शौर्य विराजशी फोनवर काहीच बोलत नव्हता तो शांतच होता.. विराजला कळलं कस ह्या गोष्टीचाच विचार तो करत राहतो. बहुतेक मम्मा इथे आली हे त्याला कळलं असेल..
विराज : "काय झालं तु शांत का झालास??"
शौर्य : "ते मी विचार करत होतो की मी दिल्लीला कधी गेलो..??"
विराज : "ओहह कम ऑन ब्रो.. मी मम्माच फ्लाईट बुकिंग बघितलंय.. तिने अर्जेनंटली दिल्लीच फ्लाईट बुक केलेलं ते ही कंपनीच्या अकाऊंट मधुन आणि मला जेवढी आपल्या आय मिन तुझ्या कंपनीची माहिती आहे त्यानुसार तुमच्या कंपनीची कोणतीच ब्राँच दिल्लीत अजूनपर्यंत तरी नाही.."
(मॉम एवढी मोठी मिस्टेक करूच कशी शकते.. शौर्य मनात विचार करू लागला..)
शौर्य : 'एक मिनिट तु सारख तुझी कंपनी, तुझी कंपनी का करतोयस?? तुझा सुद्धा तितकाच अधिकार आहे त्यावर.."
विराज : "शौर्य तु मला खुप आधीपासून ओळ्खतोस मला प्रॉपर्टी मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीयआणि इथे मुद्दा हा नाहीच आहे.. मुद्दा हा आहे की मम्मा तुलाच भेटायला दिल्लीला गेलेली.."
शौर्य : "बर झालस तु सांगितलंस ते.. म्हणजे मम्माला मला भेटायला इथे साधं चेन्नईला यायला वेळ नाही पण त्या लोकांना भेटायला जायला बरोबर वेळ आहे.. आता तर कळलंच असेल तुला मला मम्माचा राग का येतो ते आणि आता तर तिला सांगच तु ह्यापुढे तिचा फोन मी कधीच म्हणजे कधीच उचलणार नाही. "
विराज : "शौर्य तु भडकतोस का आहे आणि कोण रहात दिल्लीला??"
शौर्य : "अस काय करतो विर.. मामा राहतो ना.. ओहह सॉरी हा तुला नसेल माहीत कदाचित.. पण माझा सख्खा मामा राहतो तिथे.. बाबा गेला त्यानंतर साधी मॉमची विचारपूसही केली नाही आणि आता तूच बघ.."
विराज : "तिला तिच्या भावाला भेटवस वाटत असेल तर भेटु देत आणि ती भेटत नाही मग काय झालं?? मी आहे ना..मी येतो तुला भेटायला.. आणि आता तर मला माहिती पडलं तु चेन्नईला आहेस ते..तु बोल कधी येऊ तुला भेटायला."
शौर्य : " मला तर तुला खरच भेटावस वाटतंय रे विर पण सध्या तर माझी एक्झाम चालु आहे.. एक्साम झाली की मी स्वतः तुला फोन करतो मग भेटुयात..चालेल.??"
विराज : "पक्का???"
शौर्य : "एकदम पक्का..पण प्लिज मॉमला सांगु नकोस ते मी रागात माहिती ना काहीही बोलतो आणि तुला मी चेन्नईला आहे हे कळलंय ते प्लिज तिला सांगु नकोस.. प्लिज.."
विराज : "नाही सांगत.. पण तुझी एक्साम कधी संपतेय.."
शौर्य : "आजच सुरू झाली, अजून पंधरा दिवस."
विराज : "तुझ्याशिवाय मन नाही लागत यार.."
शौर्य : "तुझा डॅड खुश असेलना मी तिथे नाही तर.."
विराज : "शौर्य खर सांगु मला तुला खुप काही सांगायचंय यार.. पण अस नाही सांगु शकत आणि मी मॉमला हे सगळं तर सांगुच नाही शकत. तु इथे आलास किंवा मला एकदा भेटलास तर समोरा समोर सांगेल.. फक्त एवढंच लक्षात ठेव मी डॅड सारखा नाही आहे आणि.. "
शौर्य : "आणि काय विर.. हॅलो.. हॅलो..."
