Tujhi Majhi Love Life - 4 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्ह लाईफ... - 4आतापर्यंत आपण बघितलं कि गौरी, सौम्या ला भेटायला बोलावते, सौम्या कॅफे ला पोहचते, आणि तिची विवान सोबत धडक होते,ति त्याला सॉरी म्हणून टेबल वर जाऊन बसते, विवान पण त्याच टेबलं वर जाऊन बसतो...

सौम्या : एक्सक्युज मि हा आमचा टेबलं आहे , दुसऱ्या टेबलं वर जाऊन बस...😏

विवान : नाही मि इथेच बसणार !

सौम्या : ठीक आहे बस मग मीच जाते...

विवान : अग थांब !!!
मीच बोलावलं आहे तुला आणि गौरी ला इथे मला काम आहे , मला बोलायच आहे तुमच्याशी...

सौम्या : तु बोलावल आम्हाला इथे...???

विवान : हो ...

तेवढ्यात गौरी तिथे येते , हाय फ्रेंड्स मि आले....

सौम्या : गौरी काय चाललं आहे तुझं, आणि मला का नाही सांगितलं की विवान ने बोलावलं आहे आपल्याला म्हणून....

गौरी : सॉरी सौम्या , पण मि जर तुला हे सांगितलं असत तर तु आली नसती ,म्हणून मि तुला विवान नि बोलावलं हे नाही सांगितलं....
विवानचा मला कॉल आला आणि त्यानेच आपल्याला इथे बोलावलं...बाकी नंतर बोलू ...

तेवढ्यात तिथे वेटर येते

वेटर : एक्सक्युज मि सर , तुमची ऑर्डर काय...???

विवान : 3 capaccino आणा ...

सौम्या : एक मिनिट , सगळ्यांची ऑर्डर तु कसाकाय देऊ शकतो , मला नाही आवडत capaccino , मला कोल्ड coffee पाहिजे , सौम्या वेटर ला म्हणते भैया 1 कोल्ड cofee अँड 2 capaccino आणा....

विवान सगळं शांतपणे बघत असतो कारण त्याला ह्या दोघिसोबत् मैत्री करायची असते ना म्हणून तो भांडत नस्तो...
खरंतर विवानला या दोघिन्सोबत् मैत्री यामुळे करायची असते , कारण त्याला नव्या सोबत त्याची मैत्री व्हावी असं वाटत असते , आणि नव्या या दोघींची चांगली friend असते...🤭
म्हणून तो त्याचा राग कंट्रोल करत असते....

विवान : खरंतर मि तुम्हाला इथे सॉरी म्हणायला आलो आहे , कॉलेज च्या पहिल्या दिवशीच मि तुमच्याशी कसा वागलो, मला तस नव्हतं करायला पाहिजे , मला माफ करा....

( सौम्या ला तर हे ऐकून विश्वासच होत नाही कि असं कसाकाय झाला, हा मिस्टर घमंडी आपल्याला सॉरी म्हणतोय , बाप रे पण हे असं का करत असेल, काही तरी कामं असेल याच.....सौम्या मनातल्या मनात विचार करत असते....)

गौरी : इट्स ओके विवान , केलं तुला माफ...

विवान : सौम्या तु तरी बोल काही ....

सौम्या : हम्म....केलं माफ ...

विवान : थँक्स यार , मला भितिच वाटत होते तुम्ही मला माफ कराल का नाही ते....झालं मग आता तर आपण फ्रेंड्स बनू शकतो ना ......????

गौरी : हो.......लगेच हाथ पुढे करत....

विवान : हसत हाथ मिलवत् , येह हुई ना बात .....

विवान सौम्या कडे हाथ पुढे करतो , सौम्या हाथ पुढे करत नसते तर गौरीच सौम्यचा हाथ पुढे करते....
सौम्या अशी मुलगी असते तिचा लवकर कोणावर विश्वास बसत नसतो, तिच्या या स्वभवमुलेच् तिचे कमी फ्रेंड्स असतात......

( विवान मनातल्या मनात म्हणतो येस्स.... आता आपलं कामं झालं समजा, आपण आता नव्या सोबत पण मैत्री करू शकतो , याच दोघी आपली मैत्री नव्या सोबत करवून देतील ....मग तर झालं... )
आता तर विवान खूप खुश असंतो त्याला हेच तर पाहिजे असते ......😅

तिघ् coffee घेतात , आणि निघायला लागतात, वेटर बिल आणून ठेवतो, विवान बिल देतो आणि सगळे तिथून निघायला लागतात...

कॅफे च्या बाहेर येतात , विवान दोघीना बाय करून निघतो थोडं पुढे जातो त्याला लक्षात येत अरे आपण हेल्मेट तर लावलाच नाही...हेल्मेट हातात घेतो आणि लावणार तेवढ्यात त्याच लक्ष गाडीच्या आरशात जात , तो लगेच गाडी फिरवतो , आणि कॅफे कडे जातो,
तिथे सौम्या ला काही गुंड मुलं परेशान करत असतात, नको ते बोलत असतात, तिची सकूटी पण अडवून ठेवतात , तिला जाऊ देत नसतात, गौरी तिथून निघून गेलेली असते,
सौम्या खूप घाबरून गेलेली असते...

तेवढ्यात विवान तिथे येते त्याला बघून तीला थोडं बर वाटत, ती सकूटी वरून उतरते , आणि विवान च्या मागे जाऊन लपते....

विवान : काय आहे रे , एकटी मुलगी बघितली नाही कि लागले परेशान करायला , काही कळतं का तुम्हाला...
छेड काढायची ना तुम्हाला काढा मग काढा ना आता बघतो मि कशी छेड काढता तुम्ही मुलिन्चि.....

विवान् जॅकेट काढून त्यांच्या समोर उभा राहतो , त्याची बॉडी बघून तर गुंड मुलं घाबरून जाता आणि , लगेच त्यांच्या जीप मधेय बसून पळून जाता....

विवान सौम्या ला पुढे करत तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत म्हणतो , इट्स ओके काळजी नको करू, घाबरू नको गेले ते आता , आता नाही करणार तुला परेशान ते.....

सौम्या : ह्म्म्म.....

सौम्या हो तर म्हणते, पण तिच्या मनातली भीती मात्र गेलेली नसते हि गोष्ट विवान च्या लक्षात येते, म्हणून तो म्हणतो....

विवान : सौम्या एक काम कर तु चाल , सकूटी घेऊन मि पण येतो बाईक वर तुझ्या सोबत , तुला घरी ड्रॉप करून देतो चाल....

सौम्या : नको जाते मि.....

विवान : अग आपण मित्र आहोत ना मग , चाल मि येणार म्हणजे येणार ......
विवान थोडं रतुन् जिद केल्यासारखं बोलतो..

सौम्या : ओके ,....चाल.....

दोघे निघतात , सौम्या सकूटी वर असते आणि विवान बाईक वर , विवान बरोबर तिच्या सकूटी बरोबर त्याची बाईक चालवत असतो.....
दोघ थोडंच पुढे जातात , तर काय जोरदार पाऊस चालू होऊन जातो...
रस्त्याच्या कड्याला एक बस थांबा असतो पत्र्याचा , दोघ गाडी एक्बजुला लावुन तिथे थांबतात...

विवान : शट यार ..... या पाऊसाला पण आताच यायच होता का , मला जीम ला जायच होता ...

सौम्या : विवान सॉरी , माझ्यामुळे तुला इथे थांबावं लागतंय....

विवान : सॉरी काय त्यात, मैत्री साठी एवढं तर करावच लागत....

तिथे एक बेंच वर दोघे बसतात...
थोडा वेळ होऊन जातो तरी पाऊस थांबतच नसतो,सौम्या ला थन्डी लागत असते , कारण तिने आज छोट्या स्लीव चा ड्रेस घातलेला असतो , आणि त्यामुळे तिचे नकळतच दात वाजत असतात, विवान तिला त्याचा जॅकेट देतो...

विवान : हे घे सौम्या ....

सौम्या : अरे नको मला नाही वाजत आहे थंडी....

