Prem books and stories free download online pdf in Marathi

प्रेम - वेळ आणि योग्य वेळ

शिव .........शिवड्या तू थांब हा नाहीतर मी खूप मारेल. अस म्हणत गौरी शिवच्या मागे पळत होती.शिव तिला चिडवत होता.गौरे माकडे आधी पकड मग मारायचं बघ.
अचानक ती खाली बसून ओरडायला लागते,शिव पळतच तिच्याकडे जातो आणि काळजीने काय झालं असं विचारतो तर ती मोठमोठ्याने हसायला लागते.
तिला हसताना पाहून त्याला कळत की ही मस्करी करत आहे.तो तिला रागीट असा लुक देतो आणि सणसणीत कानाखाली मारतो.
तीपण रिटर्न एक ठेवून देते आणि त्याला मिठी मारून रडू लागते आणि रडतच आय हेट यु ढोल्या अस म्हणते.तोही तिला घट्ट मिठीत घेऊन म्हणतो आय हेट यु टू जाडे.
दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन वाळूतच समुद्रकिनारी बसलेले असतात. इतक्यात गौरी शिवच्या खांद्यावर डोकं ठेवते.तस तो तिला म्हणतो सॉरी गौरी मी मारलं तुला.
तुला काही झालं तर खूप त्रास होतो ग मला... तुला त्रास फक्त मी देऊ शकतो बाकी कोणतीही गोष्ट जर तुला त्रास देत असेल तर मला सहन नाही होत ग.
गौरी फक्त एक छोट स्मितहास्य करते.ती म्हणते हो रे राजा मला माहितेय .....
.आपल्या नात्याचं मुळी गमकच आपली भांडण आणि आपला राग आहे आणि तू जे आता केलं मीही तेच केलं असत,जर तु अशी गंमत केली असती तर.
तोही हसतो आणि म्हणतो गौरी मी कधीच नव्हता विचार केला,तुला मी माझ्या मनातला कधी सांगेल.वाटायचं इतका त्रास देतो हे सांगितलं तर दूर जाशील.किव्वा माझा माजक बनवशील.
पण मला माहिती नव्हत माझ्यावर तुही तितकंच प्रेम करत असशील,बरं झालं त्यादिवशी ते सगळं झालं.
त्याने ते बोलताच तिने त्याच्या हाताची पकड घट्ट केली.त्याला कळलं ती घाबरली आहे म्हणून तोही शांत झाला.

लहानपणापासूनचे सगळेच क्षण त्यांच्या नजरेसमोरून तरळले........

पाहिलं तर ओळख करून घेऊ, शिव म्हणजे आपल्या कथेचा हिरो.....डॅशिंग आणि रागीट त्याचा राग म्हणजे उफ कोणीही त्याच्या नादी लागतच नसे.कधी कोणत्या गोष्टीवरून साहेबांना राग येईल सांगताच नाही येणार.सर्वांना मदत करायला पुढे असणार मात्र चेष्टा मस्करी हे शब्द जणू त्याच्या शब्दकोशात नव्हतेच.

सगळ्यांना अपवाद म्हणजे गौरी..... नेहमी त्याच्याशी भांडण,एकही दिवस बिनाभांडणाचा जायचाच नाही.लहानपणापासून एकत्र होते मात्र,एक मिनिट त्यांचं पटत नव्हतं.

त्यांचे आईवडिलांचे संबंध खूप आधीपासूनच होते,एकमेकांना सांभाळून राहायचे.अपवाद ही दोन्ही शेंडेफळ होती.
लहानपणी एकमेकांशिवाय त्यांना करमायच देखील नाही,मात्र एकदा गौरीने केस कापले होते आणि शिवने तिला मुलगा मुलगा म्हणून खूप चिडवलं होत.
तेव्हा त्यांच्यात भांडण झाली होती त्यांनतर शिवला एकदा त्याच्या ताईने पावडर आणि टिकली लावली होती.तेव्हा हिने त्याला मुलगी मुलगी म्हणून चिडवलं होत.त्यानंतर मात्र सतत एकमेकांना ते असेच पाहायला लागले.
जसे जसे मोठे होत होते एकमेकांना त्रास देणे आणि सतत खाली दाखवणे इतकंच काम दोघेही करत असत.
गौरी इतर कोणाशीही भांडत नसे तिचा स्वभाव मनमिळाऊ होता,खूप गोड,हसरी आणि देखणी होती ती,शिवइतकी ती रागीट नव्हती तो तिचा राग फक्त त्याच्यासाठी असायचा.
वर्ष सरत चालले होते,दोघेही मोठे होत होते.आता शाळा संपून कॉलेज चालू झाला होत तरीही त्यांची खुन्नस आणि भांडण काही मिटत नव्हती.
एक दिवस कॉलेजला गौरी येत नाही,सकाळी लेक्चर होत मात्र ती एकदाही न दिसल्याने त्याला कसतरी होत होतं.नक्की का होतंय हे कळत नव्हतं.फक्त ती दिसावी अस त्याला वाटत होतं.
त्या दिवशी त्याला खूप एकट एकटं वाटत होतं.घरी गेल्यावरही त्याला काही करमत नव्हतं,सतत चिडचिड करत होता.
सिद्धी म्हणजे त्याची मोठी ताई,त्याच वागणं वेगळं वाटत असत म्हणून ती त्याला विचारायला जाते तर तो तिला पाहताच पहिला प्रश्न विचारतो की गौरी कुठे आहे ताई,आज कॉलेजला नव्हती आली.
मग तिला कारण कळत की हा का असा वागतोय,मग ती त्याची मजा घ्यायची ठरवते.म्हणते की अरे तिला पाहायला पाहुणे आले होते म्हणून आज ती नव्हती आली पण काय रे शिव तीच तोंडपण नाही न पाहू वाटत तुला.
हे जर जुळून आला तर नाही पाहावं लागणार तुला तीच तोंड मग तू कायमसाठी मोकळा तिच्या तावडीतून.पण हे सगळं ऐकून मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.
पण तीच लग्न ठरतंय आणि मला ती नकोच असते मग आपल्याला काय होतंय हे का आज मी तिला मिस केलं?का तिची काळजी वाटत होती आज मला?
त्याच्या मनातला जणू त्याच्या ताईला कळालं होत आता त्याला जाणीव व्हायला हवी इतकंच तिला वाटत होतं.पण तीलाही माहिती होत,मी बोलले तर हा काही मान्य नाही करणार.म्हणून ती शांत राहणं पसंत करते.
शिव मात्र गोंधळात असतो आपल्याला काय होतंय हे कळायला हवं.म्हणून तो ताईला विचारणं योग्य ठरेल अस विचार करून तिला म्हणतो.
अग हो जाऊदे तीच लग्न झालं तर चांगलंच आहे माझ्या मागची पीडा जाईल. पुढे म्हणतो अग माझा एक मित्र आहे ना अडचणीत आहे.मग सिद्धी म्हणते कोण रे(आता सगळं माहिती असून बिचारीला नाटक करावं लागतं होत,असो पण तिलाही माहिती होत शिवचा अहंकार त्याला मागे खेचत होता,जाऊद्या आपल्याला माहिती पण आपण पुढे पाहू काय होतंय)
तर तो सांगू लागतो अग त्याला न एक मुलगी अजिबात आवडत नाही आणि अचानक ना एकदिवस ती त्याला दिसत नव्हती तर त्याला त्याचा त्रास होत होता,म्हणजे बघ रोज समोर असून नको होती आणि आता नाहीये तर त्याला त्रास होतोय.
तस सिद्धी जोरजोरात हसू लागते त्याला वाटत आपली चोरी पकडली गेली,तो तिच्याकडे रागात पाहायला लागतो मग ती बोलते अरे त्याला इतकीही कळत नाहीये का?की तो प्रेमात पडलाय.
तो विचारात पडतो आणि म्हणतो असं काही नाहीये ही ताई उगीच काहीही बोलतेय. शेवती तो त्याच्या अहंकारापुढे प्रेमही नाकारतो.
गौरीलाही ती कॉलेज ला जात नाही त्यामुळे शिवची खूप आठवण येत असते.त्याला समजत नाही हे आपल्याला काय होतंय? पण ती असा विचार करते की आपण रोज रोज भांडण करतो त्यामुळे मला करमत नसेल.
अशातच कॉलेज मध्ये डेज चं वार वाहू लागलं होतं....सगळे तयारीत होते. त्यांच्याच वर्गात राहुल नावाचा मुलगा होता आणि तो तिला म्हणजेच गौरीला प्रपोज करणार होता.राहुल तसा चांगला मुलगा होता परंतु त्याला एखादी गोष्ट नाही मिळाली की तो हैवान बनत असे.
शिवला हे कळलं होतं. त्याला त्या गोष्टीचा खुप राग आला होता. त्यांनतर दोन तीन दिवसांपासून राहुल आणि गौरी सतत सोबत दिसत होते. शिवला हे सगळं बघवत नव्हतं. जितक्या वेला तो त्या दोघांना एकत्र पाहायचा तितक्या वेळा त्याला त्याच्या गौरीवर असणाऱ्या प्रेमाची जाणीव होत होती.
त्यानंतर तर त्याने तिला बोलणंही सोडून दिलं होतं. हे तिला जाणवत होतं पण झालं असेल काही म्हणून तीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. असेच तयारीचे दिवस जातात आणि साडी डे दिवशी गौरी उभी असते तितक्यात राहुल तिच्याकडे यायला लागतो. तीही त्याच्याकडे पाहून हसत असते. तो तिच्याकडे यायला लागला हे पाहून शिव जाऊन त्याला मारायला लागतो.
हे पाहून गौरी शेजारी असणारी नलिनी रागाने लाल झालेली असते. शिव त्याला मारता मारता म्हणत असतो तुझी हिम्मत कशी झाली. तिला प्रपोज करायला यायची. माझा प्रेम आहे तिच्यावर. हे पाहून राहुलपन जोरात ओरडतो. तुला काय इतका राग? तुझं असेल प्रेम पण तीच आहे का तुझ्यावर प्रेम ते आधी विचार. मग मला मारायला ये. इतक्यात मागून नलिनी येते आणि शिवाच्या कानाखाली ठेवून देते.
हे चित्र पाहून गौरी आणि राहुल ला पुढ्यात होणाऱ्या प्रसंगाचा अंदाज येतो. गौरी शिवला पकडते आणि राहुल नलिनीला. शिव मग गौरीला ओरडू लागतो. तुला अक्कल नाही का? तुला तो का आवडतो. मी का नाही? आता हे ऐकून गौरी आणि राहुल जोरजोराने हसू लागतात.
नलिनी, शिव आणि सगळे मुलं मुली यांना काय वेड लागलं की काय म्हणून आश्चर्यकारक नजरेने त्यांना पाहत असतात. मग राहुल म्हणतो अरे तुला कोणी सांगितलं की मी गौरी ला प्रपोज करणार आहे? मी तर नलिनीला प्रपोज करणार होतो. पण मला वाटतं त्याची काही गरज नाही.
तुझ्या गालावरची निशाणी तीच उत्तर आहे. मग तिच्याकडे वळतो आणि मस्तपैकी तिला प्रपोज करतो. मात्र गौरी तिथून पळ काढते. गौरीच्या मागून शिवदेखील जातो. त्याला खूप ओशाळल्यासारख झालं होतं.
तो तिथे जातो जिथे गौरी असते. तो येताच जबरदस्त अशी कानाखाली बसते त्याला. अजून काय अपेक्षित करणार? मग तो दोन्ही गाल पकडून उभा असतो. एक दिवसात दोन देवीचा प्रसाद जो मिळालेला असतो.
तिला त्याला तस पाहून खूपच वाईट वाटतं. मग ती त्याच्या गालावरच्या हातावर हात ठेवून म्हणते खूप लागलं का रे? तो हो अशी मान डोलावतो. मग ती त्याची माफी मागते आणि नंतर म्हणते की मूर्ख माणसा अक्कल आहे की नाही तुला. हे आधी मला सांगायचं असत की असं अख्या कॉलेजसामोर तमाशा करायचा असतो?
पण त्याला तू आवडत होती आणि अख्या कॉलेज ला माहिती होत की. मग हे असं कधी झालं. पण ते राहूदे तू तुझं उत्तर दे आता. ऐकलं तर आहेस. ती म्हणते काय ....मी नाही ऐकलं तो म्हणतो आता हा गाल कशाला सुजवलास मग? मग ती हलकं हसते आणि त्याच्या गालावर तिच्या ओठांनी होकारार्थी मोहोर उठवते. तो पुढें म्हणतो..... या गालावर पण तुझ्यामुळेच पडली. मग ती म्हणते अजून सुरुवात नाही तोच नखरे आणि मागणी करायला लागला.
तो म्हणतो हा मग लहानपणीपासून हक्क गाजवतो आणि कायम गाजवणार आणि तुही तेच करायचं. फक्त सोडून नको जाऊ. मागचे काही दिवस मी कसे काढलेत माझी मला माहिती आहे. मग ती त्याला मिठी मारते.
इतक्यात तिला राहुलचा फोन येतो आणि ते चौघेही मग एका कॅफेत भेटतात. तेव्हा गौरी आणि राहुल हे कधी कसं झालं हे सांगू लागतात.
काही दिवसांपूर्वी..........

एकेदिवशी राहुल आणि गौरी एकत्र काम करत असतात डेज संबंधी आणि गौरी त्याला म्हणते की मला प्रोपोज करायचा प्लॅन झाला का? तो तिला धक्कादायक नजरेने पाहतो.
ती म्हणते न कळण्याइतकी मी मूर्ख नक्कीच नाही. पण तुला मी फक्त आवडते.तुझं माझ्यावर प्रेम नाही. तो म्हणतो नाही तू खोटं बोलतीयस तुला काय माहिती मला माहितेय माझं तुझ्यावर प्रेम आहे ते.
तो म्हणतो तू फक्त माझी होणार. गौरी शांतपणे त्याला म्हणते ठीक आहे मी तुला काही प्रश्न विचारेल त्याची उत्तर तू बरोबर दिलीस की मी म्हणेन खरच तुझं प्रेम आहे माझ्यावर आणि मी तुला एक संधी देईल आणि स्वतः पण तुला समजून घेईल. पण मला खात्री आहे ती वेळ येणार नाहीच कधी.
तोही लगेच तयार होतो. तो गौरीला म्हणतो 4 वर्ष तुला ओळ्खतोय मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. विचार काय विचारायचंय ते.गौरी पुढे बोलू लागते. मला खायला काय आवडतं सगळ्यात जास्ती. तो म्हणतो पाणीपुरी ती म्हणते नाही मला स्वीट खूप आवडतं केक जास्ती आवडतात.
मी कॅन्टीन मध्ये किती वेळा कपकेक घेते.तो म्हणतो मग पाणीपुरी साठी त्या गाड्यावर जातेस ते. मग ती म्हणते की हो आवडते मला पाणीपुरी पण केक पेक्षा जास्ती नाही. ( ज्यांना पाणीपुरी खूप आवडते त्यांच्या भावना मला दुखवायच्या नाहीत, समजून घ्या)
मी कधी रडते? तो म्हणतो मला काय माहिती? मग गौरी म्हणते अरे कितीवेळा तरी मी रडतच असते आणि तरी तुला माहिती नाही. तू तर सतत लक्ष ठेवून असतोस की माझ्यावर. तर तो म्हणतो नाही माहिती. गौरी म्हणते अरे शिव आणि माझं भांडण झालं की कधीतरी तो खूप जास्ती बोलतो तेव्हा मी हमखास रडत असतेच.
कोणी मला काही थोडं बोललं तरी सहन नाही होत. तेव्हा मी लगेच रडते. तर असो पण मी हे दोन प्रश्न विचारले कारण हे खूप साधारण गोष्टी होत्या. ज्या मी सतत करते किव्वा खूप दिवस कोणी पाहिलं सतत तरी त्यांच्या नजरेत येऊन जात.
आता हेच प्रश्न मी तुला नलिनी बाबतीत विचारते. उत्तर देशील? तो म्हणतो आम्ही बोलत नाही तरी का विचारतेस. गौरी म्हणते तू उत्तर देतो म्हणालास. मग तो म्हणतो की तिला दुःखी असली की पाणीपुरी आवडते आणि आनंदी असली की आईस्क्रीम मागते.
रडू तिला येत की नाही तेच माहिती नाही. म्हणजे कसली बोलते तोंडावर. समोरचा रडतो. पण तिला एक कमजोरी आहे ती म्हणजे आईविषयी कोणी काही बोललं की तिला सहन नाही होत. तेव्हा रडते ती.
गौरी फक्त हसत हसत त्याच्याकडे पाहत असते. तोही विचारात पडतो. गौरी म्हणते .......अरे तुमची भांडण का झाली आठवतंय? तू तिच्या बॉयफ्रेंड ला मारलं होतंस कारण त्याने तिला रागाने बोलला होता म्हणून.
त्यानंतर तू तिच्यावर कायम नजर ठेवून असतोस तिला कोणी त्रास देणार नाही याची काळजी घेतोस. तिला माहिती पण होत नाही जे मूल तिला त्रास देणार असतात त्यांना आधीच मर बसलेला असतो.
तूच विचार कर तू इतकं सगळं माझ्यासाठी कधी केलंयस का? तिच्यासाठीच का केलंस? ठीक आहे जर अस समजला की ती आणि तू मित्र होतात म्हणून तू अस करतोस की तुझ्या आईला तुला उत्तर द्याव लागत म्हणून का तुला तिला कोणत्याही मुलासोबत पाहून त्रास होतो म्हणून.
तूच विचार कर.........तसं त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो म्हणतो हो यार माझं तुझ्यावर नाही तिच्यावर प्रेम आहे. आताच सांगतो तिला जाऊन. गौरी म्हणते ये बाबा.....मेट्रो आहेस का चालला लगेच. एवढा प्लॅन केलायस ना.....मग त्याच दिवशी कर ना तिला प्रपोज. मग तो म्हणतो हा राव हे तर लक्षातच नाही आलं.पण कधी एकदा सांगतोय अस झालंय.

मग राहुल म्हणतो असं सगळं झालं होतं. मग आम्ही चांगले मित्र बनलो. काम पण एकत्रच होत म्हणून आम्ही एकत्र दिसायला लागलो. पण काही म्हणा असं प्रपोज कोणाचं झालं नसेल.जसं आपलं झालं. मग शिव गालाला हात लावून म्हणतो. गप तू बँड तर माझा वाजला. तशी नलिनी त्याला म्हणते माफ कर यार. प्रेम खूप करते याच्यावर. पण गौरीमुळे ह्याला अक्कल आली. ती नसती तर काय झालं असत काय माहिती. मग गौरी म्हणते हो बाई आणि राहुल मुळे आमच्या साहेबांना अक्कल आली.नाहीतर नावाप्रमाणेच भोळा सांब आहे हे कळलंच नसतं मला कधी. नको तिथं लगे मला जाब विचारायला येणार. पण जेव्हा विचारायला पाहिजे होतं. तेव्हा मात्र आला नाही.
मग एकसाथ चौघे हसू लागतात. गौरी म्हणते आता कळलं का? फक्त प्रेम असून चालत नाही. तर ते योग्य वेळी व्यक्त करणंही तितकंच गरजेचं असत. भले ते साध्य होवो न होवो. पण पुढील आयुष्यात रडत बसण्यापेक्षा सांगितलेलं कधीही चांगलं. मात्र समोरच ऐकत नाही म्हणून त्याला त्रास देण्याचा विचार करणं एकदम चुकीचं. राहुल योग्य वेळी कळलं तुला म्हणून नाहीतर.
आज तू माझा आणि शिव ने नलिनीचा मार खाल्ला असता.खूप गोंधळ झाला असता सगळा. कदाचित आपल्या चौघांच्या कॉलेज जीवनावर खूप मोठा परिणाम झाला असता. चला आता पुढील प्रवासाला लागू म्हणून दोन्ही जोड्या आपापल्या मार्गी लागतात.

समाप्त....

निलम





इतर रसदार पर्याय