शौर्य खुप घाबरून गेला होता.. वरातीच्या गर्दीतील माणसांमध्ये लपुनच तो आत शिरला.. आत शिरताच जेवण बनवण्यासाठी एक खोली त्याच्या नजरेस आली.. क्षणाचाही विलंब न करता तो त्या खोलीत शिरला.. शौर्य अस लपुन छपुन कुठे चाललाय?? म्हणुन मनवी ही त्याच्या मागे त्याला बघायला त्या रूममध्ये शिरली.. शौर्य लपायला कुठे जागा मिळते का बघु लागला.. तोच भिंतीच्या कडेला टेकुन ठेवलेला भला मोठा पाण्याचा ड्रम त्याला दिसला.. ड्रम आणि भिंत ह्यांच्या मधोमध असलेल्या फटीत शिरून तो लपून बसला.. इथे अस किती वेळ त्याला लपुन रहावं लागेल हे त्याचं त्यालाच माहीत नसतं.. हृदय मात्र जोरात जोरात धडधडत होते.. अनिताचे शब्द आठवुन त्याला आता जाणवलेल की त्याने इथे येऊन खुप मोठी चुक केली होती.
"तु असा का लपलायस इथे???", घाबरून बंद केलेले डोळे त्याने मनवीच्या आवाजाने उघडले...
शौर्य : "हे मी तुला विचारायला हवं.. मनवी प्लिज तु इथून जा.. प्लिजsss"
मनवी : "मी का जाऊ...?? आधी सांग तु अस का लपलायस ते.."
शौर्य : "माझा डॅड इथे आलाय. त्याला कळलं ना की मी मुंबईत आलोय तर मला दिल्लीत परत पाठवणार नाही तो... मला इथुन खुप लांब पाठवेल तो जिथुनमाझीइच्छा असुन सुद्धा मला परत येता येणार नाही.. बाकीची उरलेली स्टोरी मग सांगतो पण तु आत्ता जा इथून.."
मनवी काहीही न बोलता शौर्यकडे बघत तिथेच उभी राहिली. शौर्य तिला विनवण्या करत तिथुन जायला सांगतात पण ती मात्र कोणत्या तरी वेगळ्याच विचारात हरवुन गेली..
इथे वृषभ विराजला घेऊन समीराच्या घरी आला त्याला वाटलं की शौर्य कदाचित रूममध्ये आला असेल..
"शौर्यsss.. ए शौर्यsss..", वृषभ रूममध्ये त्याला आवाज देत फिरत होता पण शौर्यचा प्रतिसाद त्याला काही येत नव्हता...
वृषभ : "इथे नाही आला वाटत तो..मी सगळीकडे बघितलं"
टॉनी : "फोन सुद्धा उचलत नाही आहे तो."
"मला मी काय करू कळत नाही.",विराज डोक्यावर हात ठेवुन रडु लागलेला.
टॉनीने पुन्हा फोन लावला.. ह्या वेळेला शौर्यने फोन उचलला..
"अरे आहेस कुठे तु..", टॉनी ने फोन स्पीकरवर ठेवत शौर्यला विचारलं.. शौर्यने क्षणाचाही विलंब न करता त्याला तो कुठे आहे ते सांगितलं आणि फोन कट केला..
तिघेही पळतच पुन्हा हॉलवर जायला निघाले.. इथे सुरज आणि त्याची माणस हॉलवर शौर्यला शोधु लागले..
शोधता शोधता ते लोक जेवण बनवण्याच्या खोलीत घुसले..
"इथे कोणा एका मुलाला पळताना किंवा लपताना तुम्ही बघितल का..??" सुरजचा धारधार आवाज शौर्यच्या कानावर पडला.. शौर्य मनवीकडे बघत स्तब्ध झाला..
"एक मुलगा इथे गेलाय खर, ती बघा ती मुलगी दिसते ना तिथे..", मनवीकडे बोट दाखवतच जेवण बनवऱ्या एका आचारीने सुरजला सांगितलं..
