मी सुंदर नाही - १ Chandrakant Pawar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी सुंदर नाही - १

सुहास नोकरीसाठी एका हॉटेल मध्ये गेली होती. तीने तोंडावर मास्क लावला होता.तीचा मास्क खाली घसरला. तो तिने पुन्हा नाकावर चढावला. हॉटेलवाल्याने तिला विचारले तुला काय काय बनवता येते.?

मला सगळं करता येते. जेवण बनवते, चहा बनवते मिसळपाव बनवते, चायनीज पदार्थ बनवते. शांतादुर्गा म्हणाली...बोलता बोलता तिने तोंडावरचा मास्क काढायला हात घातला एवढ्यात हॉटेलचा मॅनेजर बोलला.

कृपया मास्क काढू नका. कोरोना रोगाचा धोका अजून गेला नाही.
पण मी तर ऐकलंय की कोरोना रोग आता गेला म्हणून. कमी झाला म्हणून. सुहास बोलली.
तुम्ही ऐकलंय ते ठीक ऐकलेय .पण तो आजार पूर्णपणे नष्ट झालेला नाही .कारण कोरोना रोगाचे जंतू अजूनही हवेमध्ये आहेत आणि ते नाकातोंडातून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे तुम्ही तुमचा मास्क काढू नका. आपल्या हॉटेलमध्ये रोगराई जागरूकता आणि स्वच्छता पाळण्याला खुपच महत्व आहे..

हॉटेलच्या बाहेर आल्यावर तिने तोंडाचा मास काढला आणि पुर्ण दीर्घ श्वास घेतला. तेव्हा तिला जरा बरे वाटले. मास्क मध्ये तिला गुदमरायला झाले होते. तिने तिच्या पुढे आलेल्या दातावरून जीभ फिरवली.आपल्याला हॉटेलवाला हॉटेलमध्ये कामाला ठेवेल की नाही याची तिला खात्री नव्हती. कारण त्याने आपला अजून चेहरा बघितला नाही .

हॉटेलवाल्याने तिला विचारले होते. यापूर्वी तुमचा कामाचा अनुभव काय? तेव्हा तिने सांगितले होते की मी यापूर्वी कॅटरर्स मध्ये कामाला होते.
कॅटरर्स मध्ये तिला दररोज तीनशे रुपये रोख मिळायचे. मात्र येथे तिला महिन्याला पगार मिळणार होता.लॉक डॉऊनमुळे तिची कॅटरर्समधली नोकरी सुटली होती. त्यामुळे ती हॉटेलमध्ये काम करायला तयार झाली होती.

हॉटेलची ड्युटी सुद्धा जास्त होती. तिला चौदा तास काम करावे लागणार होते .तिला हॉटेलमधल्या गिऱ्हाईकांच्या ऑर्डर साठी पदार्थ बनवावे लागणार होते आणि भांडीकुंडी सुद्धा घासायला लागणार होती .कदाचित तिला वेटरचे काम सुद्धा करावे लागणार होते. असं मॅनेजरने तिला सांगितलं होतं इंटरव्यूमध्ये...

आपले पुढे आलेले दात त्याने अजून पाहिलेले नाहीत. आपल्याला अनेक जण " दाताडी " म्हणून चिडवतात ती गोष्ट तिला खटकत होती. काहीजण तिला. " फावडी " म्हणायचे. कारण तिचे समोरचे चार-पाच दात फावडयासारखे खसकन पुढे आलेले होते.त्यामुळे सुहास दिसायला भयंकर दिसत होती. तिचे दात तिला अधिकच विद्रुप बनवत होत होते.

दररोज आरशात बघताना ती स्वतःला प्रश्न विचारत होती आपण कसे दिसतो. विद्रूप की भेसुर.... रोज रोज दिसणाऱ्या या सुळेदार दातांना उपटून फेकून द्यावे असे तिला वाटत होते. डेंटिस्टकडे जाऊन दातांचे उपचार जाऊन करावा असे तिला वाटत होते. परंतु आर्थिक परिस्थिती आडवी येत होती.

निराश मनाने सुहास घरी आली. घरी आल्यावर तिने तोंडावरचा मास्क काढला. तो मास्क तिने खिळ्याला अडकवला. थोड्यावेळाने मास्क धुवू या असा तीने विचार केला . मात्र तिने मास्क वर फवारा मारला.बाथरूम मध्ये जाऊन तिने तोंडावर पाणी मारले. फ्रेश होऊन ती बाहेर आली. तेव्हा तिच्या आईने तिला विचारले.

अग सुहास ... काय झाले मिळाली कां नोकरी तुला...

अजून तरी नाही .हॉटेलचा मॅनेजर दोन दिवसाने सांगणार आहे... सुहास म्हणाली

चटकन मिळाली असती नोकरी तर बरे झाले असते. बाई तुला. घरचा गाडा कसा चालवायचा हाच मला प्रश्न पडला आहे .तू थोडीफार नोकरीला होतीस तेव्हा बरं होतं बाई .पण आता काय करायचं आपण.पण तुला काय वाटते , मिळेल तुला नोकरी.? तिच्या आईने तिला विचारले.

होय ना नक्की मिळेल... आईची समजूत घालीत ती बोलली. ती नोकरी मिळेल की नाही हे तिचे तिलाच माहीत नव्हते.
... आणि आई हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स माझा पूर्ण झाला म्हणजे मला चांगल्या हॉटेलच्या ठिकाणी, चांगल्या जागी नोकरी मिळेल. एखाद्या थ्री स्टार हॉटेल मध्ये नोकरी मिळाली तर पगार भरपूर मिळतो असे ऐकलेय. ती आईला बोलली.

सुहास पहिल्या ठिकाणी म्हणजे कॅटरर्स मध्ये पार्ट टाईम काम करून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करत होती . तिच्या कोर्ससाठी लागणारी फी ती काम करून मिळवत होती आणि घरचा संसार सुद्धा चालवत होती .
घरी ती आणि तिची आई होती . तिचे वडील फारच वृद्ध झाले त्यामुळे ते घरीच बसून होते.

हल्ली हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी सुद्धा खूप चुरस असते. लवकर ऍडमिशन मिळत नाही. पण तिला एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते. काहीतरी कोर्स करावा म्हणून तिने सहजच हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतले होते .परंतु नंतर नंतर तिला त्यामध्ये रुची वाटू लागली आणि तिने तोच कोर्स पूर्ण करायचा ठरवला. खरंतर तिला टुरिझम हा कोर्स करायचा होता. परंतु टुरिझम कोर्सला जागा फारच कमी होत्या. मग ऑप्शन म्हणून तिने हा कोर्स घेतला होता. या कोर्सला तिला सहज ॲडमिशन मिळाले होते.