडून डोळे बंद करून थोडावेळ तशीच बसून राहीली.
अर्चनाची आई- "वेड लागलंय का गं तूला...? चक्कर आली ना ताईला, लहान आहेस का आता...? एका बाळाची आई झालीस पण अजून जराही अक्कल नाही तूला... बावळट कुठली..."
तसं अर्चनाने तिच्या आईचे पण दोन्ही गाल खेचले आणि हसू लागली... अजय तीला बघून खुप हसत होता...
अर्चनाची आई- "खरंच ही मुलगी वेडी झालंय आज..."
अर्चना- "अगं माझी आई... माझं आधी ऐकून तर घे..."
अजयची आई- "अगं नक्की काय झालंय ते सांगशील का आता....? एवढी खुष का आहेस...?"
अर्चना- "अगं मावशी, आता लवकरात लवकर तुझ्या सुनबाईंना घरी आणायची तयारी करावी लागेल आपल्याला. आज अजयने राधिकाला प्रपोज केलं आणि राधिकाने पण होकार दिला."
अजयची आई- "काय रे अजय खरंच...? अरे व्वा... ही तर खुपच आनंदाची गोष्ट आहे... म्हणजे माझ्या पोराने परीक्षा पास केली तर..." आई खुश होतच म्हणाली.
अर्चनाची आई- "खुपच चांगलं झालं हे... आणि माझं पोरगं पण काय कमी आहे का...? अगदी राजबिंडा पोरगा आहे माझा... कुठली पोरगी नकार देईल त्याला... हो की नाही गं ताई..."
अजयची आई- "हो गं... पण एवढे दिवस आपण सांगत होतो, तर ह्याला भिती वाटत होती विचारायला... आणि हे आज एकदम अचानकपणे कसं काय विचारलं राधिकाला....?"
तसं अजयने अर्चनाचा कानच पकडला आणि म्हणाला...
अजय- "हे तुझ्या लाडक्या मुलीलाच विचार... हिने काय करामत करून ठेवली होती ते...?"
अर्चना- "आई गं... मावशी सांग ना गं ह्याला कान सोडायला..."
अजयची आई- "अरे अजय सोड तिचा कान, दुखत असेल तीला..."
अजय- "दुखू दे कान तिचा, हि एवढी नौटंकी झालंय ना आई खरंच, खुप भारीच प्लॅन सुचतात हिला... आणि त्यांत परत राधिकाला पण हिने सामील करून घेतलं होतं..."
अजयची आई- "नक्की काय केलं हिने सांगशील का आता...?"
अजयने अर्चनाचा कान सोडला आणि जे घडलं ते आईला आणि मावशीला सगळं सांगितलं. तसं आई, मावशी आणि अर्चना तिघीही खुप हसू लागल्या...
अजय- "हा तुम्ही पण हसा मला, तुम्हाला पण माझी गम्मतच वाटते ना.... पण त्यावेळेला माझी काय हालत झाली ते माझं मलाच माहीती..."
अजयची आई- "अरे हसू नको तर काय करू सांग... खरंच माझा पोरगा अगदी भोळा आहे... पण काहीही असू दे हा, एक प्रकारे माझ्या अर्चूने तुझी मदतच केली, उलट तुझं काम तीने सोपंच केलं कळलं... हुशार आहे तशी पोरगी माझी..." अजयच्या आईने तिच्या दोन्ही गालावर हात फिरवले...
अर्चना- "बघीतलं अजय... मावशी पण माझीच बाजू घेतेय..."
अजय- "हो मग, सगळ्यांची लाडकीच आहेस ना तू, मग सगळे तुझीच बाजू घेणार ना... आम्ही काय बाबा गरीब माणसं, आमची कोण बाजू घेणार आहे...?" तसे सगळेच हसू लागले...
अजयची आई- "मग कधी जायचं आपण राधिकाच्या घरी लग्नाची बोलणी करायला...?"
अजय आईजवळ जाऊन बसला आणि म्हणाला...
अजय- "आई, राधिकाने होकार दिलाय पण आधी ती तीच्या आईबाबांशी बोलेल आणि नंतर मग जाऊ आपण तिच्या घरी..."
अजयची आई- "बरं ठीक आहे, त्यांचं मत विचारात तर घ्यावंच लागेल... पण राधिकाने होकार दिला ते खूप चांगलं झालं म्हणजे आपला पुढचा प्रश्न मिटला नाही का..."
अजय- "पण ह्या गोष्टीचं सगळं श्रेय माझ्या लाडक्या बहीणीला जाते बरं का आई... अर्चूने मला खुपच सपोर्ट केला..."
अजयची आई- "मग... हुशार आहे माझी पोरगी तशी..."
अशाच त्यांच्या गप्पा चालू होत्या... सगळेच खुप खुश झाले होते...
-------------------------------------------------------------
राधिकापण घरी जात असताना पुर्ण रस्त्यात अजयचाच विचार करत होती... मागचा सगळा प्रसंग आठवून एकटीच गालातल्या गालातच हसत होती. तिही घरी येऊन पोहोचली. तिने हातपाय धुवून घेतले आणि तिचे बाबा झोपले होते, त्यांना तिने गळ्याला आणि डोक्याला हात लावून पाहीले... त्यांचा ताप उतरला होता, त्यांना आता बरं वाटत होतं...
आई पण झोपली होती... ती रूममध्ये जाऊन बसली... तिच्या मनात अजयचेच विचार घोळत होते... ती शांतपणे विचार करत बसली होती. तिने अजयने दिलेलं गिफ्ट हातात घेतलं... त्यांत काय असेल हे पाहण्याची तिला प्रचंड उत्सुकता लागली होती. तिने ते उघडून पाहीलं, तशी तिच्या चेहर्यावर मोठी स्माईल आली...
अजयने राधिकाला सुंदर पेंटींग दिले होते... त्यांत राधिकाचं सुंदर असं चित्र काढलं होतं... त्या फोटो मध्ये ती समुद्र किनार्यावर अस्ताला जाणारा सुर्य दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडून उभी होती... तिच्या काळ्या कुरळ्या केसांची बट वार्याने उडून डोळ्यासमोर आली होती.... तिच्या चेहर्यावर छानशी सुंदर अशी स्माईल होती... अजयने खुप सुंदर अशी पेंटींग केली होती आणि शेवटी लिहीलं होतं...
🥀🌿💕🥀🌿💕🥀🌿💕🥀🌿💕🥀🌿💕🥀
"आयुष्यातले सगळे सुंदर क्षण नेहमी असेच जपुन ठेव आणि तुझ्या चेहर्यावर चे सुंदर हास्य नेहमी असेच राहू दे..."
*ये आँखो की गुस्ताखियाँ मंजूर हैं हमें...*
*आपके चेहरे की मुस्कान आपका नूर हैं...*
*माँगे क्या खुदा से हम, आपकी खुशी ही
हमारे लिए सबकुछ हैं..."
*एक पल ही सही, रूक जाते हैं हम...*
*जब आपके चेहरे पर एक प्यार भरी मुस्कान आती हैं...*
*अक्सर खो जाते हैं हम इस प्यार भरे मुस्कान मे...*
*खुद को भी कभी कभी ढूँढ नहीं पाते...*
*आपकी खुशी ही एक जीने की आस हैं...*
*क्योंकि आप हमारे लिए बहोत खास हैं...*
🥀🌿💕🥀🌿💕🥀🌿💕🥀🌿💕🥀🌿💕🥀
सर्वात शेवटी पेंटींगच्या खाली त्याने चित्रकार - अजय मोहीते असं नाव लिहीलं होतं... ते पेंटींग बघून तीला खुप आनंद झाला... तीला ते खुपच आवडलं... अजय एक खूप छान चित्रकार होता, त्याला पेंटींग करायची खुप आवड होती... हे तीला माहीत होतं... तीने ते पेंटींग भिंतीवर लावली... ती बराच वेळ त्या पेंटींगकडे एकटक बघत होती आणि एकटीच गालातल्या गालात हसत होती... तीला खुप छान वाटत होतं...
संध्याकाळ झाली... आता अजयबद्दल आईबाबांना कसं विचारायचं ह्याचा विचार करतच ती बाहेर आली... बाबा शांतपणे डोळे मिटून पडले होते... आई बाहेर तांदूळ निवडत बसली होती. ती पण येऊन आईला मदत करू लागली.
राधिका- "आई, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी..."
आई- "अगं मग बोल ना काय बोलायचं होतं...?"
तेवढ्यात मेघा, मीरा आणि पाठोपाठ सोनाली पण घरी आल्या. तिघीही फ्रेश होऊन बाहेर येऊन बसल्या.
मेघा- "ताई, आमची सहल जाणार आहे पुढच्या महिन्यात... पैसे देशील ना आम्हाला...?"
आई- "काही पैसे वगैरे मिळणार नाहीत... आणि कशाला जायचंय त्या सहलीला, कुठे नाही समजलं...?" आई रागातच म्हणाली.
मीरा- "अगं ताई सांग ना आईला, आम्हाला दोघींना पण जायचं आहे म्हणून... आमचे सगळे मित्रमैत्रीणी चाललेत गं... आम्हाला पण त्यांच्यासोबत एन्जॉय करायचा आहे..."
आई- "काही नको गं राधिका, दोघींनाही पैसे द्यायची काही गरज नाही... त्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या, समजलं..."
राधिका- "अगं आई असू दे गं, देईन मी पैसे दोघींना पण... त्यांना पण त्यांच्या मित्रमैत्रीणींसोबत मज्जा करू दे गं... आणि असं पण अभ्यासात हुशार आहेत माझ्या बहिणी, काय गं अभ्यास करतील ना नीट तुम्ही...?" ती मीरा आणि मेघाकडे बघून बोलली.
"हो गं ताई, आम्ही अभ्यास करू व्यवस्थित," दोघीही सोबतच बोलू लागल्या...
आई- "तू पण त्यांना लाड करून डोक्यावर चढवून ठेवलंय, बाकी काही नाही... काय करायचे ते करा तूम्ही..."
आणि आई रागानेच आतमध्ये निघून गेली...
तशा मिरा आणि मेघा दोघींनी राधिकाला दोन्ही बाजूंनी जाऊन मिठी मारली... आणि तिच्या गालावर किस केले.
राधिका- "असू दे असू दे... आज दोघींचंही माझ्यावरचं प्रेम उतू चाललंय.... नाही का गं सोनू...?"
सोनाली- "हो ना ताई, बरोबर बोलतेस तू..."
तशा त्या जोरजोरात हसू लागल्या... आणि या सगळ्यात राधिकाला अजयबद्दल बोलायचं होतं ते राहुनच गेलं...
(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)
(Portrait वरची हिंदी कविता प्रतिलीपी वरचे आपले सहकारी मित्र तनुज गव्हाळे यांनी लिहून दिली आहे... यासाठी त्यांची मी मनापासून आभारी आहे...🙏🙏)
क्रमशः-
💕💕 @Ritu Patil 💕💕
💕💕 प्रेमगंध...💕💕
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
-----------------------------------------------------------