सुरजने त्याच्या माणसांना तिथं जाऊन बघायला सांगितलं तस ती माणसं मनवी आणि शौर्यच्या दिशेने जाऊ लागली..
"शौर्यने भीतीने आपले डोळे अगदी घट्ट बंद करून घेतले असतात.. अचानक मनवी त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवुन त्याच तोंड आपल्याजवळ करू लागली..
"ह्ये !!व्हॉट आर यु डुइंग??" शौर्य मनवीचा हात झटकतच हळु आवाजात बोलला..
"जस्ट सी एन्ड वोच..", त्याच्या गालावरून आपली चाफेकळी फिरवतच ती बोलते.. शौर्य पुन्हा तिचा हात झटकतो आणि तिला सुद्धा थोडं लांब ढकलतो पण ती पुन्हा त्याच्या जवळ आज आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टाकते..
"जर आपण अस राहिलो तर ती माणस तिथुनच जातील..", त्याच्या नजरेत बघतच ती बोलते.
शौर्य आता मनवीच्या अश्या वागण्याने इरिटेट होत होता.. तो तिला काही बोलणार पण पुन्हा सुरजचा आवाज आला..
"लवकर बघा.. तिथे कोण आहे ते..", सुरज मोठ्यानेच ओरडतो..
तसा शौर्य डोळे मिटुन शांत बसतो..
सुरजची माणस हळूहळू पुढे येऊ लागली.. मनवीने शौर्यच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्याकडे बघत असते..
सुरजच्या माणसांना मनवी एका मुलाला मिठी मारतेय अस वाटलं.. पुढे अजुन काही विचित्र बघायला नको अस बोलुन ते तिथुन निघाले आणि शौर्यला बाहेर शोधु लागले..
शौर्य डोळे मिळुन तसच असतो आणि मनवी त्याच्या गालावर पडलेली सुंदर अशी खळी बघण्यात हरवुन गेली असते.
"हे काय चाललंय..?", रोहनच्या आवाजाने मनवी भानावर येते..
शौर्य पासुन लांब होत ती रोहनकडे बघते..
"तु...तु कधी आलास???", मनवी घाबरतच रोहनला बोलते.
"ते महत्वाचं नाही तुम्ही दोघ इथे काय करताय ते महत्वाचं आहे माझ्यासाठी..", रोहन थोडं रागातच बोलत होता.
मनवी : "ते तु शौर्यलाच विचार तो सांगेल.."
शौर्यच लक्ष रोहनच्या बोलण्याकडे नसत.. तो सुरज आणि त्याचे इतर साथीदार तिथे दिसत आहेत का ते बघत असतो..
"शौर्य मी काही तर विचारतोय.", रोहन रागातच शौर्यवर ओरडतो..
"तुला एवढ भडकायला काय झालं??", शौर्य रोहनला शांत करत बोलला..
रोहन : "भडकु नाहीतर काय करू.."
शौर्य : "रोहन यार प्लिज हळु बोल.."
रोहन : "का हळु बोलु मी?? काय चालु होत तुम्हां दोघांच इथे.. "
शौर्य : "रोहन मी पाया पडतो यार तुझ्या प्लिज हळु बोल.. तिथे...
"तुम्ही दोघ इथे काय करत होतात शौर्य??", शौर्यला मध्ये थांबवत सरळ त्याची कॉलर धरतच रोहन बोलतो
"हि इथे काय करत होती ते मला नाही माहीत.. आणि माझी कॉलर सोड.. मीssss" शौर्य पुढे काही बोलणार तोच वृषभ, टॉनी आणि विराज त्याला शोधत तिथे आले..
रोहन : "मी काय??"
रोहनच मागून आलेल्या वृषभकडे लक्षच नव्हतं..
"विरss", विराजकडे बघत घाबरतच तो बोलतो..
विराज रागातच त्याच्या जवळ येत असतो.. त्याच्या पुढ्यात उभ्या असलेल्या रोहनला तो बाजुला ढकलतो..
"विर सॉरी.. प्लिज ऐकुनsss.....",शौर्य पुढे काही बोलणार तोच विराज ने सनसनीत त्याच्या कानाखाली मारली..
"विर सॉरी ना.. प्लिज", शौर्य रडतच त्याला बोलु लागला..
पण विराज काही ऐकुन घेत नव्हता.. तो पुन्हा पुन्हा त्याच्यावर हात उचलत असतो.
"तरी विचारलेल होत मी तुला.. तु आलायस तर सांग.. विचारलं होत कि नव्हतं?? खोट बोललास तु??? हिंमत कशी झाली तुझी खोटं बोलायची??", अस बोलत विराज पुन्हा त्याला मारतो..
शौर्यचे मित्र मंडळी विराजचा तो राग बघु खुप घाबरून जातात..
"त्याची चुक नाही त्यात.. प्लिज तु एकदा ऐकुन घे. ए रोहन तु अस बघत काय बसलायस हेल्प कर ",वृषभ विराजला पकडतच रोहनला बोलतो..
रोहनच डोकं पुर्ण ब्लेंक झालं असत.. काय चालु आहे हे त्याला कळतच नसत..
"लांब रहायच माझ्यापासुन आणि जर कोणी मध्ये पडलात तर मी काय करू शकतो हे शौर्यच सांगेल.", वृषभचा हात झटकतच तो बोलतो..आणि पुन्हा शौर्यजवळ जाऊ लागतो..
"प्लिज त्याला मारू नकोस.. आम्ही त्याला फोर्स केलाय म्हणुन तो इथे आलाय.", रोहन शौर्यच्या पुढे येऊन उभ रहातच बोलतो..
विराज रागभरी नजर शौर्यवर फिरवतच खिश्यातुन मोबाईल काढतो..
"कोणाला फोन लावतोयस??", शौर्य रडतच त्याला विचारतो..
"तु केलेला पराक्रम मम्माला कळवायला नको???", विराज अस बोलताच शौर्य रोहनला बाजुला करतच विराजजवळ जातो..
"सॉरी ना विर.. पुन्हा नाही ना करणार..", शौर्य विराजच्या हातातुन मोबाईल खेचुन घेतच बोलतो..
विराज रागातच त्याच्याकडे बघु लागतो..
वृषभ : "प्लिज आंटीला ह्यातलं काही सांगु नकोस."
रोहन : "तु शांत हो ना.. प्लिज"
विराज : "कसा शांत होऊ.. इथून बाहेर नाही पडू शकत हा.. मुंबईत प्रत्येक ठिकाणी डॅडची माणस आहेत.. हा अजुन जिवंत आहे हे ह्याच नशीब.. ह्याला पण चांगलं माहितीय हे सगळं.. हिंमत झालीच कशी तुझी घरी कोणाला न सांगता इथे मुंबईत यायची"
शौर्य आपल्या गालावर एक हात पकडत मान खाली घालून शांत बसतो..
वृषभ : "आपण काही तरी मार्ग काढु.."
विराज : "काय मार्ग काढणार.. शौर्य मम्माला फोन करावाच लागेल.. तीच हेल्प करू शकते आण तो मोबाईल दे इथे.."
शौर्य : "माझं मी इथे आलो तस माझं मी जाईल बरोबर.. प्लिज मम्माला नको ना सांगु ह्यातलं आणि तु पण टेन्शन नको घेऊस.."
"तुला अजुनही सिरीयसनेस कळत नाही का शौर्य... का माझा अंत बघतोयस तु..", शौर्यची कॉलर पकडतच विर बोलला..
"सॉरी बोलतोय ना मग मी.. नुसतं ओरडतोयस का माझ्यावर.. मला त्रास होतो तु अस ओरडल्यावर तुला माहितीय ना", शौर्य त्याच्या हातुन आपली कॉलर सोडवतच बोलतो..
"मोबाईल आण माझा इथे..", आपला हात पुढे करतच विराज त्याला बोलतो.
शौर्य : "विर नको ना यार..प्लिजsss तु मम्माला फोन नाही करणार.. प्लिज ना विर.. तुला माझी शप्पथ आहे.."
विराज : "नाही करत.. आण इथे तो मोबाईल..'
शौर्यने फोन हातात देताच विराजने कोणाला तरी फोन लावुन फोन वर बोलायला सुरुवात केली..
"हॅलो डॅड..", मला महत्वाच तुझ्याशी काही तरी बोलायचंय..
सुरज : "लवकर बोल.."
विराज : "मला शौर्य कुठे आहे ते कळलं.. आय मीन तो इथेच आहे.. तु लवकर ये.."
विराजच फोनवरच अस बोलणं ऐकून सगळेच आता एकदम घाबरून गेले..
"विरss", शौर्य डोळ्यांत पाणी आणत विराजकडे बघू लागला.. विराजने हातानेच त्याला शांत बस अस सांगितलं आणि तो पुन्हा फोनवर बोलु लागला..
सुरज : "कुठे आहे तो..??.."
विराज : "तो.. श्री च्या घरी आहे.. तुला श्री च घर माहीतच असेल ना?? आपण लास्ट टाईम इथे आलेलो.. काही पेपर्सवर श्री ची सिग्नेचर हवी होती म्हणून.."
सुरज : "अ.. हो माहिती आहे..मी लगेच येतो.. तु त्याला तिथुन जाऊ देऊ नकोस.."
विराज : "तो जायच्या तैयारीत आहे डॅड.. मी एकटा नाही हँडल करू शकत तु प्लिज गाडी घेऊन ये.."
सुरज : "गाडीची किल्ली तुझ्याकडे आहे.. ते सोड मी येतो. तु त्याच्यावर नजर ठेव आणि माझ्या कॉटेक्टध्ये रहा... आज बघतोच कसा वाचतोय ते"
विराज : "अ... हो लवकर ये.."
सुरज मिळेल तशी वाट काढत श्री च्या घरी जायला निघाला..
विराज : "शौर्य आपल्याकडे हिच वेळ आहे इथुन पळायची.."
शौर्य : "माझी बेग..???"
वृषभ : "ते आम्ही बघतो तु प्लिज निघ इथुन"
विराज शौर्यचा हात पकडत त्याला ओढतच आपल्या गाडीजवळ घेऊन जाऊ लागला आणि गाडी तिथुन एकदम वेगात पळवली..
गाडीत बसताच त्याने पुन्हा कोणाला तरी फोन लावला..
"हॅलो.. प्लिज माझं बोलणं नीट ऐक.. मला आत्ताच्या आता चेन्नईच बुकिंग हवंय.. लगेच.. ते मी सगळं सांगतो प्लिज.."एवढं बोलुन विराज ने फोन ठेवला..
शौर्यला आता कळत नव्हतं की तो विराजला कोणत्या तोंडाने सांगेल की तो दिल्लीला राहतो..
तरी घाबरत का होईना त्याने सांगायचं ठरवलं
"मारणार नसशील तर एक सांगायचय.", शौर्य दोन्ही हात गालावर ठेवतच बोलला..
विराजने कचकन गाडीचा ब्रेक मारत गाडी थांबवली..
विराज : "आता अजुन काय केलंस??"
शौर्य : "ते.. तु.. दिल्लीच बुकिंग कर.. मी दिल्लीला रहातो.."
विराजने काहीच रिएक्शन नाही दिली.. त्याने गाडी चालु केली.. पुन्हा फोन लावला... आणि समोरच्या व्यक्तीला दिल्लीच बुकिंग करायला सांगितलं.. आणि शांत पणे गाडी ड्राइव्ह करू लागला..
