अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 42 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 42

विराज रॉबिन नक्की कश्याला आलाय हे बघायला रूमबाहेर पडला..


शौर्य आणि ज्योसलीन सुद्धा त्याच्या मागून रूम बाहेर पडले..


"तो तुझा चरसी कश्याला आलाय इथे??",शौर्य फक्त ज्योसलीनला ऐकु जाईल एवढं हळु बोलतो


"

शौर्य स्टॉप टु कॉल हिम चरसी..",ज्योसलीन थोडं राग दाखवतच शौर्यला बोलली


शौर्य : "बर बाबा नाही बोलत पण का आलाय तो इथे??"


ज्योसलीन : "तु स्वतः चल आणि बघ.."


"तुम्ही दोघ बहुतेक माझं दिल्लीला जाण केन्सल करणार वाटत.. हे देवा प्लिज वाचव..",शौर्य दोन्ही हात जोडत, मनात देवाच्या धावा करतो


ज्योसलीन : "तु अस वेड्यासारख का वागतोयस आज??"


शौर्य : "आता तुम्ही दोघांनी मिळुन मला सस्पेन्स मुव्ही दाखवायचं ठरवलय मग कस वागु सांग??"


ज्योसलीन : "तु एवढा का घाबरतोय रॉबिनला??"


शौर्य : "एक मिनिट, तुझ्या त्या रॉबिनला मी काही घाबरत नाही हे तुला पण माहिती.. उगाच इथे येऊन खोटं काहीही सांगेल म्हणुन भीती वाटतेय.. एक तर त्याला..."


"काय चाललंय तुम्हा दोघांच.. खुचुर-फुचुर??",शौर्य आणि ज्योसलीनला अस आपल्या पाठी बडबड करतायत हे बघुन विराज बोलतो


शौर्य : "कुठे काय?? विर मला काय वाटत.. तु त्या चरसीसाठी.."


"शौर्य.",ज्योसलीन शौर्यकडे रागात बघत बोलते


शौर्य : "रॉबिनsss ओके.."


ज्योसलीन : "ओके."


शौर्य : "त्या रॉबिनसाठी तुझं उगाच काम का टाकुन येतोस. मी बघतो ना त्याला काय बोलायचय ते.."


विराज : "तुला माझ्या कामाची एवढी काळजी कधीपासून?? काल तर बोलत होतास 'तुम्ही लोक मला वेळ देत नाही. नुसतं काम नि काम करत राहतात..' "


शौर्य : "ते मी.. सहज बोललोरे.. भावनेच्या भरात.."


विराज : "असु दे.. आता आलोच आहे एवढ तर भेटूनच जातो.."


तिघेही घराबाहेर येऊन पोहचले... रॉबिन घराबाहेरच उभा होता..


विराज हाताची घडी घालुन दारातच उभं राहतो..


शौर्य रॉबिनजवळ जातच त्याला काय झालं म्हणुन विचारू लागला..


रॉबिन खुप वेळ शौर्यकडे एकटक बघतच राहिला..


"

तु अस का बघतोयस माझ्याकडे..?",शौर्य मागे उभ्या असलेल्या विराजकडे घाबरतच एक नजर फिरवत रॉबिनला बोलला..


(विराज सुद्धा थोडं गंभीर होऊनच दोघांकडे बघत होता)


"फ्रेंड्स",

रॉबिन आपला उजवा हात शौर्यपुढे करतच त्याला बोलला..


शौर्य : "रॉबिन... तु..??"


रॉबिन : "उशिरा का होईना पण मला कळलास तु.. आता अजुन मला कळुन सुद्धा न कळल्यासारख वागुण तुझ्यासारख्या चांगल्या मित्रापासुन स्वतःला लांब नाही ठेवायच.. कळत नकळत खुप दुखावलं मी तुला. कदाचित आज तु नसतास तर मी ज्योसलीनला सुद्धा गमावलं असत.. आय एम सॉरी शौर्य.. आत्ता पर्यंत केलेल्या माझ्या प्रत्येक चुकीसाठी.. मला माफ करशील.."


"

बस काय रॉबिन.." शौर्य त्याला हात मिळतच गळे मिळतो..


शौर्य : "लाईफ प्रत्येकालाच परत संधी देतेच अस नाही.. तुला दिलीय.. परत चुकीच्या मार्गावर नको जाऊस आणि ज्यो सोबत पुन्हा अस नको वागुस.. खुप प्रेम करते ती तुझ्यावर.. दोघेही खुश रहा.."


"चुकुन सुद्धा तिला दुखावणार नाही.. ज्यो मी तुझी शौर्य समोर माफो मागतो.. I am Sorry..", रॉबिन आपले कान पकडतच ज्योसलीनची माफी मागु लागला..


ज्योसलीन : "इट्स ओके.."


"तु आत तर चल.. आज पहिल्यांदाच माझा मित्र म्हणुन येतोयस यार..",शौर्य जबरदस्ती रॉबिनचा हात पकडत.. त्याला घरी आणतो..


तिघेही शौर्यच्या घरी नाश्ता करत कॉलेजच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसतात..


शौर्यची काही कम्प्लेन्ट नाही हे समजल्यावर विराज सुद्धा आपल्या रूममध्ये येऊन आपल्या कामात गुंतून जातो..


रॉबिन : "तु इथेच असतास तर आपण खुप मज्जा केली असती यार पण एनी वेस.. हॅप्पी जर्णी.. बी इन टच.. "


"

थँक्स यार..)", शौर्य रॉबिनला मिठी मारतच बोलतो..


"

एक सेल्फी तो बनता हे बॉस..", ज्योसलीन अस बोलत दोघांच्या मध्ये उभी राहते.. तिघेही एक एक पॉज घेत खुप सारे हॅप्पीवाले क्लिक तिच्या मोबाईल मध्ये घेतात..


शौर्य : "ए ज्यो मला पण सगळे पिक व्हाट्सए कर.. "


ज्योसलीन : "हो करते.. बायsss.."


"

बाय.. टेक केर.",अस बोलत रॉबिन आणि ज्योसलीनचा निरोप घेत शौर्य आपल्या रूममध्ये जायला निघतो.. तोच त्याला त्याच्या मम्माची रूम दिसते.. उद्या जाणार तर आज मम्माला भेटुन घेऊया म्हणुन तिथून सरळ तो अनिताच्या रूममध्ये जातो..


अनिता अजुनही कामातच गुंतली असते..


शौर्य : "मम्मा मला तुझ्याशी थोडं बोलायचय.."


अनिता : "मी बिजी आहे. आपण मग बोलुयात.."


शौर्य : "मम्मा हार्डली फिफ्टीन लागतील.. फिफ्टीन मिनिट्स तर तु मला देऊच शकतेस ना??"


अनिता शौर्यच्या अश्या बोलण्यावर काहीच रिएक्शन देत नाही..


शौर्य : "मम्मा.. प्लिज.. तु अजुन रागवलीयस माझ्यावर.. "


अनिता : "शौर्य मी बिजी आहे.. प्लिज डिस्टरब नको करुस.. तु निघु शकतोस इथून.. मला कामाच्या मध्ये तु अशी लुडबुड केलेली नाही चालणार.."


शौर्य नाराज होतच तिथुन निघु लागतो.. तो तिथुन निघणार तोच विराज अनिताच्या रूममध्ये येतो..


विराज : "मम्मा तुझ्याकडे काम होत. थोडा वेळ मिळेल तुझा.."


"हम्मम बोल..",अनिता अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघु लागतो. मम्माकडे विरसाठी वेळ आहे पण आपल्यासाठी नाही हे बघुन शौर्यला खूप वाईट वाटत.. ..


विराज : "कंपनीतून दरवर्षी प्रमाणे आम्ही छोटीसी ट्रिप प्लॅन केलीय.. नेक्स्ट विक मी इथे नसेल.."


अनिता : "ओके पण थंडी आहे.. स्वेटर, शाल सगळं व्यवस्थित सोबत ठेव.. बाय दी वे.. बेंगलोर मध्ये कुठे?? म्हणजे काही प्लेस वैगरे ठरलीच असेल ना??"


विराज आणि अनिता दोघेही एकमेकांसोबत त्या टॉपिकवर बोलु लागतात.


"मी येतोच.", डोळ्यांतुन येणारे पाणी दोघांपासून लपवतच तिथुन निघुन सरळ आपल्या रूममध्ये गेला..


विराज : "ह्याला काय झालं?? तु काही बोललीस का ह्याला?? "


अनिता : "त्याच्याशी बोलायला तो कोणती गोष्ट ऐकतो का माझी.. त्याच्याशी बोलणं टाळायचा प्रयत्न करते फक्त.. एनी वेज.. तु सांभाळुन जा.."


विराज : "हम्मम.. "


विराज तिथुन निघणार तोच त्याला काही तरी आठवत..


"

अग मम्मा ते मी तुला सांगायला विसरलो..", उद्या शौर्य दिल्लीला जातोय


अनिता : "हम्मम.."


विराज अनिताच्या रूममधुन निघुन शौर्यच्या रूममध्ये गेला..


शौर्य त्याच्या रूमच्या गेलरीत ब्रूनोला मिठी मारून बसलेला.. ब्रुनो देखील त्याच्या कुशीत शांत बसलेला..


विराज जाऊन शौर्यच्या बाजुला बसतो..


विराज : "ह्याला पण कळललं वाटत तु उद्या जातोस ते.. बघ कस शांत बसलाय ते तुझ्या कुशीत.. तुझ्या हॉस्टेलमध्ये पेट्स अलाउड असतील तर घेऊन जा ह्याला पण.."


शौर्य : "तस असत तर खरच नेलं असत.. खुप मिस करतो मी ह्याला तिथे."


विराज : "तो पण करतो.. तु गेल्यावर नुसतं शांत शांत रहातो.. जेवत सुद्धा नाही नीट. निदान त्याच्यासाठी तरी तु महिन्यातुन एकदा घरी येऊन भेटत जा त्याला.."


शौर्य : "हम्मम.."


विराज : "बाय दि वे.. तु बस इथे तुझ्या ब्रुनो सोबत.. मला थोडं काम आहे.. मी ते संपवुन येतो.. मग आपण बाहेर फिरायला जाऊयात.."


"विर तु एकदा कामात घुसलास तर कसला येतोस..", शौर्य नाराज होतच बोलला


विराज : "पक्का येतो.. नाही तर एक काम करतो.. मी लॅपटॉप इथेच घेऊन येतो.. म्हणजे तु दिसलास तर मी अजून डब्बल स्पीडने काम करेल.. मग आपण काम झाल्या झाल्या लगेच जाऊयात.."


शौर्य : "हम्म.."


शौर्य ब्रूनोला तसाच मिठीत घेऊन आपल्या मम्माच्या वागण्याचा विचार करत रहातो..


विराज लॅपटॉप शौर्यच्या रूममध्ये घेऊन आपल्या कामात गुंतून जातो..


तोच वृषभचा व्हिडिओ कॉल येतो त्याला..


शौर्य क्षणाचाही विलंब न करता फोन उचलतो..


"

हॅलो शौर्य.", सगळेच ऐकत्रच बोलतात..


मित्रांना अस एकत्र बघुन एक वेगळच तेज.. एक वेगळाच आनंद शौर्यच्या चेहऱ्यावर येतो... विराज फक्त त्याचा तो आंनद बघतच रहातो.. कारण ह्या दोन दिवसात त्याने आत्ता शौर्यला थोडं खुश बघितल असत


शौर्य : "हॅलो.. लेक्चर झालं वाटत.. )"


टॉनी : "हो जस्ट.. तुला मिस करतोय यार.."


राज : "हो ना.. आम्ही आता सॅंडविच खातोय.. तुझा तो स्पेसिअल सॅंडविच वाला किस्सा आठवुन आम्ही आता हसत होतो.."


शौर्य : "मग मंडेला स्पेसिअल सॅंडविच माझ्याकडुन तुला.."


राज : "अजिबात नको आणि जर तु पुन्हा मला असा त्रास दिलास तर बिग बॉस कडे तुझी कम्प्लेन्ट करेल मी.."


शौर्य : तु विर बद्दल बोलतोयस??


राज : "अजुन कोण असू शकत का ज्याला तु घाबरतोस??"


टॉनी : "अस काय करतोस.. समीराला पण तो घाबरतो.. हो ना शौर्य..??"


टोनी

सगळेच शौर्यला हसु लागतात.. समीरा पण..


विराज सुद्धा गालातल्या गालात त्यांच बोलणं ऐकुन हसत असतो..


शौर्य : "टॉनी.. उद्या आपण भेटणार आहोत मित्रा.."


वृषभ : "तुला तर भेटावच लागेल त्याला.. उद्या बर्थडे आहे टॉनी सरांचा.."


रोहन : "शौर्य किती वाजेपर्यँय येशील..??"


शौर्य : "सात वाजतील."


राज : "येहह मग आपण उद्या नाईट आउटला जातोय हे कन्फर्म.."


राज नाईट आऊट बोलताच विराज रागातच शौर्यकडे बघतो.. तसा शौर्यला ठचका लागतो आणि तो जोर जोरात खोकु लागतो..


समीरा : "काय झालं?? पाणी पी.."


शौर्य : "ते नाईट आऊटच.."


वृषभ : "तु आल्यावर लगेच निघु आपण.. आम्ही थांबु तुझ्यासाठी.. तुला सोडून थोडी ना जाणार.. नको टेन्शन घेऊस..."


शौर्य : "गाईज मी उद्या येतोय ना.. तिथे आल्यावर बोलूयात.."


रोहन : "अरे प्लॅन नको का करायला... इथे आल्यावर कस बोलणार..??"


("

कस सांगु.. तुम्हाला", शौर्य मनातच बोलतो)


"मी करतो तुम्हाला कॉल तुम्ही ठरवा काय ते. ओके... बाय बाय..", शौर्य त्या लोकांच पुढच काहीही ऐकुन न घेता फोन कट करतो..


डोक्याला हात लावून तो तिथेच बसतो..


हळुच चेहऱ्यावरचा हात काढत तो विराजकडे बघतो.. विराज अजुनही एक संशय भरी नजरेने त्याच्याकडेच बघत असतो..


शौर्य : "अस नको ना बघुस विर.."


विराज : "काल सांगितलेले नियम लक्षात आहेत ना तुझ्या??"


शौर्य : "हो.. पण मी काय बोलतो.. जर ते रुल्स मंडे पासुन मी फॉलो केले तर??"


विराज : "अजिबात नाही.."


"कस होत असेल त्या अनघाच मी तर विचारच करू शकत नाही..", शौर्य विराजला चिडवतच बोलला..


विराज : "तुला बोलायच काय आहे?"


शौर्य : "मला एवढे रुल्स लावु शकतोस मग ती तर तुझी फियांसी.. तिला किती लावले असशील.. बिचारी.."


विराज : "ती तुझ्यासारखी अतरंगी अजिबात नाही जे तिला असले रुल्स लावायला. तुझी तर स्कुल मधुन कम्प्लेन्ट, ट्युशन मधुन कम्प्लेन्ट, कॉलेमध्ये गेलास तिथुन कम्प्लेन्ट. तुला माहिती दिल्ली ला जाण्याआधी जस्ट मी आणि मम्मा बोललो की तु तिथे गेलास.. तिथुन अजुन काही कम्प्लेन्ट नाही.. पण लगेच तुला नजर लागली. आता मित्र पण बघ तेही कम्प्लेन्ट करत होते.. "


शौर्य : "तु फक्त तेवढंच ऐकलस.. त्यांनतर पण ती लोक काही बोलले माझ्याबद्दल ते बर नाही ऐकलस.."


विराज : "शौर्य एक सजेशन देऊ.. तु ते साऊथचे मूव्ही बघणं बंद कर.. ते बघुनच डोक्यावर असा परिणाम होतो. त्यांच बघुनच फायटिंग शिकलास वाटत.."


शौर्य : "अजुन???"


विराज : "तुला सांगायलाच विसरलो.. मी अनघाला आपला फेमिली फोटो दाखवत होतो.. तीला तु तुझा तो फेव्हरेट एक्टर आहे ना.. काय त्याच नाव?? "


शौर्य : "विजय देवराकोंडा.. वन ऑफ माय फेवरेट एक्टर", शौर्य थोडं एक्साईट होत बोलतो.


विराज : "हा.. त्याच्यासारखा वाटतो.. पण.."


शौर्य : "पण काय??"


विराज : "मला तु कोणत्याच एंगलने त्याच्यासारखा नाही वाटत.."


शौर्य : "ज्वेलसी."


विराज : "काय बोललास?? परत बोल.."


शौर्य : "तुला आधी तो एक्टर माहिती तरी आहे का?? टोलिवुडच सोडच तु.. तुला बॉलिवूड मधला तरी एखादा नवीन एक्टर माहिती आहे का??आणि फक्त तुझी अनघाच नाही मुंबईत कॉलेजला होतो ना तेव्हा पण सगळे तेच बोलायचे.. ज्योला विचारून कन्फर्म करू शकतोस तु.."


विराज : "असेल पण.. पण मला मुव्हीच एवढं क्रेज नाही.. जेवढं तुला आहे.. "


शौर्य : "म्हणुनच अस बोलतोस.. बाय दि वे.. तु काम कर.. आपण लंचसाठी बाहेर जातोय.."


"

उरलेलं काम रात्री करतो.. चल जाऊयात..", विराज लॅपटॉप बंद करतच शौर्यला बोलला..


विराज : "मी आलोच तैयार होऊन.. तु पण लवकर तैयार हो.."


विराज बाहेर जाताच शौर्य वृषभला फोन लावतच गेलेरित जातो..


"

हा शौर्य बोल..", शौर्यचा फोन उचलतच वृषभ बोलतो..


शौर्य : "वृषभ, मला उद्या नाईट आऊटिंगला तुमच्यासोबत यायला नाही जमणार यार.. "


वृषभ : "ए शौर्य यार प्लिज.. आता भाव नको हा खाऊस..."


शौर्य : "अरे भाव नाही खात.. विरने मला स्ट्रिक्टली वोर्निंग दिलीय आणि त्या फैयाज मुळे तर मला तो तिथे दिल्लीला पाठवतच नव्हता.. आता पाठवतोय पण त्यात त्याने मला एवढे काही रुल्स एन्ड रेगुलेशन सांगितले की तु विचारूच नकोस.."


वृषभ : "त्याला थोडी ना कळणार की तु आमच्यासोबत बाहेर आलास ते.."


शौर्य : "विश्वास ठेवुन पाठवतोय यार तो.. मला त्याचा विश्वास तोडायला नाही आवडणार.. हा पण तु ग्रुपमध्ये कोणाला सांगु नकोस प्लिज.. परत टॉनी नाराज होईल माझ्यावर.. प्लिज एडजस्ट कर.. मी सांगेल की फ्लाईट इस्यु आहे. तुम्ही लोक पार्टीला गेले की मग मी हॉस्टेलमध्ये येईल.."


वृषभ : "खर तर त्यांना नव्हतोच सांगणार पण फोन स्पीकरवर आहे आणि त्यांनी ऐकलं.."


शौर्य डोक्याला हात लावतच खाली बसतो.. आता फोनवर काय बोलायच तेच शौर्यला कळत नव्हतं.


शौर्य : "टॉनी यार सॉरी.. पण प्लिज मला समजुन घे ना.. मी माझ्या विरच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत रे.. "


टॉनी : "शौर्य तु नाही तर पार्टी नाही.. आपण इथे हॉस्टेलमध्ये करूयात बर्थडे.."


शौर्य : "टॉनी प्लिज माझ्यासाठी तु प्लॅन नको केन्सल करुस.."


राज : "शौर्य तु नाही तर मज्जा नाही रे म्हणजे तुच विचार कर जर रोहन नसता किंवा वृषभ नसता पार्टीला तर मज्जा आली असती का..?? आपण सगळे एकत्र असलो तरच मज्जा येईल.. त्यामुळे उद्या नाईट आऊटिंगला बाहेर जाणं किंवा न जाण हे तुझ्याच हातात आहे.. तूच ठरव काय ते.."


शौर्य : "मी मगाशी क्लीअर केलय.. विर बोलेल तेच.. माझं मत नाही बदलणार.. सॉरी.."


शौर्य फोन ठेवुन तसाच मागे वळतो तर विर त्याच्या मागे हाताची घडी घालुन उभा असतो..


शौर्य : "तु कपडे चेंज करायला गेलेलास ना??"


विराज : "मोबाईल राहिला तो घ्यायला आलेलो.."


शौर्य : "मला भुक लागलीय विर.. प्लिज लवकर.. मी पण तैयार होतो.."


विराज : "उद्याचा काय प्लॅन आहे??"


शौर्य : "काहीच नाही.. डायरेक्ट हॉस्टेल.."


विराज : "शौर्य लास्ट टाईम पार्टीला काय झालेलं तुला आठवतय ना??म्हणुनच तुला मी हे सगळं बंद कर बोललो.. "


शौर्य : "अरे विर मी नाही जात आहे कुठे.. मी आता वृषभला फोन करून तेच सांगत होतो.."


विराज : "जा.. पण काळजी घे..आणि अजुन एक.. ड्रिंक वैगेरे"


शौर्य : "अरे यार मी नाही करत ड्रिंक.. "


विराज : "विश्वास आहे पण काळजी वाटते तुझी..."


शौर्य : "नक्की जाऊ ना पार्टीला..?"


विराज : "हम्मम.. "


विराजने परवानगी देताच शौर्य खुश होतच.. वृषभला फोन करून कळवतो..


शौर्य येतोय हे कळताच सगळे खुश होतात..


ठरल्याप्रमाणे विराज आणि शौर्य लंचसाठी बाहेर जातात..


तिथुन मॉलमध्ये जातात..


शौर्य टॉनीसाठी एक छानसं शर्ट घेतो आणि सोबत ब्रँडेड अस हॅन्डवॉच..


विराज : "तुझ्यासाठी पण काही तरी घे.."


शौर्य : "नाही नको.. तुला काही घ्यायचय??"


विराज : "माझी शॉपिंग झालीय.. USA ला जाण्याआधीच."


शौर्य : "मग जाऊयात घरी??"


विराज : "हम्म..."


दोघेही घरी येतात..


शौर्य : "विर तु मनापासून मला जा बोललायस ना उद्या पार्टीला??"


विराज : "खर सांगु.. मी मोबाईल घ्यायला आलो ना.. तेव्हा तुला अस गेलरीत जाऊन फोन वर बोलताना बघतील ना तेव्हा अस वाटलं की तु उद्याच्या पार्टीबद्दलच प्लॅन करतोयस म्हणजे एका क्षणाला अस वाटलं मला की तुझ्यावर विश्वास ठेवुन मी चुक करतोय. पण तुझं फोन वरच बोलणं ऐकलं तर थोडं भरून आलं रे.. तुझ्या लाईफमध्ये तु माझ्या शब्दला किंमत देतोस ह्याची खात्री वाटली मला आणि खर तर मला हे अस रुल्स एन्ड रेगुलेशन तुझ्यावर लावायला नाही आवडत पण डॅड नंतर तुला नाही गमवायच मला म्हणुन काळजी पोटी अस वागावं लागतय.."


शौर्य : "विर तुला खर सांगु..माझ्यासाठी तुच माझी मम्मा आहेस आणि बाबा पण.. मम्मा तर मला समजूनच नाही घेत रे.. मला नाही माहीत मी अस बोलणं योग्य आहे का नाही.. पण बाबा गेला ना त्यानंतर मम्मा वेगळीच वागू लागली.. त्यानंतर तु आलास सोबत तुझे डॅड आले.. तुला प्रत्येक गोष्ट ती सगळ्यात आधी द्यायची.. पण माझ्या बाबतीत तस कधीच नाही होत.. इव्हन आता ही.. तीच तुझ्यावर जास्त प्रेम आहे.. ह्या गोष्टीच मला कधीच वाईट नाही वाटलं पण वाईट ह्या गोष्टीच वाटत की मला तीच प्रेम नाही मिळतरे.. खुप हर्ट होत यार.. मघाशी सुद्धा तिने तेच केलं.. मी फक्त पंधरा मिनिटं मागितली यार तिच्याकडे.. मी बिजी आहे तु निघु शकतोस हे तीच उत्तर होत आणि तु आलास तेव्हा तिच्याकडे वेळ होता.. मला नाही कळत तुम्ही दोघ माझ्याशी दिल्लीपासून अस वागत होते की जणु मी खुप मोठा गुन्हा केलाय.. मी मारामारी केली.. मी वाईट.. माझी प्रिंसिपल सरांनी तिच्याकडे कम्प्लेन्ट केली म्हणुन मी वाईट. कधी तरी माझ्यातले चांगले गुण पण बघा ना यार.. एकदा येऊन तर बघा कॉलेजमध्ये.. मी कसा वागतो, कसा राहतो हे विचारा तुम्ही.. सेमिस्टरला संपुर्ण कॉलेजमध्ये टॉप केलय मी विर.. त्याच तुम्ही लोक कोणीच कौतुक करणार नाही.. अभ्यासातच नाही.. साधं फुटबॉलची मॅचसुद्धा खेळायला गेलो ना संपुर्ण ग्राउंड माझ्या नावाने चिअरअप करत असत.. तुम्ही आल्यापासुन नुसतं ड्रिंक ड्रिंक लावत बसलेत.. तुला सांगु एकदा त्या राजने मला नकळत ड्रिंक पाजलेली विर.. पूर्ण दिवस मी रडलेलो.. आयुष्यात खुप मोठी चुक केली अस वाटत होतं मला.. तु विश्वास नाही ठेवणार मी त्या लोकांसोबत मैत्री पण तोडलेली.. दिल्ली सोडुन इथे यायला देखील तैयार झालेलो.. पण डॅडच्या भीतीने नाही आलो.. पण मम्माचा विश्वास माझ्यावर कमी इतरांवर जास्त आहे.. तो मुलगा फक्त बोलला हा कॉलेजमध्ये दारूच्या बॉटल घेऊन फिरत असतो... मम्माने लगेच विश्वास ठेवला यार.. पण त्या आधी तो मुलगा माझ्याशी कस वागला ते नाही विचारत ती मला.. पण मला खरच अस वाटत की त्यादिवशी तु नको यायला पाहिजे होत मला वाचवायला.. निदान तुम्ही तिघ खुश राहिला असता.. तुझ्यासोबत तुझा डॅड पण असता आणि तुझी मम्मा पण.."


शौर्य अस बोलताच

विराजचा हात त्याच्या गालावर उठतो..


विराज : "परत अस नाही बोलायच हा शौर्य.. तुझ्याशिवाय मी नाही जगु शकणार.. आय एम सॉरी... मी पण तुला नाही समजू शकलो."


(टॉनीची बर्थडे पार्टी कशी असेल?? भेटूया पुढील भागात.. आणि हा भाग कसा वाटला हे देखील कळवा)


क्रमशः

©भावना विनेश भुतल