जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 8 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 8

साहिल चे शिक्षण पूर्ण होण्यासएक वर्ष होते. साहिल ची सुट्टी संपली त्याला उदया जावे लागणार म्हणुन आईने दोन-तीन प्रकारचे फरालचे केले. रात्री झोपण्यापूर्वी मधुकर साहिल गप्पा मारत होते. साहिल ची आई ही तिथे आली. बोलता-बोलता आई साहिलला म्हणली, एक वर्ष राहिले. खुप अभ्यास कर!!! कोणाच्या वाईट संगतीत पडू नको. तसा तु खुप हुशार गुणी मुलगा आहे. साहिल चे बाबा..... हो!! ना!! मग का जायच्या वेळेला त्याला उपदेश करते. आई....... नाही हो, !!काळजी पोटी बोलते. साहिल...... आई व बाबा तुम्ही काही काळजी करू नका. आणि बाबा तुमच्या व आई च्या मार्गदर्शन केल्या मुळे वेळोवेळी मी सावरत गेलो. मला चुकीची दिशा मिळाली नाही. बाबा..... चल उदया जाणार आहेस, लवकर झोप.

साहिल आपल्या खोलीत गेला. सजीकज त्याला सई ची सारखी आठवण येतं होती. बालपणी च्या आठवणी अशा कोण विसरत का??-त्याने आठवणी ची पेटी काढली आणि सगळ्या जपून ठेवल्या वस्तु पाहून पुन्हा नीटनेटकया ठेवून दिल्या आणि बालपणीच्या आठवणी डोळ्या घेऊन झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ उरकून आई वडिलांचा आशिर्वाद घेऊन तो बाहेर पडला. गावा बाहेर पडताना बालपण आठवत तो पुढे चालला होता. पण तो उदास होता. रेतीचे कन हातातून निसटून जातात त्याप्रमाणे गाव मागे पडत गेला. आणि गाडी शहराच्या दिशेने धावू लागली.
मावशीच्या घरी पोचला. वाटच पाहत होते. मावशीच्या चिमुकल्या मुलींनी घेरा घातला.'' दादा,, तु किती दिवस आला नाही. आम्ही तुला खुप मिस केल!!!!! एक ना अनेक!!!!!'' त्याने, त्याच्या आवडीचा खाऊ दिला. छान एक-एक पप्पी घेतली. या सगळ्यात आनंदी झाला. साहिल..... अग, मावशी काका कधी येणा ??? . चारला येतील. मावश!! अग मी सात वाजता निघेल कॉलेचि तयारी करायची. साहिल...... बरं, मी पडकन छान जेवण बनवते जेऊन जा!!! बस मग आपण गप्पा मारू मावशी........ काका आल्यावर सगळे खुप गप्पा मरतात. काका ही साहिल ला समजाऊन सांगतात. एक वर्ष आहे. तु हुशार आहे पण खुप मेहनत घे. पुढे आपल्याला त्रास होणार नाही. जेवणझाल्यावर दोघांचा निरोप चिमुकल्या चा पापा घेऊन तो निघतो.

पुढे एक वर्ष राहिले म्हणुन तो त्याचे मित्र अभ्यासाला लागतात. इकडे सई पण डॉक्टर होण्यास अगदी थोडा कालवदि होता. सई साठी तिचे बाबा एक मोठ हॉस्पिटल बांधण्याचे काम जवळ-जवळ पूर्ण झाल होत. त्यासाठी त्यांना जमिन सुद्दा विकावी लागली. पण मुलांचे करियर महत्वाच. तरी सुमन ला खुप काळजी वाटायची. एक दिवस मधुकर व सुमन गप्पा मारत होते. आणि बोलता-बोलता जुन्या आठवणी निघाल्या .दोघांच्या ही डोळ्यात पाणी आले. मधुकर........ आपण हॉस्पिटल च्या उदघाटनाच्या वेळी त्यांना बोलाऊ..सुमन .....खरंच या सगळ्या धावपळीत आपल जाण नाही झाल. काय म्हणतील ते आपल्याला???- साहिल पण खुप मोठ झाला असेल. ऐत्क्यत सई येते. तुफानंमेल... आई... आई ii अग मला खुप भूक लागली काही तरी खायला दे!!!!! आई... देते, अग लहान मुला सारखी काय करते??? आत्ता तु मोठी डॉक्टर झालीस आणि असा आलडपना .सई...... असुदे तु माझी आई मी तुझी मुलगी,, बाकी नंतर आणि तिने आईला खुप प्रेमाने मिठी मारली. आई...... बरं लडुबाइ खा तुला भूक लागली ना.!! बाबा...... सई आत्ता थोडे दिवस!!!!! सई...... बाबांचा हात हातात घेऊन...हो, बाबा तुमच स्वप्न पूर्ण होणार. आणि खरंच एक चांगली डॉक्टर होणार. मधुकर तिच्या डोक्यावरून हात फिरवत, तिचे कैतुक करतो.
दिवसा मागून दिवस जातात. शेवटी सई डॉक्टर होते. सुमन व मधुकरला खुप आनंद होतो. सगळे नातेवाईक,मित्र,शेजारी अभिनंदन करण्यसाठी फोन करतात. काही तर घरी येऊन अभिनंदन करतात. सई चे मित्र, मै त्रीनी घरी येतात सई ला डॉ. डॉ. म्हणुन आम्हाला पार्टी हवी. असा आवाज करतात सई..... हो... हो... नकी देणार पार्टी.!!! भारत..... पण कधी देणार. पार्टी ची वेळ ठरली. एका छान हॉटेल मध्ये सई च्या बाबांनी तयारी केली. त्या दिवशी तिचे सगळे फ्रेंड्स आले होते अगदी शानदार पार्टी होती. पण सईचं मन कुठ तरी नाराज होत. तिला साहिल ची खुप आठवण येतं होती. तिला वाटत होते. मी डॉ... झाले. साहिल ने कुठून तरी यावे. आणि मला प्रेजेट दयावे आणि ते मी नेहमी प्रमाणे जपून ठेवावे. पण त्याला काय माहीत मी कुठे आहे?? आणि मनला समजावत ती ....... पुन्हा आपल्या मित्रांत रमली आपण किती ही मोठे झालो तरी आपल्या लहानपणीच्या आठवणी साठी मनात जागा ही असते. साईने काही दिवस डॉक्टर दीक्षित यांच्या बरोबर काम केल आत्ता ती ऊत्म हृदयवर शस्त्रकीय्र्य करत होती. सई च हॉस्पिटल ऊत्म रित्याचाल होत. मधुकर च स्वप्न साकार झाल होत. सुमन ही खुप आनंदात होती. साई ही खुश होती. पण तिची धावपळ वाढली होती. सकाळी दहाच्या सुमारास हॉस्पिटल जायचे. काही डॉक्टर्स होते, काही नर्स होत्या, असे लहान मोठे किती तरी लोक वेगवेगळ्या कामासाठी होते. पण सई पेशंट ची काळजी स्वता घेत असे. बरेचसे पेशंट तिने बरे केले. काही लोक तर तिच्या पाया पडायचे. तिला आशिर्वाद देयाचे. मी तुम्च्यतील एक आहे. मी देव नाही हे ती लोकांना सांगायची. आज सई नेहमी प्रमाणे दिसत नव्हती. आई...... सई काय ग,, काय झाल?? तिला काय बोलावे ते कळतं नव्हत. सई..... आई अग, आज सकाळी एक पेशंट आला आहे. त्याच ओप्रेषन उदया करायचे आहे. आई..... हो, मग सई.... तो खुप लहान आहे. ते अवघड पण आहे. त्याच्या जीवाला धोका आहे. त्याच्या आई कड़े पैसे पण कमी आहे. त्याला वडिल नाही. खुप विनवण्या केल्या त्याच्या आईने. आई..... अग, तु एक चांगली डॉ. आहेस. आणि पैसा काय??-?त्याचा विचार करू नको तो बरा झाला ही च तुझी फी त्याच्या आई चा आशिर्वाद हा कितीतरी लख मोलाचा असेल. एत्क्यत तिच्या मोबाईल ची रिंग वाजते. त्याच मुलाची तब्येत बिघडते. ती आईला सांगते. देवाला नमस्कार कर. चाल मी ही येते. जाता जाता तिने डॉक्टर दीक्षित बोलवले. नर्स ला ओप्रेषन ची तयारी करायला सांगते. पोचल्यावर वेळ न लावता डॉ. दीक्षित घेऊन ओप्रेश्ण करण्यास गेले .थोड्याच वेळात बाहेर आले. मुलाची आई जवळ आली. ती बोलण्याच्या आदीच सई.... सगळ ठीक आहे. आई डॉ. दीक्षित याचे पाय पडते. ते तिला धीर देतात. तुमचा मुलगा बरा होईल काळजी करू नका. सई तिच्या आई जवळ येते. व मिठी मरते. आई...... चला आत्ता घरी बाबा वाट पाहत असतील आणि आपण काही खाल्ले नाही आणि हो त्या मुलाच्या आई च्या जेवणाची सोय केली...... दोघी घरी येतात मधुकर..... अग, सुमन तु सई बरोबर......सुमन ने सगळा प्रकार सांगितला. सई थोडी घाबरली होती. सई.... आहो बाबा ते... ...मधुकर सई च्या डोक्यावरून हात फिरवत मला अभिमान आहे. सई हे हॉस्पिटल नुसता पैसे मिळावे म्हणुन नाही. किंवा तुला त्या साठी शिकवले नाही. एखद्या गरिबाला जीवन दान मिळाले त्या सारखे पुण्य नाही. त्याचे जे आशिर्वाद मिळतात ते अनमोल असतात. त्या मुलाला आपल्या हॉस्पिटल मधून जेव्डि मदत करता येईल तेव्डि कर.सई....... खरंच बाबा मी खुप भाग्यवान आहे. मला तुमच्या सारखे आई वडील मिळाले. बाबा....... सई एक लक्षात ठेव. ज्या ज्या वेळी तु हॉस्पिटल मध्ये जाशील तेव्हा तिथल्या गणपतीचे दर्शन घे......