कोंबडीचे प्रयत्न Sheetal Jadhav द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंबडीचे प्रयत्न

कोको कोबंडा गावभर हिंडत फिरायचा. तुरूतुरू चालायचा. त्याच्या डोक्यावरचा सरळ, उभा असा लालभडक तुरा कधी कधी एका बाजूस झुकलेला असायचा. त्याला तो शोभून दिसायचा. त्याचा चोचीचा खाली लालभडक कल्ला होता. संपूर्ण शरीर तपकीरी काळ्या पिसांनी झाकलेले होते.

गावात चंदुशेट राहत होते. त्यांचा घराचे बांधकाम चालु होते. बांधकामाला लागणाऱ्या वीटा, वाळू बांधकामाजवळच ठेवल्या होत्या. तिथेच रस्त्याचा कडेला मातीचा ढीग होता. कोको कधी कधी तिथेच खेळत असे. असाच तो एके दिवशी नेहमीप्रमाणे त्या ढिगाऱ्यावरून वर खाली करत होता. तितक्यात कीको कोबंडी आली. किकोची पिसे पांढरीशुभ्र होती. ती आणि कोको एकत्र खेळायचे. त्या दोघाना नीलु बकरी झेब्रा म्हणायची. नीलु बकरी तिथेच बाजुला होती. ती म्हणाली, "माझा झेब्राचा पांढरी पट्टी आली." कीकोने काही लक्ष दिले नाही. किको कोबंडी कोकोला म्हणाली, "किती सहज तु वर चढतो आणि भरकन खाली येतोस. मी पण येऊ का?" तसा कोको कोबडा प्रेमळ होता पण विचारलेल बर अस किकोला वाटल.
कोको म्हणाला "ये लगेच." वर किको चढायला गेली तसा तीचा पाय त्या वाळूत रूतला. तिने पाय ओढला तशी ती पडली. हे पाहून नीलु बकरी हसली. किकोला नीलु बकरीचा राग आला ती म्हणाली, "कोणी पडल तर अस हसतात का?" आपल हसु दाबत ती म्हणाली, "अग चुकलच माझ." आणि ती पुन्ही हसायला लागली. आता मात्र कीको कोंबडीला राग आला ती म्हणाली, "तुला इतक सोप वाटत तर तु चढुन दाखव."
निलू बकरीनेही प्रयत्न केले पण तीचाही पाय रूतला. ते पाहून कोको कोबंडा म्हणाला, " मी रोज सकाळी येथे गेल्या दोन-तीन दिवसापासुन येतोय आणि वर खाली चढत उतरत होतो. पहिल्यांदा मीही असाच घसरलो. मग पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न केला. मग जमल. तुम्ही पण करा. जमेल तुम्हाला." नीलू बकरी म्हणाली, " किको तु प्रयत्न कर. तु करू शकतेस." मग किको वर चढली. हळूहळू पाय पुढे नेत नेत ढिगाऱ्यावर पोहचली. तशी नीलु बकरी म्हणाली, "किको तु करून दाखवलस."

२.मैत्री

गोलू माकड खुप हुशार होते. त्याचे केस लांब व करड्या रंगाचे होते. त्याची शेपटी लांब होती. तो
जिथे राहयचा तिकडे आंब्याची, नारळाची खुप झाडे होती. तो नारळाचा झाडावरही भरभर चढायचा. तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारायचा. तिथेच भैरू अस्वल यायचे. त्या दोघांची खास मैत्री होती. गोलू माकड भैरू अस्वलाचा पाठीवर बसायचा. त्याचासोबत खेळायचे. दोघांचा वेळ चांगला जात होता.

एके दिवशी माकड झाडाच्या फांदीवर झोपले होते. आणि अचानक कानात गुन गुन अस काही तरी आवाज येत होता. त्याने डोळे उघडले तर दुरुन खुप साऱ्या मधमाश्या येताना दिसल्या. तो झरझर झाडावरून खाली उतरला. तो घाबरला आणि भैरू अस्वलाकडे गेला.

गोलू माकड म्हणाले, "मला आता त्या झाडाचा येथे राहता नाही येणार. मला आता दुसरीकडे जाव लागेल." भैरू अस्वलाने विचारले, "का रे काय झाल? तु इतका का बरे घाबरला आहे?" माकड म्हणाले, "अरे मी राहतो त्या झाडावर मधमाश्यानी ताबा घेतलाय. मला चावतील त्या. म्हणुन तर तुझ्याकडे आलोय. मदत कर मला. तुला हव ते देतो. पण त्या मधमाश्याना पळवुन लाव तेवढ."
भैरू अस्वल हसले. ते म्हणाल, " तु इथेच थोडे दिवस राहा."
गोलू माकड आणि भैरू अस्वल दोघे एकत्र राहू लागले.
नंतर काही दिवसानी ते झाडापाशी गेले. मधाच पोळ झाडाला लटकत होत. त्यातुन मध खाली टपकत होत. भैरू अस्वल झाडावर चढल. त्याने पोळ झाडावरून काढल. तशा मधमाश्या पोळ्यातून बाहेर निघाल्या आणि खुप दुुर गेल्या. माकडाने अस्वलाचे आभार मानले आणि पुन्हा माकड त्या झाडावर राहू लागले.