विवान : अग घे...खोटं नको बोलू ...तु तुझ्या मित्रांसोबत् खोटं नाही बोलू शकत....घे...

सौम्या : मि तुला उद्या परत करते...

विवान : हो चालेल ....

थोड्या वेळाने पाऊस थांबतो , आणि दोघ परत सौम्या च्या घरच्या दिशेने निघतात, सौम्या च घर येत,
सौम्या : आलं माझं घर, थँक्स विवान...

विवान : वेलकम ....चाल बाय येतो मि आता

सौम्या : बाय...

घरात आल्यावर बघते तर , light गेलेली असते ती , ती आईला हाक मारते , आई कुठे आहेस तु , आई.....

आई : हो आले ग् ,आई हातात मेणबत्ती घेउन बाहेर येते...

सौम्या : आई जेवणाला काय बनवलं आज ???

आई : कुठे होती तु एवढ्या वेळ ????

सौम्या : अग मि ,बाहेर गेले होते थोडं कामं होता..

आई : बर, चाल आज मस्त तुझी आवडती भाजी केलीये, चला जेवून घेऊ या...

सौम्या : हो चला ....मि फ्रेश होऊन येते आई...

सौम्या रूम मध्ये जाते , फ्रेश होते आणि आर्शसमोर् , उभी राहते , मोबाईल चि टॉर्च लावून बघते , तीच लक्ष जॅकेट कडे जात , थोडा वेळ तर ती विवानचाच् विचार करत असते..
तीच मन तिला म्हणत असत कि आपण किती चुकीचा विचार करत होते , विवानबद्दल् , विवान तर किती चांगला आहे, बर झालं आज कळले नाहीतर आपण असंच वाईट विचार केले असते त्याच्याबद्दल्.....
ती त्याच जॅकेट काढते आणि व्यवस्तीत घडी करून ठेवते,जॅकेट कडे बघून एक स्मित हास्य देते , आणि खाली जेवायला येते ....

जेवण झाल्यावर सौम्या आपल्या रूम मधेय जाते, थोडा बुक वाचता वाचता झोपून जाते , सकाळी मस्तपैकी तयार होऊन कॉलेज ला जाते , कुठे आहे हि गौरी असं स्वताहून म्हणत गौरीला शोधात असते. गौरी ला शोधात शोधात ती कट्टा जवळ येते, हा त्यांचा नेहमीचा कट्टा असतो...
सौम्या गौरीला फोन करते,
सौम्या : अग कुठे आहेस तु .....मि कधीपासून शोधतेय तुला...

गौरी : अग आज मि नाही येणार , कारण मझि ताब्येत् बरी नाही....

सौम्या : ओके..... काळजी घे.....

गौरी: हो ......बाय
सौम्या ला आज कॉलेज मधेय एकटे एकटे वाटत असते,कारण आज गौरी आली नव्हती , आणि नव्या पण गावाला गेलेली होती म्हणून ती पण नव्हती....
lecture झाल्यावर सौम्या लंच करण्यासाठी कॅन्टीन मधेय जाते , आणि एकटी एका टेबलं वर जाऊन बसते , तिकडून विवान येत असतो ,तो तिला बघून तिच्या टेबलं कडे येतो...

विवान : हॅलो सौम्या .....

सौम्या : hii

विवान : आज एकटी कसाकाय....???

सौम्या : गौरी आणि नव्या नाही आलेल्या कॉलेज ला...

विवान : मि आहे ना आज मि लंच करतो , तुझ्यासोबत...

सौम्या : स्मित हस्य् देत .....हो चाल....

सौम्या चे विवान बद्दल चे विचार आता बदलले होते, ती त्याच्याबद्द्ल आता चांगला विचार करत होते....
बघुत आता पुढे कळेल आपल्याला कि त्यांची जवळीक कशी वाढेल ते , आणि हि तुझी माझी लव्ह लाईफ , म्हणजे विवान आणि सौम्या चि लव्ह लाईफ कशी पूर्ण होईल ते ....
यासाठी वाचत राहा तुझी माझी लव्ह लाईफ.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED