मोरपंख भाग - 3
तिने फर्स्ट time त्याला कॉफीवर भेटायला बोलवलं होत.इच्छा
असून सुद्धा निखिलला कॉफीसाठी हो म्हणावसं वाटत न्हवत.कारण तिथे पुन्हा पाहिल्यावर पब्लिक प्लेस मध्ये भांडण होईल की काय असं त्याला वाटत होतं..त्याला यातून मार्ग काय काढावा सुचत न्हवत..हातात असणारा मोबाइल दोन बोटात फिरवत होता.एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अश्यातली गत झाली होती.तेवढ्यात मोबाईल पुन्हा खनानला..
शर्वरी : are yetos na tu ? Kuthe harvlay nemka bol na patkan ...
दोन्ही ओठ आत मध्ये दाबत मनातल्या मनात पूटपुटू लागला.चल निखिल चल ही वेळ दवडू नकोस..संधी पुन्हा पुन्हा येत नाही असं म्हणू लागला.. पुन्हा मोबाईल re ओपन केला..आणि दोन्ही हातात पकडलेल्या मोबाईलमधे खुर्ची वर बसून टक टक type करू लागला.
निखिल : हो ...येतो अर्ध्या तासात कॅफ्फे कट्ट्याला भेटु ...
शर्वरी : nakki ...Me high-tech tikde chal bye bhetu ...
निखिल : bye
ती किती वाजता कंपनीतून बाहेर पडते याची तो वाट पाहू लागला..बरोबर पाच मिनिटाने ती केबिन बाहेर आली ती एक नजर त्याच्या भोवती फिरवली...व हळूहळू पुढे सरसावत बाहेर निघून गेली.तोही तिच्या मागोमाग 10 मिनिटाच्या अंतरावर निघाला.
हातामध्ये असणारा मोबाइल लागलीच खिशा मधे ठेवला..समोर पसरलेल्या file व्यवस्थित रचून ठेवल्या..बॅग उचलली व chaapl स्टँड पाशी जाऊन थांबला...तिथे शेजारील बाकड्यावर बसून सॉक्स व बूट घातले ..आणि घाई गरबडीत शिड्या उतरू लागला...रस्त्यावर येऊन थांबला रस्त्याच्या उजव्या बाजूला एखादी बस किंवा ऑटो मिळते का ते पाहत होता...पण बस किंवा ऑटो काही थांबता थांबत न्हवती.. थोड्या वेळाने एक ऑटो कशीबशी थांबली..
ऑटोवाला - किधर जाणे का है भाई ??
निखिल - कॅफ्फे कट्टा ...चलोगे क्या ????
ऑटोवाला - 30 रुपये लगेगा बाही साहेब ..देखो जमता है तो बेtho ..
निखिल : ( उगाच उशीर नको म्हणून ) हो ठीक आहे चला...ऑटो मध्ये बसत बोलला...यार तिथे गेल्यावर काय होईल ..कधी चिंताग्रस्त तर कधी जुन्या आठवणी मध्ये रमत तो मनी हसत होता.. एवढीशी होती 7 वर्षा पासूनची मैत्रीण खुप बदलीये..राग सुद्धा चेहऱ्यावर खुलून दिसतं होता...कॅफ्फे कट्टा आला.रिक्षा वाल्याला 30 rs दिले... हळूच कासव पावलांनी ती तिथे पोचली आहे का याची खात्री करावी म्हणून तो कासव गतिने पुढे सरकत होता...तसा निखिल थोडासा मागे झाला कारण टेबल नंबर 3 वर ती बसली होती त्याची वाट पाहत... हॉटेलच्या वर्क्सच्या7 कोपऱ्यात असणाऱ्या पंख्याने कुरळे कुरळे भुरभुरणारे केस...अलगद केसांमधून हात घालुन गालावर रेंगाळणाऱ्या केसाला बोटाने काना मागे सारत होती...चातकासारखी वाट पाहणारे डोळे तर उफ....$ निखिल तिला चोरट्या नजरेनं तिला बाहेरूनच पाहत होता..
मोबाईल तिचे दोन तीन meesege तोपर्यंत पडले होते ...कुठे आला आहेस अशी ती विचारात होती...नेमकं काय सांगावं निखिलला कळेना...छातीमधे धाकधूक आणखीन वाढली..डोक्यामध्ये विचार मंथन पुन्हा सुरू झालं..चिंतेची नुसती लाहीलाही डोक्यात झाली...तस त्याने क्षणात निर्णय घेतला...काय होईल ते होईल पण समोर जाऊया आपण...पाहूया जे होईल ते...एक मोठा श्वास घेतला ..छातीमधली धाक धुक आणखीनच वाढली..caffecha दरवाजा त्याने उघडला..आणि समोर नजर टाकली...
ती त्याच जागेवर बसली होती.निखिल एक एक पाऊल टाकत तिच्याकडे हळुहळु पुढे जात होता. एव्हाना तिने पण आता बारीक नजर त्याच्याकडे नजर फिरवली होती हा काय पाठलाग करतो की काय माझा असा संशय तिच्या मनात दाट निर्माण झाला होता..निखिल तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि बोलू लागला..तीही त्याच्याकडे गुन्हेगार नजरेनं पाहत होती..निखिलने बोलण्यास सुरुवात केली..
निखिल : निखिल सरपोतदार तुमचाच मित्र का ...?( निखिल स्वतःचाच नाव तिला विचारात होता...)
शर्वरी : हो त्याचं काय ?? आणि तुला कसा माहीत तो .( शर्वरी त्याला खोसून विचारू लागली )
निखिल : सॉरी to say but.... आत्ता मगाशी 5 मिनिट्सपूर्वी बस स्टॉप च्या जवळ असणाऱ्या इंदिरा गांधी पुतळ्यावर त्याचा एका bikela धडकून एक्सक्सिडेंट झालाय...( निखिल स्वतः बद्दलच असा काय बोलतोय हे त्याला पण कळत न्हवत ...हे ऐकून शर्वरीच्या हातामध्ये असणारी purse खाली पडली..अश्रूंचा बांध फुटला.. डोळे पाझर फुटल्या गत पाणावले काच फरशीवर तुटून फुटावी तस काळीज देखील फाटलं गेलं ...त्याचा एक्सक्सिडेंट स्वतः मुळेच झाला अस ती समजू लागली.)
शर्वरी : काय ...?कुठे आहे तो...फार लागलं तर नाही ना त्याला..? मला सांग ना कुठेय निखिल ? कुठेय
( शर्वरी अश्रूं ढसा ढसा ढालीत होती..)
निखिल - वि.सी हॉस्पिटल ...
शर्वरी - ok.... मी निघते तिकडे...(एका हाताच्या मुठीने पाणावले डोळे तिने पुसले ..व सरळ हॉस्पिटलकडे धाव घेण्यासाठी निघाली...कोणत्या हालत मध्ये असेल तो..? उगचाच बोलावलं न मी त्याला...स्वतःला दोष देत होती..निखिलचा पूर्ण अंदाज चुकला होता...त्याने कॅफ्फे मध्ये घुसताना जो विचार करून घुसला होता...तस न करता हे वेगळं सांगुन अस जास्त काही होईल याची त्याला कल्पना न्हवती... तो ही तिच्या मागोमाग जाऊन हॉस्पिटल मधे पोहचला...तिथे शर्वरी चौकशी कक्षा पाशी जाऊन विचारपूस करत होती... पण वारंवार ती सिस्टर अस कुणीही patient इथे नाही असच सांगत होती..निखिल तोपर्यंत काहीतरी कागदावर खरडत बसला होता..लिहून पूर्ण झाल्यावर त्यान त्या कागदाची घडी घातली..व आजू बाजूला भिर भिऱ्या नजरेनं पाहू लागला...बहुतेक कोणाला तरी शोधत असावा तो...तशी नजर एका शेजारी खेळत असलेल्या एका मुलावर पडली..त्यानं त्याला एक चॉकलेट दिल...व ती चिठुरी समोर चौकशी काउंटर जवळ उभ्या असलेल्या त्या शर्वरी जवळ देण्यास सांगितली...आणि तो शेजारी असलेल्या चहाच्या टपरी पाशी जाऊन उभा राहिला..पूढे काय प्रकार घडतो ते पाहू लागला..शर्वरी अजुन पण त्या परिचारिकेशी हुज्जत घालत होती...
शर्वरी - अस कस काय म्हणून शकता तुम्ही...?? तुम्ही एकदा पुन्हा चेक करा ना....
( पाणावलेले डोळे शमून आता तोंड भांडखोर झालं होतं...तशी हताश होऊन ती उभा राहिली होती...तो assistsnt ऑफिसर तर खोट बोलला नसेल ना...तिने मनातल्या मनात विचार सुरू केला...छे छे.. नसेल तसा का बोलेल तो ...आणि बोलला असेल ना तर त्याची खैर नाही ...तिने मनाशी ठाम निर्णय केला..ऑफिस मधून त्या आसिस्टंट चा नंबर मिळतोय का ..पहावा म्हणून तिने मोबाइल पर्स मधून बाहेर काढला..तोच एक छोटस गोंडस मुल तिच्या जवळ येऊन उभा राहील...तिच्या पायानजवळ जाऊन उडया मारत चिठुरी तिला दाखवू लागलं..तस तिने त्याकडे पाहिलं ...व हातातली चिठुरी घेत कुणी दिलीय रे विचारलं असता ...त्याने हॉस्पिटलच्या दाराकडे बोट केलं.. शर्वरी दरवाज्या जवळ आली पण तिथे कोणिच न्हवतं...त्याच्याकडे पाहून ती पुन्हा विचारू लागली..ते छोटस 4 वर्षाच मूल केसांन हात लावून पाहत होत...नंतर पुन्हा ते खेळू लागलं...शर्वरीने कुणी दिली असावी ही चिठी मनातल्या मनात स्वतालाच विचारू लागली...शेजारी कुणीच नाहीये ना हे तिने पाहिलं..तश्या ती चिठीच्या घड्या उलगडू लागली..अक्षर ओळखीचं वाटत होतं...ती ती चिठूरी वाचू लागली...
क्रमश :
- सुरज सुर्यवंशी