मी सुंदर नाही - ३ Chandrakant Pawar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी सुंदर नाही - ३

तसं पहायला गेलं तर सुहास दिसायला गोरीपान होती. तिच्या चेहऱ्यावर काळे पणाचा जराही मागमूस नव्हता. तिचे दात वेडेवाकडे आणि बाहेर आलेले नसते.तर सुहास छान दिसली असती. सुहास तशी दिसत असल्यामुळे अनेकांनी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.

अगदी ताजा प्रसंग सांगायचा तर... आठ दिवसापूर्वी रस्त्याने जाताना. एका माणसाने तिला समोरून धडक दिली. तिच्या गालाला अस्पष्ट स्पर्श केला. मात्र सुहास सावध होती. त्यामुळे पुढचा प्रसंग टळला होता. ती तशी दिसत असल्यामुळे त्याने तो प्रसंग केला होता. ती त्याला एकदमच वेंधळी वाटत होती. आपण असे केले तर ती काही करणार नाही असेही त्याला वाटत असावे. अशा अनेक प्रसंगाला सुहास सामोरी गेली होती. मात्र तिने भांडणं केले तर लोक तिलाच हसत होते. त्यामुळे ती सहसा भांडण करणे टाळत होती. तिचे होणारे शोषण ती सहन करीत होती. त्याचा तिच्या मनावर विपरीत परिणाम होत होता.त्यामुळे समोर एकदा कोणी पुरुष माणूस येताना दिसला किंवा एखादा पुरुष शेजारून जाताना दिसला कि ती लगेच सावध होत असे. अशी माणसं तिच्या अंगाला मुद्दाम स्पर्श करीत असत. अशा माणसांना तिचं रूप दिसत नसे. फक्त ती एक स्त्री आहे. हेच ते पहात असत.अशा माणसांच्या नजरा हपापलेल्या असतात हे तिला अनुभवाने कळले होते.

सुहासच्या घरी तिची मामी आणि मामा राहायला आला होता. सुहासचा मामा प्रेमळ होता .पण मामी खूपच खत्रूड होती. ती सुहासचा द्वेष करायची.
काय ग सुहासे .तू तुझं ही फेदांरलेलं तोंड काळं कां करत नाही. यावर सुहास मामीला काहीच बोलली नाही.

ते बघून मामीला अधिकच चेव आला. सुहासला अधिकच टोमणे मारत होती. सुहास ते निमूटपणे सहन करीत होती. मात्र तिच्या मामाला त्याच्या बायकोचं वागणं पटत नव्हतं. पण मामी पुढे तो हतबल होता.
सुहासची मामी सुहासच्या आईला सुद्धा उलट बोलायची. क्षणोक्षणी सुहासच्या आईचा पाणउतारा करायची.

त्याचप्रमाणे सुहासची मामी मारकुटी होती. तिने सुहासला अनेक वेळा मारले होते. सुहासच्या आईला तर तिने एकदा झाडूने बदडले होते. तेव्हापासून सुहासची आई मामीच्या नादाला लागत नव्हती. ती मामीला खूपच वचकून होती.तिची आई सुहासला सुद्धा सांगे की त्या मामीच्या तोंडाला लागू नकोस. फारच वाईट बाई आहे ती.

होय आई माहित आहे मला . पण आता मी तिला घाबरणार नाही यापुढे.सुहास बोलली.
ही बया इकडे कशाला आली कुणाला माहित. सुहासची आई त्रासिक चेहरा करीत म्हणाली.
पण आई मामीला बाबा काय बोलतच नाही त्यांनी तीला बोलायला पाहिजे ना.
ते कशाला बोलतील. त्यांची ती लाडकी आहे ना.
आणि मामा सुद्धा काही बोलत नाही तिला उलट... सुहास आईला बोलली.

अरे तुझ्या मामाचा या मामीने भोटमामा करून ठेवलाय.
त्याची काय बिशाद आहे .तिच्या समोर तोंड उघडायला.
मामा त्याच्या तोंडातून जराही फरक पडत नाही. तसा त्याने प्रयत्न केलाच तर मामी त्याची पुरी वाट लावते. सुहासच्या आईने पुस्ती जोडली.
पण आई या मामीचा एकदा काय तो बंदोबस्त करायला हवा .ती खूप जास्तच करायला लागली.
तू तसं काही करू नकोस .तुझ्या बाबांना त्याचा त्रास होईल. आणि तुझ्या मामाला सुद्धा त्रास होईल.

हे तुझं असं आहे . तुला काय जरा सांगायला गेले की तू सरळ मलाच टांगायलाच उठतेस.

अगं तसं नाही सुहासे. ही मामी आहे कजाग. तिच्या पुढे आपण जर तिला तोंड देत राहिलो तर तिला रात्र पुराणार नाही . ती पक्की भांडखोर आहे.
होय ती गोष्ट खरी आहे. पण अशा माणसांना जरा लगाम घातला पाहिजे. नाहीतर ती आपल्याला खूपच वरचढ ठरेल.
सुहास तुला मी हात जोडते .तू काय बाई असं मामाच्या विरुद्ध तु काही करू नकोस .ती आलेय थोडे दिवस. राहील थोडे दिवस पाहूण्यासारखी. जाईल मग ती निघुन.

हो वाट बघ .ही मामी लगेच थोडी जाणार आहे चांगलं खाईल. राहील आणि मग जाईल .आपल्याला भिकारी करून. आपले पैसे संपेपर्यंत ही राहिली ती इथे हरी तर यावेळी बघतेच. आई... यावेळी मी नाटकच करते.
कसलं नाटक करतेस तू बाई . आईने वळुन तिला म्हटले.

आपण ना उद्या पासून अशी चर्चा करायची घरातल्या घरात... की रुपये पैसे संपले .पैसे नाहीयेत. आता जेवणाचे कसं होईल. मग मामी निघून जाईल त्यामुळे.
नाही जाणार ती तशी ती पक्की पोचट आहे. जर तिला जर कळलं की आपण हे खोटं खोटं नाटक करतोय.

तर ती आपल्या दोघींची पूरती वाटच लावून टाकील.

असं काहीच होणार नाही. तू घाबरू नकोस. मी बघते तिच्याकडे. नको बाई नको मी तुझ्या पाया पडते .तू असं बोलू नकोस आजिबात. तुझ्या मनात सुद्धा तसे काही आणू नकोस .तीची आई सुहासला गयावया करीत म्हणाली.
बरंबरं नाही करत ...जाऊ दे. मी नाही करत तिच्याशी नाटकबिटक कसलेही... सुहासने तिच्या आई सोबत बोलणं थांबवले. सुहासने आईकडे चक्क माघार घेतली.