सुहासला काय करावे कळत नव्हते. मात्र ती गोंधळली नव्हती किंवा स्वतःशीच त्रागा करत नव्हती. तीची मनस्थिती काबूत होती आणि ती एकदम शांत होती. सुहास कुरूप नव्हती. ती फार उद्धट सुद्धा नव्हती. मात्र ती तशी दिसते. त्याचे खापर लोक तिच्या जन्माला देतात. ही गोष्ट मात्र तिला खूपच खटकत होती.
तिच्या मनात विचार येत होते. लोकं कशी असतात ना...
अनेकांना दृष्टी नसते, ते दृष्टीहीन असतात .अनेक लोकं मुकी असतात. ते बोलू शकत नाहीत. एखादा बुटका असतो.
तर कुणी एखादी उंच असते. उंच मुलीला जिराफ म्हणून चिडवलं जातं. कुणी जाड असेल, कोणी किरकोळ असेल, तर एखाद्या जाड्याला जाडा. किरकोळ मुलीला कडकी असं म्हणतात.
अशा लोकांना खरंतर माफ नको करायला. त्यांची त्यांना शिक्षा मिळायला हवी .
पण हे होणार कसं आणि कोण करणार हाच मोठा प्रश्न होता. ...कुणाला मुलं होत नसतील तर त्यांना वंधत्व आहे म्हणून संबोधलं जातं.
समाजात अशा अनेक गोष्टी आहेत .ज्याला व्यंगाची बिरूदं लावून ठेवली जातात. आणि तशाच प्रकारे ती माणसे ओळखले जातात .
यांच्या व्यंगानुसार त्यांना हाक मारली जाते.
कुणाला काळ्या म्हणून म्हटलं जातं. कुणाला जाड्या म्हणून हिणवलं जातं. हे स्टिकर आहेत ना , ते आयुष्यभर त्या व्यक्तीला चिकटून राहतात.
मग कोणी कामचुकार असेल,कोणी कंजूष असेल, कोणी लोभी असेल.कोणाचे नाक बसके असेल, कोणी चकणा किंवा काना असेल,
कोणी तोतरे बोलत असेल तरी त्याची टवाळी केली जाते.
अशी असंख्य लोकं समाजात वावरतात . त्यांना प्रत्येकाला काही ना काही प्रकारे चिडवलं जातं.
त्यामुळे आपल्याला चिडवणं हे स्वाभाविकच आहे. त्याचा आपण उगीच बाऊ करायला नको .जे जीवन आपल्या वाटेला आलेले आहे तेच जगणं आहे .तेच निमूटपणे जगायला हवं.
तरच आपलं जीवन हे सुखकर आणि आनंदी होईल.
लोकांनी आपल्याला कमी लेखलं म्हणून आपण कमी बुद्धीचे होत नाही.इतरांना चिडवून लोकं त्या व्यक्तीचा अंत पाहतात .
परंतु दिव्यांग असलेली व्यक्ती समजूतदार असेल तर भांडण, कलह ,अपमान, सन्मान या गोष्टी दुय्यम ठरतात. अशा व्यक्तीने जगणं या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे.
अशा या लोकांना खूप कॉम्प्लेक्स येतो त्या गोष्टीचा. त्या कॉम्प्लेक्स (न्यूनगंड)मधून उठून उभं राहायचं, म्हणजे मोठी शक्ती लागते.ती शक्ती आपल्यापाशी आहे. ते जेव्हा त्या व्यक्तीला कळतं. तेव्हा तो माणूस त्या गोष्टीवर मात करतो आणि समाजात एक दिवस स्वतःला सिद्ध करतो.
हेच खरं आहे.आणि जे त्या कॉम्प्लेक्स मधून बाहेर पडत नाहीत ते आयुष्यभर तिथेच आणि तेच तेच करत राहतात. स्वतः मोठे होत नाहीत. तीए इतरांच्या प्रेरणेची वाट बघतात.
शाळेमध्ये अनेक मुलं मुली ढ असतात आणि त्याचाही अनेकदा त्यांना कॉम्प्लेक्स येतो.
पण न्यूनगंड कमी झाला की नंतर नंतर तर यापैकी अनेक मुलं हुशार ठरतात. अभ्यास कसा करायचा .पाठांतर कसं करायचं. हे त्यांचं तेच शिकतात. मात्र अनेकदा क्लासेस लावून सुद्धा अनेक मुलं हुशार होत नाहीत. किंवा अभ्यासात प्रगती करत नाहीत.
याचा संबंध न्यूनगंडाची नसतो तर बुद्धीशी असतो
. पण सुक्ष्मपणे म्हणण्यापेक्षा नकळतपणे तो होत असतो. या क्षेत्रामध्ये हल्ली समुपदेशन ( कॉन्सेलेशन)
चे उपाय सुद्धा आहेत. पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. समुपदेशक सरकारी असला तर तो फी कमी घेतो. किंवा घेत नाही.मात्र खाजगी समुपदेशक जास्त फी आकारतात.
जाऊदे हा विषय फारच गहन आहे....
विचार असह्य झाल्यामुळे तिने तिची मान झटकली. डोक्यातले विचार बाजूला काढू लागली.
परंतु तिच्या मेंदूतले विचार बाहेर पडत नव्हते. ती अधिकाधिक विचारात रुतत होती. ती एकामागून एक विचार करत होती
एकदा कां त्यांच्यातला तो न्यूनगंड निघून गेला म्हणजे ढ मुलेमुली सुद्धा चमकतात. किंवा सरळ सरळ वर्गात पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये येतात. तुझ्या मनात अजून विचार येत होते.
यासाठी मात्र त्यांनी कॉम्प्लेक्स किंवा न्युनगंड याच्याकडे अजिबातच दुर्लक्ष करून टाकायला पाहिजेत. आपण हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी अर्ज केला. ते बरेच झाले. आपल्याला पर्यटन कोर्स(टुरीझम) करायचा होता.
परंतु पर्यटन कोर्सला फिरावे लागणार होते .पिकनिकला जावे लागणार होते . निरनिराळ्या स्थळांना भेटी द्याव्या लागणार होत्या. त्याचा खर्च आपल्याला झेपणारा नव्हता. त्यासाठीच तर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला आपण. त्याचाही खर्च आहे थोडाफार. पण आपल्याला जास्त खर्च करता येणार नाही. हा विचार करूनच तिकडे आपण वळलो आहे...
यापुढे आपण सुद्धा असंच करायचं.जास्त विचार करायचा नाही. खोलात शिरायचं नाही. आपण जे ठरवले तेच करायचं .त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं. काही तरी नक्कीच होईल आपल्या आयुष्याचं. सुहासने तत्क्षणीच ठरवून टाकले होते.
आता तिच्या मनावरचा ताण खूपच हलका झाला होता. तीला खरोखरच ताजंतवानं वाटत होतं.