फोन कट होतो..
"विरला काय बोलायचं होत नेमकं..??? शट.." अस बोलत शौर्य पुन्हा त्याला फोन लावतो पण विरचा फोन आता नोट रीचेबल लागतो.. म्हणुन शौर्य अनिताला फोन लावून विराज आणि त्याच झालेलं बोलणं सांगतो..
(इथे विराज फोन वर बोलतच मागे फिरतो आणि फोन त्याच्या ह्याततून खाली पडतो..कारण समोरच दृश्यच तस असत)
त्याच्या मागे सुरज उभा असतो.. त्याच शौर्य सोबतच बोलणं ऐकत
विराज : "डॅड तु कधी आलास इथे??"
सुरज : "कोणाशी बोलत होतास??"
"ते .. ते.. अ..मित्राशी...", विराज अडखळतच बोलतो.
"विर कोणासोबत बोलत होतास तु??", सुरज जोरातच त्याच्यावर ओरडतो..
"खरच मित्र होता", विराज घाबरतच बोलतो..
सुरज खुप वेळ रागातच त्याच्याकडे बघतो आणि त्याचा हात उठतो तो थेट विराजच्या गालावर.. सुरजचा हात इतक्या जोरात उठतो की विरच्या ओठातून रक्त येत.. संपुर्ण रूममध्ये तो आवाज घुमतो..
"खोटं कधी पासुन बोलायला लागलास तु माझ्याशी..",एक एक पाऊल विराज पुढे टाकतच तो बोलतो..
"डॅड आय एम सॉरी..",विराज त्याला घाबरतच आपलं एक एक पाऊल मागे टाकत असतो..
"कोणाशी बोलत होतास तु??", सुरज परत त्याला विचारतो..
"शss शौर्यसोबत", विराज घाबरतच त्याला बोलतो..
"कुठे आहे तो.. हे त्याने तुला सांगितलंच असेल..", सुरज अस बोलताच विराज नकारार्थी मान हलवत नाही म्हणुन बोलतो..
तस पुन्हा त्याच्या गालावर सुरजचा हात उठतो..
"कुठे आहे तो??", विराजची कॉलर पकडतच सुरज त्याला धमकवतच विचारतो..
"डॅड सॉरी...पण मला हे नको वाटतंय.. तु प्लिज सगळं थांबव..", विराज रडतच आपली कॉलर सोडवतच सुरजला विणवु लागला..
सुरज : "ह्या घरात राहायचं असेल तर मी बोलेल तस वागावं लागेल नाही तर मी हे ही विसरून जाईल की तु माझा मुलगा आहेस ते आणि तुला कधीपासून त्याचा पुळका यायला लागला?? शौर्यला मारायची सुपारी तर मी तुलाच दिली होतीना तेव्हा त्याचा पुळका नाही आला का??"
विराज : "म्हणुन तर शौर्य जिवंत आहे ना डॅड.. जर मी नाही घेणार अस म्हटलं असत तर तु दुसऱ्या कुणाला तरी ते काम दिल असतस आणि त्याला फक्त मी खरचटवलं जेणे करून तुला वाटाव की मी तुझं काम करतोय.. मला तु पण हवा आहेस, मम्मा आणि शौर्य पण.. पण तुच नुसतं प्रॉपर्टी प्रॉपर्टी करत बसलायस.. प्लिज डॅड सोड ना हे सगळं."
सुरजचा पुन्हा हात उठतो विराजवर.. तो रागाने वेडापिसा झाला असतो.. तुझ्यामुळे माझे सगळे प्लॅन आतापर्यंत फसत गेले.. तूच कारणीभूत आहेस सगळ्याला अस बोलत सुरज विराजचा गळाच दाबतो.. इतका तो चिडला असतो त्याच्यावर..
"डॅssड", विराजच्या तोंडुन शब्दच फुटत नव्हते.. आज आपला खरच जीव जातोय अस त्याच झालं असत.. तोच विराजच्या बेडरूमच्या खिडकीतून गाडीचा आवाज आला.. तसा सुरज रागातच विराजला ढकलुन देतो.. विराजची पाठ जोरातच कपाटावर आदळते.. एक हात पाठी भोवती आणि एक हात गळ्या भोवती धरून तो कळवत असतो.. सुरजला त्याच्या अश्या रडण्याने किंवा कळवळन्याने काहीच फरक पडणार असतो.. तो खिडकीजवळ जावुन बघु लागला. गाडीतुन अनिता बाहेर पडली..
"ही का लवकर आली आज..?", सुरज स्वतःशीच पुटपुटला..
सुरज : "जर ह्यातलं अनिताला काही कळलं तर तुला तिच्या नजरेसमोरून उतरवायला मला वेळ नाही लागणार.. याद राख.. जशी तुझ्या आईची अवस्था केलीना त्याहून बेकार तुझी करेल हे लक्षात ठेव फक्त.. विराजचे केस जोरात ओढतच सुरज त्याला सांगुन तिथुन निघून गेला.."
विराज आपली पाठ धरत कस बस उठत बेडवर येऊन बसतो..
अनिता विराजला शोधत त्याच्या रूममध्ये आली..
विराज घुडघ्यात डोकं घालून रडत बसलेला.. त्याची आणि त्याच्या रूमची अवस्था बघुन अनिता थोडं घाबरली..
अनिता : "विर काय हे.. ??"
अनिता जाऊन विरच्या बाजुला जाऊन बसली..
विर इथे बघ बघु काय झालं??
विराजने अनिताकडे बघताच अनिताच काळीज धस्स झालं.. ओठ अगदी फुटून त्यातुन रक्त येत होतं..
अनिता : "कोणी केलं हे.. कोण आलेलं इथे...?? मी पोलिसांना कळवते तु थांब.."
अनिता हातात मोबाईल घेऊ लागली..
"मम्मा नको ग.. डॅडला पोलिसांनी पकडलेल मला नाही आवडणार.. ", विराज अनिताचा हात पकडतच तिला बोलतो..
अनिता : "सुरजने तुला मारलं तुला??? एक मिनिट.."
("फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये विरच्या रूममध्ये.. ₹", अनिताने विरच्या बेड शेजारी असलेल्या लेंडलाईनवरून फोन लावंतच घरातील नोकराला सूचना दिल्या)
तोच एक नोकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला.. अनिताने इशाऱ्यानेच त्या नोकराला जा म्हणुन बोलते.. तोच तिचा फोन वाजतो..
"आजच्या सर्व मिटिंग केन्सल... हो हो माहिती ती महत्वाची डिल आहे पण माझ्या मुलापेक्षा ते महत्वाचं नाही वाटत मला.. आणि सर्व कॉल मायराला हँडल करायला सांगा.",ती फोनवर बोलता बोलताच विरच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमांना औषध लावु लागली.. विराज तीच सगळं बोलणं ऐकत असतो..
अनिताने औषध लावताच विराज रडतच तिच्या मांडीवर झोपतो. अनिताला ही भरून आले..
विराज: "मम्मा तु आणि शौर्य माझ्यावर कधीच नाराज नका होऊ.. मी वाईट नाही.."
अनिता : "काय झालं सांगशील??",
विराज : "अश्या गोष्टी नको नको ना ग विचारुस की जी गोष्ट मला तुला सांगावीशी वाटतेय पण नाही सांगु शकत..."
(सुरज बाहेरूनच दोघांचं बोलणं ऐकत असतो विराज अनिताला काही सांगणार नाही ह्याची खात्री होताच तो थेट स्वतःच्या रूममध्ये निघुन जातो.)
अनिता : "बर नाही विचारत.. तु काही खातोस??"
विराज : "नकोss.."
अनिता : "थोडं झोप मग तुला बर वाटेल.."
अनिता आज विरसाठी खूप हळवी होते.. थोडा वेळ एखाद्या लहान मुलासारखं ती त्याला थोपटत झोपवते.. तो झोपला ह्याची खात्री होताच ती तडक उठुन सुरजच्या रूममध्ये जायला निघाली.
सुरज बेडवर पेपर वाचत बसलेला... अनिताने वेळ वाया न घालवता सरळ मुद्यावर हात घातला...
अनिता : "विर आता लहान राहिलेला नाही जे तु त्याला अस मारतोस.."
सुरज शांतपणे न्यूज पेपर मधलं दुसर पान पलटतो आणि ते वाचत आहे असं अनिताला भासवतो..
"स्वतःशीच बोलायला मी तुला मूर्ख वाटत असेल तर तो गैरसमज आहे तुझा.. निदान शौर्यच समजु शकते पण विर तर तुझा स्वतःचा मुलगा आहे त्याच्याशी इतकंही वाईट नको वागूस की त्याला तुला पुढे बाप बोलायची लाज वाटेल..", सुरजवर ओरडतच ती बोलते.
सुरज : "बिजनेस मॅनचा मुलगा आहे तो.. साधं बिजनेस न कळावा इतका मूर्ख तो नक्कीच नसू शकतो.. त्याच्या चुकांमुळे पूर्ण एवढ्या वर्षाचा बीजीनेस माझ्या हातुन जायची वेळ आलीय माझी आणि तसही माझा मुलगा आहे तो मी मला हवं ते करेल.. इतरांनी मध्ये पडु नये.."
अनिता : "लहान आहे तो.. तुला वाटेल सगळंच तो लवकर शिकेल तस नाही.. थोडा वेळ दे त्याला. आता कुठे त्याला बिजीनेस म्हणजे नेमकं काय ते कळायला लागलय..आणि अजुन एक.. मुलगा जरी तुझा असला तरी त्याच्यासाठी त्याची आई ही मीच आहे.." विराजसाठी अनिता थोडं नमतेपणा घेत तिथुन निघाली..
स्वतःच्या रूममध्ये येऊन ती आज घडुन गेलेल्या गोष्टींचा विचार करू लागली.. तोच शौर्यचा फोन वाजला.. ती शौर्यचा फोन उचलते...शौर्य विरची विचारपुस करतो तिच्याकडे.. अनिता त्याला सगळं सांगते.. शौर्यलाही विरची काळजी वाटु लागते.
शौर्य : "मम्मा मी एकदा भेटु त्याला?? त्याला इथे नाही बोलवत मी मुंबईत येऊन भेटतो त्याला मग तर चालेल??"
अनिता : "एवढ्यात नको.. मी सांगेल तेव्हाच आणि मी सांगेपर्यंत तु मुंबईला अजिबात यायचं नाही आणि पुन्हा पुन्हा मला एखाद्या लहान मुलासारखं तु तिच तीच विचारात बसु नकोस.. तुला आत्ता तुझं चांगलं वाईट कळायला हवं शौर्य.."
शौर्य : 'अग पण मम्मा मी विर साठी बोलतोय ग.. त्याला मला काही तरी सांगायचंय."
अनिता : "तुझी परीक्षा चालु आहे.. तु तिथे लक्ष दे.. विरची काळजी घेणं सोड.. त्याची काळजी घ्यायला त्याचा डॅड आहे आहे इथे. त्याला काय सांगायचं हे आपण नंतर बघुच आणि पुन्हा मला तुझ्या तोंडुन मी मुंबईला येऊ का हे वाक्य ऐकायला यायला नकोय?? "
शौर्यशी बोलताना अनिताचा आवाज थोडा वाढला होता.. शौर्यने काहीही न बोलता रागातच फोन कट केला आणि अभ्यासाला लागला.. शौर्य सोबत इतर सगळेच अभ्यासाला लागले..
परीक्षेच्या चिंतेने कोणीही एकमेकांच्या रूममध्ये जास्त ये जा करत नव्हतं..सगळ्यांच अभ्यास एके अभ्यास असच चालू होतं.. बोलता बोलता दिवस पटापट जाऊ लागले.. अश्यातच शेवटच्या पेपरचा दिवस उजाडला..
शेवटचा पेपर इंग्लिशचा असल्यामुळे परीक्षेच टेन्शन अस कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हतं.. सगळे आपले मज्जा मस्ती करत गेटजवळच उभे होते..
टॉनी : "मनवी आज पेपर संपतोय.. पार्टीच तेवढं लक्षात असू दे.."
मनवी : "हो रे.. पेपर सुटल्यावर डिस्कस करूयात आपण.. आपल्या नेहमीच्या जागेवर.."
सगळेच होकार दर्शवतात.. आणि आपापल्या क्लासरूमध्ये जायला वळतात..
मनवी आणि रोहन सोबत असल्यामुळे शौर्य आणि समीराला एकमेकांशी समोरा समोर अस बोलता येत नव्हत..
सगळ्यांना कधी एकदाचा हा पेपर होतो अस झालं असत. समीरा तर सगळ्यांपेक्षा थोडी जास्तच उत्सुक असते.. पेपर लिहिताना देखील तीच्या डोक्यात कोणते तरी वेगळेच विचार चालु असतात.. पेपर संपताच सगळे ठरल्या ठिकाणी भेटतात..
राज : "गाईज मग आता कुठे जायच फिरायला???"
सीमा : "मला अस वाटत की आपण एखादी ट्रिप काढावी.. मस्त पैकी ऐक आठवडा तरी.."
समीरा : "मी एक बोलु का?? म्हणजे मला तुम्हाला काही तरी सांगायचं आहे.."
वृषभ : "इथे बोलायला परमिशन घ्यावी लागते...??"
टॉनी : "मला तर आजच कळलं.."
समीरा : "तुम्ही लोक माझी मस्ती करणार तर राहू दे मी नाही बोलत.."
शौर्य : "ती काय बोलते ते एका तरी.."
राज : "मला माहित होतं हा हिची बाजु घेऊन बोलणार ते..."
शौर्य : "कुठले साधु बाबा म्हणायचे तुम्ही??? नाही तुम्हाला आधीच सगळं कळत म्हणुन विचारलं.."
"सिक्स सेन्स म्हणतात ह्याला.. सगळ्यांकडे असलं टेलेंट असत अस नाही..",स्वतःची कॉलर सरळ करतच म्हणाला
टॉनी : "मग तुला एक्सामला येणारे प्रश्न पण आधीच माहीत असतील ना??? तुझ्याकडे असणाऱ्या तुझ्या सिक्स सेन्सच्या टेलेंटने.."
टॉनी शौर्यला टाळी देतच बोलला.. सगळे राजला हसु लागतात..
वृषभ : "ए राज तुझ्या सिक्स सेन्सने सांग ना मला किती मार्क्स पडतील.."
सीमा : 'ए राज मला पण सांग ना.."
राज : "तेच बोललो ही अजून कशी बोलली नाही ते.."
सीमा : "मी काही बोलली तर तुला नेहमी प्रॉब्लेम का असतोच रे.. तु.."
"एक मिनिट...!!",रोहन सीमा आणि राजच होणार भांडण थांबवत मोठ्याने ओरडतो..
रोहन : " तुम्ही लोक समीराला काही बोलु देणार आहात की नाही.. बोल ग समीरा तु.."
बेगेतुन कोणाच्या तरी लग्नाची पत्रिका काढते.. आणि ती टेबल वर ठेवते..
सगळे ती पत्रिका बघुन शौर्यकडे बघतात.
समीरा : "अस बघत बसू नका.. उघडुन बघा.."
राज : "समीरा तुझं लग्न ठरलं पण..?₹"
समीरा : "मॅड माझं लग्न नाही माझ्या मोठ्या भावाच आहे. तुम्हाला मी बोलली तर होती.. "
राज : "तु तुझ्या दादाच लग्न जमलंय अस बोललेलीस पण ह्याच वर्षी करणार हे काही बोलली नव्हतीस "
समीरा : "मग आत्ता बोलते. तुम्ही सगळे माझ्या दादाच्या लग्नाला या.. मी पण काय बोलतेय.. (समीरा डोक्यावर हात मारून घेतच बोलते) या नाही.. तुम्ही सगळे येणार आहात.."
राज : "लग्न आहे कधी??"
समीरा : "आज पासुन बरोबर नऊ दिवसांनी.. म्हणजे नऊ दिवसांनी एक एक कार्यक्रम चालु होतील..अकराव्या दिवशी लग्न..."
मनवी : "मी तर येणार.."
रोहन : "मी पण.."
