Mi Sundar Nahi - 6 books and stories free download online pdf in Marathi

मी सुंदर नाही - ६ - अंतिम भाग

सुहास स्वतःच्या दिसण्या बाबत उदासीन झाली होती. ती तिच्या सौंदर्या बद्दल फारच बेफिकीर झाली होती.
तिच्या दातांमुळे तीचा सगळा उत्साह मावळून गेला होता.
तिचे दात पिवळे पडू लागले होते. तिच्या दातावर रक्ताचे डाग सुद्धा दिसू लागले होते. सुहासला भीती निर्माण झाली की आपल्याला 'पायोरिया' नावाचा दातांचा आजार झाला तर नसावा. 'पायोरिया' नावाचा आजार हिरड्या आणि दात अगदी कमकुवत करतो आणि त्याच्यामध्ये पू निर्माण करतो. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.हिरड्या कमकुवत झाल्यामुळे दात सैल होऊन ते वेडेवाकडे दिसतात. तरीसुद्धा सुहास स्वतःचे दात दिवसातून तीन-चार वेळा घासत होती.

तीच्या दातांनी तीचं हसं करून सोडले होते.तरीसुद्धा ती निराश झाली नव्हती.
तिचे दात असे लाल-पिवळे दिसल्यामुळे तिच्याकडे तिचा स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन आणखीनच निष्काळजीपणाचा होत होता.

तिच्या दातावर पिवळसर थर जमा झाला होता. पण आपण तर दररोज दात चांगल्या टूथ ब्रशने आणि पेस्टने ब्रश करतो ,मग हे असं का होतं. आपण कदाचित दात जास्त वेळ घासत नसेल. वरवर घासत असावेत. उद्यापासून आपण दंतमंजन करण्यासाठी भरपूर वेळ देऊ या आणि हा घाणेरडा प्रकार बंद करून टाकू. ती मनातल्या मनात विचार करत होती.

आपला चेहरा वेगळा दिसतो ती गोष्ट सोडून द्या .परंतु निदान हे दात तरी पांढरेशुभ्र दिसायला हवेत.आपला चेहरा सुंदर नाही तो नाही .पण आपण दातांचे आरोग्य तरी उत्तम राखू.दात हेच चेहरा बिघडवतात किंवा चेहरामोहरा सुंदर दिसावा यासाठी त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. चेहऱ्यामध्ये दातांना खूप महत्त्व आहे. म्हणून
ते तरी शोभिवंत व्हावेत असा प्रयत्न करू .तसा निश्चय तिने केला होता...

हे असे आणि तसे यामध्ये सगळे आले.
आपण एवढ्या सुशिक्षित आहोत. त्यामुळे दातांच्या अशा दिसण्यामुळे स्वतःचा चेहरा बिघडवून घेण्यात काही हशील नाही... काहीतरी करायला हवे....

सुहास हॉटेलमध्ये कामाला जाऊ लागली. तिथे तीला
भांडी घासण्याचे काम मिळाले. तेव्हा तिथले मॅनेजरला बोलली.
मला जेवण बनवायला सुद्धा येते.. मी चांगली शिकलेली आहे.
ती गोष्ट माहित आहे आम्हाला .
आम्ही बायोडाटा मध्ये तुझे शिक्षण वाचलेले आहे. त्यामुळे तू परत परत कशाला सांगतेस.तू सगळं काम करायला तयार झालीच .म्हणून आम्ही तुला नोकरी द्यायचं कबूल केलं .पण आता तू नाही म्हणतेस. हे बरं नाही .तुला कामाला यायचे तर‌ ये... नाहीतर उद्यापासून बंद हो .चल. जा... काम कर तुला दिलेलं ते.
हॉटेल मॅनेजर रागावून बोलला.

तसं नाही साहेब.पण माझ्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार तुम्ही मला काम द्यायला काय हरकत आहे ना सर तुमच्याकडे.

सुहास तू म्हणतेस ते बरोबर आहे... पण आमच्याकडे जी जागा उपलब्ध आहे .आता सध्या जी पोस्ट रिकामी आहे.तीच तुला देणार ना .बाकीच्या कामाला माणसं आहेत आमच्याकडे . तू काय कर. जे सध्या आहे काम ते तू कर .नंतर पुढे बघू. कदाचित तुझं प्रमोशन सुद्धा होऊ शकते.

पण मग भांडी घासायचे काम जे आहे त्याचा पगार सुद्धा कमी असेल ना मला.
अर्थातच तो कमीच असणार. हे काय ऑफिस काम आहे कां.. तुझ्या हुद्द्यानुसार तुझा पगार ठरवायला.

तसं नाही सर... जरा मला शोभेल असे काम दिले असते तर बरं झालं असतं ना.

बरे ठीक आहे .तू आठवडाभर हे काम कर. मग तुला असेल तर एखादे काम आम्ही बघतो कसं.
ते कस काय बघणार सर तुम्ही...
ऐ बाई ...तू माझ्या जास्त डोक्यात जाऊ नकोस.
तुला काम करायचं तर कर . नसले करायचे असल्यास सोडून दे. आणि जा घरी...
सर ...असं रागावू नका प्लीज..

कसं आहे सुहास. आमच्या मालकांची दोन-तीन हॉटेले आहेत. त्या ठिकाणी तुला मिळू शकते. एखादी नोकरी चांगली. पण सध्या तू इथे जॉईन तर हो... मॅनेजर शांतपणे तिला बोलला.

बरं सर ठीक आहे .मग मी जॉईन होते.आजपासून आणि तुम्ही दिलेले काम सुद्धा तुम्हाला करून दाखवते.
.शाब्बास गुड गर्ल... पण मला काम करून दाखवण्याची गरज नाही. तू जेवढे काम करशील तेवढा तुला पगार मिळणारच आहे ना. मॅनेजर हसून म्हणाला.

हो सर हो...सुहास भांडी घासण्यासाठी ठेवलेल्या भांड्या कडे वळली .त्या पसाऱ्यामध्ये तिने स्वतःला कामासाठी झोकून दिलं.
मग ती रोजच ती भांडी घासण्याचे काम करत होती...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED