Morpankh part - 1 books and stories free download online pdf in Marathi

मोरपंख भाग - 1

मोरपंख - भाग 1

मोरपंख

ऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 वाजले होते..बस येण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ होता.नेहमीप्रमाणे शिरूर busstop गजबजलेला होता.आजू बाजूला एस.ट्याची ये जा चालू होती त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.बोअर होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या निखिल ने खिशातला मोबाइल काढला.नागमोडी बोट फिरवत कसा तो पॅटर्न उघडला देव जाणे.फेसबुक update चालत बसला.गालावर मात्र प्रचंड स्मितहास्य जणू हिरवागार पाउस नुकताच पडून गेलेल्या गारव्यात इंद्रधनू उमलाव अगदी हुबेहूब तसच होत काही.बालपणीची मैत्रीण शर्वरीचीच अकाउंट होत ते बहुदा..तिच्याशी तो रोज बोलायचा पण शब्द बोटांपर्यंत यायचे पण ओठापर्यंत आलेले शब्द त्याच्या टायपिंग मधे येत न्हवते.तिला नंबर मागायला तो थोडासा घाबरत असावा बहुतेक..कुणास ठाऊक ..सध्या ती पण पुण्या वरून शिफ्ट होऊन शिरुरला राहायला आली होती कारण तिला पण जवळच midc मधे जॉब मिळाला होता.पण तिचा साधा फोटो पण फेसबुक वॉल वर न्हवता.इकडे त्याची बस लागली त्याची भनक सुद्धा निखिल ला न्हवती.गालातल्या गालात हसत मात्र त्याने नजर थोडीशी वर फिरवली शिरूर - रांजणगाव बस त्याला दिसली..तसा तो मॅरेथॉन मधे पळाव तसा अधश्या सारखा बस कडे पळत सुटला.गर्दीत रेटत रेटत तो पुढे सरकत होता.. गर्दी काही केल्या हटत न्हवती.कसाबसा गर्दीत वाट काढत एस.टी मधे घुसला एक शीट रिकामं होत त्यावर जाऊन अलगद विसावला. जागा मिळाली म्हणून क्षणभंगुर आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.ये हॅलो मिस्टर..कुणाच्या जाग्यावर बसलाय तुम्ही ? कुणाला विचारून ? हे शुक शुक ...समोर ऐन विशीतली पोरगी सलवार कुर्ता घातलेली त्याची बोलत होती बोलत कसली वाद घालत होती.निखिल मात्र तिच्या कडे पाहतच होता..ये कळत नाहीये का तुला ? हात त्याच्या चेहऱ्यासमोरून फिरवत चुटकी वाजवत ती म्हणाली.तिचे ते कुरळे भिरभिरणारे केस गुलाबी रंगावर भाळलेल्या निखिल ला थोडं भानावर आल्या सारख झालं...मी मी पकडली आहे ..जागा...निखिल तोटक्या आवाजात बोलत होता..मी मी काय उठ हो बाजूला बघ...निखिल मात्र थोडा भान हरपला असावा बहुतेक .थोडं पुढे वाद नको म्हणून उठला व वरच्या sitrela असलेल्या एस. टी च्या दांड्याला धरून उभा राहिला.ओढणी सावरत ती मात्र तिरका कटाक्ष त्याच्याकडे टाकत काहीतरी रागाच्या स्वरात पुटपुटत बसली.निखिल चोरी नजरेनं अधून मधून तिच्याकडे पाहत होता ती मात्र मूर्ख आहे हा हा म्हणत असावी बहुतेक रागवट्या चेहऱ्याने पाहत होती.बघता बघता बस स्टॉप कधी आला समजलच नाही.बसून राहणारे सर्व लोक उठून गर्दीत उभे राहून भराभरा पुढे सरकत राहिले.तिने पण घाईचा सपाटा लावत उतरण्यास सुरुवात केली.तिच्याकडे आपण गुन्हेगार असल्या नजरेनं तुच्याकडे पाहत होता.निखिल सॉरी म्हणावसं वाटलं तसा तो कानात गाणे ऐकन्यासाठी घातलेला हेडफोन काढत बॅग पाठीला अडकवली आणि तो उतरू लागला.तोपर्यंत ती ऑटो ला हात करून निघून गेली होती.निखिल जरा अस्वस्थ वाटत होता.कंपनी 2 - 3 km अंतरावर असल्याने जवळच असलेल्या ऑटो ला हात करून तोही चालता झाला.कंपनी gate जवळ आल्यावर सुटते दहा रुपये रिक्षावाल्याला देऊन त्याने आत मध्ये एन्ट्री केली.कंपनी मध्ये असिस्टंट ऑफिसर असल्या कारणाने शिपायाला केबिन कुठे आहे अशी विचारणा केली.शिपायाने तोंडातुन ब्र सुद्धा न काढता डाव्या sitela हात केला.केबिन मस्त होत.पुढ्यात कॉम्पुटर त्याच्या शेजारी माउस,पेनाचा बेंच,थोडीशी कागद ,फायली आणि एक खुर्ची असा सगळा सेटअप होता.cpu च मधोमध असणार बटण दाबून कॉम्पुटर ऑन करण्याचा प्रयत्न त्याने केला .कॉम्पुटर ऑन केला खरा पण त्याचा पासवर्ड कुण्या शर्वरी नावाच्या मुलीकडे होता अस विचारणा केल्यावर त्या शिपायाने सांगितलं..कंटाळवाणं न व्हावं म्हणून पॅटर्न असलेला मोबाइल ओपन केला आणि नेट वर सर्फ करून लागला.व्हाट्सअप्पप messege टक टक सारखे पडत होते.तेवढ्यात शिपायाने शर्वरी मॅम आल्यात अस सांगितलं.तसा तो त्या दिशेने सरसावला काचेवर दोन बोटाने टक टक करत करत मे आय come इन ?? अशी विचारणा केली.येस come इन ..अस प्रत्युत्तर आलं.file चाळत असणाऱ्या त्या मॅडमने मागे वळून पाहिलं .थोडी ती थबकली.निखिलपण थोडं थबकला.कारण ती तीच होती मगाशी एस. टी मधे वाद घालणारी..

क्रमश :

- सुरज सुर्यवंशी

इतर रसदार पर्याय