शौर्य : "मी ही येईल.."
"तु तर असणारच.. तुझ्यासाठी घरातलच लग्न ना..", वृषभ हळुच शौर्यच्या कानात बोलला..
शौर्यही थोडा लाजतो आणि हसु लागतो..
राज : "वृषभ मित्रा मोठ्याने बोललास तर आम्हीही हसु.."
वृषभ : "नको..तुला नाही कळणार तो जॉक होता.."
राज : "जॉक केल्यावरच माणस हसतात हेच तुला कळलं नाही म्हणजे हाच मोठा जॉक आहे.."
राज टॉनीकडे हसतच टाळी मागु लागला..
टॉनी : "तुझं झालं असेल तर मी काही तरी बोलु का?? विषय काय आणि तुम्हा दोघांच काय चालु आहे..??"
रोहन : "माझ्या मते आपण सगळेच तैयार आहोत लग्नासाठी.. "
"येसsss.", सगळे एकत्रच बोलले..
मग माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे. समीराच्या भावाच लग्न आणि आपण आऊटिंग पण होईल..
वृषभ : "पण आपण राहायचं कुठे??"
समीरा : "माझ्या घरी सगळी सोय केलेली आहे.. टेन्शन नको आणि तुम्हा सगळ्यांचे फ्लाईटच तिकीटसुद्धा माझा दादा बुक करेल.."
मनवी : "तु कधी निघतेस??"
समीरा : "दोन दिवसांनी.. पण जर तुम्ही लोक पण येत असाल तर आजच तिकीट बुक होईल म्हणजे आपण सगळेच एकत्र जाऊयात.. थोडी शॉपिंग पण होईल आणि मस्त पैकी फिरणं.."
"मला काहीही चालेल..",शौर्य समीराकडे बघतच बोलला
राज : "मलाही चालेल.. तस पण लेक्चर काही होणार नाहीत.."
समीरा : "मग सगळे तैयार आहेत.."
"येस...", सगळेच एकत्रच बोलतात..
समीरा : "पक्का ना?₹
"एकदम पक्का..", पुन्हा सगळे एकत्रच बोलतात.
समीरा : "ठिक आहे मी आलीच.."
मनवी : "आता तू कुठे चाललीस??"
समीरा : "अग तिकीट नको का बुक करायला.."
समीरा थोडं बाजूला जाऊनच फोन वर बोलु लागली..
शौर्य तिथे बसूनच तिला न्याहाळत होता.. थोड्या वेळात ती पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसते...
समीरा : "गाईज मला तुमचे डॉक्युमेंट लागतील.. फ्लाईट बुकिंग साठी ते मला व्हाट्सए करा.. ते ही आजच..म्हणजे दादा तस बुक करेल आपली तिकीट.."
"ओके...'
मनवी : "आणि मी देणाऱ्या पार्टीच काय??"
राज : "ते तु नंतर देऊ शकतेस.. बाय दि वे लग्न आहे कुठे???"
सीमा : "अस काय करतोस ही मुंबईची आहे म्हटलं तर हिची फेमिली मुंबईचीच असणार ना.. आणि फेमिली मुंबईची आहे म्हटलं तर लग्न ही ते मुंबईतच करतीलना.."
राज : "तु अस काय करतेस.. जर नवरी मुलगी समजा पंजाब किंवा गुजरात किंवा अजुन कुठे रहाणारी असेल तर तिथेही असु शकत ना.."
समीरा : "नाही रे.. मुलगी पण मुंबईचीच आहे.. त्यामुळे लग्न हे मुंबईतच असणार आहे.."
शौर्य : "काय!!! समीरा खरच लग्न मुंबईत आहे??"
समीरा : "हो.. पण त्यात शॉक होण्यासारख काय आहे.."
शौर्य : "मी नाही आलं तर चालेल का?? "
समीरा : "का आता काय झालं??"
शौर्य : "तेsss"
क्रमशः..
©भावना विनेश भुतल..
(आता पूढे काय?? शौर्य जाईल मुंबईला?? त्यासाठी पुढील भागाची प्रतिक्षा करा.. आणि हा भाग कसा वाटला ते हु कळवा)