Mi Sundar Nahi - 2 books and stories free download online pdf in Marathi

मी सुंदर नाही - २

सुहासची आणि विजयची मैत्री होती. विजय तिच्या कॉलेजमधला मित्र होता. मनातून सुहास विजयवर मरायची. विजयला समजेल अशा अर्थाने तिने चार-पाच वेळा विजयशी वर्तन सुद्धा केले होते. मात्र विजय कडून तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नव्हता.
एकदा तर विजयने तिला सांगून टाकले सरळ-सरळ स्पष्टपणे. सुहास तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला समजते. पण तु दिसायला अशी आहेस. त्यामुळे तू मला अजिबात पसंत नाहीस. हां आता आपली मैत्री आहे म्हणून मी तुझ्याशी बोलतो आहे. परंतु माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच भावना नाहीत.

त्या दिवसापासून सुहासने विजयला प्रेम नजरेने पाहायचे सोडून दिले. ती त्याच्याशी निखळ मैत्री प्रमाणे त्या दिवसापासून त्याच्यासोबत वागू लागली. खरंतर तिला वाटले होते की विजय तिच्यावर प्रेम वगैरे करतो की काय? पण तसे काहीच नव्हते.

आयुष्यात आपले कसे होणार असा तिला प्रश्न पडला होता.आपल्याशी कोणी लग्न करील की नाही? की आपल्याला असेच विना लग्नाचे कायमचे राहावे लागेल याची चिंता तिला लागून राहिली होती.

विजयने तर तिला सरळ सांगून टाकले होते की तुझा चेहरा असा आहे विचित्र . तुझे दात पुढे आहेत. त्यामुळे तू मला जराही आवडत नाहीस.मी बोलायचे म्हणून मी तुझ्याशी बोलतोय.
खरं तर तिला विजयचा खूप भयंकर राग आला होता .परंतु तिने तो आवरला .जाऊंदे....

त्याच्या मनात नाही ना तसे काही .पण आपण बोलतो आहोत ना एकमेकांशी खूप झाले.

सुहास प्रमाणे तिच्या आई-वडिलांना सुद्धा तिच्या लग्नाची काळजी होती. तिला मागणी घालायला एक-दोन स्थळे आली होते. परंतु तिच्या आईने त्यांना नाकारले होते. .कारण ते अजिबात शिकलेले नव्हते.
तिच्या आईनेच ते स्थळ नाकारल्यामुळे सुहासने पुढे काहीच प्रयत्न केले नाही. आपली आई आपल्यासाठी चांगलेच करते हे तिला माहित होते.

तिच्या पुढे आलेल्या दातांमुळे तिला आतापर्यंत तिच्या जीवनात खूपच अपमान सहन करायला लागला होता. हेटाळणी युक्त बोलणे ऐकावे लागले होते. अनेकदा तिला अपमानास्पद वागणूक मिळाली होती. तिच्यापासून तिचे मित्र मैत्रिणी दूर पळत होते. तिला ते कळायचे. पण नाईलाजाने तिला तसे दाखवता येत नव्हते.
तिच्या समोरच अनेक जण तिला फिदीफिदी हसायचे.

ते त्यांचं हसणं बघून तिच्या छातीत दुसरी कळ उमटायची. पण निसर्गाने दिलेल्या रूपामुळे तिचे काही चालत नव्हते.

तिचा देवावर विश्वास नव्हता आणि देवावर राग सुद्धा नव्हता. कारण आपल्याला हा जन्म मिळाला. तेच खूप झाले. असे तिला नेहमी वाटत असे...नाहीतर आपण आईच्या गर्भातच मरून गेलो असतो ....
त्यापेक्षा जे आहे तसेच राहावे . हे जगणे असेच भोगीत रहावे त्याला काही इलाज नव्हता. असे तिने ठरवले होते.
ठेविले अनंते तैसेची रहावे. असे तिला वाटत होते.

इतर मुलीप्रमाणे तिला जास्त नटता मुरडता येत नव्हते. तिने तसे केले तर ती अधिकच बिभत्स दिसायची. शेजारीपाजारी तिला जास्त जवळ करत नव्हते. शक्यतो तिला लांबच ठेवत होते. तिच्या आई-वडिलांना हे व्यंग नव्हतं मात्र तिच्या वाट्याला ते आलं होतं.

.नाही म्हणायला तिने दोन-तीन वेळा फेशियल केले होते. मात्र ती तिच्या भुवया नेहमी कोरायची. एवढ्यावरच ती समाधान मानायची. निसर्गाने हे असे आपल्याला रूप बहाल केलं आहे. त्या रुपाचा अपमान करता कामा नये. एवढंच तिला कळत होतं .कारण निसर्गाने तिला दिव्यांग केले नव्हते. मात्र तिचा चेहरा तिच्या मनासारखा तिला दिला नव्हता. हाता पायाने ती निरोगी होती. तिला कसलेही व्यंग नव्हते. त्यामुळे ती कधीकधी निसर्गाचे आणि देवाचे आभार मानायची.

खरे तर तिला देवाचा राग यायचा. मात्र देवाबद्दल काही बोलायला लागू नये म्हणूनच ती देवाला मानेनासी झाली होती. ती एकदमच नास्तिक नव्हती. सुहास जास्त फॅशन सुद्धा करत नव्हती.इतर मुलींसारखी फॅशन कपडे घातले तर तीला लोक छद्मीपणे हसत.

चेहऱ्याचा नाही पत्ता आणि कपडे कसले घालते बघा. असे छद्मीपणे तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागत असत.

जीवनामध्ये अनेक वेळा ती आतापर्यंत निराश झाली होती. परंतु शिक्षणामुळे त्या पासून ती वाचली होती. जगामध्ये तिच्यापेक्षा अनेक विद्रूप माणसे आहेत हे तिला कळले होते. मोबाईल मध्ये ती पहात होती. आपल्या पेक्षा भयंकर व्याधी घेऊन लोक जगत आहे हे ती अनुभवत होती. त्यांच्यापुढे आपलं दुःख काहीच नाही असे ती स्वतःला समजावत होती. विजय तिला बावळट म्हणत असला. तरी तिला बुद्धी मात्र चांगली मिळाली होती. ती प्रगल्भ बुद्धीची होती. जीवनामध्ये आपण शिक्षणानेच काहीतरी करू शकतो याची तिला जाणीव होती. त्यामुळे ती शिकत होती. शारीरिक बाबतीत आपण कमजोर असलो तरी शिक्षणाच्या बाबतीत आपण वरचढ आहोत हे समाजाला दाखवून द्यायला हवे. याची खूणगाठ तिने स्वतःची बांधली होती.

शिक्षण आणि चेहरा याचा काही संबंध नाही. कारण कुणाच्या चेहऱ्यावर शिक्षण लिहिलेलं नसतं. किंवा एखादा माणूस ज्ञानी आहे हे कुणीही सांगू शकत नसते. त्यामुळे बुद्धीच्या बळावर आपण आपलं व्यंग दूर करू शकतो आणि समाजात सन्मानाने जगू शकतो या बद्दल तिच्या मनात अजिबात शंका नव्हती. त्यामुळेच आपले दुःख विसरून ती शिकत होती.

पुस्तकांतून ती माहिती पाहत होती .वाचत होती.
नाही म्हणायला कधी कधी तिच्याबद्दल लोकं सहानुभूतीने बोलत असत.

तुझे हे अस रूप. तुझं कसं होणार गं बाई .मात्र ते ऐकण्यात तिला स्वतःची कीवच वाटायची...

लोकं तिच्याबद्दल कीव येऊन सहानुभूतीने बोलायला लागले की तिला त्यांचा राग यायचा. त्याबरोबरच तिला स्वतःचाही राग यायचा. हे जीवन संपून टाकावं असं तिला कधी कधी वाटायचं. मात्र ती तिच्या मनावर ताबा ठेवत होती. आणि जगत होती. तिची आई तिला धीर द्यायची. तिचे वडील तिला धीर द्यायचे.
आणि आईवडिलांसाठी ती जगत होती. त्यांची सेवा करावी. त्यांना आपल्या शिवाय दुसरं कोणीच नाही ही जाणीव तिला झाली होती. त्यामुळेच ती आपलं मन काबूत ठेवत होती. तिच्या आई-वडिलांना सुद्धा त्याबद्दल कल्पना होती....

सुहासला लग्नाबद्दल विजयने नकार दिला आहे हे तिच्या आईला माहीत होते. तरीपण विजयची नी तीची मैत्री आहे हे तिला खटकत नव्हतं. ते दोघे बोलतात. भेटतात. याबद्दल तिच्या आईला माहीत होतं. विजय आणि सुहास मित्र आहेत हे तिला कळले होते. आज-काल मुला-मुलींची मैत्री असते. ते तिच्या आईला अनुभवाने माहित झालं होतं. नाही म्हणायला तिच्या इमारतीमध्ये राहणारी एक दोन मुले तिच्या मागे होती.पण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नव्हते किंवा लग्न करण्याच्या लायकीचे अजिबात नव्हते. ती वाया गेलेली मुलं होती. हे तीला माहीत होते. अशा मुलांपासून तिची आई सुहासला नेहमी दूर राहायला सांगत असे. अशा मुलांमध्ये आपल्या मुलीचे आयुष्य बरबाद होऊ शकते. याची तिच्या आईला कल्पना होती.

तिच्या कुरूपतेचा फायदा घेऊन तिला सहानुभूती दाखवून तीची फसगत होऊ शकते.म्हणून सुहासच्या आईने तिला बजावून सांगितलं होतं . तू अशा मुलांमध्ये मिसळू नकोस. त्यांच्याशी जास्त संबंध राखू नकोस. जेवढ्यास तेवढीच बोलत राहा. नाहीतर आमच्यावर पस्तावायची पाळी यायची. त्या सोबत तुझ्यावरही पस्तावायची पाळी यायची. तेव्हा तू नेहमी सावध रहा.

होय आई मी तसेच करेन. जसे तू सांगतेस. ती तिच्या आईला म्हणाली. तिच्या आईचा सुद्धा तिच्यावर खुप विश्वास होता. तिच्या वडिलांना तर सुहास बद्दल खूपच चिंता होती. आपले वय झालेले आहे आणि आपण आपल्या मुलीसाठी काहीच करू शकत नाही. बाहेर जाऊन तिच्यासाठी चांगला नवरा शोधू शकत नाही. याची त्यांना खंत लागून राहिली होती. आपले नातेवाईक मंडळी काही कामाचे नाहीत .हे त्यांनी अनुभवावरून जाणले होते.

सुहास शिकलेली मुलगी आहे . त्याप्रमाणे तिला तिचा भावी साथीदार मिळायला हवा याबद्दल तिचे आई-वडील ठाम होते. मात्र तीला जी स्थळे येत होती. ती खूपच कमी शिकलेल्या मुलांची होती. नोकरी नसलेल्या मुलांची स्थळे होती. त्यामुळे सुहास पेक्षा तिच्या आई-वडीलच त्यांना नकार देत होते.

तिला बघायला येणारी स्थळे तिला ' कचरा ' म्हणत. आणि तीचा चक्क कचरा करून जात.तू कचऱ्याच्या लायकीची आहेस असे तिच्या तोंडावर म्हणणारी लोकं सुद्धा तिला अनेकदा भेटली होती. तीला अजून किती मनस्ताप भोगावा लागणार होता. तिचे तिलाच ठाऊक नव्हते.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED