Savar Re - 5 books and stories free download online pdf in Marathi

सावर रे.... - 5

पलीकडून येणारा आवाज ऐकून जाई स्तब्ध झाली. तिला विश्वसच बसत नव्हता. यश ने तिला कॉल केला होता. ती पुन्हा त्याच आवाजात हरवून गेली.

*हॅलो, जाई…..?

पलीकडून यश बोलत होता पण जाईच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ती नुसतीच ऐकत होती. पुढे काही बोलावं हे तिला सुचतच नव्हतं. प्रेमाच असच असतं ना समोर आवाज जरी ऐकला तरी मन गुंतून जात. सगळ्या जगाचा विसर पडतो. सुख-दुःख संवेदना विसरून मन तल्लीन होऊन जाते. जाईच पण तसच झालं होतं.

तो मात्र तसाच बोलत राहिला.

हॅलो….हॅलो…..आवाज येतोय ना? जाई…. हॅलो… तू बोलत का नाहीस?....जाई आर यु देअर?.......
जाई भानावर येत म्हणाली

*अं….हं….हो...येतोय आवाज.

*अरे मग गप्प काय बसली बोलल्या शिवाय समजणार आहे का?

जाई एकदम दचकून, मनातच म्हणाली नेमकं काय बोलायचं आहे ह्याला? तिने थोडं कचरतच विचारलं,
* क..का..य?

*अग फोन वर कोणी आहे की नाही हे कसं समजणार ? त्यासाठी हॅलो बोलायची पद्धत आहे मॅडम.

एक मोठा श्वास घेऊन ती रिलॅक्स झाली आणि म्हणाली,
*अं… हो ना.. सॉरी

*अरे काय तू पण किती सिरीयस होतेस, मस्करी केली मी.

*हम्म

*हम्म काय, तू ना खूप बदळलीस.

*कोण मी?

*नाहीतर काय आल्या पासून पहातोय माझी आधीवली मैत्रीण हरवलीय कुठेतरी.

ती कसनुस हसून म्हणाली,
* अस काही नाही

तो थोडा गंभीर होत म्हणाला,
*तू ठीक आहेस ना जाई?...

अचानक त्याच्या काळजीने विचारण्याने ती पुन्हा दचकली,
*हो... मला काय झालं?

त्याच टोन मध्ये तो म्हणाला,
* मग मला का असं वाटतंय की काही तरी आहे जे मला नाही माहीत.

जाई थोडीशी तिची बाजू सांभाळत म्हणाली,
*अरे... असं... काही नाही.

तो थोडा इमोशनल होऊन म्हणाला,

*खरंच ना? की आता मी इतकाही महत्वाचा नाही जे तू मला सांगू इच्छित नाहीस.

जाई समजवणाच्या स्वरात म्हणाली,

*अरे... खरंच…. तसं काही नाही.

*मग अशी घाबरलीस का?

*कोण? मी ? नाही तर.

* मला कळतं तुझ्या आवाजा वरून माहीत आहे ना?

तुला कळत असत तर मला बोलण्याची गरजच लागली नसती ना अस मनात बोलत राहिली ओठावर मात्र काहीच नाही आले.

* ……
तिच्याकडून प्रतिउत्तर नाही आले म्हणून तो म्हणाला,

*अग इतकी काय घाबरते मस्करी करतोय, तू पण ना.

पुन्हा एकदा दिर्घ श्वास घेऊन स्वतःला नॉर्मल करत ती म्हणाली,

*तू कॉल का केला होतास?

*अरे हो विसरलोच, आज तुझा काही प्रोग्रॅम आहे का?
तिला काहीही न बोलू देता तोच पुढे म्हणाला,

*असेल तर कॅन्सल कर, आपण बाहेर जातोय.

*अरे पण….

*नो एस्कुज हा जाई, मला कसलेच बहाणे नकोत, आधीच सांगतोय. तू येतेस आणि हे फायनल. तयार रहा मी येतोय अर्ध्या तासात. ओके बाय.

*अरे पण….

ती बोलतच होती तितक्यात,
फोन कट झाला.

कट झालेल्या फोन कडे दोन मिनिटं ती पहात राहिली पुन्हा एकदा दोन आसवे गालावरून सरकली. मग कसलासा विचार करून ती तयारीला लागली.

जाईच्या घरातील वातावरण थोडं निराशेची झळ असल्यासारखं होत. सगळ्यांना माहीत होतं, की जाई रात्रभर झोपली नसेल. कारण परिस्थितीच तशी होती त्याला कोणीही काहीच करू शकत नव्हते. आता सगळ्यांना मिळून फक्त जाईला सांभाळून घ्यायचे होते म्हणून कोणीही तिला डिस्टर्ब केले नव्हते. नितीन ऑफिस ला निघून गेला होता. किचन मध्ये होती तर बाबा सोफ्यावर बसून टीव्ही पहात होते. बेल वाजली म्हणून बाबांनी दरवाजा उघडला तर समोर यश उभा. त्याला पाहून ते आश्चर्यचकित झाले यश आता आणि इथे कशाला बरं आला जाईला काल कसं तरी समजावलं पण असा हा समोर आला तर तिला आणखीन त्रास होईल. क्षणभर तसेच विचार करत राहिले. तोच त्याना यश ने आवाज दिला, काका काय झालं? कसला विचार करताय?
त्यांची तंद्री भंग झाली आणि त्यांनी जबरदस्ती हसत त्याला आत बोलवले.

जाईच्या आईला आवाज दिला त्यानाही यश ला पाहून आश्चर्य वाटले, त्यानी त्याला पाणी दिलं आणि विचारपूस केली. त्याची नजर भिरभिरत सगळ्या घरावर फिरत होती. खूप दिवसांनी जो आला होता. बाबां त्याला काही विचारणार तोच तो म्हणाला जाई कुठे आहे तयार झाली ना? आम्हाला बाहेर जायचं आहे. त्याच्या अस बोलण्याने आई बाबा शॉक बसल्या सारखं एकमेकांना पहात राहिले. यशाला त्यांचं वागणं थोडं खटकलं पण तस न दाखवता तो पुन्हा म्हणाला काही प्रॉब्लेम आहे का काका. बाबा भानावर येत पुन्हा काहीतरी सारवा सारव करणार तोच जाई तिच्या रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली, मी तयार आहे.

जाईला असं तयार होऊन बाहेर आलेले पाहून पुन्हा एक धक्का त्या माय-बापाला बसला आणि ते काळजीत पडले. जाई कधी उठली आणि तयारही झाली, काही बोलली पण नाही.

आईने जाईला विचारले, जाई तू तयार होऊन कुठे निघालीस?

जाई काही बोलणार तोच यश म्हणाला, आई मला ना एलिनासाठी शॉपिंग करायची आहे. आणि ह्या बाबतीत जाईची चॉईस नंबर वन असते म्हणून मी थोडा वेळ तिला नेतोय बाहेर.

एरव्ही त्याच्या सोबत पाठवताना त्याना काहीच वाटत नव्हतं,पण आता वेगळी स्थिती होती. त्याना जाईची खूप काळजी वाटत होती. बाबा काही म्हणणार तोच जाई म्हणाली बाबा जाऊ ना मी लगेच येईन. आता तीच म्हणत असेल तर बाबा काय म्हणणार ते शांत झाले आणि मग म्हणाले ठीक आहे जा पण काळजी घे. जाईची आई नास्था करून जा म्हणतच होती पण यश ने त्याना मधेच थांबवून सांगितले आज नको उशीर होतोय, मी पुन्हा येईन नक्की आणि त्याने तिला ओढतच बाहेर नेलं. ते दोघे घाईतच निघाले.

बाहेर गाडीत एलेना त्यांची वाट बघत बसली होती. जाईने तिला हाय केले आणि घरी का नाही आलीस असे विचारले. ती काही म्हणायच्या आधीच यश म्हणाला की मुद्दाम नाही आणली तिला घरी नाहीतर उशीर झाला असता ना म्हणून

एलेना ने फक्त त्याला एक रागीट लूक दिला ती शांतच होती. तिच्या वागण्या वरून जाईला त्यांच्यात काहीतरी बिनसले असावे असं वाटलं. पण ती गप्प झाली. जाई मागच्या सीट वर बसली होती. तीच मन मात्र समोरच्या ड्राइविंग सीटवर बसलेल्या यश मध्ये अडकलं होत. ती त्याला निहाळत होती. पण एक नजर तिच्यावर रोखली होती ती एलेना ची, जाईच्या लक्षात येताच ती बाहेर पाहू लागली. मनातून खूप वाईट वाटत होते. काल पर्यन्त जे फक्त तीच होत ते आज निसटून गेलं होतं. आता तर ती मन भरून त्याला पाहू ही शकत नव्हती. मनातून गहिवरून आली होती तरी तिने तिच्या आसवांना सक्त ताकीद दिली होती. काय बिशाद त्यांची बाहेर यायची. ही सगळी खटाटोप फक्त यशच्या चेहऱ्यावरची खुशी जपण्यासाठी होती.

मनातच ती त्याला बोलत होती आणि स्वतःच्या मनाला समजावत होती. माझं प्रेम मला नाही मिळालं मग काय झालं? तू तर खुश आहेस ना?

पण तो तर पूर्णपणे ह्या सगळ्या पासून अनभिज्ञ होता.
काही वेळेतच ते मॉल मध्ये पोहोचले.
खूप प्रशस्थ ठिकाण होते ते अनेक प्रकारची दुकाने एकाच छता खाली. जाईने तिच्या नेहमीच्या दुकानात त्याना नेलं तिथे सगळे ट्रॅडिशनल कपडे होते. ती नेहमी तिथे जायची म्हणून तिथे सगळे तिला ओळखत होते आणि तिच्या सोबत प्रेमाने आणि नम्रतेने वागत होते. यश ला ह्या सगळ्याच खूप कौतुक वाटलं. जाईला त्याने आधीच सांगितलं होतं की सागर त्याचा मित्र त्याचे लग्न होते म्हणून त्याला एलेना साठी काही ट्रॅडिशनल आऊटफिट घ्यायचे होते. म्हणून जाई ने तिथे काम करणाऱ्या एक मुलीला काही सूचना दिल्या त्या नुसार तिने एलेना ला काही ड्रेसेस दाखवले. परंतु एलेना ला काही पसंत पडतच नव्हते. एकतर तिने कधी असले कपडे घातले नव्हते त्यामुळे तिला ते कम्फर्टेबल वाटत नव्हते. आणि दुसरं म्हणजे तिला उगाचच अस वाटत होतं की यश नकळत तिला आणि जाईला कंपेर करतोय.

जाईला कदाचित तिची अवस्था समजत होती म्हणून मग तिने एक दोन इंडोवेस्टर्न ड्रेसेस आणून तिला ट्राय करायला दिले.एलेना ला हे ड्रेस खूप आवडले ती चेंजिंग रूमकडे गेली. त्याच वेळेत जाई काही ड्रेस पहाण्यात गुंग होती आणि यश नकळत तिला पाहण्यात हरवून गेला. जाईने एक लाईम आणि ग्रीन अशा कॉम्बिनेशनच्या ड्रेस वर डोळे रोखले. तिच्या कडे पाहून कोणालाही दिसले असते तिला तो ड्रेस किती आवडला ते पण तिने क्षणभर त्या ड्रेसला पाहिले आणि तिथून काढता पाय घेतला.तितक्यात एलेना बाहेर आली. तिने मोती कलरचा मॉडर्न स्टाईल मध्ये डिझाइन केलेला घागरा घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. यश आणि जाई पण तिला एकटक पहात राहिले.

क्रमशः..........


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED