Mi Sundar Nahi - 4 books and stories free download online pdf in Marathi

मी सुंदर नाही - ४

परिस्थितीमुळे अनेकांना मनाविरुद्ध वागावे लागते. अनेकांची अनेक स्वप्ने असतात. परंतु परिस्थिती ती पूर्ण करू देत नाही. सुहास बाबतीत सुद्धा तसेच काहीसे दिसत होते.
तिला तिच्या जवळच्या मैत्रिणीने सुद्धा पाठ फिरवली होती. तिला फर्निचरवाली असे तिच्या मैत्रिणीम्हणायच्या.
मला असं का म्हणतेस .तिने मैत्रिणीला विचारलं
अगं तुझे दात पुढे आहेत ना. मग त्याला फर्निचर .
असं म्हणतात.
हे कुणी ठरवलं. त्याला कशाचा काही आधार आहे.नुसते दात पुढे आहे म्हणून फर्निचर कसं काय ते झालं.

कोण कशाला ठरवेल. पण तसे म्हणतात. तसं म्हटलं की समोरच्याला कळतं की तो माणूस कशाबद्दल बोलतोय.
म्हणजे ही एक प्रकारची चिडवाचिडवी झाली होय ना.
होय अगदी तसंच ‌. पण काय ग सुहास तुला असे चिडवण्याचा राग येत नाही.
तुम्ही मला चिडवता . नावे ठेवताय. माझ्या व्यगांवर बोलताय. त्यात तुम्हाला आनंद मिळतो ना. मग तर झालं.

मग त्याचे तुला काही वाटत नाही.
हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे... सुहास तिला बोलली.
पण इतरांना चिडवून ,इतरांना नावं ठेवून काय समाधान मिळतं अशा माणसांना.
माणसाचा स्वभावच मुळी असा विचित्र आहे. समोरच्याची मस्करी करायला मिळाली की तो संधी सोडत नाही. त्यामध्ये त्याला आसुरी आनंद मिळतो.
आता हेच बघ ना. एखादा माणूस काळ्या रंगाचा असला की त्याला दुःख होईल असे घालून पाडून त्याच्या रंगावरून बोलले जाते. त्याचा वेळोवेळी अपमान केला जातो. त्याच्या मनाला किती यातना होत असतील याचा साधा विचार कोणी करत नाही.
अगदी खरं म्हणतेस ते तू .पण त्यात त्याला काही लाज वाटण्याचे कारण आहे कां. कारण तो शरीराचा एक भागच आहे ना. मग....
आणि चिडणारा जो असतो तो त्या माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे .त्या स्वभावाप्रमाणे तो वागणार किंवा बोलणार...
ठीक आहे ना. एक दोन माणसांना हे आपण समजावून सांगू शकतो. पण अनेक लोकांना आपण कसं समजवणार. त्यामुळे अशा गोष्टी या होतच राहणार....

हे तू म्हणतेस सुहास .अग तुझ्या बाबतीत लोकं काय काय बोलतात. तुझ्या दातावरून, तुझ्या व्यंगावरून. तरी तू एकदम नॉर्मल घेतेस.

मग काय मी रडू म्हणतेस आणि जर मी रडले. तर तुम्ही लोकं मला आणखी चिडवणार .
मला आणखीन त्रास देणार. आणखी मस्करी करणार. माझी भंकस चालवणार.

ही गोष्ट तू बरोबर बोलते सुहास.हेच व्यंग जर मला असतं तर मला खूप दुःख झालं असतं. पण देवाच्या कृपेने ते तसं मला नाही. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते.

हेच हेच. हीच गोष्ट आहे वेगळी तुझ्यात आणि माझ्यात. तुला याचा फरक जाणवतो ना .एखादे व्यंग दुसऱ्याला आहे .ते आपल्याला होऊ नये म्हणून लोकं देवाची प्रार्थना करतात. त्यामध्येच सगळे आलं. म्हणजे त्यांना त्याची भीती वाटते .हे असून सुद्धा असे लोक व्यंग असलेल्यांना हसतात. त्याची टर उडवतात. त्याच्या मागे त्या माणसाची टिंगल करतात.परंतु अशा लोकांचा त्या व्यक्तीला खूप राग येतो. पण आपण रागावलो तर ती लोकं आपल्याला आणखीन त्रास देतील म्हणून अशी व्यक्ती तो राग गिळून टाकते आणि कुढतकुढत जगते.

याबद्दल मी तुला नमस्कार करते कोपरापासून. मी तुला एकदम कच्ची समजत होते. पण तू एकदम पक्की आहेस .पुरी पोहोचलेली. तीची मैत्रीण बोलली.

पोचलेली म्हणजे काय तुला म्हणायचंय. याचा अर्थ काय.
अगं पोचलेली म्हणजे सगळ्या गोष्टींची माहिती असलेली .म्हणजे तू हुशार आहेस. असा त्याचा दुसरा अर्थ आहे.
बरं चल मी जाते .आता छान बोललीस माझ्याशी तू आज. आणि मी पण तुझ्याशी बोलले जरा मन मोकळं झालं.
मन मोकळं झालं की तुझं मन एन्जॉय झालं. सुहास म्हणाली.

अगं खरंच तसं काही नाही .मलाही वाटते तुझ्याबद्दल काहीतरी चांगलं. तुला लोकं चिडवतात. पण मी एकटी काय करणार ना. त्यांची तोंडे कशी बंद करणार.
मी तुला एक विचारू. सुहास तिला बोलली.
तुझ्या तोंडून अशी भाषा बरी नाही. कारण तुला ही एक व्यंग आहे.
मलाही कोणतं लिंग आहे ती मैत्रीण अचंबित होऊन बोलली.
कसे आहे ना. मी जरी दाताडी असले तरी. तु एवढी गोरी नाहीस सावळी आहेस.
पण मी काळी तर नाही ना. माझा रंग निमगोरा आहे.
ते काही असो. परंतु क्रीम लावून, मुलतानी माती लावून कोणी गोरं होत नाही .कोळसा कितीही उगाळला तरी काळाच काळाच.
अग तु हे काय बोलतेस .असं वेडं वाकडं मला.
तेच ना मी तुला अशी काळी बोललीच. तर तुला किती लागले मनाला.
बरोबर बोलतेस तू मला. ती सुहासला बोलली.
आणि काय ग ऐ.... सुहास तिला जोराने म्हणाली.
काय म्हणतेस बोल तो तू . सुहास...
खरं म्हणजे मी बोलणार नव्हते. पण तूच मला बोलायला भाग पाडलेस म्हणून सांगते.
काय सांगणार आहेस तू मला सुहासी...
हेच तुझा सख्खा भाऊ तुला काळी म्हणून हाक मारतो . ते तुला आवडत नाही तरीपण तू चालवून घेतेस.
कसे आहे ना...माझे दात आज ना उद्या सरळ मला करता येतील.आता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. पण तुझा काळा रंग काही जाणार नाही .त्यासाठी तुला तुझी कातडी सोलून काढावी लागेल किंवा खरवडून काढावी लागेल. तू जराशी उन्हात गेलीस की लगेच काळी पडतेस. सुहास तिला म्हणाली.
तू नको ग. मला अशी बोलूूूस.अशी बोललीस की मला खूप वेदना होतात .तिची मैत्रीण तिला बोलली. दत्त श्री लागले तुला.बघ मी जराशी बोलले तर तु एवढी कळवळलीस.

बरं जाते मी असं म्हणून तिची मैत्रीण निघून गेली. तिच्या मैत्रिणीने तिथून काढता पाय घेतला.सुहास तिथे एकटीच थांबली. ती विचार करू लागली.काही लोक मित्र मैत्रीण सुद्धा म्हणून घेण्याच्या लायकीचे नसतात. खरंच लोकं कुणाच्या दुःखाचा कसा उपयोग करून घेतील काही नेम नाही.

हा जगाचा न्यायच म्हटला पाहिजे...पण असा उफराटा न्याय दुसऱ्याच्या मनाला खूपच त्रास देतो.आपल्या आईवडिलांनी आपले नाव ' सुहास ' ठेवले. पण आपले हसायचे वांदे आहेत. आपण हसलो तर आपले दात दिसतात. सुहास्य मुद्रेने आपण आपले तोंड मोठ्याने उघडू शकत नाही. आपले दात अनेक लोकांना खूपतात . आपले नाव सुहास आहे हे खूपच विसंगत आहे .त्या ऐवजी दुसरे काहीतरी नाव असायला हवे होते.

आपल्या सुहास या नावावर सुद्धा आपल्या मित्रमंडळींच्या कंपूत अनेक कोट्या केल्या जातात . पण त्यालाही आपण काही करू शकत नाही. आपल्या दातांना डेंटिस्ट कडून तार लावून पाहिली . पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आपले दात फारच वेडेवाकडे आहेत. ते बेढब आहेत. ते आता सरळ होणार नाहीत.असे अनेक विचार करीत ती घरी पोहोचली. घरी तिची आई तिची वाटच बघत होती.

बरे झाले तू वेळेवर आलीस .मला किती काळजी लागली होती .तिची आई तिला बोलली.
अहो आपली सुहास घरी आली हो.तिच्या आईने ओरडून सुहासच्या वडिलांना सांगितले.
आली का बरं बरं ठीक आहे. त्यांनी निश्वास सोडला. त्यांना सुद्धा सुहासची काळजी लागून राहिली होती.
सुहास घरी आलेली आहे. कळल्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला.

काय ग सुहासे! तू तिच्याशी एवढे काय बोलत होतीस.
तू पाहिलेस काय आम्हाला बोलताना .तिने आईला विचारले.
होय मी बघितले तुम्हा दोघांना बोलताना....
अगं तसं काही नाही .ती मला चिडवते . म्हणून मी तीला विचारत होते की तुझा रंग सावळा आहे. मग तुला राग येत नाही का त्याचा.
अगं अशाच असतात या. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं दाखवायचं उघडून. तिची आई म्हणाली.

तुला सांगू काय सुहासे. काही लोकं ही फेंदरट नाकाची असतात. वाकड्या पायाची असतात. कमरेत वाकलेली असतात. त्यांनाही त्यांच्या दैनंदिन कामात त्याचा अडसर होत असतो. पण ती लोक सगळं बाजूला सारतात आणि आपली कामे करतात. लोक त्यांना काहीही म्हणोत .

परंतु ते कमी नसतात. ते त्यांच्या आयुष्यात अगदी चोख असतात. ते कोणत्याही बाबतीत स्वतःला कमी लेखत नाहीत. इतर लोकच त्यांना कमी लेखतात.आता हेच बघ ना. एखाद्या घरात मुलगी जन्मली तरी त्या लोकांना दुःख होतं .हे त्या घराण्याचे व्यंग असतं.अशी लोकं मनातून दुःखी होतात. पण ते असे कां वागतात.

हेच त्यांना कळत नसतं खरंतर अशा लोकांची मानसिकता नकारात्मक असते.

आणि ऐकलेस का सुहासे.आता माझेच बघ .माझे पूर्वी चांगले केस होते. मला आता टक्कल पडलेय.
माझी नजर कमी झाली. मग हे व्यंग मला माझ्या तारुण्याच्या नंतर निर्माण झाले .त्याचं दुःख सुद्धा असतं अनेक जणांना. असे अनेक व्यंग असलेली लोकं समाजात आहेत. आणि ते त्यांची कामे व्यवस्थित करत आहेत. पण अशा नावं ठेवणाऱ्या व्यक्तींपासून आपण नेहमीच दूर राहायचं. तिचे वडील तिला धीर देत बोलले.

हो ना यांचे केस किती झुपकेदार होते पूर्वी .पण आता यांना टक्कल पडले .आपल्या वसाहतीमधील काही टारगट मुलं यांना टकल्या म्हणून हाक मारायचे. तेव्हा मला किती राग यायचा .पण हेच मला शांत करायचे. त्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा आपण या लोकांपासून जरी वेगळे असलो तरी आपण त्यांना दुःखी करू नये. तिची आई तिला बोलली.

कुणी आयुष्याच्या मध्येच एका पायाने अधू होतो. कुणी डोळ्याने अधू होतो. कोणी हाताने अधू होतो. जरी ते अगोदर धडधाकट असले तरी नंतर त्यांच्यात अशी कमतरता निर्माण होते. पण म्हणून कोणी निराश होऊ नये. आयुष्य माणसाला चांगलं शिकवते आणि धडा देते. ज्यांना जन्मजात व्यंग आहे किंवा दिव्यांग आहेत .त्यांना त्याची सवय झालेली असते. त्या अवयवा शिवाय किंवा त्या व्याधी सहीत ते जगायला शिकलेले असतात .परंतु ज्यांना मध्येच अशी व्याधी जडते त्यांचे हाल कुत्रा खात नाही.

इतकेच नव्हे तर एखाद्याचा प्रेम भंग होतो आणि त्यांना प्रेयसी किंवा प्रियकर याशिवाय जगावे लागते किंवा एखाद्या व्यक्तीची पत्नी किंवा पती मरतो .तेव्हा जे आयुष्य जगता लागते ना ते सुद्धा अधिक दुःखदायक असतं.कारण असं म्हणतात की पती किंवा पत्नी हा सुद्धा त्या व्यक्तीचा एक अवयव असतो आणि तो भाग जर निखळला तर मग त्याला जगताना खूपच त्रास होतो.
हे जीवन आहे.हे असच जगायचं असतं .तिचे वडील तिला हळव्या स्वरात म्हणाले.

एखादा माणूस बुटका असतो. तेही त्याचे व्यंग असते. उंच माणसाला बघून त्याला रोज रोज दुःख होत असतं...
चला राहू द्या या चर्चा ...यावर बोलून काही उपयोग नाही जास्त.

बरं मी जेवायला वाढते. तुम्ही दोघांनी जेवून घ्या. मी पण बसते जेवायला. चला .....तिची आई बोलली.

मामा आणि मामी चे काय... सुहासने विचारलं

ते दोघे गेले मगाशीच त्यांच्या घरी निघून. सुहासची आई म्हणाली.

बरं झालं... सुहास म्हणाली. एवढं बोलून, हातपाय धुवून ती जेवायला बसण्याची तयारी करू लागली.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED