पडछाया - भाग - ३ मेघराज शेवाळकर द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

पडछाया - भाग - ३



चेहरा पुसत विहान आरशासमोर उभा होता.. कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेलं मानसी नाव आज पुन्हा कानावर पडलं.. तिचं आरसपाणी सौंदर्य डोळ्यासमोर तरळून गेलं.. चाफेकळी नाक.. लालचटुक ओठ.. गोल चेहेरा.. चित्रपटात गेली असती तर.. जाहिरात क्षेत्रात.. गायन क्षेत्रात.. कुठेही असली असती तर नक्कीच टॉपवर राहिली असती..तिचा तो लाघवी स्वभाव.. गोडं आवाज.. सारं भुरळ पडणारं.. पण आपलं हृदय आधीच कुणी चोरलं होतं..

" मला तुमच्या पायाजवळ जागा मिळाली तरी स्वतःला धन्य समजेन.. मला तुमच्याकडून काहीही नको." मानसी म्हणाली.
" तुझी जागा पायाजवळ नक्कीच नाही.. पण हृदयातही नाही.. " विहान म्हणाला.
" आपण मैत्री नक्कीच करु शकतो.. " मानसी.
" त्याने तुझ्या आयुष्यात सुख थोडीचं येणार.. माझ्यासारख्या क्षुद्र व्यक्ती जो तूझ्या लायकीचा नाही.. त्याच्यासाठी आयुष्य वाया घालू नकोस!" विहान.
" तुम्ही आधी सांगितलं असतत तर मीच लग्नाला नकार दिला असता.. " मानसी.
" सगळं अचानक घडलं.. मी मरणाऱ्या बाबांना नकार नाही देऊ शकलो.. " विहान म्हणाला.
" म्हणूनच तुम्ही माझ्यासाठी सारं काही आहात.. तुमचं प्रेम.. कोण ती ? हा स्टेला .. तिला घेऊन या.. मी तुमच्या दोघांत येणार नाही. " मानसी.
" तू असेपर्यंत ती येणार नाही.. " विहान.
" ठिक तर.. मी जाते.. कुणा एकाच्या जाण्याने दोघे सुखी होणार असतील तर माझी तयारी आहे.. " मानसी.
" तू जाण्याची गरज नाही.. हे घरं.. संपत्ती.. माझी कमाई सारं सारं तुझच आहे.. " विहान.
" जिथं तुम्हीच माझे नाहीत तर हे सर्व घेऊन काय करायचं.. " मानसी म्हणाली.
" मी तूला परत सांगतो.. हे घर.. सारं सारं तुझं आहे.. इथून जाणारं कोण असेल तर तो मी असेन. " विहान.

" विहू.. आवरलं असेल तर खाली ये.. " आईच्या आवाजाने विहान भानावर आला.. त्याने पटापट सारं आवरलं आणि खाली आला.

