दिवाना दिल खो गया (भाग १) preeti sawant dalvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिवाना दिल खो गया (भाग १)

♬♬दीवाना दिल खो गया
बेगाना दिल हो गया
मुझे चैन नहीं बेचैन हूं मैं
बस ये मेरा दिल खो गया
दीवाना दिल खो गया
बेगाना दिल हो गया♬♬ (Movie name : Jab dil kisi pe aata hai /1996)

हे गाणं ऐकत ऐकत सिलू झोपी गेला. सकाळी ८.१५ ची ट्रेन जी पकडायची होती त्याला.
अहो, हे आता रोजचं झालं होतं. सकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. फक्त तिची एक झलक बघण्यासाठी.

ती नेहमी तिच्या एका मैत्रिणीबरोबर त्याच ट्रेनला असायची. पहिल्या दिवशी जेव्हा सिलूने तिला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला.
पिंकीश चुडीदार, त्यावर नाजूकसे कानातले, डायमंड टिकली आणि हातात घुंगरूवाल कडं जे ती चालताना आवाज करायचं. तिच्या बरोबर नेहमी तिची एक मैत्रिण असायची.
तिला रोज बघता बघता आता सिलूला दोन आठवडे झाले होते.

सिलू म्हणजे सलील अय्यर. त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक चिराग. तो साऊथ इंडियन ब्राह्मण होता. अभ्यासात भयंकर हुशार होता. तसेच हल्लीच तो एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला लागला होता. त्याचा पगारही लाखाच्या घरात होता. पण दोन आठवड्यांपूर्वी अम्माच्या इडलीने घात केला.

तर झाले असे की, सिलूच्या ऑफिसची बस सिलूला न्यायला नाक्यावर यायची. अगदी पाच मिनिटांवर नाका आहे हो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे अम्माने इडली-सांबर केले होते. सिलूला नेमका उठायला उशीर झाला.

झालं!! सिलू न खाताच निघत होता. पण अम्माच्या पुढे त्याची काय बिशाद होती. गपचूप बसून त्याने नाश्ता संपवला आणि खाली येऊन बघतो तर बस निघून गेली होती. आता टाईमवर पोहचायचे तर त्याला ट्रेनशिवाय पर्याय नव्हता.
म्हणून ही स्वारी निघाली स्टेशनवर. तिकीट काढून ट्रेन पकडणार इतक्यात ती दिसली आणि तो सगळं विसरला.
ट्रेन मध्ये चढण सुद्धा. पण ती मात्र चढली त्या ट्रेनमध्ये.

तेव्हापासून मुद्दामून सिलू रोज ट्रेनने जातो. तिची एक झलक बघण्यासाठी. पण अजूनतरी तिला ह्या सगळ्याची साधी कल्पना ही नाहीये.

असेच काही महिने गेले. सिलूच्या कामाच्या स्पीडमुळे आणि एकंदर त्याच्या हुषारीमुळे त्याच्या कंपनीच्या अमेरिकेच्या ब्रांचमध्ये त्याला बदली मिळाल्याचे लेटर हाती पडलं. खर तर सिलूच्या मनात तर नव्हते जायचे पण सिक्युर फ्यूचरसाठी जाणे जरूरी होते. म्हणून सिलूने बदली कम प्रमोशन अॅक्सेप्ट केले.

त्याचा पासपोर्ट, व्हिसा, टिकिट, कंपनीकडून राहायची सोय होईपर्यंत एक महिना जाणार होता तोपर्यंत त्याला इथेच काम करायचे होते. अम्मा तर इतकी खूष झाली की, सिलूला कुठे ठेवू कुठे नको असे झाले होते तिला. सिलू अमेरिकेला जाणार ही बातमी एव्हाना सगळ्या नातेवाईकांना कळली होती. सगळ्यांचे शुभेच्छा दयायला फोन वर फोन येत होते. सिलूच्या वडिलांनाही सिलूचा अभिमान वाटत होता. एकंदर घरात आज आनंदीआनंद होता.

पुढच्या महिन्यापासून सिलूला अमेरिकेच्या ऑफिसमध्ये रुजू व्हायचे होते. राहण्याची, जेवणाची सगळी सोय ही ऑफिस करणार होते. त्यामुळे अम्मा निर्धास्त होती. तसे पण तिथे स्थिरस्थावर झाल्यावर सिलूचे अम्मा आणि अप्पा अमेरिकेला जाणारच होते. हे सुद्धा अम्माने आधीच ठरविले होते आणि तिच्यापुढे काहीही बोलायची हिम्मत सिलूत काय तर त्याच्या वडीलांमध्येही नव्हती.

आज सिलू रोजच्याप्रमाणे ८.१५ ची ट्रेन पकडायला स्टेशनवर गेला. इतक्यात त्याला स्टेशनवर गर्दी दिसली. काय झाले ते पाहण्यासाठी तो गर्दीत मिसळला. समोर पाहतो तर तिची मैत्रीण चक्कर येऊन पडली होती आणि ही तिला हवा घालत होती. पण आजूबाजूला त्यांना मदत करण्याऐवजी बघणाऱ्यांची जास्त गर्दी होती. तिला काय करावे सुचत नव्हते. ती एकसारखी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती.

इतक्यात सिलू आणि एक व्यक्ति पुढे आले आणि त्यांनी तिच्या मैत्रिणीला उचलून बाकड्यावर बसविले आणि तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. त्या बरोबर ती हळूहळू शुद्धीवर यायला लागली. ती शुद्धीवर येताच तो दूसरा माणूस निघून गेला. त्याला कदाचित उशीर होत असेल. मग सिलूने तिला पाणी भरविले आणि लिंबू सरबत आणून दिले. तिची मैत्रीण आता बऱ्यापैकी शुद्धीवर आली होती.

दोघींनी सिलूचे आभार मानले. मग सिलू मनात नसताना ही पुढची ट्रेन पकडून ऑफिसला गेला.

न तिने त्याला नाव विचारले न त्याने तिला.

पुढचे दोन-तीन दिवस सिलूला ऑफिसला जाताच आले नाही कारण अम्मा अचानक आजारी पडली. तिला ताप येत होता. दोन दिवसांनंतर अम्मा हळूहळू उठायला लागली होती. सिलूने अम्माची या दोन-तीन दिवसांत खूप सेवा केली होती.

आज जवळजवळ चार दिवसांनी सिलू ऑफिसला जाणार होता. तो नेहमीप्रमाणे स्टेशनवर पोहचला. सिलूने ह्या चार दिवसांत तिला खूप मिस् केले होते. सिलू त्याच्याच विचारात असताना कोणीतरी त्याला ‘ओ हॅलो’ असे म्हटले. सिलू अचानक भानावर आला. पाहतो तर ती समोर उभी होती.

“हाय, मी मुग्धा सबनीस आणि ही उमा माझी मैत्रीण. आम्हा दोघींना तुम्हाला काल केलेल्या मदतीसाठी थॅंक्स म्हणायचे होते. काल मी तुमचे नाव ही नाही विचारले”, मुग्धा म्हणाली.

“माझे नाव सिलू आहे.”, सिलू म्हणाला.

“अच्छा. छान नाव आहे. तुम्ही नेहमी हीच ट्रेन पकडता का?” मुग्धा म्हणाली.

पण सिलू काही उत्तर देणार इतक्यात ट्रेन आली आणि ती म्हणजेच मुग्धा त्या ट्रेन मध्ये चढली आणि गर्दीत मिसळली.

ट्रेन निघून गेली तरी सिलू तिथेच उभा होता......

क्रमश:

(पण सिलू तर अमेरिकेत जाणार आहे मग त्याच्या लवस्टोरीचे काय होणार हाच प्रश्न पडला ना तुम्हाला. हे लवकरच कळेल तुम्हाला तोपर्यंत हा भाग आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा )

धन्यवाद

@preetisawantdalvi