शौर्य : "विर सॉरी."
विराज निशब्द होता..
"विर प्लिज बोलणं..", शौर्य त्याला समजवतच बोलला..
पण शांतपणे विराज गाडीच चालवत होता.. शौर्यच कोणतंच बोलणं तो ऐकत नव्हता..
शौर्य : "विर जर तु आता माझ्याशी बोलला नाही ना तर.. तर मी...तुझ्या डॅड ला फोन करेल.. आणि मग बघ.."
तरीही विर शांतच..
शौर्य : "विर बघ.. मी करेल फोन.."
शौर्यने फोन हातात घेतला पण विर काही प्रतिसादच देत नव्हता..
शौर्य : "बघ.. मी करतो कॉल त्यांना आणि सांगतो टाका मारून मला.. तुला नाही फरक पडत.."
विरने आता शौर्यकडे बघितलं..
विराज : "अजुन सुधारला नाहीस तु.. मला ब्लॅकमेल करायला तुला चांगलंच जमत.."
शौर्यने ड्राइव्ह करतानाच विराजला मिठी मारली..
शौर्य : "विर मम्माने भीतीने मला तुलाच काय कुणालाच मी दिल्लीला आहे हे कळु देऊ नको अस म्हटलेलं रे. कारण तुझा डॅड.."
विराज : "शेवटी रक्ताच नात महत्वाच असत शौर्य."
शौर्य : "अस नाही आहे विर.. मम्माने तुला कधी तरी परक्या सारख वागवलय का??, मला सांग बघु.. उलट लहानपणापासुन ते आत्तापर्यंत ती माझ्यापेक्षा पण जास्त तुला इंपोर्टटंट देतेय आणि खर सांगायच झालं तर तु लकी आहेस.. तुझ्याकडे डॅड पण आहे आणि मॉम पण.. आणि अजुन एक खर सांगायच झालं तर.. (विराज काही बोलणार तोच शौर्य त्याला थांबवत पुन्हा बोलु लागला)
मी तुझ्यापेक्षा जास्त लकी आहे कारण माझ्याकडे तु आहेस.. माझ्यासाठी माझी मम्मा पण तुच आणि माझा बाबा पण तुच.. तु तर माझी जान आहे ब्रो.."
विराज : "तु रडलास म्हणजे तुला अस वाटत की मीही रडावं.. म्हणुन एक एक डायलॉग मारतोस.. "
विराज शौर्यचे केस विस्कटत बोलला..
तोच विराजच्या फोन वर त्याच्या डॅड चे दोन येत असतात.. पण विराज आता फोन उचलत नाही..
शौर्य : "डॅड तुला काही करणार नाही.. मला भीती वाटतेय खूप.. नाही तर तु पण चल दिल्लीला.."
विराज : "माझं टेन्शन नको घेऊस मी तस ही इतक्यात घरी जाणार नाही.. मी पुण्याला जाणार आहे.. एक दोन विक ने मग मुंबईत येईल.. "
शौर्य : "बाय दि वे.. सकाळ सकाळी कोणाशी बोलत होतास???"
विराज एक संशय भरी नजर शौर्यवर फिरवतो..
विराज : "तुला काय माहीत..??"
शौर्य : "ब्रूनोला भेटायला आलेलो ना.. तेव्हा बघितलं मी.. चल सांगुन पण टाक आता.."
विराज : "ते मी कंपनीच्या कामा संदर्भात बोलत होतो.."
शौर्य : "नक्कीना??"
विराज : "नक्की म्हणजे तुला बोलायच काय आहे??", शौर्यला राग दाखवतच तो बोलतो.
"काही नाही.. तस पण ह्या एंग्री बर्डची फियांसी बनायला कोणाचे एवढे वाईट दिवस आलेत", विराजला चिडवतच तो बोलतो..
