चिमण्यांचा चिवचिवाट...कपात वाफाळणारा चहा....आणि शांत हे अनुभवणारी समिधा....हे नेहमीचंच समीकरण झालं होतं......नुकताच सूर्य आपले डोके वर काढत होता. थांब मी येतोय असं समिधाला सांगत होता. तीही चहाच्या एका एका घोटासोबत त्याच्या धडपडीला दाद देत होती.
हेतर रोजचंच होत. मनापासून सजवलेल्या गॅलरीत तिला सकाळचा चहा घेण्यात जी तृप्ती आणि समाधान मिळायचं ते फक्त तिलाच माहिती होतं.तसं काही दिवसांपूर्वी ती इथे शिफ्ट झाली होती. या गॅलरीत तासनतास बसून राहायचं. पुस्तक वाचायची गाणी ऐकायची तिला खूप सवय होती. कामही तिला तिथेच बसून करायला आवडायचं.
आई बाबा कधी आलेच तिचे तर आई नेहमी तिला म्हणायची कम्पनीने तुला घर देऊन चूक केली. एक गॅलरी दिली असती तरी खूप होत.पण जितका ती त्या गॅलरीवर प्रेम करायची तितकच प्रेम तिच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसून यायचं. ती कुठेही राहिली तरी नेहमीच घर सजवायला तिला आवडायचं.
आई नेहमी म्हणायची अग जितक्या प्रेमाने घर सजवतेस तेच आता मायेने आपल्या माणसाने भरून घे. कशी अशी राहतेस.लग्न कर ग बाळ आता. पाहुदे आम्हाला तुझं गोकुळ. पण समिधा नेहमी म्हणायची आई आग वेळ आहे ग. आपल्याला आवडणारा अजून भेटत नाही ग मी तरी काय करू?
आज समिधा अशीच बसली होती गॅलरीत फोन घेऊन. आज इन्स्टाग्रामवर उगीचच एक प्रोफाइल दिसली आणि पहिल्या नजरेतच तो त्यावरचा फोटो तिच्या मनात भरला. काळे डोळे,काळा शर्ट ,क्रीम कलरची जिन्स आणि चष्मा. असं ते समोर दिसणारं रूप तिच्या मनात भरून गेलं.
कितीतरी वेळ ती त्याच फोटोकडे पाहत होती. बोलावं की नको कसा माणूस असेल. आपण मूर्ख आहोत असं फोटो पाहून कोणी लगेच बोलायला जातं का? एक तर तो इथला नाही वाटत ....फोटो जिथला वाटतो ते ठिकाण इथलं नाहीच मुळी. मग तिच्या लक्षात येत की ठिकाण ओळखीचं नसलं तरी नाव अपल्याकडचच दिसतंय. राघव.....जस तिला फोटो आवडला तसाच तिला नावही आवडलं.
कितीतरी वेळ ती त्याच्याकडेच पाहत होती. एकदा विचार आलाच मनात आणि ती रिक्वेस्ट पाठवणार इतक्यात. डोक्यात हेडलाईन आली. सोशल मीडियावर कोणीतरी कोणालातरी फसवलं. आधीच आपल्याला काही माहिती नाही कोण कुठला. काहीतरी उद्योग नको बाई. पण आहे तर तीनच पोस्ट. आणि प्रायव्हेट आहे हे अकाउंट बाबा. चांगला असेल काय???
मूर्ख समिधा बास काहीही नको विचार करुस. चल आता ऑफीस ला उगी कायपण उद्योग सुचतोय. पण मनात असतंच घ्यावा का एक चान्स असलाच चांगला तर. मित्र तरी बनावा आपल्याला थोडी संसार करायचाय. पण पुन्हा नको म्हणून मनाला समजावत उठली आणि आवरून ऑफिस ला आली.कामात रमून गेली.
पुन्हा घरी आली आणि गाणी लावून आपली काम करू लागली.......गाणं सुरू होत" न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला." पण तिला हे ऐकून फक्त राघव समोर येत होता. काय होईल ते होईल आता करतेच रिक्वेस्ट म्हणून तिने रिक्वेस्ट पाठवली. त्यांनतर दर दोन मिन ती फोन चेक करत होती पण काही परतीचा संदेश येत नव्हता.म्हणून मॅडम नाराज होत्या.
इकडे राघव च्या फोनवर नोटिफिकेशन येत.... समिधाच्या रिक्वेस्टची. पण राघव फोटो पाहतो तर त्याला कुठेतरी आवडून जातो. तिने तिच्या आवडीच्या गॅलरीचा फोटो ठेवला होता. ज्यात ती झोपळल्यावर बसून पुस्तक वाचत होती,तेव्हा आईने काढला होता. तिचे सुंदर असे केस समोर होते. तिचा चेहरा स्पष्ट नव्हता मात्र गोड फोटो होता.
तो हे पाहत असताना त्याची ताई सुद्धा त्याला पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर तिने जवळ जवळ 10 वर्षांनी अशी समाधानाच हसू पाहिलं होतं.ती त्याला अस पाहून खुश होती. मग ती त्याला म्हणते कर की ऍक्सेप्ट छान आहे की......आशा मुली समोरून कमीच वेळा रिक्वेस्ट पाठवतात. तो म्हणतो हा आणि म्हणूनच मला वाटत हे फेक आहे अकाउंट. बघ एका मिन कळेल.तो रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो आणि hi असा मॅसेज करतो.
ताई म्हणते येडपट तू पण पाठव आणि तीच त्याच्या हातातून फोन घेऊन तिला पण पाठवते रिक्वेस्ट. समिधाला हे पाहून आनंद होतो मग ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करते. तर त्यात त्याच्या ताई जिजूंचा त्यांच्या मुलाचा आणि त्याचा असा फोटो असतो. एक असाच त्याने सजवलेल्या गॅलरीचा फ़ोटो असतो.
एक फोटो त्या छोट्याशा मुलाचा असतो. ती रिप्लाय करते hi आणि लहान मुलगा खूप क्युट आहे. तर इकडे ताई तिचे फोटो पाहून म्हणते अरे हे अकाउंट फेक नाहीये. बघ तिचे फोटोज. मस्त आहेत.इतक्यात तिचा मॅसेज येतो आणि ताई म्हणते ये धर बाबा फोन मी जाते.
मग तो मॅसेज पाहून काय करू असा विचार करत असतो आणि तिचे फोटो पाहून त्यालाही ती आवडली होतीच पण काय करणार. खर असेल की खोट? पण नंतर विचार करतो. अरे आपणच केला होता आधी मॅसेज तर बोलूया. तर त्याच्या मॅसेज ला पाहून तीला धक्का बसतो. हो तो क्युट आहे पण तू जो कोणी आहेस ना फेक उगीच शहाणपणा करू नकोस.
तिला जरा रागच येतो आणि वाईटही वाटतं. सुरुवात अशी तर पुढे काय होईल मग काय तिला राग आला म्हणजे समोरच्याची वाट. ती बोलायला चालू करते. ओ हॅलो चांगला दिसतोस याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुलगी तुझ्यात आवड दाखवतेय किव्वा माझं फेक id आहे. आधी शहानिशा करायची आणि मग बोलायचं कळलं ना? वाटलंच होत इथला नाहीस त्यामुळेच इतका घमंडी आहेस.
माझंच चुकलं एवढं छान लाईफ चालू होतं माझं कुठून तुझं प्रोफाइल पाहिल आणि रिक्वेस्ट केली देव जाणो. आता ह्याच गिल्ट मध्ये 4 दिवस ना कामात मन लागेल ना इतर कुठे. एवढंच होता ना तर रिक्वेस्ट च नव्हती ना ऍक्सेप्ट करायची. मूर्ख कुठला. मला तर तुझाच id फेक वाटतो.
तो म्हणतो ये बाई इथे झोपायचा टाईम झाला डोकं नको खाऊ आणि हो फेक नाही मी. ती म्हणते असय का सॉरी मला काय माहिती झोपायचा टाईम झाला. तोही म्हणतो हा मीपण तेच म्हणतोय. ती म्हणते ठीक आहे झोप इथे नाही अजून झोपायचा टाईम झाला.
तिच्या आणि त्याच्या दोघांच्याही डोक्यात ट्यूब पेटते की 2 सेकंदांपूर्वी आपण एकमेकांना मारून टाकू असं बोलत होतो. ही अशी वेडी का आहे लगेच झोप म्हणाली वेडाबाई. इतकं मासुम असू शकत का कोणी? तिलाही हेच वाटत असत झालं.......खाल्ली माती आली मोठी त्याची काळजी करणारी. बावळट कशी आहेस. मग तिचच मन तिला बोलत" अग तू त्याला अशी भांडतच होतीस जशी घरात कोणाला बोलतेय.....आणि हसू लागतं तिचं मन तिच्यावर."
त्याला हसू कंट्रोल नाही होत आणि तो मोठमोठ्याने हसू लागतो. त्याची झोप त्यांच्यातला अवघडलेपण सगळंच नाहीस होत. तो तिला सॉरी म्हणतो आणि हसतोही तीही हसते सॉरी म्हणते आणि एक नवी सुरुवात होते......
सगळी प्राथमिक माहिती सांगून होते तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे सध्या हे तिला कळतं. बरोबर दहा वाजता समिधाची गाडी रुळावरून घसरायला लागते. तिकडे मात्र दोन च्या वर वेळ गेलेली असते तिला वाईट वाटतं उगीच आपल्यामुळे तो जगतोय. झोपुया आता असं ती त्याला म्हणते.तोही पुन्हा कधी बोलणार या संभ्रमात असतो. विचारू की नको अशी मनात शंका असते.
पण तरीही एकमेकांना जास्ती काही न बोलता ते एकमेकांचा निरोप घेतात. ती त्याच्या विचारात तो तिच्या विचारात झोपी जातात. आता रोज रोज बोलणं होतंच असतं. एकमेकांचे टाईम सांभाळून दोघेही एकमेकांना वेळ देत होते. दोघांच्या सवयी आवडीनिवडी जुळत होत्या एकूणच काय ,तर देवाने बॅकग्राऊंडला जणू थोडासा प्यार हुआ हें,थोडा हे बाकी....असं किव्वा आधा ईश्क आधा हे, आधा हो जयेगा असं टाईप काहीतरी वाजवल्यासारखं दोघांच्याही घरच्यांना वाटत होतं.
आता रोजच्या गप्पा फक्त चॅटिंग पुरत्या राहिल्याच नव्हत्या कधी कॉल कधी व्हिडीओ कॉल असं काहीसं चालू झाल होत. दोघांच्या घरी निदान हेतरी कळलं होतं की ,"कूच तो हमारे पीछे पक राहा हे." जीसके बारे मे पता करना अब जरुरी हो गया हे.
खर तर सहा महिन्यात ते एकमेकांचे जीवप्राण झाले होते. राघव च्या ताईला आनंद झाला होता की तिच्यामुळे राघव पुन्हा बाहेर जाऊ लागलाय. जिम करतो सर्व व्यवस्थित करतो. विशेषतः तो मनापासून आनंदी असतो.
एके दिवशी तो तिला फोन करत असतो पण काही लागत नाही. मॅसेज करतो पण काही उपयोग होत नाही. चार दिवस हेच चालू होतं. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. ताईलाही चिंता लागलेली असते आणि तो तडक भारतासाठी तिकीट बुक करतो आणि निघायला लागतो.त्याच्या ताईला भीती वाटू लागते आणि ती तिचे हसंबंड पुढच्या फ्लाईट ने त्याच्या मागे यायचं ठरवतात.
इकडे समिधा आई आजारी असल्याने गावी येते अचानकच. राघव ला मॅसेज करणार इतक्यात तिचा फोन पाण्यात पडतो.तिला काही कॉन्टॅक्ट नाही करता येत.पुढचे तीन दिवसही तसेच जातात.तिलाही करमत नसतं पण तिच्याकडे पर्याय नसतो.आपण पुन्हा ऑफिस गेल्यावर बोलू असा ती विचार करते.
गावाहून घरी येते आणि त्याला कॉल करत असते पण लागत नसतो.काय करावं तिलाही आता कळत नसतं.तो चिडला असणार आता आपल्याला नाही बोलणार.माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर हे मला तुला सांगायचं होत आणि तेही राहील.
असं म्हणून ती रडत असते कितीतरी वेळ त्याच्या आठवणीत. इकडे राघव भारतात पोहोचतो. तिला काय त्यालाही सतत ते जे जे काही बोलले होते ते क्षण आणि क्षण आठवत होतं. एकमेकांची ओढ अजून वाढत होती. पण तो जेव्हा फोन ऑन करतो तर तिचे कॉल्स पाहून त्याचा जीव भांड्यात पडतो. तिला कॉल करावा असं वाटतं पण आता जाऊन सरप्राईज देऊ आशा विचाराने तो निघतो.
त्याची ताई आणि जिजुही भारतात येऊन पोहोचतात. त्यांनी आधीच त्याचं लोकेशन आपल्या मोबाईल वरती दिसेल जरी तो कुठेही असला अशी सोय केली असल्याने त्याला शोधणं त्यांच्यासाठी कठीण गोष्ट नसते.
इकडे समिधा आवरून खाली आलेली असते काही सामान घेण्यासाठी रिमझिम रिमझिम सुरू होऊ लागते इतक्यात समोरून येणाऱ्या माणसाला तिचा धक्का लागतो आणि ती सॉरी म्हणते पण तो तिला पकडतो आणि म्हणतो अग रोज रोज लांबूनच विचार करायचो कधी जवळ येशील आज तर तू आलीच आहेस, सोडणार नाही मी आता तुला. एवढं होईपर्यंत पावसाने जोर केल्याने आणि मुळात पावसाळा असल्याने वर्दळ कमीच होती. त्यामुळे रस्त्यावर माणस कमीच . ..तिला राग येतो आणि ती त्याच्या कानाखाली मारते तस करतात त्याचे अजून साथीदार पुढे येऊन तिला पकडतात आणि तिला गाडीत नेण्यासाठी जबरदस्ती करू लागतात.
एका मुलीने हे पाहून पोलिसांना फोन केलेला असतो. पण थोड्याच अंतरावर राघव हे सगळं पाहतो आणि गप्प मटकन खाली बसतो.ती प्रतिकार करत असते पण त्यांचा जोर वाढत असतो.इतक्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो आणि ते गुंड पळून जातात.
ते जाताच ती रडत खाली बसते..... समोर पाहते तर राघव दिसतो. त्याचे ताई आणि जीजू तिथे पोहोचतात आणि त्याला तस पाहून नक्कीच काही घडलं असणार याचा त्यांना अंदाज येतो. ते तिला काय झालं विचारतात. तर ती सांगते आणि ह्याची ताई बोलते यासाठीच मी म्हणत होते याला भारतात नको येऊन द्यायला. ऐकलं नाही तुम्ही माझं. आता माझ्या भावाला कोण पाहणार. त्याची तीच अवस्था झाली जी पाच वर्षांपूर्वी होती.
समिधाला तर काहीच समजायला तयार नसतं. तिचा राघव तिचा जीव तिच्याच समोर होता आणि तोही असा निपचित पडला होता त्याला काय झालं का झालं.....असं कसं आणि हे काय बोलतायत. तीच डोकं बंद पडायची वेळ आली होती. पण सध्या त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं जास्ती गरजेचं होतं म्हणून ती कशीबशी उठते आणि त्यानाही सावरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात.
त्याला डॉक्टर चेकअप साठी नेतात त्याचे जीजू त्याच्यासोबत जातात. डॉक्टर ला सगळं सांगतात. इकडे राघवची ताई तिला कळतं की समिधाला धक्का बसलाय या सगळ्याचा त्यानेच ती अशी झालीये पण तिला सत्य कळणं गरजेचं होतं.त्यामुळे त्या तिला बसवतात आणि म्हणतात तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईल.
त्या बोलू लागतात ......पाच वर्षांपूर्वी मी राघव माझा नवरा छोटा रोहन सगळे खुश होतो. माझा राघव इन्स्पेक्टर होता खूप तडफदार. खूप भारी होता तो अगदी कर्तव्यदक्ष असा पण त्याच्या अश्या असण्यामुळे लोकांना त्यांची काम करता येत नसत. त्यामुळेच ते सतत त्याला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत असत. पण माझा राघव वाघ होता वाघ. पण बघ ना ग अशी हालत झाली आहे त्याची.
एके दिवशी त्याच्यासमोर एका लहान मुलीवर बलात्कार झाला ग. त्याला बेदम मारून बांधून ठेवलं होतं आणि यातही त्याच्याच कामातले काहीजण सामील होते. त्याला धोका मिळाला होता. त्याच्याच सहकाऱ्यांनी दिला होता. त्यांनतर तो गप्प राहायचा काहीच बोलायचा नाही. डॉक्टर म्हणाले की त्याच्या मनात हे रुतलंय ते बाहेर निघेपर्यंत आपण काहीच नाही करू शकत.
एका निरपराधी लहान मुलींसाठी आपण काहीच करू शकलो नाही याचा खूप घातक परिणाम त्याच्या मनावर झाला आणि त्यामुळे तो असा झाला माझा भाऊ एक मनोरुग्ण आहे ग एक मनोरुग्ण आणि त्या रडू लागतात. समिधा त्यांना सावरते.
त्या पुढे बोलतात आणि त्यामुळे आम्ही त्याला घेऊन तिकडे गेलो होतो. त्याच्यावर ट्रीटमेंट चालू होती.तो हळू हळू बजेर तर येत होता पण म्हणावा तितका फरक नव्हताच त्याच्यात तो भारतात यायलाही नको म्हणायचा.आम्हीही त्याला त्रास नको म्हणून इकडे कधीही न येण्याचा निर्णय घेतला होता.
पण त्यादिवशी त्याने तुझा फोटो पहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू समाधान दिसलं. तुमच्यात बोलणं होऊ लागलं हे मला कळत होतं. तो पुन्हा त्या सगळ्यातून बाहेर येईल असं वाटू लागलं होतं मला. तुला हे कधीतरी सांगावं वाटत होतं तुझा निर्णय जो असेल तो असेल. पण पुन्हा तू सोडून गेलीस तर त्याच काय होईल याचीही भीती वाटू लागली होती मला. मीच तुझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून दिली होती याचा कधी कधी पश्चात्ताप व्हायचा मला.
तुझा कॉन्टॅक्ट नाही झाला आणि तो इकडे तडक यायला निघाला मी नको म्हणत होते पण त्याचे जीजू म्हणाले.त्याने एका भीतीवर मात केली आहे.आपण त्याला जाऊन देऊ आपणही जाऊ.काहीतरी असेलच चांगलं लिहिलेलं .म्हणून येऊ दिलं ग त्याला इथे पण येऊन पाहतो तर काय? हे सगळं झालेलं.
समिधा आत्ताच विचारते नीट विचार करून निर्णय घे. माझ्या भावला यापुढे त्रास झालेला मला सहन होणार नाही. समिधा उभी राहते आणि निघून जाते. हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाप्पाकडे जाऊन खूप रडते त्याला ओरडते म्हणून राघवला भारतात यायला नको वाटायचं पण त्याला होणारा त्रास त्याने बोलून नाहीं दाखवला. पण आता नाही त्याच्यासोबत मोदेखील आहे.
अष्टिगन्ध घेऊन ती ताईसमोर उभी राहते आणि म्हणते ताई त्यात विचार काय करायचाय मी त्याच्यावर प्रेम केलंय आणि आधीचा राघव नक्कीच आपल्यात परत येईल. तुम्हीं काळजी नका करू. त्यांना तो गंध लावते. त्याही खुश होतात.
राघव शुद्धीवर येतो त्यांनतर ते सगळे समीधाच्या फ्लॅट वर येतात आणि राघववर तिथूनच ट्रीटमेंट चालू असते. समिधासोबत राघव अजून नीट उभा राहत असतो. त्याची मनातली भीती कमी होत असते.एक दिवस समिधा राघवला कॅफेत घेऊन जाते.
तिथे अचानक त्यादिवशी आलेले गुंड परत येतात. समिधाला पकडून घेऊन जाऊ लागतात. समिधाला त्याक्षणी फक्त आणि फक्त राघवचीच काळजी वाटत असते. त्याला पुन्हा त्रास होईल या विचारानेच तिचे हात पाय गळून जातात. पण तरीही राघव मला वाचव या एका आर्त हाकेने राघव जणू मूर्तीतून बाहेर येतो आणि मग पुढे घडतं ते असत तांडव. पाच सहा वर्षात जे त्याच्या मनात दबून राहील होतं ते सगळं सगळं बाहेर पडत. सगळे गुंड जमिनीवर लोळत असतात आणि तो गुढग्यावर बसून लहान मुलासारखा ढसाढसा रडत असतो.
त्याच्या मनातलं सगळं काही बाहेर पडत. समिधाला मिठीत घेऊन पुन्हा एकदा तो रडतो. समिधाला त्याला अस पाहून खूप खूप आनंद होतो. तोच राघव जो सहा वर्षांपूर्वी हरवला होता कुठेतरी मनात दडपून गेला होता तो परत आला होता.
समिधा आणि राघव घरी येतात आज सगळं काही ठीक झालं होतं. डॉक्टर सुध्दा समिधाला आता तू निर्धास्त राहा असं सांगतात. काही दिवसांतच ताई आणि जीजू रोहनसोबत पुन्हा ऑस्ट्रेलियाला जातात.
राघव पुन्हा कामावर रुजू होतो. त्या लहान मुलीच्या सगळ्या अपराध्यांना शिक्षा होते. त्याला त्याच वेगळंच समाधान मिळतं. आपली मुलगी एवढी खूश आहे हे पाहून समीधाच्या आईवडीलांनाही समाधान मिळतं.
दोन वर्षे कशी झरझर निघून गेली.राघव आणि मी एकत्र आहोत. आमच्या आयुष्यात आता काही त्रास नको याची मनोमन ती प्रार्थना बाप्पाकडे करत होती. इतक्यात तिच्या डोळ्यावर कोणीतरी हात ठेवत.
तिला तो राघवच आहे हे कळून जातं. तीही हसून त्याला म्हणते काय इन्स्पेक्टर साहेब हे शोभत नाही तुम्हाला. तो म्हणतो का आम्हाला काय मन नसतं इतरांसारखं वेड्यासारखा प्रेम नाही का होऊ शकत आम्हला इतक्या सुंदर आणि हुशार मुलींसाठी. आणि तिच्यासमोर अंगठी पकडतो.
तिचा आनंद तर गगनात मावत नसतो ती त्याला हात देते आणि तो अंगठी घालतो आणि घट्ट मिठी मारतो. तो बोलू लागतो अशाच विचाराने मी इथे आलो होतो.तुझ्यासोबत आयुष्य घालवायला पण आपली पहिली भेट अशी होईल हे कोणाला माहिती होतं. पण म्हणतात न जे होत ते चांगल्यासाठीच ते काही खोटं नाही.
तो दिवस आहे आणि आजचा अशीच कायम माझ्यासोबत राहा. इथूनच सुरवात होते त्यांच्या आयुष्याच्या नवीन इनिंगला
समाप्त