shaletil ved prem - 2 books and stories free download online pdf in Marathi

शाळेतील वेड प्रेम - 2

मागील भागावरून
दिव्या कावरीबावरी होऊन संपूर्ण शाळा बघत होती.तेवढ्यात तिला एका मुलाचा धक्का लागला,त्यामुळे दोघंही खाली पडतात.पडल्यामुळे दिव्या ला थोड खरच्टत.तो मुलगा उठून काहीतरी बोलणार इतक्यात त्याला एका मुलाने आवाज दिला........' ये अम्या चल लवकर उशिर होतोय,तसा त्याने त्याची बगेतील समान खाली पडलेला उचला आणि तो काहीही न बोलता तडक निघाला.दिव्या ला त्याच खूप वाईट वाटल तिने खाली बघतील तर एक पेन तिला दिसला ,तो पेन थोडा महागतल तिला वाटलं,तो पेन त्या मुलाचा होता,तिने ती पेन स्वतः जवळ ठेवला नंतर तो भेटला तर त्याला देऊ असता तिने विचार केला ती उठून सगळ विसरून परत वर्ग शोधण्यास गर्क झाली.तेवढ्यात तिला एक शिपाई दिसल्या तिने त्यांना तिचा वर्ग विचारला,त्या शिपाई बाई ने तिला तिचा वर्ग शोधून दिला .दिव्या चे वर्गशिक्षकानी सर्व विद्यार्थ्यांना तिचे ओळख करून दिली......' मुलांनी ही दिव्या सबनीस तुमची नवीन मैत्रीण.तुम्ही सगळे तिच्याशी मैत्री करणार ना?.....असे विचारताच सगळे एकसाथ हो असे म्हणाले.दिव्या एका मधल्या रांगेत एकच मुलगी बसलेली दिसली ती तिच्या शेजारी जाऊन बसली. तिच्याशी तिने लगेच मैत्री केली,तिचे नाव रेश्मा असे होते.रेश्मा आणि दिव्या ची खूप चांगली मैत्री झाली.त्यांनी सोबत च डब्बा खाल्ला. छान अभ्यास करून आजच शाळेचा दिवस संपला.आजच्या दिवशी तिला ती मुलगा परत दिसला नाही.
शाळा सुटली तशी दिव्या धावतच घरी गेली.आजच्या दिवशी काय काय झालं तेही तिने तिच्या आई ल सांगितलं फक्त सकाळी धक्का लागलेला प्रसंग सोडून.संध्याकाळी ती खाली तिच्या मैत्रिणीसोबत खेळून नंतर अभ्यास केला.रात्री तिचे वडील घरी आल्यावर तिने त्यांनाही शाळेविषयी सांगितलं.आपल्या मुलीला नवीन शाळा आवडली म्हणून त्यांनाही आनंद झाला.नंतर सगळ्यांनी जेवण करून टीव्ही बघत बसले.दिव्या उद्या शाळेसाठी तिची बॅग भरत होती. बॅगेत तिला तो त्या मुलाचा पेन दिसला.....अरेच्या आपण हा पेन त्याला परत च दिला नाही.उद्या पहिला तुला शोधून त्याचा पेन परत करवा अश्या विचाराने तिने पुन्हा तो पेन तिच्या बॅगेत ठेवला.बॅग भरून ती लवकरच झोपून गेली.
सकाळी दिव्य लवकर उठून पुन्हा शाळेच्या तयारीला लागली.तयारी करून देवाला नमस्कार करून शाळेला गेली.शाळेत गेल्या गेल्या तिचे मैत्रीण रेश्मा दिसली त्या दोघी सोबतच पुन्हा वर्गात गेले.शाळेची घंटा झाली आणि वर्ग सुरू झाले.त्यांचा पहिला विषय चालू होताच एक मुलगा पळतच वर्गात येऊन मॅडम ला आत येण्यासाठी विचारत होता.दिव्य वर नजर करून बघितल तर तो तोच मुलगा होता जो काल तिला धक्का मारून गेलेला .मॅडम ने त्याला आत येण्यासाठी सांगितलं.तसा तो शेवटच्या बंच वर त्याच्या मित्रांसोबत जाऊन बसला.त्याला बघताच तिला त्याच्या पेन ची आठवण झाली.तिने विचार केला मधल्यासुठीत त्याला त्याचा पेन परत करवा.म्हणून मध्ल्यासुठीत ती त्याला शोधू लागली पण तिला तो दिसलाच नाही.पण नंतर त्याला पेन देऊ या विचाराने तिने परत तो पेन स्वतः जवळ ठेऊन घेतला .तिने तिच्या रेश्मा क तो सगळा प्रकार सांगितला असता....त्याच नाव अमर राजपूत आहे.बड्या घरातल्या बिघडलेला आणि खूप उद्वठ मुलगा आहे आणि तुला त्यांची पेन पर करण्याची काहीही गरज नाही असे सांगितले.पण तरीही शाळा सुटल्यावर तिने त्याला तो पेन परत करण्यासाठी त्याला भेटली.त्याला भेटताना तिला थोडी भीती वाटत होती.त्याच्या सोबत अजून दोन चार त्याचे मित्र होते दिव्य ने त्याच्या समोर तो पेन धरला......हा पेन तो काल तिथेच विसरून आलेला नी तुला तो परत करायला आलीते हा घे........तो त्या गोष्टीवर आधी हसला......तो का हसला याच तिला आश्चर्य वाटल.....तिने परत त्याला घे अस म्हूनल्यावर तो म्हणाला.......नकोय मला तो पेन तो तुझ्याकडेच ठेव......अमर,........अरे पण हा तुझा पेन आहे मी कसा काय ठेऊन घेऊ शकते.......दिव्या,........तुला एकदा सांगितलेला कळत नाही का ग बिनडोक,नकोय मला ठेव तुलाच......अमर,अस बोलतच दिव्या ला त्याचा खूप राग आला ती काही बोलणार तोच तो तिथून निघून गेला.तिला त्याचा खूप राग येत होता.पण दुसऱ्याची वस्तू अशी स्वतः जवळ ठेवणे हे तिला पटत नाही....त्यामुळे ती त्याला तो पेन उद्याच्या उद्या परत करायचं ठरवते.

बघू आता उद्या दिव्या तो पेन अमर ल परत करू शकते का त्यांच्यात अजून भांडण वाढते ते,पुढच्या भागात......हा भाग कसा वाटलं हे नक्की कळवा....धन्यवाद


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED