माकड आणि हत्ती Sheetal Jadhav द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माकड आणि हत्ती

1.माकड आणि हत्ती

जंगलाबाहेर तलाव होता. त्या तलावात रोज एक हत्ती आंघोळ करायला यायचा. त्याच नाव गजु होत. त्या तलावाजवळ भरपुर झाडे होती. त्या झाडावर पक्षी, खारूताई आणि निलू माकड राहत असे.

गजु हत्ती पाण्यात मनसोक्त बसायचा. सोंडेने अंगावर पाणी उडवायचा. निलू माकड झाडावरून हे सगळ पहात असे. त्यालाही हत्तच पाण्यात मनसोक्त डुंबण पहाण्यात खुप मजा वाटायची.त्यालाही खुप पाण्यात पोहावस वाटे. पण पोहता येत नसल्याने तो कधी पाण्यात गेला नाही.

एके दिवशी हत्ती नेहमीप्रमाणे आंघोळ करण्यासाठी तलावाचा दिशेने जात होता. पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली बसला. त्याला काही केल्या उठता येत नव्हत. त्याने खुप प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही.

थोड्या वेळाने निलू माकडाच हत्तीकडे लक्ष गेले. निलू माकडाला वाटल की हत्ती चिखलात लोळत आहे म्हणुन तोही चिखलात लेळू लागला.

हत्तीचा पाय दुखत होता तो केविलवाणेपणे निलू माकडाला म्हणाला "तु का बरे असा चिखलात लोळतोय?" त्यावर निलू माकड म्हणाला, "मला वाटल अस करण्यात तुला मजा वाटत असेल."
हत्ती म्हणाला, " छे रे माझा पाय घसरला, मला उठताही येत नाही. मला मदत कर."
माकड म्हणाला, "मी एवढासा मी तुला कशी मदत करू? बघतो काही जमतय का?". माकडाने प्रयत्न केले पण व्यर्थ.
हत्ती म्हणाला तु अस कर. माझा मित्र शेरूला बोलव. तो जंगलात हत्तीचा कळपात असेल. त्याला सांग गजुने बोलवलय. तो लगेच येईल.

माकडाने लगेच शेरू हत्तीला गजु जवळ आणल. शेरूने सोंडेंच्या सहाय्याने गजुच्या सोंडेला खेचल. गजु हत्तीचा सोंडेला शेरू हत्तीने सोंडेने ओढल आणि गजु हत्ती खाडकन उभा राहीला. गजुला खुप आनंद झाला. त्याने आपल्या पायाकडे पाहिल आणि तो तलावाचा दिशेने आनंदाने पळतच गेला.हे पाहुन शेरूने ही निलू माकडाला पाठीवर बसायला सांगीतले आणि तोही तलावातील पाण्यात गेला. गजु हत्तीने सोंडेने पाणी नीलू माकडावर उडवल आणि पाण्यात मनसोक्त मजा केली.

माकड मनसोक्त त्यांचासोबत खेळले मग झाडावर भरभर चढले ओरडून म्हणाले, "धन्यवाद".

2. लाल भोपळा
इटुकला पिटुकला मोनू ससा टुणटुण उड्या मारत रानात बागडायचा. सशा रानात लालचुटुक गाजरे किंवा हिरव हिरव गवत जे मिळेल ते खायचा. एकेदिवशी ससा असाच फिरत फिरत वाट चुकला आणि मळ्याजवळ आला. मळ्यात काय असेल हे पाहण्यासाठी तो मळ्यात शिरला. त्यात लाल भोपळे लावले होते. सशाला लाल भोपळा खावासा वाटला. त्याने आजुबाजुला पाहिल आणि भोपळा खायला सुरवात केली. तितक्यात त्या मळ्याचा मालक आला आणि त्याने सश्याला पळवल.
ससा काहि केल्या त्या भोपळ्याना विसरला नाही. त्याने त्याचा चार-पाच मित्राना एकत्र केल आणि लाल भोपळ्याबद्दल त्याना सांगितले.
तो म्हणाला "इतक चविष्ठ गोड फळ मी कधीच खाल्ल नाही. तुम्ही माझ ऐकल तर तुम्हालाही खायला मिळेल."
एका मित्र सशाने शंका घेतली. "तिथला मालक बरे आपल्याला भोपळे खाऊ देतील "
मोनू त्यावर त्याना म्हणाला,"आपण जमिनीतुन आपण आपल घर करू, लांबेलांब मोठस बिळ जे थेट मळ्यात निघेल."
मोनू आणि त्याचे मित्र कामाला लागले. जमिनीतून बीळ पंजाने माती सारत बाजुला करत त्यानी लांब बिळ बनवल आणि रात्री मळ्यात पोहचले. त्यानी मनसोक्त भोपळे खाल्ले. जसा मालक आले तसे ते सर्व बिळ्यात गेले. मालकाने बिळाचा मुखावर मोठा दगड ठेवला आणि म्हणाला "बसा अता. आत बिळात बोंबलत.'
सशाचे मित्र घाबरले. मोनू मात्र घाबरला नाही तो म्हणाला, " अरे आपण मळ्याचा बाहेरुन ह्या बिळातुन तर आलो. चला माझ्यामागे."आणि ते बाहेर आले. एकमेकाना अलिंगन करत उड्या मारत म्हणत होते, "लाल भोपळे खाणार कोण?" मित्रानी मोनूचे आभार मानले आणि त्यांचा घरी गेले.