"मगासच कमी झालय का??",पुन्हा दम देतच तो शौर्यला बोलतो.
शौर्य नकारार्थी मान हलवत नाही म्हणुन बोलतो आणि शांत बसतो.
विराजने पुन्हा फोन करून तिकीट बद्दल चौकशी.. पण सर्व सीट फुल असल्याने त्याला आजच्या दिवशीच दिल्लीला जाणार तिकीट मिळालंच नाही.. तस गाडी त्याने बाजुलाच पार्क केली..
शौर्य : "आता काय करायचं??"
शौर्यच्या प्रश्नाचं उत्तर न देता तो मोबाईल मध्ये काही तरी करण्यात गुंतून गेला..
"गाडी बाहेर उतर.. आपण ही गाडी इथेच ठेवुन दुसऱ्या गाडीने पुण्याला जातोय.." शौर्य जास्त प्रश्न करता सरळ गाडीतुन बाहेर उतरला.. विराज ने बुक केलेल्या केबमध्ये दोघेही बसुन पुण्याच्या दिशेने रवाना झाले..
विराज : "भुक लागली असेल ना तुला??"
शौर्य : "भुक??? आणि मलाsss ?? अजिबात नाही..
विराज : "नाश्ता केलेलास का सकाळी??"
शौर्य : "नाही.."
विराज : "मग काय खाल्लं जे तुला अजुन भूक नाही लागली.."
"तुझ्या हाताचा मार..", शौर्य गाल चोळतच बोलला..
विराजला हसु आलं.. त्याने हसतच त्याची मान पकडत त्याला मिठीत ओढल आणि सॉरी म्हटल..
"जोरात लागलं का??", प्रेमाने त्याला विचारू लागला
शौर्य : "आत्ता जोरात मारलं मग लागणारच ना.."
विराज : "एवढा कसा रे नाजुक तु.."
शौर्य विराजला काही बोलणार तोच त्याला वृषभ फोन करतो.. त्याची चौकशी करायला.. शौर्य वृषभला मी ठिक आहे.. पोहचलो की फोन करतो अस सांगुन फोन ठेवतो.. पुण्याला पोहचायला अजून दोन तास तरी लागणार असतात.. विराजसुद्धा मोबाईल मध्ये काही तरी करण्यात बिजी असतो.. गाडीत एसीचा थंडावा आणि त्यात शौर्यची खुप दिवसांपासूनची अपुरी झोप त्यामुळे डोळे आता त्याचे पेंगत होते. झोप उडवण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी झोप लागतेच..
"मी हॉटेल बुक केलय दोघांसाठी. आजची रात्र तिथे काढुयात. उद्या पुण्यावरून तु दिल्लीला जा आणि मी काय म्हणतो आपण मुंबई क्रोस झालं की जेऊया का डायरेक्ट पुण्याला गेल्यावर..", विराज एकटाच बोलत असतो
शौर्य गाढ झोपुन गेला असतो..
विराज पुढे काही बोलणार तोच शौर्यची मान त्याच्या खांद्यावर येऊन पडते.. विराज त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतो आणि त्याला झोपु देतो..
पुढे आता विराज काय करणार हे त्याच त्यालाच कळत नसत..
इथे रोहन मनवीला सॉरी बोलत तिच्या मागे फिरत असतो.. पण मनवी मात्र मला आता तुझ्याशी बोलायचं नाही म्हणुन रोहनला टाळत असते.. नकळत आपण शौर्यच मन ही दुखावलं अस रोहनला वाटत असते.. कोणत्या तोंडाने शौर्यकडे माफी मागु हेच त्याला कळत नसत.. म्हणुन रोहन शौर्यला कॉल करतो..
