शेवटचा क्षण - भाग 31 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेवटचा क्षण - भाग 31


काही दिवसांनी प्रतिकचा साखरपुडा होता.. पण त्यासाठी जाणं गार्गीला जमलं नाही आणि कदाचित तीला वाटलं उगाच आपल्याला बघून प्रतीक विचलित होईल.. त्याने कठोर होऊन त्याच्या आयुष्याची वाटचाल सुरू केलीय तर त्यात आपण उगाच त्याला कमजोर करण्यापेक्षा आनंदाने त्याच्या या निर्णयात त्याला साथ द्यावी.. पण ज्यादिवशी साखरपुडा होता त्यादिवशी मात्र गार्गीच्या मनाची अवस्था खूपच चलबीचल झाली होती.. पण आज गौरव तिच्याजवळ होता.. त्याने तिला खूप प्रेमाने आणि धीराने सावरलं.. त्यामुळे गार्गीसुद्धा लगेच सावरली.. आणि गौरव सारखा समजून घेणारा नवरा मिळाला म्हणून त्याला आणि देवाला धन्यवाद देत होती..

तब्बल जवळपास एक महिन्यानंतर गौरवला ऑफिस मधून एक ऑर्डर आली त्यामध्ये असं लिहिलं होतं की त्याची काही दिवसांसाठी युके ला बदली करण्यात येत आहे या गोष्टीमुळे घरात थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं. आई बाबांना घेऊन जाणं त्याला शक्य नव्हतं आणि गार्गी आणि गौरांगीेला त्याला न्यायचं होतं पण आई-बाबांना येथे एकटं सोडून जाणे सुद्धा त्याला योग्य वाटत नव्हतं. गौरव आई-बाबांना म्हणू लागला की

गौरव - "तुम्ही काही दिवस गावाकडे किंवा ताई कडे राहायला जा आणि गार्गी आणि गौरांगीला मी माझ्यासोबत घेऊन जातो."

पण आई बाबांची कुणाकडे जाऊन राहण्याची अजिबात इच्छा दिसत नव्हती.. म्हणून गार्गीने गौरवला समजावलं की

गार्गी - "काहीच दिवसांचा प्रश्न आहे आणि आई-बाबा आपली जबाबदारी आहे त्यांना एकटे टाकून किंवा कुणाकडे पाठवून आपण असं जाणे योग्य नाही..तू खुशाल जा, तुझं काम झालं की परत ये, तीन चार महिन्यांचाच तर प्रश्न आहे ना.. आई-बाबा व गौरांगीला मी सांभाळेल.. "

त्याने गार्गीला सोबत चलण्यासाठी अनेक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला

गौरव - अग अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळणार.. नशिबाने मिळाली हवं तर आपण त्याचा फायदा घ्यायला हवा ना.. आपल्याला सोबत वेळ घालवायला मिळेल, आणि लंडन सारख नावाजलेलं शहर औडध फिरायला मिळेल.. किती लोकांचं स्वप्न असतं असं पण पूर्ण होत नाही.. आपल्याला जर असा वेळ घालवायला मिळणार आहे तर तू का नाही म्हंतेयेस??

गार्गी - आपण आई बाबांना नाही घेऊन जाऊ शकत का??

गौरव - अग त्यांचा पासपोर्ट च नाहिये तो येईल कधी आणि पुढे आणखी विजाची procedure मोठी आणि त्यातल्या त्यात आणखी अडचण म्हणजे इंग्लिश त्यांना नाही जमत.. आणि तिथे ते बोर होतील.. अग कधी इथेच ते आपल्याशिवाय स्वतःहून कधी घराच्या बाहेर जात नाही.. तिथे तर त्यांना अजिबातच करमनार नाही..

गार्गी - तूच म्हणतो की ते आपल्याशिवाय कधी बाहेर पडत नाही मग आपण जर दोघेही गेलो तर त्यांना इथे राहणं शक्य होईल का??

गौरव - अग मग काही दिवस गावाकडे किंवा ताईकडे राहतील.. काय हरकत आहे..

गार्गी - गौरव आपलं गावाकडे काहीच नाही आणि कुण्या नातेवाईकाकडे ते चार महिने इतके दिवस नाही राहू शकणार तुलाही माहिती आहे.. तसाच ताईच्या घरी राहण्याबद्यल पण.. आजपर्यंत ते 8 दिवसाच्या वर ताईकडे राहू शकले आहेत का?? त्यांना ताईबद्यल प्रेम आहे पण मुलीकडे जास्त दिवस राहणं त्यांच्या तत्वात नाही बसत अरे जुन्या विचारांचे आहेत ते..

गौरव - हो तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे.. त्याला आपण काय करणार.. हे तिकडे राहिले तर ताईलाही मदत होईल..

गार्गी - हो पण त्यांना नाही राहायचं तिच्याकडे जास्त दिवस, कितीही चांगलं असलं ना तरी ते तिथे नाही राहू शकत.. मी ऐकलं आईंना कितीदा बोलताना.. "मुलगी आणि जावयाचा घर शेवटी परकंंच असतं आपल्या घरात जो मोकळा श्वास घ्यायला मिळतो तस जवयासोबत असताना थोडं तरी ताण येतो.."

गौरव - तुला तर माहीत आहे ना जिजु किती चांगले आहेत ते कधीच यांना काही बोलणार नाही की कधी अपमान करणार नाही ते तर लांबची गोष्ट आहे कधी यांची गोष्ट सुदधा टाळत नाहीत ते.. तरी पण यांचे असे विचार आहेत.. त्याला आपण काय करणार..

गार्गी - आधीपासून याच विचारांत आयुष्य जगत आलेत ते गौरव आता तू म्हणशील की विचार बदला तर अस एकदम त्यांना नाही शक्य होणार.. त्यामुळे त्यांना असं टाळण्यापेक्षा त्यांची थोडी काळजी केली तर..

गौरव - म्हणजे??

गार्गी - म्हणजे काहीच दिवसांचा प्रश्न आहे.. तू एकटा जा मी इथे थांबते त्यांच्याजवळ म्हणजे त्यांना कुठे जायची गरज नाही पडणार आपल्याच घरात आनंदाने राहतील ते.. आणि त्यांचा आशीर्वाद असला तर आपल्याला नक्कीच पुन्हा संधी मिळेल.. पण त्याचं मन दुखावून आपण पण तिकडे निश्चिन्त नाही राहू शकणार..

गौरव - आणि मी तिकडे एकटा राहणार त्याच काय?? माझी काळजी नाही तुला??

गार्गी - आहे ना.. पण तू young आहे सद्धे स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि वरून स्मार्ट पण आहे एकटा कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो..

गौरव - हम्म ठीक आहे.. बघू नंतर कधी मिळाली संधी तर.. काळजी घे स्वतःची आणि सगळ्यांची...

अस म्हणत त्याने गार्गीला त्याच्या मिठीत घेतलं..

गार्गी - हो नक्कीच

म्हणत तिनेही मिठी पूर्ण केली..

गौरव - आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय गार्गी की तू माझ्या आई बाबांसाठी स्वतःच्या आनंदाची पर्वा केली नाही.. खरच थँक्स..

गार्गी - थँक्स म्हणायची अजिबात गरज नाही गौरव.. ते माझे ही कुणी आहेत ना, माझं कर्तव्य आहे ते.. आणि त्यांनी पण माझ्यासाठी खूप काही केलंय.. मला गरज असलेल्या काळात त्यांनी माझी किती काळजी घेतलीय.. मग मी माझ्या कर्तव्याला चुकवून कोणतं सुख मिळवणार आहे आणि ते असं किती काळ टिकणार आहे .. . बस तू तुझं काम आटपून लवकर ये..

गार्गी गौरवसोबत जायला तयार झालीच नाही शेवटी नाईलाजाने तो एकटाच लंडन ला निघून गेला..

तो गेला पण आता गार्गीला पुन्हा थोडा एकटेपणा आणि ताण जाणऊ लागला.. एक दिवस गार्गीचे सासुसासरे घरात झोपले होते आणि गार्गी गौरांगीसोबत हॉल मध्ये खेळत होती.. खेळता खेळता ती उभी झाली तशी अचानक तिच्या डोळ्यापुढे सगळं धूसर झालं आणि ती धाडकन खाली कोसळली.. ती पडल्याचा आवाज आणि त्यात आई पडली म्हणून गौरांगीने जोरात रडायला सुरुवात केली.. अजून नीट बोलता येत नव्हतं पण आई जवळ जाऊन ती

"आई ऊ, आई ऊ " एवढंच बोलत होती..

गौरंगीच्या रडण्याचा आणि काही पडल्याचा आवाज आला तसे गार्गीच्या सासुसासरे लगेच बाहेर आले आणि बघतात तर काय गार्गी चक्कर येऊन पडली होती.. तिला तस बघून ते पण एकदम घाबरून गेले पण थोडं धीराने घेत त्यांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं आणि तिला जाग आली.. डोकं अजुनही गरगरत होतं, आणि अंगात ताप होता.. तस त्यांनी तिला डॉक्टरांकडे जायला सांगितलं.. कारण तीच चक्कर आणि ताप याच प्रमाण थोडं वाढलं होतं..

आता सगळी भिस्त आपल्यावर आहे तेव्हा आपल्याला अस आजारी पडुन नाही चालणार म्हणून ती तयार झाली.. पण सदधे तरी तिची चालण्याची परिस्थिती नव्हती. तेव्हा ताप उतरण्याची औषधी आणि निंबुपाणी घेऊन तिने थोडा आराम केला आणि नंतर पिल्लुला आजी आजोबांकडे ठेऊन ती स्वतःच एकटी तिथल्याच जवळच्या जनरल डॉक्टरांकडे गेली.. तिचे सासरे सोबत येतो म्हणून म्हणत होते.. पण आईला गौरांगीला ऐकट्याने सांभाळायला शक्य होणार नाही म्हणून तिने नाही म्म्हंटलं आणि एकटीच निघाली..

