शेवटचा क्षण - भाग 30 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेवटचा क्षण - भाग 30

सकाळी गार्गी उठून एकदम आनंदाने घरात वावरत होती.. तिला वाटलं आज तिला गौरव गिफ्ट देणार आहे आणि तो कुठल्या अंदाजाने देतोय हे तिला बघायचं होतं.. पण त्याच्याकडे बघितलं असता त्याच तस काहीच त्याच्या वागणुकीवरून वाटत नव्हतं.. अगदी रोजच्या सारख त्याच रुटीन सुरू होतं..

गार्गीने काल बॅग उघडून बघितलेच त्याला माहितीच नव्हतं.. तो योग्य वेळेची वाट बघत होता खरंतर सगळ्यांसमोर ते गिफ्ट त्याला गार्गीला द्यायचं नव्हतं, त्याने आज थोडा वेगळा विचार केला होता..

गार्गीने दिवसभर वाट बघितली रात्रीही झोपायला जाईपर्यंत ती वाट बघत होती.. पण गौरव मात्र अजूनही तसाच त्याने गिफ्ट दिलं पण नाही आणि काही बोलला पण नाही.. म्हणून नाराज मनाने गार्गी गौरांगीला घेऊन तिच्या खोलीत झोपायला गेली.. गौरांगीला झोपवून स्वतः झोपणार तेव्हढ्यात तिच्या खोलीच्या दारावर दार खटखटन्याचा आवाज आला.. तिने दरवाजा उघडला तर गौरव होता..

गौरव - झोपली होती का??

गार्गी - नाही बस आता झोपणारच होते..

गौरव - पिल्लू झोपलं??

गार्गी - हो ती पण आताच झोपली..

गौरव - तुझ्याशी बोलायचं होतं, तुला झोप येतेय का??

गार्गी - नाही झोप तर नाही आली बोल ना..

गौरव - मी आत येऊ??

गार्गी - हो ये ना..

त्याला खोलीत घेऊन तिने दरवाजा बंद केला..

हा बोल काय म्हणत होता??

गौरव - पिल्लू उठते का ग मधात कधी??

गार्गी - नाही आता नाही उठत झोपते ती निवांत.. का तुला झोपायचं आहे का इकडे?

गौरव - अ.. मी म्हणत होतो आज किती छान चांदणं पडलंय ना तर आपण बाल्कनी मध्ये जाऊन बोलूया का?? म्हणजे आपल्या आवाजाने पिल्लू उठणार नाही आणि नीट बोलता येईल..

गार्गी - हो चालेल..

गौरव - ठीक आहे ... तू हो पुढे मी आलोच सतरंजी घेऊन..

गार्गी बाल्कनीकडे वळली आणि गौरव लगेच एक सतरंजी आणि सोबत ते गिफ्ट घेऊन बाल्कनी मध्ये शिरला..
सतरंजी गार्गीकडे देऊन तिला ती टाकायला सांगितली आणि गिफ्ट मागे लपवलं.. दोघेही सतरंजीवर खाली बसलेत..

गार्गी - काय झालं गौरव?? काय बोलायचं आहे?? सगळं ठीक आहे ना??

गौरव - नाही ना काहीच ठीक नाहीय, बस तेच ठीक करायचं आहे म्हणून आज बोलायचं होतं.. एक मिनिट.. डोळे बंद कर..

तिने डोळे झाकलेत.. आणि तिला कळलं की हा नक्की मला गिफ्ट देणार आहे म्हणून मनातून ती खूप आनंदी झाली होती पण तसं चेहऱ्यावर काहीच न दाखवता शांत राहिली.. त्याने हळूच ती काचेची सुंदर शिल्ड गार्गीच हातात ठेवली आणि डोळे उघडायला सांगितले.. तिने तर कालच बघितलं होतं पण त्याला काही कळू नये आणि त्याने surprise दिल्याचा आनंद त्याला मिळावा म्हणून ती त्याच्या समोर ते गिफ्ट अगदी पहिल्यांदा बघतेय अस दाखवत होती.. आणि खरच ते पुन्हा बघताना सुद्धा गार्गीला ते गिफ्ट आणखी जास्त आवडलं होतं कारण ते गौरवने तिला दिलं होतं.. अस आधी कधी घडलं असतं तर गार्गीने अगदी आनंदाने गौरवला मिठी मारली असती पण 2 वर्षांमध्ये त्याच्यात आलेल्या दुराव्यामुळे थोडस तिला ऑकवॉर्ड होत होतं म्हणून फक्त हसून तिने त्याला धन्यवाद दिलेत... गार्गीच्या या वागण्यावरुन गौरवला त्याच्यात निर्माण झालेल्या दुराव्याची जाणीव प्रकर्षाने झाली ..

गार्गी - खूप सुंदर आहे गिफ्ट.. मला खूप आवडलं.. खूप खूप धन्यवाद😊

गौरव - खरंच आवडलं ना??

गार्गी - हो रे खूप खूप आवडलं मला ,पण आज अस अचानक काहीही नसताना तू माझ्यासाठी असं गिफ्ट का आणलं??

गौरव - आज काहीच नाही का?? किती वाजलेत बघ?? दुसरा दिवस लागलाय.. 12 वाजून गेले आहेत.. आज तर खूप स्पेशल दिवस आहे.. आजच्या दिवशी मी गिफ्ट दिल तास तू पण मला देऊ शकते, खरंतर द्यायलाच हवं तू ..

गार्गी - आजच काय या अख्या महिन्यात काहीच स्पेशल असल्याचं मला आठवत नाही..

गौरव - अग आज तो दिवस हे ज्यादिवशी आपलं लग्न पक्क झालं होतं.. आजच्याच दिवसामुळे आपण एकमेकांच्या आयुष्यात आहोत.. मग सांग आहे की नाही स्पेशल??

गार्गी - अरे हो, मी तर विसरूनच गेली होती हे... हो हो आहे खरच स्पेशल दिवस आहे..

गौरव - आहे ना मग चाल माझं गिफ्ट दे.. मला पण गिफ्ट हवंय..

गार्गी - आता?? आता मी काय गिफ्ट देऊ, मी काहीच आणलं नाहीये.. बाहेर गेली की आणेल तेव्हा देईल..

गौरव - नाही मला तर आताच हवंय?? आणि ते बाहेरच वगैरे काही आणून नकोय.. तू आता जे देऊ शकते ना तेच हवंय मला..

गार्गी - काय?? काय हवंय??

त्याने तिच्या हातातून गिफ्ट घेत अलगद बाजूला ठेवलं.. आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन तिच्या नजरेत नजर रोखून बोलू लागला..

गौरव - मला माझी पूर्वीची गार्गी हवीय, माझ्या मूर्खपणा मुळे आणि माझ्या चुकीमुळे माझ्यापासून दुरावलेलीे माझी गार्गी मला परत हवी आहे.. माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी गार्गी मला हवी आहे.. आपल्यातले संबंध पुन्हा आधीसारखे व्हावेत अशी माझी इच्छा आहे.. तू पुन्हा मला तुझ्या मनात जागा द्यावी हेच मला हवं आहे.. खूप विचित्र वागलो ना ग मी.. थोडा स्वार्थी झालो होतो, माझी झोप झाली पाहिजे मला दिवसभर काम करायचं असते हाच विचार करत बसलो पण तुला आणि पिल्लुलाही माझ्या सहवासाची गरज असू शकते हा मात्र कधी विचारच नाही केला आणि हो त्यात थोडी तुझी आणि पिल्लुची काळजी सुद्धा होती.. तुम्हाला तुमची privacy मिळावी म्हणजे कधी तुला तिला दूध द्यायचं आहे वगैरे तेव्हा तुला उगाच माझ्यासमोर awkward वाटू नये म्हणून .. आणि माझ्यामुळे तुझी किंवा पिल्लुची झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणून सुद्धा मी तुमच्याकडे झोपायचं टाळत राहिलो.. कारण एकदा आई बोललेली मला की मी खूप जोरजोरात घोरतो आजकाल.. खरंच फक्त हाच उद्देश होता माझा.. पण या काळजी मुळे जर मी तुलाच गमावून बसणार असेल तर काय कामाची ती काळजी?? आणि या काळजीच्या नादात माझं तुझ्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याला खरच काळजी म्हणता येईल का? तू बोलून सुद्धा मी मनावर घेतले नाही पण आज माझी चूक जाणवत आहे मला.. खरच गार्गी मी आजही तुझ्यावरच प्रेम करतो.. खूप खूप प्रेम करतो.. मला माफ करशील का??