शौर्य इतका गाढ झोपेत असतो की फोनच्या आवाजानेही त्याला जाग येत नाही.. विराज फोन घेतो आणि सायलेंटवर टाकतो.. शौर्य नाराज असेल म्हणुन माझा फोन उचलत नाही असा गैरसमज रोहन करून घेतो..
समीराला मात्र शौर्य कुठे गेला हे काहीच कळत नसत.. ती तिच्या पावण्यांची उठ बस करण्यात बिजी असते.. अश्यातच सीमा समीराला गाठते आणि तिला घडलेला प्रसंग सांगते.. समीराला काय रिऍक्ट करावं कळत नाही. ती पळतच चेंजिंग रूममध्ये जाते..तिच्या मागोमाग सीमा ही जाते... समीरा मोबाईल घेऊन शौर्यला फोन लावते.. शौर्य फोन उचलत नाही म्हणुन समीरा अजूनच घाबरते.. वारंवार समीरा फोन करते म्हणजे काही तरी काम असेल असं समजून विराज फोन उचलतो..
"शौर्य तु कुठे आहेस?? बरा आहेस ना. किती फोन केले तुला..?उचलत का नाही तु.. तु फोन उचलत नाहीस म्हणुन मी किती घाबरले माहिती..... तुला कस रे कळत नाही..", समीरा एकटीच बोलत रहाते
"एक मिनिट..!! मी विराज आहे शौर्यचा भाऊ.. ",विराज समीराला मध्येच थांबवत बोलला.
"शौर्य झोपलाय.. तु कँटीन्युअसली फोन करत होतीस म्हणुन मला फोन उचलावा लागलाय " विराज अस बोलताच समीरा डोक्यावर हात मारून घेते.. आता काय बोलाव ते तिला कळत नाही.. लाजेने एकदम चुरररर झालेली असते..
समीरा : "शौर्य आहे ना बरा..??"
विराज : "हो आहे बरा.. तो उठला की फोन करायला सांगतो.. ओके..??".
"हम्मम.. ठेवते..",एवढं बोलुन समीरा फोन ठेवते..
सीमा तिला काय झालं म्हणुन विचारते.. शौर्य बरा आहे न??
समीरा : "आहे बरा.. पण त्याच्या भावाने फोन उचलला.."
सीमा : "अरे देवा म्हणजे तु जे बोलली ते सगळं त्याच्या भावाने ऐकलं का??"
समीरा मानेने हो बोलते.. तस दोघी हसतात..
अचानक मनवी येऊन रडतच समीराला मिठी मारते..
समीरा : "मनवी !!! काय झालं?? तु अशी रडते का??"
मनवी : "समीरा तु मला माफ कर.."
समीरा : "अग पण झालं तरी काय??"
मनवी : "रोहन माझ्यावर संशय घेतो.. त्याने मला आणि शौर्यला नको त्या अवस्थेत बघितलं.. आम्ही तस काही करत नव्हतो ग.. पण ते.. शौर्य ने.."
"मनवी तु काय बोलतेस?? नीट काय ते सांग..", समीरा आता चिडतच मनवीला बोलत होती..
"मला नाही काही सांगायचय.. हे तु शौर्यला दे.. त्याला सांग मला हे नकोय.. माझं फक्त रोहनवर प्रेम आहे..", अस बोलत समीराने शौर्यला दिलेली चैन ती समीराच्या हातात देते आणि तिथुन निघुन जाते..
समीरा ती चैन बघत रहाते.. आणि सीमाकडे बघते..
"ही चैन हिच्याकडे कशी आली मी तर ही शौर्यला दिलेली..", समीराला शौर्यच काय चालु आहे हे कळतच नव्हतं.. आता परत संशयाच भूत तिच्या डोक्यात शिरत चालेल..
क्रमशः
(आता पुढे काय?? मनवीने का अस केल? खरच तीच शौर्य वर प्रेम आहे की अजून काही.. त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा आणि भाग कसा होता ते ही कळवा)
©भावना विनेश भुतल