त्यांनी अशक्त पणामुळे होऊ शकते अस म्हणत काही गोळ्या दिल्यात आणि एका डॉक्टरचा रेफरन्स दिला आणि त्यांच्या कडे जाऊन एकदा दाखवून द्या म्हणून सांगितलं.. तो रेफरन्स एक न्यूरोसर्जनचा होता..

दुसऱ्या दिवशीच ती सगळ्यांच्या आग्रहाखातर त्या डॉक्टर कडे गेली.. त्यांनी तिच्या काही चाचण्या करून घेतल्या काही जुजबी विचारपूस केली.. आणि दोन दिवसांनी रिपोर्ट न्यायला या म्हणून सांगितलं.. पण आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे "परत येताना ऑटो किंवा कॅबने या.. गाडी चालवत येऊ नका.. " तिला थोडं विचित्रच वाटलं.. पण "ठीक आहे " म्हणत ती तिथून निघाली.. दोन दिवसांनी पुन्हा रिपोर्ट्स घ्यायला गेली ..

डॉक्टर - ये गार्गी.. एकटीच आलीयेस का?सोबत कुणी नाही??

गार्गी - हो सर, ते गौरव म्हणजे माझे मिस्टर इथे नाहीत आणि लहान मुलगी आहे तिला आजीआजोबांकडे सोडून आली आहे..

डॉक्टर - अच्छा.. आता तुला कस वाटतंय??

गार्गी - ठीक आहे मी डॉक्टर पण डोकं सारख जड असल्यासारखं वाटतं.. कधी कधी एखादी कळ डोक्यात निघते आणि डोकं ठणकायला लागतं.. कधीतरी अचानक डोळ्यापुढे अंधारी येते.. मी तर जेवण करते डॉक्टर पण एवढा अशक्तपणा का येतोय तेच कळत नाहीय..

डॉक्टर - कधीपासून होतंय तुला असं??

गार्गी - हे तर इतक्यात होतंय, जवळपास 9 10 महिन्यांआधी कधीतरी जास्त विचार केला किंवा ताण आला की मला ताप यायचा आणि डोकं दुखायचं.. पण तापाची गोळी घेतली की सगळं व्यवस्थित होऊन जायचं..

डॉक्टर - आणि तेव्हा तु दुर्लक्ष केलं स्वतःकडे..

गार्गी - म्हणजे??

डॉक्टर - म्हणजे तो फक्त अशक्तपणा किंवा ताण नव्हता.. ते एका भयंकर आजाराच्या पाऊलखुणा होत्या..

गार्गी - कसला आजार डॉक्टर..

डॉक्टर - ब्रेन ट्युमर..

गार्गी - काय?? पण मी ठीक आहे..

डॉक्टर - खरंच??

गार्गी शांत बसली..

डॉक्टर - ट्युमर बराच वाढला आहे.. आपल्याला लवकरात लवकर ओपरेशन करावं लागेल अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो..

गार्गी - डॉक्टर आपल्याला आणखी 2 महिने थांबता येईल का??

डॉक्टर - नाही या 15 दिवसांतच करावं लागेल.. इतका जास्त वेळ दिला तर तो वाढून केस हाताबाहेर जाईल..

गार्गी - डॉक्टर मी सद्धे ओपेरेशन नाही करू शकत.. माझा नवरा गौरव कामानिमित्त देश बाहेर गेला आहे.. आणि माझे सासू सासरे वयस्कर आहेत आणि ते एकटे कधी घराबाहेर पडत नाहीत.. माझं ओपेरेशन झालं तर त्यांचं आयुष्यच थांबून जाईल.. सद्धे घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे..

डॉक्टर - सगळं ठीक हे पण जीवापेक्षा जास्त काही आहे का?? गौरवला तू आजच फोन करून इकडे निघून यायला सांग.. किंवा कुणी आणखी येऊ शकत असेल तर त्यांना बोलावून घे..

गार्गी - डॉक्टर जर ओपेरेशन केलं तर मी कायमस्वरूपी बरी होईल का?? म्हणजे पुन्हा अस होणार नाही याची कितपत शाश्वती असेल??

डॉक्टर - थोड आधी आली असती तर मी गौरेंटी घेऊ शकलो असतो पण आता तो थोडा वाढला आहे.. तर पूर्ण बरी होशीलच किंवा पुन्हा तो वाढणार नाही अस मी तरी गैरेंटी ने नाही सांगू शकत पण हो झाला तर होऊनही जाईल अन्यथा काही नाही तर तुझं आयुष्य तरी वाढेल..

गार्गी - ठीक आहे डॉक्टर .. आपले खूप खूप धन्यवाद.. मी कळवते तुम्हाला लवकरच..

अस म्हणून ती डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडली.. पण पुढे काय करायचं हाच विचार तिच्या मनात घोळत होता..

------------------------------------------------------


क्रमशः