विहानला पहाताच मानसी उभी राहिली.. पुढे होऊन ती पाया पडतं म्हणाली..
" माझ्या कशाला पाया पडतेस.. मी त्या योग्यतेचा नाही.. आणि तसही ज्या नात्याने आपण बांधलो गेलेलो आहोत, त्यात तुझी जागा पायाजवळ नक्कीच नाही.. " विहान.
" माझी जागा कुठे आहे तेच विचारायला आलेय.. तुमच्या परवानगी शिवाय.. " मानसी.
" तूला परवानगीची काहीच आवश्यकता नाही.. मी तूला आधीच सांगितलं होतं.. सारं सारं तुझंच आहे.. फक्त माझ्या हृदयावर तिचा हक्क.. आता तर तो गाजवणारी .. " विहान बोलता बोलता गहिवरला.
" कशी आहे ती ? " मानसीने विचारले.
" जगात असुन.. नसून सारखीच आहे.. कुणी तरी सांगत म्हणून तिचं स्टेला नाव आहे असं म्हणते .. आपण आवाज दिला तर काहीच प्रतिसाद देत नाही.. डॉक्टर म्हणतात काहीही सांगता येणार नाही.. केव्हा वेड जाऊन चांगली होईल.. " विहान म्हणाला.
" होईल ती नीट.. तुमच्या प्रेमाची शक्ती त्याला बरा करेल..! तुम्ही काळजी नका करु.. " मानसी.
" तिचा हट्ट नाही पुरवला म्हणून रागावलीय माझ्यावर.. मी तिचं ऐकायला हवं होतं.. " विहान.
" कसला हट्ट?.. " मानसीने विचारले.
" तूला सारे अधिकार देऊन तुझ्यावर प्रेम कर असं म्हणणं होतं तिचं.. मी नाही ऐकलं.. तिचा.. तूझा.. आईचा.. तूझ्या बाबांचा अपराधी आहे मी..माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला.. " कातरलेल्या आवाजात विहान म्हणाला.
" तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका.. सारे दान तो परमेश्वर टाकत असतो.. आपण तर सारिपटावरील केवळ सोंगटी आहोत.. तो ठेवेल त्या घरात जावंच लागतं.. " मानसी म्हणाली.
" एव्हढी समजदार आहेस! मग सारं सोडून का निघून गेलीस... तूला तूझं सारं सुख देईन असं वचन दिलं होतं तिला.. तू निघून गेलीस.. तो राग तिच्यावर काढला गेला.. खूप हळवी आहे ती .. ते आरोप नाही सहन करु शकली .. तिच्या कमकुवत मेंदूला ते ओझं नाही पेलवलं गेलं . ती वेडी झाली .. आपल्या सुखासाठी.. तूझ्या सुखासाठी.. ती वेडी झाली .. " विहान बोलता बोलता धायमोकलून रडायला लागला.
मानसी आत जावून त्याच्यासाठी पाणी घेऊन आली..
" पाणी घ्या.. पुसा ते अश्रू.. तुमच्या डोळ्यातील अश्रू ना स्टेलाला आवडतील ना... " मानसी म्हणाली.
" वाक्य पूर्ण कर.. अर्धवट सोडू नकोस..!" विहान म्हणाला.
" तुम्ही म्हणता ना.. माझा सर्वांवर अधिकार आहे? त्या अधिकाराने एक मागितलं तर दयालं? " मानसी म्हणाली.
" मला इथेच रहायचंय.. तुमच्या जवळ.. नाही.. स्टेलाची जागा नकोय मला.. फक्त तिची छाया बनून.. " मानसी.
" तो अधिकार आपण सप्तपदी चाललो तेव्हाच मिळालाय तूला..! तुचं निघून गेलीस.. अन हृदयात म्हणशील तर त्याला वचन दिलंय.. तिथेही तुझाच अधिकार असेल.. आधी त्याचं ऐकणारच नव्हतो पण आता.. त्याच्या शब्दाला मोठी किंमत आलीये. " विहान म्हणाला.

मानसी घरात रहायला येऊन वर्ष उलटून गेलं होतं.. तिने सारं सांभाळलं होतं.. विहान, घरं.. सारं सारं.. आता रविवारी ती सुद्धा रोमीलला भेटायला जातं असे.. दोघांचा सुखी संसार पाहून आई आनंदली होती..
आणि एक दिवस मानसीने गोडं बातमी विहानच्या कानात सांगितली.. विहान आनंदात न्हाऊन निघाला..
" मला ना परी हवीय.. अगदी तुझ्यासारखी..!" विहान म्हणाला.
" नाही हं.. मला मुलगा हवाय.. अगदी... " मानसी.
" माझ्यासारखा.. हो ना? " विहान म्हणाला.
" अं हं.. तुमच्यासारखा नाही.. " मानसी गोडं हसत म्हणाली.
" मग.. बाबांसारखा?.. " विहान.
" नाही हो.. स्टेला सारखा .. निष्पाप.. चंचल.. " मानसी.
" खरंच.. तू इतकी समंजस आहेस? " विहान.
" मी साधारण स्त्री आहे.. पण स्टेला आहे ना... देवदूत.. तिच्या सारखा मुलगाच व्हावा.. " मानसी.
" ओह.. मानसी.. आय लव्ह यू.. " तिला बाहुपाशात कैद करत विहान म्हणाला.
" खरंच.. हा स्वर्ग सोडून मी नसते गेले तर स्टेला .. " मानसी म्हणाली.
" ती आपल्या आयुष्यातून जाणारच होती .. ते तर मीच शपथ दिली होती आमच्या प्रेमाची.. की ती कधीही मला सोडून जाणारं नाही.. माझी चूक आहे.. जे घडतंय ते माझ्या मनाप्रमाणे घडावं असा अट्टाहास करत होतो. " विहान.
" अहो आता झालेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका.. मला खात्री आहे स्टेला लवकरच आपल्या सोबत असेन.. आपल्या चौघाची दुनिया.. तुम्ही.. स्टेला .. मी.. अन आपलं बाळ.. " मानसी म्हणाली.

" विहू.. आपण दोघेच नाही रहायचं..!" स्टेला विहानला बिलगत म्हणाली .
नुकताच झालेला धुंद प्रणय.. सुखाने विहान पहुडला होता.
" काय म्हणतेस बेबी ..दोघांत तिसरा कोण हवंय.. " विहान
" छोटासा विहू.. तुझ्यासारखा.. इवलासा.. " स्टेला.
" ए मलाही आवडेल.. पण तुझ्यासारखा हवा.. " विहान.

" कसला विचार करताय? " स्वतःशीच हसणाऱ्या विहानला पाहून मानसीने विचारले.
" अहं.. काही नाही.. स्टेलाला पण लहानमुलं खूप आवडतात.. एक अनाथ मुलं दत्तक घ्यायचं ठरवलं होतं.. तिने.. " विहान म्हणाला.
" आता वापस येईल तेव्हा स्वतःच मुलं असेल तिच्या मांडीवर.. " मानसी म्हणाली.

मानसी आता सात महिन्यांची गरोदर होती.. तिला काय हवं काय नको ते आई स्वतः बघत होती. तिची अन होणाऱ्या बाळाची काळजी विहान घेत होता..
रविवार सकाळचा दिवस.. विहान रोमीलला भेटायला जायचं म्हणून तयार होतं होता.. तो बाथरुममध्ये असताना त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला..
" विहान.. तुमचा कॉल आहे.. हॉस्पिटल मधून.. " मानसी.
" डॉक्टर असतील.. भेटायला येणार का नाही विचारत असतील.. त्यांना सांग मी येतोय.. " विहान म्हणाला.
मानसीने कॉल उचलला.. डॉक्टरांशी बोलून तिने मोबाईल खाली ठेवला.. विहान बाहेर आला.. स्तब्ध उभी असणारी मानसी.. तिला पाहून तो तिच्या जवळ आला..
" मनू.. काय झालं.. काय म्हणाले डॉक्टर? " त्याने विचारले.
" विहान.. विहान.. मला इतका आनंद झालाय.. कस सांगू.. नाचवं वाटतंय. " मानसी म्हणाली.
" अगं हो हो.. तूझ्याअवस्थेकडे बघ.. दोन जीवांची आहेस.. मला सांग.. तूझ्या ऐवजी मी नाचेल.. " विहान.
" मी जे सांगेन ते ऐकल्यावर तू खरंच नाचू लागशील.. विहू डार्लिंग आपली स्टेला बरी झालीय.. तिला पूर्वीच सर्व आठवायला लागलंय.. " अत्यानंदाने मानसी म्हणाली.
" काय.. माझा स्टेला ठिक झाली .. आपल्या बाळाचा पायगुण.. " विहान म्हणाला.
मानसी देवाजवळ साखर ठेवायला गेली.. विहानच्या हसऱ्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.. एक भीती जाणवू लागली..
" काय झालं विहान.. तूम्ही असे का बसले आहात ? " मानसीने विचारले.
विहान सुन्न होऊन तिच्याकडे पहात राहिला...

|| क्रमशः ||