जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 4 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 4

भाग-- 4 सई आणि साहिल व त्याची टीम फायनल परीक्षा देण्यास जातात टीचरानी त्या छान शब्दात स्वागत केल. सगळ्या मुलांनी प्र्तीउत्तर छान दिल. बोल-बोल म्हणता परीक्षा संपत आली. आज शेवटचा पेपर होता. पेपर संपल्या वर एकत्र जमले. सई--सर्वाना म्हणली पेपर कसे गेले. ''तसे छान गेले पण बघू मार्क पडल्यावर.'' .. एक जण म्हणला. सगळे एकमेकांना विचारत होते तु कुठे जाणार??-? सुट्टी कशी घालवणार. कोणी म्हणे मी मामाच्या गावाला जाणार, कोणी म्हणे मी मावशी कडे जाणार!!!! साहिल सई मात्र काही बोलत नव्हती. कोणी तरी म्हटल!!!! अरे तुम्ही कुठे जाणार.... अरे ते कुठे नाही जाणार त्यांना एकमेकांशी बोल्याशिवाय करमत नाही त्याच्या तील एकजण म्हणली. आमच्या सगळ्या तुमची मैत्री खुप आवडते. खरंच.... सगळे एकमेकांना. हातात हात देत जल,येतो, बाय, टाटा करत सगळे घरी जातात. साहिल सई पण आपल्या सायकल वरून घरी येतात. वाटेत एक आंब्याचे झाड लागते. सई कैरिचा हट्ट करते. साहिल तिच्या साठी छान असा कै ऱ्या काढतो. थोडावेळ झाडा खाली बसून कैरी खतात. मग घरी येतात. बाबा आज लवकर घरी आलेले असतात. सई दारातूनच, ''आया, बाबा तुम्ही आज लवकर किती माज्या!!!!? सोप्यावर दप्तर फेकते.. बाबा--...अग चिमुकले काय एवढ खुश!?! ''आणि हो पेपर कसे गेले. ''मस्त बाबा!!!! ऐतक्यत आई येते. आई--...हो का रिजल्ट लागल्यावर कळेल ....हो!!! हो!!!'' बघच तु मी आणि साहिल पहिल्या नंबर येणार.'' बाबा--.....हो आहेच माझी चिमुकली हुशार!!! सई मोठ्या तोऱ्यात.... शर्ट ची कॉलर उडवत... मग, सई म्हणतात मला .!!!!!फ्रेश वयाला आत जाते. आई बाबा चकित होतात आणि ती गेली तरी तिच्या पाठी मागील आक्रुतीकडे पाहत राहतात. . .....दुसऱ्या दिवशी नऊ वाजले तरी सई उठत नाही. आई आवाज देते.. ''अग सई उठ किती वाजले.'' सई-,-....'अग आई सुट्टी आहे. झोपू देना .'' आई--....''माझ सगळ काम झाले आहे आणि मी शेतावर जाणार आहे.'' त्या बरोबर ती ताडकन उठली. डोक्यात टपली मारत छे!! बाई आता साहिल रागवनार ठीक नऊ वाजता शेतावर भेटणार होतो. घड्याळाकडे बघत.... चल!!! चल!??? सई वाजून गेले. स्वतःशी बडबडत असते..... सई---,,अग आई मला पण यायचे आहे. आंघोळीच पाणी काढणा... पिल्जि आई!!! माझी आई!!!! आईची गोड पापी घेते.. आई काढून ठेवलय जा!!!! ती जाते. आई बाहेरून लवकर उरक साहिल मगाशी येऊन गेला. मला का नाही उठवल सई-,-......तुझी झोप मोड नको म्हणुन, गेला तसाच. सई व आई शेतात येतात. सुदामा रमा, साहिल शेतात काम करत होते.सईला, सुमन ला पाहून ते झाडाखाली आले. साहिल सई वर रागावले तेवढ्यात तिने एक छान डिजाइन केलेले ग्रीटींन कार्ड साहिला दिल .ते त्याने उगडले. त्यात सुंदर अक्षरात happy हॉलिडे सुंदर फुलपाखरू रेखाटले होते.. साहिल--......खुप छान !!!! सुमन अरे रात्री जागुन केलंय.. सई--...मला नाही आणल.!!!! साहिल।खिशातून छान असा कैऱ्या काढतो... वा!!!!!! मस्त!!! पण तु माझ दिलेले जपून ठेवशील आणि मी तेव्हा सगळे हसतात. साहिल--......''अग, वेडे तु मनात जपून ठेव..'' हो...... आणि ती कैरी खात बसते. ....... गप्पा मारत ओल्या भिमूगाच्या शेंगा खाऊन।झाल्या. रमा चला आ ता , सई आई मी पण..... सुदामा-,-....नको सई खुप ऊन आहे. सुमन--....तुम्ही आम्हाला इथे आणून दया आम्ही तोड्तो..... मला आवडत. सुमन आग्रहा मुळे सुदामा तयार झाला. दिवस भर सर्वानी भरपूर शेंगा तोड ल्या ..... सुट्टी चे काही दिवस असेच गेले... आज रिजल्ट दिवस सई ची लगबग सुरु झाली. साहिल ही लवकर तयार झाला. सई आईचा आशिर्वाद घेऊन रमा चा आशिर्वाद घेण्यास आली. दोघे ही रमा ला नमस्कार करतात..... रमा ....''.सुखी रहा.. व पहिल्या नंबर नी पास व्हा...'' .. दोघे शाळेत जातात. बाकी ची टीम पण येते हाय!!! हॉलो!!!!! एकमेकांना करतात. रिजल्ट ची वेळ होते. सगळे जातात. सगळे आप आपला रिजल्ट घेतात. तुला किती ,,!!!!! तुला किती!!!!!!? असा एकच गोंधळ उडालेला असतो. आई साहिल चा रिजल्ट पाहतात. दोघांना ही खुप छान marks पडलेले असतात. दोघांनचा पहिला नंबर आलेला असतो. सई----,.....एस!!!! एस!!! करून ओरडत असते.. सई साहिल अभिनंदन सगळे कैतुक करतात. शिक्षक सुद्दा अभिनंदन करतात. सई घरी बाबांची वाट पाहतअसते. तीला वाटते कधी एकदा बाबांना सांगते त्यांना खुप आनंद होईल. आणि त्यांनी केलेले प्रॉमिस ..... ..... ''सई ये सई अभिनंदन चिमुकले बाबा घरात येताच आवाज देतात.''सई --....''..बाबा तुम्हाला कस माहीत.'' बाबा,--.......अग,, चिमुकले मला माहीत होत. सई-.......तुम्ही मला प्रॉमिस....... बाबा--.....हो नकीच..... सुमन--..अभिनंदन सई!!!!!! सई--..Thanks आई. सुमन--..अग साहिल च पण अभिनंदन करायला हव. तुम्ही फ्रेश व्हा मी तुमच्या साठी कॉफी आणते.. आणि सई साठी गोड खाऊ. मधुकर--...आपण सगळे साहिल च अभिनंदन करायला जाऊ. सगळे साहिलचया घरी येतात. सुदामा अंगणातच असतो. अरे, मित्र मधु ये, सुदामा म्हणतो. मधुकर .......अरे. सुदामा आपली मूल पहिली आली. साहिल, मधुकर सूमनला नमस्कार करतो. मधुकर...... .. उठ बाळा, खुप खुप मोठ. माझ्या पेक्षा ही मोठ ओपीसर हो... मधुकर खिशातून काही पैसे काढतो व साहिला देतो. सुदामा........ अरे हे कशा ला!!!!! मधुकर..... तूझ्या साठी राहू दे मधुकर दोघांना ही एक दिवस फिरायला घेऊन जातो. खुप मस्ती धमाल करतात. . हल्ली मधुकरला खुप काम असते. एक दिवस तो नेहमी प्रमाने कामावर गेला होता. मस्त मूढ असतो . सगळ्याला सई साहिल यांच्या बद्दल सांगत असतो. तो खूपच आनंदात होता. तेवढ्यात रामू गरम गरम कॉफी घेऊन आला. मग काय सोने पे सूहगा. त्याला कॉफी खुप आवडते. तेवढ्यात राणे म्हणला. अरे यार मधु तु काय बोलायच ते बोलून घे. तो हिटलर म्हणजे बॉस येण्याची वेळ झाली. नाही तर सगळा मूढ हाप करेल. त्याला कुणाच्या भावनांशी काही वाटत नाही. सगळे मस्त गप्पा मारत कॉफी पिऊन झाली .बॉस ची इन्ट्रि झाली सगळे तोंडाला कुलूप लाऊन बसले. थोड्या वेळाने मधुकरलाबॉसने बोलवल .दरवाज्याला लॉक करत सर आत येऊ. बॉस हाताने खुणावत बसा. मधुकर वाटल..... काही तरी गोड बातमी असेल...... बॉस........'' मिस्टर मधुकर हे लेटर. खोला आणि पहा'' मधुकर लेटर खोलात हो सर, पाहतो तर काय त्यात मुंबई ला एक मोट्या कंपनी च लेटर होत. बॉस.... 'मिस्टर मधुकर तुम्हाला चार दिवसात जावे लागेल. तिथे तुमची सगळी सोय केली आहे.'' मधुकर ..........हो सर!!! खरं तर मधुकरला खुप चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण सुदामा व त्याच्या कुटुंबाला आपण दूर वानर।तो घरी येतो. सुमन चहा देते. तो आपल्याच विचारत असतो. तेव्हा सुमन त्याला कारण विचारते. तो लेटर दाखवतो. ती ही उदास होते. सगळे कस काय जमणार ...या विचारत असतात. सुदामा येतो. दोघाचे उदास चेहरा पाहून..काय झाला सुदामा म्हणतो. सुमन लेटर देते. तो ही उदास होतो. पण म्हणतो. अरे चांगले दिवस आले. हा तर आनंदचा दिवस आहे. मा स्वाभिमान आहे. माझ्या मित्राला येवढी छान नोकरी मिळाली. मधुकर.......' अरे पण आपली भेट.,,'' मला शेताच्या कामासाठी याव लागत. मी येऊल तुला भेटायला. सई साहिल लहान आहेत. नवीन मित्र मैत्रिनि झाल्या कि पडेल विसर. .सुदामा हे सगळ खाली मान खालुन बोलत होता. मधुकर च्या चेहऱ्याकडे पाहुन बोलायची हिमत नव्हती. नाही तर डोळे अश्रू नी भरले असते.