गौरव बोलत होता.. आणि दोघांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. गौरवने आपलं बोलणं संपवलं आणि गार्गीने सरळ त्याला कडकडून मिठी मारली.. आणि अगदी हुंदके देतंच रडायला लागली.. गौरवनेही मिठी आणखी घट्ट करत तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.. याच मायेच्या स्पर्शासाठी ती कधीची झुरत होती.. त्याने तिला त्याच्या मिठीत मनसोक्त रडू दिलं.. आणि तो ही आसवं गाळतच होता.. भावनांचा सर ओसरला आणि डोळे पुसत गार्गी त्याच्या मिठीतुन बाजूला झाली..

गार्गी - मी पूर्वीचीच गार्गी आहे गौरव .. तुझी गार्गी .. पण तू माझा गौरव राहिला नव्हता.. पण आज अस वाटतय की मला माझा आधीचा गौरव मिळाला.. आज खरच खूपच खास दिवस आहे एकाच आयुष्यात आजच्या दिवशी मी दोन दा तुला मिळवलंय.. मी कधीची वाट बघत होते तुझी.. तू अस का वागतोय मला कळतच नव्हतं, तुला माहिती आहे किती किती आणि काय काय विचार करत होते मी.. त्यामुळे मला कित्येकदा रात्र रात्रभर झोप लागत नसे.. अरे तेवढाच नाही तर आपल्यातले संवाद देखील किती कमी झाले होते.. अगदी कामपूरतं बोलायला लागलो होतो आपण..

गौरव - त्या सर्वांसाठी मला खरच माफ कर ग माझी राणी.. मी पुन्हा अस खरच कधीच नाही वागणार..

गार्गी - हम्म.. जाऊ दे आजचा दिवस चांगला आहे ना मग गेल्या दिवसांवर जास्त विचार नको करायला.. बरं गिफ्ट काय देऊ मी तुला?? तुझी गार्गी तर आधीपासूनच तुझी आहे.. दुसरं काहीतरी माग..

गौरव -हम्म.. खरंतर मी तुला मिठीच मागणार होतो पण ती तर मला न मागताच मिळाली.. आता दुसरं काही मागायला हवं नाही का??

अगदी खट्याळ नजरेने तिच्याकडे बघत..आणि ओठांच्या कोपऱ्याला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा लावत तो बोलला.. तशी गार्गी एकदम लाजली..

गार्गी - चल, तुझ आपलं काहीतरीच असतं..

अगदी लाजून खाली बघतच ती बोलली..

गौरव - अरे वाह.. किती गोड लाजतेय बघ.. गालावर काय सुंदर लाली आलीय.. तू अशीच माझ्या समोर लाजत राहिली तर मी कसा मला कंट्रोल करू सांग..

गार्गी - कंट्रोल करायलाच हवं आहे का मग??

गार्गीच्या बोलण्याचा अर्थ कळून तो तिच्या बाजूने सरकला आणि तिच्या कानाच्या पाळीला ओठ टेकवत बोलला..

गौरव - अच्छा.. ठीक आहे नाही करत.. पण नंतर मला दोष नको हा देऊस..

त्याच्या इतक्या दिवसानंतरच्या स्पर्शाने तीही शहारली.. आणि वळून थोडं लाजतच पुन्हा त्याच्या मिठीत शिरली.. त्याने हलकेच त्याच्या हाताने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला.. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.. तीच्या ओठांची हालचाल त्याला आणखी मोहक वाटत होती.. तसेच त्याने हळूच तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये कडीबंद करून घेतले.. आज किती तरी दिवसांनी ते दोघेही एकमेकांमध्ये पुन्हा गुंतले होते..

यादिवसापासून दोघांमध्येही पुन्हा सगळं सुरळीत झालं होतं.. गार्गीच्या तब्येतही आता चांगली राहत होती .. तिच सुख तिचा आनंद तिला परत मिळाला होता.. पण तो खरच आणखी किती दिवस टिकणार होता देवालाच माहिती..

क्रमशः

-------------------------------------------------------------