अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 26 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 26

समीराला मनवीच्या बोलण्यावर काय रिएक्शन द्यावी हेच कळत नव्हतं..

सीमा : "समीरा तु तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस.. तुझ्यासाठी दादाच लग्न महत्वाचं आहे. आपण शौर्यशी भेटुन बोलु नक्की काय भानगड आहे ते कळेलच आपल्याला.."

समीराला सीमाच बोलणं पटत.. एक खोल श्वास घेत तिने रडु आतल्या आतच कुठे तरी दाबुन टाकलं..

"पाणी घे..", बाजुलाच असणाऱ्या वेटर कडुन सीमा ने पाणी घेत समीराला दिल..

पाणी पिऊन तिला थोडं बर वाटल..

"आर यु ओके..??", सीमाने तिला काळजी पोटी विचारल..

"शौर्य अस कसं वागु शकतो?? समीरा स्वतःलाच प्रश्न करत असते.

समीराच लक्ष मात्र आता लग्न समारंभात लागत नव्हत.. त्याच त्याच पाहुण्याला ती पुन्हा पुन्हा 'जेवलात का??, कसे आहात' म्हणुन विचारत होती.. आलेले पाहूणे ही तिचा चिंतीत असलेला चेहरा बघुन 'सगळं ठिक आहे ना??', म्हणुन तिला विचारत होते.. ती खोटं हसु चेहऱ्यावर आणत हो बोलत होती त्यांना..

★★★★★

इथे एवढं सॉरी बोलुन सुद्धा मनवी ऐकत नाही म्हणुन रोहनला सुद्धा राग अनावर होत असतो.. शेवटी तो तिचा हात पकडतच तिला हॉल बाहेर नेतो.. काय तो एकदाचा निष्कर्ष आज लागु दे ह्या उद्देशाने.

रोहन : "मनवी काय लावलस तु?? किती सॉरी बोलतोय मी तुला??".

मनवी : "रोहन हात सोड आधी.."

रोहन : "का??? आता मी हात पकडलेला पण नाही आवडत का तुला????

मनवी : "रोहन, तु माझ्यावर विश्वास कधी ठेवलायस?? मी तुला आधीही सांगितलेलं की शौर्य मला नाही आवडत.. त्याची नजर मला नीट वाटत नाही.. पण तुलाच अस वाटत होतं की माझा गैरसमज झालाय.. मग आता जे बघितलस ते?? का तो ही गैरसमज.."

मनवीच्या अश्या बोलण्यावर रोहन गोंधळून जातो.

"तु तिथे का गेलेलीस..??", गंभीर चेहरा करतच तो तिला विचारतो..

मनवी : "झालं तु आलास पुन्हा त्या पॉईंट वर.. तुला मी तिथे का गेली हे महत्त्वाचं आहेना मग ऐक.. डॅडचा फोन आलेला.. मी त्याच्यासोबत बोलत होते.. इथे हॉलवर बेकग्राउंडला लावलेल्या म्युसिकचा आवाज आणि बाहेर वरातीत वाजणाऱ्या ढोलचा आवाज म्हणुन मी त्या रूममध्ये गेली.. तिथे थोडं नीट ऐकायला येत होता.. आता तुला डॅडचा फोन आलेला की नाही हे बघायला सुद्धा मोबाईल चेक करायचा असेल तर प्लिज चेक कर.. धर घे मोबाईल.. चेक कर.."

रोहन : "सॉरी..मला नाही चेक करायचा.."

"नाही तु करच चेक..", मनवी जबरदस्ती रोहनच्या हातात आपला मोबाईल देत बोलली..

"आय एम सॉरी ना मनु... प्लिज तु शांत हो..", रोहन मनवीच्या हातात तिचा मोबाईल देतच बोलला..

रोहनला कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नव्हतं.. एकीकडे जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तिच्यावर आणि दुसरीकडे ज्याने त्याच आत्तापर्यंत बिघडलेल आयुष्य सरळ पणाला लावले तो त्याचा जिवलग मित्र..

मनवी : "तु अजूनही त्याचाच विचार करतोयस.. अश्या व्यक्तीचा त्याच मुंबईत एक आणि दिल्लीला एक गर्ल फ्रँड.. ज्योसलीन सोबत काय चालु असत त्याच हे तुला पण माहिती आणि त्याच्या वरून तु माझ्यावर संशय घेतोस..??"

रोहन : "मला हा टॉपिक नको.. स्टॉप कर इथेच. शौर्य अस वागेल अस मला वाटत नव्हतं पण तु एवढं बोलतेस मग मी तुझ्यावर विश्वास दाखवणं जास्त गरजेच आहे. मला अस तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. आय एम सॉरी".

"मलाही तुझ्यावर अस रागवायला नको हवं होतं.. आय एम सॉरी", अस बोलत मनवी रोहनला मिठी मारते..

★★★★★

विराज आणि शौर्य जवळपास तीन तासाच्या ट्राफिक भऱ्या प्रवासाने फायनली पुण्याला पोहचले... शौर्य अजुनही झोपुनच होता.. विराज त्याला उठवत आपण पोहचलो म्हणुन सांगतो.. शौर्य डोळे चोळतच उठतो... गाडी हॉटेल बाहेर येऊन थांबली असते.. विराजने आधीच दोघांच हॉटेल बुकिंग केलं असत.. दोघेही सरळ रूममध्ये शिरतात..

शौर्य रूममध्ये आल्या आल्या बेडवर पुन्हा आडवा होतो..

विराज : "शौर्य मला खुप भुक लागलीय.. तुला भूक नाही का??".

"भुक नाही.. झोप येतेय मला..झोपुदे.. तु घे जेवुन..", अस बोलुन शौर्य पुन्हा झोपतो..

विराज : "अजिबात नाही.. आधी जेवुन घे आणि मग झोप बघु आणि तुझा फोन वाजतोय सारखा.. उठ ना"

शौर्य : "विर झोपु दे ना यारsss.. खुप झोप येतेय.. फोन सायलेंट मोडवर टाक"

विराज : "ओके.. समीराचे बारा तेरा तरी मिस कॉल तरी येऊन गेलेत..".

"हम्मम..", शौर्य झोपेतच बोलतो.. पण नंतर जाणवत कि विर ने समीराच नाव घेतलं

"कोणाचे???", शौर्य झोप उडवत बोलतो...

"समीराचे", विराज शौर्यच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव टिपतच बोलतो.

"मग तु उठवलस का नाही मला..", विराज वर चिडतच तो बोलतो

"ओहहह.. समीरा...", विराज चिडवत शौर्यला बोलतो..

शौर्य : "हा म्हणजे फ्रेंड आहे माझी.."

विराज : "फक्त फ्रेंड की ??"

"तु दे तो मोबाईल इथेआणि मला भुक लागलीय.. प्लिज ऑर्डर कर ना काही तरी. " शौर्य विराजच्या हातुन मोबाईल घेत समीराला फोन लावतो पण समीरा फोन उचलत नाही.. बहुतेक बिजी असेल असा विचार करून तो फोन बेडवर टाकतो.

विराज : "काय झालं?? रागावली की काय??"

शौर्य : "बिजी असेल.."

विराज : "ओके बट ही समीरा कोण??"

शौर्य : "माझ्या कॉलेजमध्ये आहे.. तिच्याच तर भावाचं लग्न म्हणुन आम्ही सगळे आलो.."

विराज : "अच्छा म्हणजे श्रीची बहीण का..?₹"

शौर्य : "तु ओळखतो का त्याला.. ?"

विराज : "हा म्हणजे माझा बेस्टफ्रेंड आहे तो.. इव्हन बिजीनेसमध्ये पण त्याने आम्हाला खुप मदत केली म्हणून तर डॅड आणि मी इथे आलेलो."

शौर्य : "पण काय फायदा.. ना तुला लग्न भेटलं ना मला.. पण मी बाकीचे प्रोग्राम खुप एन्जॉय केले.. "

विराज : "ते दिसलं मला गाडीत.. किती दिवसाची झोप म्हणायची..??"

शौर्य : "भरपुर दिवसाची.. तु जेवण ऑर्डर कर मला भूक लागलीय.. मी फ्रेश होतो.."

"समीराच्या नावाने चांगलीच झोप उडालेली दिसतेय..", विराज चिडवत बोलला..

शौर्य : "तुला तर मला चिडवायला कारण हवं होतं ते भेटलं.. पण मी तुझ्या सारख खोटं तर नाही बोलत.. कंपनीचा कॉल होता म्हणे खोटारडा."

विराज : "तु व्हेज खाणार की नॉन व्हेज??"

"ओहह हो.. टॉपिक चेंज.. म्हणजे कूछ तो गडबड हे दया..", शौर्य आता विराजला चिडवतच बोलला..

विराज : "हो ना गडबड आहे.. पण ती तुझ्या डोक्यात.. काय खाणार आहेस ते सांग..".

शौर्य : "मी व्हेज खाणार.."

विराज : "समीराला नॉन व्हेज खाल्लेलं आवडत नाही का??"

शौर्य : "अस काही नाही.. मला नाही होत नॉन व्हेज खायला.."

"राहु दे रे होत अस.." दोघेही आता एकमेकांना चिडवण्यासाठी बहाणे शोधत होते.. विराजने दोघांनसाठी जेवण ऑर्डर करतो.. दोघेही जेवुन घेतात..

जेवन होताच विराज मोबाईलमध्ये काही तरी कर बसलेला असतो..

शौर्य : "काय करतोयस??"

विराज : "तुझ उद्याच तिकीट बुक करतोय.. दिल्लीला जायचय ना?? का इथेच रहायचय"

शौर्य : "उद्या नको ना लगेच.. मला तुझ्यासोबत अजून दोन दिवस राहायचय.. कितीमहिने तुझ्यापासुन लांब होतो मी.. प्लिज.."

विराजला काय बोलावे कळत नव्हतं.. तो मोबाईलमध्येच काही तरी करण्यात बिजी होता..

शौर्य : "विर प्लिज ना.. "

पण विराज शौर्यच्या बोलण्याला काही रिस्पॉन्स देत नव्हता..

विराज आपलं काही ऐकत नाही हे बघुन शौर्य नाराज होतच तिथुन निघुन जातो आणि गेलरीत जाऊन उभा राहतो.. थोड्या वेळाने विराज तिथे येतो नि त्याच्या बाजुला उभा रहातो..

शौर्य : "केलंस बुकिंग..??"

विराज : "हम्मम.."

शौर्य रागातच विराजकडे बघतो नी सरळ आत यायला निघतो..

विराज : "ऐक तर.. तु दोन दिवस बोललास पण मी तीन दिवसानंतरची केली.. चालेल न???"

विराज अस बोलताच एक वेगळाच आनंद शौर्यच्या चेहऱ्यावर येतो.. आणि तो विर ला मिठी मारतो..

विराज : "मग शॉपिंग ला जाऊयात..? आज तुला हवी तेवढी शॉपिंग कर.. मी काहीच बोलणार नाही"

शौर्य : "ते तर तु कधीच बोलत नाहीस रे.. आपण मूव्हीला पण जाऊयात. खुप दिवस मूव्ही पण नाही बघितला मी."

विराज : "तु बोलशील ते.."

विराज आणि शौर्य दोघेही मिळुन हॉटेल जवळच असलेल्या मॉलमध्ये घुसतात.. आधी शौर्यने सांगितलं तस मुव्हीला जातात आणि मग तिथुन शॉपिंग करायला..

शौर्य आणि विराज मनसोक्त अशी शॉपिंग करून मॉल बाहेर पडायला निघतात तोच शौर्यची नजर म्युसिक इन्स्ट्रुमेंट च्या दुकानात ठेवलेल्या एका गिटारवर पडते... बाहेर काचेतून ते अगदी आकर्षीत दिसत होतं..

"विर ते गिटार बघ ना किती सुंदर दिसतंय..",शौर्य विराजला पकडत त्या दुकानाजवळ घेऊन जाऊ लागतो...

"शौर्य तुझ्याकडे आधीच डझनभर गिटार आहेत.. अजून नाही हा..", विराज त्याला त्या दुकानापासुनलांबओढतच बोलतो.

शौर्य : "दिल्लीमध्ये एक पण गिटार नाही रे. रागाच्या भरात मी विसरलो न्यायला. प्लिज प्लिज.."

विराज : "कधी वाजवतोस का तु..?? उगाच पडून रहात.."

शौर्य : "वाजवतो ना.. तुझी आठवण आली की.. प्लिज ना.. विर".

शौर्यने अगदी लहानमुलासारखं हट्ट करत विराजकडून ते गिटार फायनली घेतलं..

दोघेही रूमवर येतात.. संध्याकाळचे नऊ वाजुन गेले असतात

ज्योसलीन शौर्यला फोन करते..

"ओहहह शट..", ज्योसलीनचा फोन बघुन शौर्य करतो..

विराज : "कारे काय झालं???"

शौर्य : "अरे ज्यो चा बर्थडे आहे आज.. तिने मला बोलवलेलं.. आता एवढी ओरडेल ना काही विचारू नकोस.."

विराज : "हे बर आहे... मुंबईत आल्या आल्या तिला भेटलास ते.."

शौर्य : "तीच मला मॉल मध्ये भेटली.. पण आता तिला काय सांगु.."

"समीरा पाठवत नाही म्हणुन सांग.. मग ह्यापुढे कधीच फोन नाही करणार ती..", विराज हसत बोलतो..

शौर्य : "तुला मस्ती सुचतेय..??"

विराज : "आधी फोन उचलुन ती काय बोलते ते तरी बघ.."

शौर्य फोन उचलायला जाई पर्यंत कट होतो आणि दोन मिनिटांनी पुन्हा वाजतो..

शौर्य फोन उचलुन सरळ कानाला लावतो..

ज्योसलीन : "शौर्य कुठे आहेस तु..?? कधीची वाट बघतेय मी तुझी.. तु आल्या शिवाय मी कॅक कट नाही करणार हा.. आपलीमुंबई गॅंग वाट बघतेय यार तुझी.. प्लिज लवकर ये."

शौर्य : "ज्यो ऐक ना.. मला नाही ग जमणार यायला.. मी चेन्नईला रिटर्न आलो आज सकाळीच.. थोडा प्रॉब्लेम झालेला म्हणुन.."

ज्योसलीन : "काय रे शौर्य.. मी कधीची तुझी वाट बघतेय इथे.. सगळ्यांना सांगितलं पण शौर्य येणार आहे.. सगळे किती खुश झाले माहिती का तु येणार म्हणुन.. पुर्ण मुड ऑफ केलास तु".

शौर्य : "सॉरी ना ज्यो.. प्लिज समजून घे.. प्लिज.."

ज्योसलीन : "काही सिरीयस प्रॉब्लेम आहे का??"

शौर्य : "हो.. म्हणजे नाही.. म्हणजे एवढा पण नाही.. तु आता तुझा बर्थडे सेलिब्रेट कर आपण मग निवांत बोलु..आणि one more time....wish you happiest birthday and great year a Head.. enjoy the day..".

ज्योसलीन : "थेंक्स आणि बाय आणि हो टेक केर"

"हम्मम बाय..", एवढं बोलुन शौर्य फोन ठेवुन देतो आणि सुटकेचा श्वास सोडतो..

शौर्य : "ज्योसलीन कधी मोठी होणार कळत नाही.. अजुनही लहान मुलासारखीच असते.. सगळ्यांसमोर मिठी मारणार, हात पकडणार.."

विराज : "तुला पहिलं काही प्रॉब्लेम नव्हता तिच्या अश्या वागण्याचा.. ती आधी पासुनच अशी आहे यु नो देट.."

"पण समीराला आहे न... तीला नाही..",आपण नको ते बोललोय हे लक्ष्यात येताच शौर्य उशीत आपलं तोंड लपवत लाजतो.

"ओह हो...बंधुराज कबुली जवाब दिलाच फायनली", विराज शौर्यच्या तोंडावरची उशी बाजुला काढत बोलु लागला.. आता आम्हाला कळु पण द्या कधी पासुन हे..

शौर्य : "कधी पासुन काय.. त्यादिवशी तु मला फोन केलेलास आठवत त्याच दिवशी मी तिला प्रपोज केलं आणि ती हो पण बोलली मला.."

विराज : "ग्रेट.. मग दिल्ली कशी आहे?? एन्जॉय करतो का??"

"खुप म्हणजे खुप.. तु काय विचारूच नकोस.. सगके फ्रेंड्स माझे भारी आहेत.. खुप भारी मज्जा करतो आम्ही..", शौर्य एक एक गंमती विराजला सांगू लागला..

★★★★★

इथे लग्न समारंभ आटोपुन मंडळी घरी आली.. जवळपास रात्रीचे अकरा वाजले असतील.. रोहन, वृषभ, मनवी आणि इतर सगळीच मंडळी बाहेर बसलेले असतात.. समीरा ही काम आटोपुन बाहेर येते. ती सुद्धा आज अस्वस्थ होती.. पण मित्र मैत्रिणीच्या गप्पा गोष्टीत थोडं मन रमुन जाईल अस तिला वाटत म्हणुन ती ही त्यांच्या दिशेने येते.. खर तर ती शौर्यशीच फोनवर बोलायला बाहेर आली असते.. पण सगळे रुममध्ये गेले की शौर्यशी बोलेल असा विचार करत ती आपल्या मित्र मैत्रिणी जवळ यायला निघते..

"मी आलेच डॅडचा फोन आहे अस बोलत मनवी तिथुन उठते..", फोन वर बोलतच ती समीराच्या बाजूने जाते..

"हा शौर्य बोल.. एवढ्या रात्री का फोन केलास तु?? तुला माहिती ना रोहनला कळलं तर पुन्हा आमच्यात भांडण होतील..", मुद्दामुन समीराला ऐकु जाईल अस मनवी बोलते आणि सरळ रूममध्ये शिरते.. खर तर तिने शौर्यला फोन लावलेलाच नसतो..

ती रूममध्ये येऊन शौर्यला फोन लावते.. मनवीचा एवढ्या रात्री फोन बघुन खर तर शौर्यला आश्चर्य वाटत..

मनवी : "हॅलो शौर्य कसा आहेस??"

शौर्य : "तु एवढ्या रात्री का फोन केलास??"

मनवी : "ते.. काम होत तुझ्याकडे.. म्हणजे मला एक चैन मिळाली.. त्याला एक लॉकेट सुद्धा आहे.. अर्धवट अस हार्ट शेपच.. मी आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांना विचारलं पण कोणाचीच नाही ती चैन.. फक्त तुला आणि समीराला विचारायचं राहील.. तुझी आहे का ही चैन?? नाही तर मी समीराच्या दादा कडे देते.."

शौर्य : "माझीच आहे ती चैन.. तुला कुठे मिळाली ती ??"

मनवी : "इथेच समीराच्या घरातच पडलेली मिळाली मला.."

शौर्य : "पण मी तर बेगेत ठेवलेली ती.. अशी कशी पडेल ती??"

मनवी : "आता कपडे वैगेरे काढताना पडली असेल तुझ्या हातुन. "

शौर्य : "मे बी असेल.."

मनवी : "नक्की तुझीच आहे ना..?? मग मी ठेवते माझ्याजवळ.. दिल्लीला भेटल्यावर देते तुला.."

शौर्य : "हो ग माझीच आहे.. आणि थेंक्स बट रोहन कुठे आहे..??"

मनवी : "तो आहे बरा.. ऐक ना.. एक काम होत तुझ्याकडे.. प्लिज कुणाला सांगू नकोस की मी तुला अस एवढ्या रात्री फोन केलेला म्हणजे कस आहे ना रोहनला किंवा समीराला आवडणार नाही असं एवढया रात्री मी तुला फोन केलेला.. आणि उद्या आम्ही इथुन निघतोय म्हणुन तुला आज विचारण गरजेच होत.. जर तु नाही बोलला असतास तर मग मी ही चैन समीराच्या दादाकडे देणार होती मी.. आत्ता अजुन कोणाचा कुठल्याही प्रकारचा गैरसमज होण्याआधी मी ठेवते फोन पण प्लिज मी जे सांगितलं ते लक्षात ठेव.."

शौर्य : "बर नाही सांगत मी.. ऐक ना मी फोन ठेवतो मला समीरा फोन करतेय.."

मनवी : "तीला सांगु नकोस.."

शौर्य : "नाही सांगत बाय."

शौर्यने मनवीचा फोन कट करत लगेच समीराचा फोन उचलला..

"कशी आहेस??", फोन उचलल्या उचलल्या शौर्यने पहिला प्रश्न समीराला केला..

समीरा : "आहे बरी.. तु कसा आहेस??".

शौर्य : "एकदम मस्त.. तुला मिस करतोय.."

समीरा : "मग फोन करायचा ना..मला पण कळलं असत तु मला मिस करतोयस ते.."

शौर्य : "आता तु बिजी असशील म्हणुन नाही केला.. पण तुझ्याच फोनची वाट बघत होतो.."

समीरा : "आता कोणाशी बोलत होतास.. एवढ्या वेळ..??'

शौर्य : "ते.. अग एक फ्रेंड आहे.. थोडं काम होत म्हणुन बोलत होतो..."

समीरा : "नक्की??"

शौर्य : "अ.. हो.. ग.. तु अस का विचारतेस..??"

समीरा : "ते मी तुला दिल्लीला भेटल्यावरच सांगेल.. ठेवते.."

शौर्य : "समीरा अस तुटक तुटक का वागतेस?? बोल तरी.. एवढस बोलायसाठी फोन केला तु.."

समीरा : "शौर्य तुला माहिती मला खोट बोललेलं आवडत नाही.. तरी तु माझ्याशी खोटं बोलतोस.."

शौर्य : "आता कुठे खोटं बोललो मी.. फ्रेंड सोबत तर बोलत होतो.."

समीरा : "कोणत्या फ्रेंडसोबत बोलत होतास??"

शौर्य : "समीरा तु रागवु नकोना ग.."

समीरा : "तु मनवीशी बोलत होतासना..?? हो की नाही एवढं सांग.. "

शौर्य : "अ हो..."

समीरा : "एवढ्या रात्री तिला फोन करायची काय गरज आहे शौर्य??"

शौर्य : "एक मिनिट..!! मी नाही फोन केला तिला.. ती..."

"शौर्य स्टॉप दिस..", शौर्यला मध्ये तोडतच समीरा बोलली.आणि रागातच फोन कट करते.. शौर्य तिला पुन्हा पुन्हा फोन लावत असतो पण ती फोन स्विच ऑफ करून टाकते..

आणि रागातच आपल्या रूममध्ये जायला निघते.. तोच तिला रोहन एकटा बसलेला दिसतो.. म्हणुन ती त्याच्या जवळ जाते..

समीरा : "रोहन.. झोपायला नाही गेलास??"

रोहन कोणत्या तरी खोल विचारात गुंतलेला असतो.. समीराच्या बोलण्याकडे त्याच लक्ष नव्हतं..

"रोहन मी तुझ्याशी बोलतेय.. काय झालं??"

रोहन : "अंsss.. काही नाही.. असच.."

समीरा : "काय झालं सांगशील??"

रोहन : "नाहीsss काही नाही.. तु झोपली नाहीस अजुन..??"

समीरा : "विषय बदलु नकोस काय झालं ते सांग.."

"समीरा शौर्य अस का वागतोय..?? मला नाही कळत की तो अस मनवीच्या मागे का लागलाय.. आय मिन सकाळी दोघांनाही अस एकमेकांच्याजवळ असं म्हणजे... ते दोघे... म्हणजे मनवी आणि शौर्य.. मला नाही तुला सांगायला जमत.. ज्याला मी आपला एवढा जिगरी यार समजतो तो अस क्स वागु शकतो ग.. "रोहन तुटक तुटक शब्द जोडतच बोलतो.

समीरा : "तु पण शौर्य वर डाऊट घेतोस??"

"मी पण म्हणजे?? तुला सुद्धा??", रोहन प्रश्नार्थी चेहरा करतच समीराकडे बघतो.. समीरा स्तब्ध होत त्याच्याकडे बघते..

रोहन : "डाऊट नाही घेत ग.. पण माझ्या डोळ्यांनी जे बघितलं त्यावर तर विश्वास ठेवु शकतो ना आणि इथे मुंबईत आल्यावर त्याच त्या ज्योसलीन सोबत काय चालु असत हे आपल्याला माहीतच आहे.. प्लिज तु गैरसमज करून घेऊ नकोस.. पण शौर्यच आजच वागणं बघुन मी थोडं हर्ट झालं.."

समीरा : "मला ही नाही पटत.. मी दिल्लीला गेल्यावर बोलेल त्याच्याशी.. तु झोप.. एवढ थंडीत बाहेर नको बसुस अस.. चल आत..

"झोपायचं नाही का??",गेलरीत एकटक कोणत्या तरी विचारात हरवुन गेलेल्या शौर्यला विराज बोलतो..

शौर्य : "हम्मम.. तु झोप मी आलोच.."

विराज : "बर ये लवकर.. मी झोपतो.."

विराज दिवसभर दमल्यामुळे झोपुन जातो..

शौर्य रात्रभर समीराच्या फोन वर फोन लावत असतो.. पण समीराचा फोन काही लागत नसतो.. शौर्यला कळत नसत नक्की काय झालंय तिला ते. तो त्याच विचारात असतो..

आणि विचार करता करता गेलेरितच झोपुन जातो..

(आता हे चक्रव्यूह कुठे थांबेल.. मनवी अस का करते?? काय चालु आहे तिच्या मनात..? ते कळेलच आपल्याला पुढील भागात?? हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.. )

क्रमशः

©भावना विनेश भुतल