पडछाया - भाग - २ मेघराज शेवाळकर द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

पडछाया - भाग - २



विहानने थर्मास अन बॅग उचलली.. तो पुढे निघाला... तो गेट मधून आत शिरला.. बहुमजली इमारत.. त्यात असणाऱ्या ऑफिस मध्ये गेला.नाव नोंदवल .. विहान पाठीमागच्या पटांगनातं पोहोचला... विहान स्टेलाला शोधू लागला.. कोपऱ्यातील एका झाडाखाली बसला होती .. विहान तिच्या दिशेने निघाला..
. स्टेला झाडावर चढणाऱ्या मुंगळ्यांच्या रांगेकडे टक लावून बघत होती ..
" काय बघते आहेस? " विहान ने विचारले.
" शु s s s s s.. " ती वळून बघत म्हणाली .
विहानने तिच्या खांद्यावर हात ठेवला.. तीने मागे बघितलं अन खांद्यावरील हात झटकून टाकला.. ती परत त्या रांगेकडे पाहू लागली .. आता विहानने सर्व सामान ओट्यावर ठेवले.. आपल्या खिशातील चॉकलेट काढले अन तिच्या समोर पकडले.. समोरच लक्ष सोडून ती चॉकलेटकडे पाहू लागली .. विहानने रॅपर काढून तिच्या समोर चॉकलेट पकडले.. लहानमुला प्रमाणे तिचे डोळे चमकले.. तिने झडप मारुन ते चोकेट घेतले अन तोंडात टाकले..
" अजून हवयं? " दुसरं चॉकलेट दाखवत विहानने विचारले.
तिने मानेनेच होकार दिला..
" मग मी म्हणेल तसं ऐकावं लागेल..! ऐकशील? " विहान.
तिने मानेनेच होकार दिला.. विहानने तिचा हात पकडून खाली बसवले.. ती खाली बसली ..
" तू कोण आहेस..? मला चॉकलेट हवं आहे.. " निरागसपने स्टेला म्हणाली .
" आधी तूला हे खावं लागेल.. मगच चॉकलेट मिळेल.. " विहान म्हणाला.
त्याने डबा उघडून ऑम्लेट दाखवलं.. एक घास मोडून तिला खाऊ घातलं.. ती ते खाऊ लागली ..सारं संपताच विहानने तिला पाणी पाजले.
" मला त्याचाकडे नेशील..? " स्टेलाने विचारले.
" कुणाकडे? तूझ्या बाबाकडे..? " विहान म्हणाला.
" माझा बाबा खूप लांब गेलाय.. गॉडकडे.. मला त्याचाकडे जायचंय.. विहू डार्लिंग.. " स्टेला म्हणाली .
" मीच आहे तूझा विहू डार्लिंग.. " विहान म्हणाला.
" चल.. खोटारडा कुठला.. तूला मिशा आहेत.. त्याला नाहीत काही.. " ती म्हणाली .
" मी मिशा काढून आलो तर.. मला म्हणशील विहू डार्लिंग.. मग तर त्याच्या सारखा दिसेन मी. " विहान म्हणाला.
" आम्ही ना लग्न करणार आहोत..चर्च मध्ये तो माझी वाट पहात असेल... " ती म्हणाली .
" हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी.. पेस्ट्री.. तूला आवडते ना? " विहान पेस्ट्रीचा बॉक्स उघडत म्हणाला..
स्टेलाने ती पेस्ट्री पटापट खाऊन टाकली.. विहानने तिच्या तोंडाला माखलेली पेस्ट्री खिशातून रुमाल काढून पुसून टाकली.
" तुझं कुणी आहे का इथे? " स्टेलाने विचारले.
" हो.. माझं लव्ह.. माझं प्रेम.. माझी स्टेला .. स्टेला ब्रिगेंझा तिचं नाव.. " विहान म्हणाला.
" तिचं पण नाव स्टेलाच आहे.. इथले ते मोठे.. सर आहेत ते मला म्हणाले माझं पण नाव स्टेला आहे.. " ती म्हणाली .
" हो का?.. माझी स्टेला भेटली ना.. कि तिला हा गुलाब देशील?.. " विहान तिला गुलबाचं फुल देत म्हणाला.
" मला पण आवडतो.. लाल गुलाब.. पण हे मी तिलाच देईन.. " स्टेला म्हणाली .
" असू दे तुलाच घे.. ती भेटल्यावर दुसरा देईन तिला.. " विहान म्हणाला.
" ओह.. हाऊ स्विट.. मी गॉड जवळ प्रे करेल.. तूझ्यासाठी.. ती लवकरच भेटेल तूला.. " स्टेला म्हणाली .
विहानने सारा कचरा उचलून एकत्र एका कॅरीबॅग मध्ये गोळा केला... बाकीचं सामान आवरुन घेतलं.. खिशातील चॉकलेट काढून स्टेलाला खायला घातलं.. अन तिचा हात पकडून वापस निघाला.. स्टेलाला रुममध्ये सोडून तो वापस निघाला. परत वळून स्टेलाकडे पाहिले.. खिडकीत उभी राहून ती दुसरीकदडे बघत होती ..
" ती बरा होईल ना.. " विहानने विचारले.
" आम्ही होप्स सोडलेले नाहीत.. तिच्या मेंदूत झालेला गुंता सुटला की होईल पूर्वी सारखी .. " डॉक्टर म्हणाले.
" ती लवकर बरा व्हायला हवी .. डॉक्टर.. तिला दुसरीकडे? " विहान म्हणाला.
" मि. विहान.. जगाच्या पाठीवर कुठेही नेलंत तरी हाच इलाज होतो.. काळ हाच इलाज आहे.. " डॉक्टर.
" सॉरी डॉक्टर.. पण आशा वेडी असते.. " विहान म्हणाला.
" आय कॅन उंडरस्टॅंड मि. विहान.. लेट्स प्रे.. " डॉक्टर .
विहान त्यांच्याशी बोलून तिथून निघाला.

विहान घरात आला.. सोफ्यावर बसला.. शरीरापेक्षा म्हणाला थकवा जाणवत होता. त्याने बसल्या बसल्या डोळे मिटले..
" विहू.. आलास बाळा.. " आई तिथे येतं म्हणाली.
" हो.. जरा थकल्यासारखं वाटतंय.. डोकंही दुखतंय.. " डोळे मिटूनच विहान बोलला.
" तूला म्हणाले काही खाऊन जा.. नाही खाल्लं की ऍसिडिटी होते.. बरं फ्रेश होऊन ये.. मी वाढते .. जेवून घे अन आराम कर.. " आई म्हणाली.
" हो आलोच.. " विहान बोलला, अन आत गेला.
आई पाठमोऱ्या लेकाकडे पहात उभी राहिली.. त्याचं एकाकीपण पाहून तिला गलबलून आलं.. तिने पदराच्या टोकाने डोळे पुसले अन स्वयंपाक घराकडे गेली.
" आई.. तू पण बस.. आपण दोघेही सोबत जेवू.. " विहान म्हणाला..
" आज एकादशी.. माझा उपवास असतो.. तू बस. " आई.
" किती उपवास करतेस.. आता हया वयात नसतात झेपत.. सोड ते उपवास. " विहान म्हणाला.
" माझ्या लेकाचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून!.. त्या ईश्वराशी भांडणं आहे माझं.. " आई म्हणाली.
"कुणाच्या म्हणण्यावर काहीही होतं नसतं आई.. जे प्राक्तनातं असतं तेच घडतं असतं.. तू उगाचं स्वतःला त्रास करुन घेते आहेस.." विहान म्हणाला.
" विहू संध्यकाळी काय करतो आहेस.. कुठं बाहेर जाणार नाहीस ना.. " वाढत आई म्हणाली.
" नाही.. का काही विशेष? " विहानने विचारलं.
" संध्यकाळी मानसी येणार आहे..!". आई म्हणाली.
" मानसी.. अचानक.. कशी काय? " विहान म्हणाला.
" मीच बोलावलंय.. आता दोन वर्ष होऊन गेलीत.. तो काही नीट होईल असं वाटतं नाही. कुठवर एकटा रहाणार.. अन तिनेही एकटेपण का सोसायचं? " आई म्हणाली.
जेवण होताच विहान बेसिनकडे गेला.. आईने ताट उचलून ठेवलं.. विहान आपल्या रुममध्ये गेला..

" स्टेला .. मी सांगतोय ते शांतपणे ऐक.. पॅनिक होऊ नकोस.. " विहान रोमीलला म्हणाला.
" तू लग्न करणार आहेस? हेच सांगणार आहेस.. हो ना?.. ते तर आधीच सांगून झालय.. हया चार दिवसात काही बदललंय का?.. तसं असेल तर सांग.. " स्टेला.
" मी.. मी.. लग्न करुन आलोय.. " विहान म्हणाला.
" हम्म..झालं एकदाच..काँग्रट्स..पण चोरुन का? मी थोडीचं मोडायला येणार होते .. " स्टेला म्हणाली .
" तिच्या वडिलांना अटॅक आला म्हणून भेटायला गेलो होतो.. पण त्यांची शेवटची इच्छा म्हणून हार घालून उरकून घेतलं लग्न .. " विहान म्हणाला.
" मग इथे काय करतो आहेस डार्लिंग.. तिच्या जवळ असायला हवंस.. युवर ड्रीमि डेज.. डोन्ट मिस देम.. तिचेही काही स्वप्नं असतील.. संसाराची.. आपल्या नवऱ्याची.. ती पूर्ण कर.. गो मॅन गो.. " स्टेला म्हणाली .
" तिचे वडील गेले.. ती दुःखात आहे.. " विहान.
"विहू डिअर.. हया क्षणी सगळ्यात जास्त तुझी गरज आहे तिला..तिला सावर.. प्रेम दे.. आधार दे.. तुझी जादूची झप्पी.." स्टेला म्हणाली .
" जादूची झप्पी.. ती फक्त तुझ्यासाठी आहे.. स्टील आय लव्ह यू.. " विहान.
" डोन्ट बी सेल्फिश.. तिच्या भावनांचा विचार कर.. आता तुझ्यावर तिचा हक्क आहे.. विहू.. " स्टेला म्हणाली .
" मी सारे कर्तव्य पार पाडीन.. तिला भरभरून सुख देईन.. पण मी तुझाच असेन.. लक्षात ठेव.. " विहान.
" हो.. मला माहित आहे.. म्हणून तूला हक्काने सांगतेय.. आता फक्त तू तिचा बनून रहा.. " स्टेला म्हणाली ..

विहान भानावर आला तेव्हा चार वाजून गेले होते.. तो उठून बसला.. ती येणार म्हणून तो विचारात पडला..
" का येते आहे?... डिवोर्स तर घेणार नसेल ?.. तिलाही सुखात आयुष्य घालवण्याचा अधिकार आहे.. माझं काय? माझं आयुष्य असचं गेलं.. ना रोमीलला सुख देऊ शकलो.. ना मानसीला.. ना ती सत्य स्वीकारु शकली ना रोमील.. " विहान.
" चहा घे विहू..! तयार हो.. मानसी येतंच असेल.. " आई म्हणाली.. अन रुममधून निघून गेली.
विहान चहाचे घोट घेत घेत खिडकीतून बाहेर बघत होता..
ढग जमत होते.. ऊन सावलीचा खेळ चालू होता.. अगदी तसाच त्याच्या मनात आशा निराशेचा खेळ चालू होता.. चहा संपताच तो फ्रेश व्हायला उठला..

|| क्रमशः ||