अस्तित्व मेघराज शेवाळकर द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अस्तित्व



सदाने वाडा साफसूफ केला, दिवाबत्ती केली.. थोडावेळ बसला.. समोरच्या बैठकीत नजर फिरवली.. दोन छोटी मुलं सारिपाट मांडून खेळत बसली होती.. त्यातला पाटलाचा मुलगा हरण्याच्या बेतात असताना चिडला..
" मी नाही जा .. चिडी खेळतोस." तो डाव मोडत म्हणाला.
" मी कायले खेळू धाकले मालक.. तुम्हीच त चिडी खेळून ऱ्हायले." सदा रडकुंडीला येत म्हणाला.
" ये पोट्यानो.. कायले दंगा करुन ऱ्हायले, भायेर जाऊन दंगा घाला जा.. " पाटील म्हणाले.
आता मात्र सारं कसं शांत शांत वाटतं होतं, सदा आठवणीतून बाहेर आला. मांडीवरच दार बंद केलं का नाही ते पहायला तो पायऱ्या चढून गेला..
" सद्या.. ये ना जवळ.. कोण न्हायी बगत.. " अमित म्हणाला.

सोळा वर्षाचा अमित, सदाला जवळ ओढत होता.. मनात असूनही सदा नकार देत होता..
" छोटे मालक.. कुणी आलं तर मायी धडगत नयी बगा.. तुमाला कोण काऊन काय बोललं.. सारी निजानीज झाली की येतो.. " सदा हात सोडवत म्हणाला.
" आता भेटावं वाटतं, मग येऊन काय करतो.. सांग मले.. कोणी आलंच तर सांगू.. माही पाठ धरली.. तू तुडवत होता. " जवळ ओढत अमित म्हणाला.
ओठांवर ओठ टेकवत दोघे रसपान करु लागले..
ती गोडी.. अमितच्या शरीराचा गंध.. सदाला आताही जाणवत होता.

" सदा.. तूला किती विनवून ऱ्हायलो..तूच ऐकुन नयी ऱ्हायलास.. तुज्या बिगर रहावतं नयी आता.. " अमित.

" हित कुणाच्या ध्यानात नव्हतं येत मालक.. तिथे जागा छोटी राहायते.. तिथं कोण तुमच्या जवळ फिरकू देईल.. " सदा निराशेचा सूर आळवत म्हणाला.

सारं आठवलं अन सदाने सुस्कारा सोडला.. बेडवरुन हात फिरवला आणि दरवाजा ओढून घेत खाली आला.
मोठा दरवाजा, त्यात उभ राहून अमितला निरोप देताना माजलेलं काहूर.. भरलेले डोळे.. सारं आठवलं..

एकदा अमित शहरात गेला, तो तिकडचाच झाला.. शिकून डॉक्टर झाला.. सरकारी नोकरी करु लागला...लग्न केलं.. आता तो वापस येईल ही अशाही मावळली.. आता सदा तिशीचा झाला.. पोरका असणारा सदा.. त्याच्याकडे कोण लक्ष देणार.. हा मात्र आपल्या प्रियकराची वाट पहात राहिला.. त्यांचं येणं बंद झाल.. वाड्याची देखभाल करणं.. शेती वहाणं सारं सदाकडे होतं..तो अधिकार अमितने त्याला दिला होता. असेच दिवस पुढे जात होते..

" मामा.. मामा.. " चिमुकल्याच्या आवाजाने सदा भानावर आला. त्याने नजर उचलून समोर पाहिले, अमित चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन उभा होता. अमितला पाहून सदा आनंदून गेला.. तो धावतच त्याच्या जवळ गेला..

" आलात छोटे मालक.. लय वाट बघायला लावली.. मला इसरुन गेले.. आपल्या सदाला पार इसरुन... " डोळ्यातून मेघ बरसू लागले.

" बाबा मामा का ललतोय.. " चिमुकला म्हणाला.

" त्याला.. ना तूला बघून खुप आनंद झाला.. म्हणून रडतोय. जा त्याचे डोळे पूस." अमित म्हणाला
चिमुकल्याने आपल्या इवल्यशा हाताने डोळे पुसले..

" सदा.. माझं एक काम करशील? हयाला दिवसभर सांभाळशील.. मला दवाखान्यात जावं लागेल.. अरे हो सांगायचं राहून गेलं.. मी इथं सरकारी डॉक्टर म्हणून रुजू झालोय... " अमित.

सदाने त्या तीन वर्षाचा चिमुकल्याला जवळ घेतले.. तो सदाला बिलगला..

" तसा राहिलं तो.. पण हट्टच करु लागला तर ये.. दवाखान्यात घेऊन.. " अमित म्हणाला.

" वाडा उगडू.. संध्यकाळी मुक्काम तिथंच कारसाल नं? " सदाने विचारले.

" नाही नको.. संध्यकाळी आल्यावर सांगतो... शिव.. रहाशील ना मामा जवळ.. तो तूला चिऊ, काऊ दाखवेल.. गंमत खायला घालेल.. त्याला त्रास नाही दयायचा हं राजा.. मी पेशन्ट बघून येतो.. " अमित त्याची पापी घेत म्हणाला.

अमित गाडीत बसून निघून गेला... सदाने शिवला आपल्या हृदयाला लावले.

" तुमचं नाव काय?' सदाने विचारले.

" शिवम.. " बोबड्या शब्दात शिव म्हणाला.

" आई नाही आली तुमची..?" सदाने विचारले.

" ती नायी.. देवाकले गेली.. मला चॉकलेट आणायला.. " निष्पाप शिव म्हणाला.

त्याचे ते शब्द ऐकताच सदाला गलबलून आलं.. त्याने चिमूकल्याला काळजाशी घट्ट पकडले..

" देवा हे काय ऐकुन ऱ्हायलोय.. हया चिमुकल्याला शिक्षा का देऊन ऱ्हायलास बाबा.. " सदा गहिवरला.

" मामा.. तू पलत ललतो.. तुझी पण आई देवाकलं गेली.. "

" नाही रे राजा.. त्यामुळे नयी रडून ऱ्हायलो.. उगाचं डोळे भरुन येऊन ऱ्हायले.. " सदा म्हणाला.

" माजी मोठीमाय असंच बोलते.. " शिव म्हणाला.

" चला.. गंमत खायची एकजनाला.. " सदा म्हणाला.

संध्याकाळी अमित वापस आला, त्याने पाहिलं शिव सदाजवळ रमला होता.. आजच्या इतकं आनंदी शिवला पाहिलं नव्हतं.. अमितला पहाताच शिव धावतच येऊन त्याला बिलगला..

" बाबा मामा खुप खुप छान आहे.. माजे खुप खुप लाल कळतो.. मी..तू.. त्याला आपल्या सोबत घेऊन जावू.. " शिव म्हणाला.

" तो नाही येणार आपल्या सोबत.. तो रागावलाय माझ्यावर.. " अमित म्हणाला.

" बाबा.. तू.. कान पकलून.. सॉली बोल.. तो ऐकेल.. खुप चांगला आहे मामा.. मला मांडीवर झोपवलं.. गाणं म्हणाला.. " शिव.

" तुझे आभार कसे मानू.. सदा..! बिन आईच्या पोराला सांभाळणे महाकठीण असतं.. " अमित.

" हे मला सांगून ऱ्हायलात डॉक्टरसायेब.. " सदा.

" सॉरी.. मी असं बोलायला नको होतं.. शिवला तरी मी आहे.. तू तर.. " अमित.

" ऱ्हाऊ द्या मालक.. नोकराची माफी कयाला मागून ऱ्हायलात.. " सदा म्हणाला.

आभाळ भरुन आलं.. पावसाला सुरुवात झाली.. तसा सदा आणि अमित त्याच्या घरात आले.. पाऊस धो धो बरसायला लागला.. सदाने चहा बनवला.. चहा पिऊन झाल्यावर अमित वापस निघाला. पुलावरुन पाणी गेल्याची बातमी कुणीतरी दिली. अमित वापस आत आला.

" वाड्यावर सोय करु का? " सदाने विचारले.

" इथेच थांबतो.. शिवला ही जागा ओळखीची झालीय.. वाड्यावर गेलो तर तो त्रास देईल.. " अमित म्हणाला.

" तू एकटाच राहिलास सदा.. लग्न करायचं असतं.. " अमित.

" आज पर्यंत एकटा नव्हतो डॉक्टरसायेब.. आता मात्र असं वाटून ऱ्हायलंय.. माझा नवरा होता संगतीला.. दुसरी बायको आणली होती.. पण मनातून त्याला माझा मानून ऱ्हायलो.. पण आज समजून चुकलो.. तो माझा नव्हताच.. " सदा म्हणाला.

" मी माझा कुठं राहिलोय सदा.. तुझ्याशिवाय एकटा पडलो होतो.. वाटलं डॉक्टर झालं की आपल्या सदाला आणून आपलं जग निर्माण करायच.. पण समाज, परंपरा ह्यापुढे झुकावं लागलं.. नाही...समाजाला घाबरुन नाही.. आईच्या हट्टाखातर मला उमाशी लग्न करावं लागलं.. मी तिला तूझ्या विषयी सर्व सांगितलं.. पण ती सुद्धा तिच्या आईवडिलांसाठी माझ्यासोबत राहिली.. तिने स्वतःला माझी दुसरी बायकोच मानलं.. माझ्यापाशी शरीरसुखाची मागणी केली नाही... मीच दुबळा ठरलो.. मोहाच्या क्षणी तिच्यासोबत.... मला माफ कर सदा.. मी असं नव्हतं करायला पाहिजे होत.. पण त्या क्षणानंतर सुद्धा तिने कधीच माझ्यावर हक्क नाही सांगितला.. अधिकार नाही गाजवला.. मी मात्र तिच्यात चांगुलपणाच्या ओझ्याखाली दबलो गेलो.. पुढे आम्हाला शिव झाला.. पण त्याला जन्म देताना ती दगावली.. माझा हातात हात घेऊन तिने माझ्याकडून वचन घेतलं.. " अमित डोळे पुसत म्हणाला.

" तुम्ही मला तुमच्या लग्नाबद्दल, तूमच्या बायकोच्या बद्दल काऊन नाही कळवलं.. मला परकं केलं.. माझी आठवण नयी आली.. मी तुम्हाला अडवलं नसतं.. उलट तुमच्या बायकोशी सुखान संसार केला असतात तुमी... " सदा म्हणाला.

शिव सदाच्या मांडीवर बसल्या बसल्या झोपला होता.. त्याला पलंगावर झोपवून पांघरुन घातले..

" तुम्ही पण पडा थोडावेळ.. मी आपल्यासाठी भाकरी टाकतो गरमागरम.. भूक लागून ऱ्हायली असणं.. " सदा.

सदाने चूल पेटवली, काठवट मांडलं, डब्यातून पिठं घेतलं.. हंड्यातून पाणी घेतले.. चुलीवर तवा टाकला.. तवा तापे पर्यंत कांदा चिरला, लसूण हिरवी मिरची वाटण बनवलं.. तव्यावर पाणी टाकलं.. चर्रर्रर्र आवाज आला.. पिठात पाणी घालून पिठं मळलं.. हातावर भाकरी थापली.. तव्यावर टाकुन त्यावरून पाण्याचा हात फिरवला.. अमित हे सर्व पहात होता.. त्याच्या मनातील औदासीन्य कुठल्या कुठे पळून गेलं.. तो भानावर आला तेव्हा सदाच्या चार भाकरी तयार होत्या.. त्याने तव्यावर तेल टाकले... मोहरी टाकली.. ती तडताडताच कांदा घातला.. कांदा होताच वाटणं घालून पाणी टाकलं.. फोडणीचा खमंग वास दरवळला.. त्यात बेसन घालून झुणका बनवला.. पाट घालून त्याने अमितला आवाज दिला..

" तू नाही बसणार..? " अमितने विचारले.

" नयी सायेब तुम्ही जेवून घ्या.. मी बसेन मागणं.." सदा.

" सदा.. मला प्रेमाचा, जोडीदाराचा अधिकार राहिला नसला तरी आपण मित्र आहोत बालपणीचे, त्या अधिकाराने बोलतो.. बस आपण दोघे बसू एका ताटात.. " अमित त्याचा हात पकडत म्हणाला.

सदा पाणी घेऊन जेवायला बसला..

" खुप तिखट झालाय झुणका.. तुमी कसं खाऊन ऱ्हायले बाप्पा.. थांबा तुमाला दुध देतो.. " सदा म्हणाला.

" नको सदा.. हे माझ्यासाठी अमृतासमान आहे .. " अमित.

सदा खाली बसला, दोघांनी जेवण केले.. बाहेर पाऊस बरसतच होता.. सदाने आवराआवर केली..

" वाड्यावर गेला असतात तर.. आरामात झोपता आलं असतं.. " सदा म्हणाला.

" तिथे भिंतीला बोलतं बसलो असतो.. इथे तू तरी आहेस.. दिवस कसाबसा जातो.. पण रात्र खायला उठते.. " अमित.

" मालक तुमी दुसरं लग्न का करत नयी.. शिवला आई मिळलं.. तुमी माज ऐकुन ऱ्हायले तर... " सदा.

" तूला मघा सांगितलं की.. उमाने जाताना वचन घेतलं.. तिने आई, आबा समोर वचन घेतलं.. मी तूला तूझा अधिकार देईन.. आबासाहेब.. आत्याबाई.. हयांचं पाहिलं लग्न झालंय.. गावाकडच्या अनाथ सदाशिव सोबत.. तुम्हाला अमित सांगू शकले नाहीत.. त्या दोघांचं एकमेकांशिवाय अस्तित्व नाही.. त्यांची मनं.. हृदय एक झालेली आहेत.. माझं शेवटची इच्छा पूर्ण करा.. त्या दोघांना.. एक होऊ द्या.. मला वचन द्या.. वचन द्या.. व.. च.. " बोलता बोलता तिने प्राण सोडले.. " अमित म्हणाला.

" खरं बोलून गेली ती.. माझं असं निराळं अस्तित्व नयी.. तूमी आहात तर या जिंदगानीला अर्थ आहे.. नयी तर व्यर्थच ऱ्हायलो ना मी.. " सदा म्हणाला.

" तूझा निरोप घेऊन निघाल्या पासून मी माझा नव्हतो सदा.. आज तूला भेटलो.. खरंच माझं अस्तित्व तुझ्यामुळे पूर्ण होतं.. आता आपण एकमेकांना सोडून रहायचं नाही.. " अमित त्याला मिठी मारत म्हणाला.

" मित.. माझा मित.. " सदा..

" तुझी हाक ऐकायला माझे प्राण कंठाशी आले होते सदा.. " अमित म्हणाला.

" पण आबा अन आई.. ते बरे तयार झाले..!" सदा.

" त्यांनी संमती दिलीय.. पण सोबत रहायला नकार दिलाय म्हणून आपण आपली दुनिया सरकारी कोर्टर्सवर बसवू.. ते सुद्धा लवकरच मनाने आपलं नातं स्विकारतील.... बाहेर पाऊस थांबला होता.. वातावरण साफ झालं होत.. तिघेही सोबतीने निद्रेच्या आधीन झाले होते.. पूर्ण कुटुंब अस्तित्वात आलं होअस्तित्व तं.....

|| समाप्त ||

मेघराज शेवाळकर