प्रेमगंध... (भाग -१६) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग -१६)

(आपण मागच्या भागात पाहिलं की,
आई- "तू पण त्यांना लाड करून डोक्यावर चढवून ठेवलंय, बाकी काही नाही... काय करायचे ते करा तुम्ही..."
आणि आई रागानेच आतमध्ये निघून गेली...
तशा मिरा आणि मेघा दोघींनी राधिकाला दोन्ही बाजूंनी जाऊन मिठी मारली... आणि तिच्या गालावर किस केले.
राधिका- "असू दे असू दे... आज दोघींचंही माझ्यावरचं प्रेम उतू चाललंय... नाही का गं सोनू...?"
सोनाली- "हो ना ताई, बरोबर बोलतेस तू..."
तशा त्या जोरजोरात हसू लागल्या... आणि या सगळ्यात राधिकाला अजयबद्दल बोलायचं होतं ते राहुनच गेलं...
आता पुढे...)

राधिका आईला जेवण करायला मदत करत होती... मीरा, मेघा दोघीपण बाहेर अभ्यास करत बसल्या होत्या... बाबा शांतपणे पडून राहीले होते. सोनाली एकटीच रूममध्ये बसून अभ्यास करत होती... अचानकच सोनालीचं लक्ष राधिकाने भिंतीला लावून ठेवलेल्या पेंटींगकडे गेले. ती पेंटींगच्या जवळ जाऊन नीट निरीक्षण करू लागली. तीने पेंटींगवरचं सगळं वाचलं... तीला ती पेंटींग खुप आवडली. तीने राधिकाला आवाज दिला...

सोनाली- "ताईऽऽऽ ए ताई, इकडे ये गं जरा..."
राधिका तिचा आवाज ऐकून रूममध्ये गेली.
राधिका- "काय गं काय झालं...? ओरडतेस कशाला...?"
तीच्या पाठोपाठ काय झालं म्हणून हे बघायला मीरा, मेघा आणि आई पण आली...

सोनाली- "ताई हे पेंटींग किती सुंदर आहे गं... कोणी दिलंय तुला हे...?"

तसं मीरा, मेघा आणि आई पण जवळ जाऊन ती पेंटींग बघायला लागले...

मीरा- "वाॅवऽऽऽ सुपर्ब... ताई कित्ती भारी पेंटिंग काढलंय गं हे... अगदी सेम तुझ्यासारखंच... ताई किती सुंदर दिसतेस गं तू ह्या पेंटींगमध्ये..."

मेघा त्या पेंटींगजवळ जाऊन त्यांवर लिहीलेलं होतं ते जोरातच वाचू लागली... तीचं वाचून झाल्यावर ती राधिकाला म्हणाली...

मेघा- "ताई ही पेंटींग तर सुंदर आहेच गं, पण यांवर शायरी पण किती सुंदर लिहलंय..."

आई- "अजय मोहिते कोण गं...? आणि त्याने तुझं पेंटींग का काढलंय...?"

राधिका- "आई... अजय माझ्यासोबत शाळेमध्ये शिक्षक आहे आणि माझा खुप चांगला मित्रसुद्धा आहे... मगाशी अजयबद्दलच मला तुझ्याशी बोलायचं होतं..."

आई- "काय गं त्याच्याबद्दल काय बोलायचं होतं तुला...? आणि त्याच्या प्रेमात बिमात पडलीस की काय गं तू...? त्याने पेंटींग काढलंय तुझी म्हणून विचारलं..."

आईचं बोलणं ऐकून मीरा, मेघा आणि सोनाली तिघीही हसू लागल्या... तशी आई त्यांना ओरडली...

आई- "मस्करी चालू आहे का इथे...? सारख्या आपलं दात काढत असतात बस... गप्प बसा तिघींनी पण..." आई त्यांना रागवतच म्हणाली. तशा तिघीही गप्पच बसल्या...

राधिका- "अगं आई त्यांच्यावर का ओरडतेस उगाचच...? माझं अगोदर ऐकून तर घे मी काय म्हणते ते...?"

आई- "बरं ठिक आहे बोल तू..."
राधिकाने अजयबद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल आईबाबांना सगळं सांगितलं...

बाबा- "अगं ठीक आहे ना मग, आनंदाचीच गोष्ट आहे ही... त्याचे घरचे सगळे तयार आहेत लग्नाला... मग आपल्याला पण काहीच हरकत नाही..."

आई- "हो अगदी बरोबर आहे तुमचं... खुपच छान झालं हे. नशिब काढलं पोरीने..." आईने राधिकाच्या डोक्यावरून हात फिरवला...

बाबा- "राधी... तू खुप खुष रहा... आत्तापर्यंत तू खूप केलंय सगळ्यांसाठी... आणि आमची तू अजिबातच काळजी करू नकोस कळलं... इथलं सगळं बघायला आहे मी... तुझं लग्न झालं की तुझ्या संसाराचं बघ तू... तू खुष राहशील तर आम्ही पण खुष राहू... इथली काळजी करू नकोस तू..."

राधिका- "बाबा असं का बोलताय तुम्ही...? तुम्ही तर मला लगेच परकं करून टाकलंत... आणि मी खुप काही केलेलं नाही तुमच्यासाठी, माझं फक्त मी कर्तव्य पार पाडतेय... तुम्ही एवढ्या खस्ता खाऊन आमच्यासाठी कित्ती केलंय, हे पाहत आलंय मी लहानपणापासून... आणि मी आज जी काही आहे, ती फक्त तुमच्यामुळे आहे... मग माझं तुमच्याप्रती काहीच कर्तव्य नाही का...? बाबा... लग्न झालं तरिही मी माझं कर्तव्य पार पाडत राहणार आहे..."

बाबा- "राधी बाळा तसं नाही सांगत मी तुला... तू आमच्यासाठी कधीच परकी नव्हती आणि नसणार... पण जगाची रीतच आहे गं ती... मुलीचं एकदा लग्न झालं की तीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाते... सासरच्या माणसांची जबाबदारी सांभाळावी लागते... त्यांची मनं राखावी लागतात... आयुष्यात खुप गोष्टी बदलतात... मग तू तिकडे लक्ष देणार की इकडे.... एवढंच सांगायचं होतं मला..."

राधिका- "बाबा, तुम्ही जे काही बोलताय ते सगळं पटतंय मला... पण माझ्यापरीने जितकं करता येईल तेवढं सगळं करेन मी... कारण माझ्या मागे अजून तीन बहीणी आहेत माझ्या, त्यांची पण सगळी स्वप्न पुर्ण करायची आहेत मला..."

आई- "बरोबरच आहे तुझं... खुप नशीबवान आहेत आम्ही तुझ्यासारखी पोरगी आमच्या पोटी जन्माला आली... पण आमच्यासाठी करता करता तुझ्या संसारात काही अडचण नको यायला बस... तु सुखात राहायला हवी बस बाकी आम्हाला काही नको..."

राधिका- "आई बाबा तुम्ही बोलतात ते अगदी बरोबरच आहे... तुमचं सगळं बोलणं पटतंय मला. पण तुम्ही एकदा अजयला आणि त्याच्या घरच्यांना भेटून तर बघा... खुप चांगली माणसं आहेत ती, तुम्हालाही आवडतील... आणि ते यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढतील... विश्वास ठेवा माझ्यावर."

बाबा- "अगं पोरी तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे आमचा... आणि तुझ्यावर नाहीतर कोणावर विश्वास ठेवणार... हं..."

राधिका- "हो बाबा, माहीती आहे मला... तुम्ही सगळेच खुप विश्वास ठेवतात माझ्यावर आणि तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी कधीच वागणार नाही..."

आई- "हो गं राधी आम्हाला माहीती आहे ते... तुझ्यावर आमचा पुर्णपणे विश्वास आहे... आणि त्यांना वेळ मिळेल तेव्हा बोलावून घे अजयला आणि त्याच्या घरच्यांना... कधी येणार आहेत ते...?"

राधिका- "अजयला मला विचारावं लागेल... नंतर सांगते मी तुम्हाला आणि हो रविवारी अर्चू आणि अजय दोघेही बाबांना बघायला येणार आहेत... तेव्हा त्याच्याशी भेट होईलच तुमची..."

आई- "बरं ठिक आहे..."
घरामध्ये सगळेच खूप खुश होते... मीरा, मेघा आणि सोनाली तिघींनीही राधिकाला येऊन घट्ट मिठी मारली...
सोनालीने राधिकाचे दोन्ही गाल खेचले आणि म्हणाली...

सोनाली- "ताई तू आता नवरी होणार..." ते ऐकून राधिका गोड लाजली. तसे सगळे तिला हसू लागले. मेघा, मीरा, सोनाली तिघीही राधिकाच्या गोल गोल फिरून नाचू लागल्या... आणि गाणं बोलू लागल्या...

"येऽऽऽ ढिंगचिका ढिंगचिका... ताई आमची नवरी होणार..." आई -बाबा, राधिका हे बघून खूप हसायला लागले... मीरा गाणं बोलू लागली...

*गोड गोजिरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी...
फुलाफुलांच्या बांधून माळा मंडप घाला गं दारीऽऽऽ...*

असं गाणं बोलून तिघीही नाचू लागल्या... राधिका खूप लाजत होती... सगळे तिला खूप हसत होते... तिघींनीही राधिकाला घट्ट मिठी मारली....

मेघा- "ताई खरंच आम्ही सगळे तुझ्यासाठी खुप खुप खुश आहोत..."

घरातलं सगळं वातावरण आनंदी झालं होतं...

-----------------------------------------------------------

अजयच्या घरी पण सगळे खुप आनंदात होते...
अजयची आई- "अजय, उद्या राधिकाला विचारून घे, तिच्या आईबाबांचं काय मत आहे ते... मग आपण जाऊ लगेच तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला..."

अजयचे बाबा- "अजय, तुझ्या आईला खुपच घाई झालंय हा सुनेला लवकरच घरी आणायची..."
अजय गालातल्या गालातच हसू लागला...

आई- "हो मग, होणारच मला घाई सुनेला लवकर घरी आणायची.... अगदी मनासारखी पोरगी भेटलंय आपल्या अजयला... दोघांचा संसारही खूप छान होईल बघा..."

बाबा- "अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ... लवकरच जाऊ आपण लग्नाची बोलणी करायला... काय चिरंजीव जायचं ना मग..."
तसा अजय लाजला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला.

बाबा- "बघितलंत आपले चिरंजीव किती लाजतात ते... लवकरच आता लग्नाच्या बेडीत अडकणार म्हणून त्यांच्या मनात लाडू फुटत असतील आता..."
आणि आईबाबा दोघेही खुप हसू लागले...

अजयच्या डोळ्यांसमोर राधिकाचाच चेहरा येत होता.... राधिकाला प्रपोज करतानाचा सगळा प्रसंग आठवून त्याला खुप हसु येत होतं.... तोच विचार करता करता रात्री त्याला कधीतरी उशीरा झोप लागली...

-------------------------------------------------------------

राधिकाला मात्र झोप लागत नव्हती... ती अजयचाच विचार करत होती... "अजय माझ्या घरची परिस्थिती समजून घेईल ना...?" याच गोष्टीचा विचार ती करत होती... सोनाली राधिकाच्या बाजूला झोपली होती... ती ही राधिकाला बघून जागीच होती...

सोनाली- "ताई कसला एवढा विचार करतेस गं...? झोप नाही येत का तुला...?"

राधिका- "नाही गं सोनू, झोपतेच मी आता आणि तू कशाला जागी आहेस...? झोपून जा तू, खुप उशीर झालाय..."

सोनाली- "ताई मला माहिती आहे... तू लग्न करून गेल्यावर आमचं कसं होईल, हाच विचार करतेस ना...? अगं नको एवढा आमचा विचार करू तू... आमच्या नशिबात जे असेल ते होईल आमचं, पण आमच्यामुळे तू स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस..."

राधिका- "खुप मोठी झालंयस का गं तू आता... आहेस शेंडेफळ पण खुप मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस... आणि तुमच्यामुळे माझं कसलं आलंय गं नुकसान...? काहीही बोलत असतेस... खुप उशीर झालाय... झोप आता गपचूप, वेडी कुठली..."

तशी सोनाली हसू लागली... राधिकाने सोनालीच्या केसांवरून हात फिरवला... आणि सोनाली तिच्या अंगावर पाय टाकून झोपून गेली... राधिकाला पण उशीरा कधीतरी झोप लागली....

क्रमशः-

💕💕 @Ritu Patil...💕💕

💕💕 प्रेमगंध... 💕💕

🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
-------------------------------------------------------------------------