पडछाया - भाग - ५ मेघराज शेवाळकर द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पडछाया - भाग - ५


" बच्चा.. तुझं औषधं घे.. " स्टेलाला गोळ्या देत विहान म्हणाला.
" डार्लिंग सकाळी जाग आली तेव्हा तू नव्हतास.. कुठे गेला होतास? यू नो? मला एकट्याला खूप भीती वाटते तू नसताना. प्लिज मला एकट्याला सोडून जावू नकोस. " स्टेला म्हणाली .
" मी बाथरुम मध्ये असेल..!" विहान म्हणाला .
" नाही.. तिथेही नव्हतास.. " स्टेला .
" हा.. आई कडे गेलो होतो.. त्यांची पाठ दुखत होती म्हणतं होती रात्री.. गडबडीत विचारायला नव्हतो गेलो.. म्हणून सकाळी जाग आल्यावर.. हवं तर विचारु शकतेस. " विहान म्हणाला.
" मानसीचा नवरा कधी येणार आहे ? त्याला नाहीये वाटतं आपल्या बायकोची.. होणाऱ्या बाळाची काळजी? " स्टेला.
" काही गोष्टी आपल्या हातात नसतात.. तिचंही तसंच आहे.. स्वतःच सुख पणाला लावून दुसऱ्यासाठी खूप काही करते.. आपलं दुःख सांगत नाही कुणाला.. " विहान.
" तू काय बोलतो आहेस? मला काहीही समजलं नाही.. " स्टेला म्हणाली .
" तू जास्त विचार नको करुस.. आधी तू बरी हो.. " विहान
" मी बरीच आहे..!" स्टेला .
" हे तू नाही.. डॉक्टरांनी सांगायला हवं.. " विहान.
" मी ग्रुम बनेल.. तूझ्या हातात हात देऊन तूझ्या सोबतीने चालेल.. तू ब्राईड.. किती सुंदर दृष्य असेल.. " स्टेला म्हणाली .
" त्यासाठी ठणठणीत बरी हो.. मग आपण करु .. कारण तू बरी होईपर्यंत शक्य नाही.. " विहान म्हणाला.
" तुझं लग्न झालं होतं.. त्याचं काय झालं? " स्टेलाने विचारलं.
" सारं खरं खरं सांगेन.. पण आत्ता नाही.. " विहान म्हणाला.

मानसीचे दिवस भरत आले होते.. तिला कधीही दवाखान्यात न्यावं लागेल हया चिंतेत विहान होता..
" मनू.. चेहेरा बघ किती सुकलाय.. तूला त्रास होतोय का? " विहान म्हणाला.
" विहू.. हया दिवसात असं होतंच असतं.. मी आहे ना काळजी करायला.. " आई म्हणाली.
" स्टेला कुठंय ? तिला बघून या.. " मानसी विहानला म्हणाली.
" तिला गोळ्या दिल्यात.. ती झोपलीय.. " विहान म्हणाला.
" बरं तू आहेस ना हिच्याजवळ.. मी हिच्यासाठी खायला बनवते.. " आई म्हणाली अन किचनमध्ये गेली.
" मनू.. तूला जास्त त्रास होतोय का? " विहानने विचारले.
" थोडासा.. पण आपल्या बाळाचा चेहेरा पहाताच सारं विसरायला होईल. " मानसी म्हणाली.
विहानने तिला आपल्या मिठीत घेतलं.. ती त्याच्या मिठीत विसवली.
" हे काय चालू आहे? डार्लिंग यू आर चीटिंग मी.. तू अन हि.. दोघे.. " आत येतं स्टेला किंचाळली .
तिच्या आवाजाने दोघे विलग झाले.. मानसीचा चेहेरा अनामिक भीतीने भरुन गेला.
" तू समजतेस तसं काहीही नाहीये.." विहान त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला.
" कुणाला फसवतो आहेस विहान.. मला की स्वतःला? का आम्हां दोघांना.. " रोमील म्हणाला.
" तू शांत हो बेबी .. मी सारं सांगतो तूला..!" विहान.
" आता सांगण्यासारखं काय राहिलंय.. माझं आजारपण.. त्याचा फायदा घेऊन.. तूला माझी वाट पहावीशी नाही वाटली ? मी मात्र तुझ्याकडे धावत आले .. " स्टेला .
" प्लिज मला माफ कर.. हयात विहानची काहीही चूक नाही.. मीच.. " मानसीने बोलण्याचा प्रयत्न केला.
" एक मिनिटं.. मी तुझ्याशी बोलत नाहीये.. आमच्या दोघांत बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही. " स्टेला .
हा गोंधळ ऐकुन आई बाहेर आली.. ती त्वेशाने समोर आली..
" काय बोलते आहेस पोरी .. ती बायको आहे त्याची.. तिचे उपकार मान.. आज तू विहानच्या बेडरुम मध्ये आहेस.. अन ती इथे.. " आई म्हणाली.
" आई.. तू मनूला घेऊन जा इथून.. मी बोलतो तिच्याशी.. " विहान म्हणाला.
" काय बोलणार माझ्याशी? तू फसवलंस मला.. " स्टेला म्हणाली अन धावत रुमाच्या बाहेर पळाली .. तिच्या पाठोपाठ विहान धावला.
" हे एक ना एक दिवस होणारच होतं.. एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत.. तिला जावंच लागणार.. हया घरातून.. " आई म्हणाली.
बाहेरुन विहानचा ओरडण्याचा आवाज ऐकुन त्या दोघी बाहेर आल्या.. समोरच दृष्य पाहून त्या गर्भगळीत झाल्या..
समोर स्टेला शुद्ध हरपून पडली होती .. विहान तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता..
" ज्याची भीती होती तेच घडलं.. ह्यासाठीच मी हिला दूर नेऊ लागलो.. " विहान म्हणाला.
" अहो.. हे बोलतं बसण्याची वेळ नाहीये... आधी डॉकटरला बोलवा. " मानसी म्हणाली.
विहानने डॉक्टरांना फोन लावला.. स्टेलाला उचलून बेडवर झोपवलं.

डॉक्टर स्टेलाला तपासत होते.. ती अजून शुद्धीवर आलेली नव्हती ..
" गोळ्या घेतल्या नव्हत्या का? " डॉक्टरांनी विचारलं.
" मी स्वतः देत होतो.. " विहान म्हणाला.
" नाही.. मेडिसिन घेतलं असतं तर हायपर झालीच नसती .. काही घडलंय का? " त्यांनी विचारलं.
विहानने घडलेला सारा प्रसंग सांगितला..
" हिला हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करावं लागेल.. तिला शॉक बसलाय.. " डॉक्टर म्हणाले. ऍम्ब्युलन्स बोलावण्यात आली.. त्यात स्टेलाला घेऊन विहान दवाखान्यात गेला.
घरी आई अन मानसी त्याच्या येण्याची वाट पहात होत्या..
बऱ्याच वेळानंतर विहान वापस आला.. त्याच्या चेहऱ्यावर निराशा, दुःख दिसून येतं होत.
"कशी आहे स्टेला ? काय म्हणाले डॉक्टर? " मानसीने विचारले.
" ती परत.. " विहान रडायला लागला.
" माझंचं चुकलं.. मी तुमच्याकडे हट्ट केला नसता तर.. " मानसी म्हणाली.
" सुनबाई.. आता कसलाच विचार करु नकोस.. हया अवस्थेत तू टेन्शन घ्यायला नको.. विहान.. सांभाळ स्वतःला.. तुझ्यावर दोन जीव अवलंबून आहेत.. मानसीकडे बघ.. " आई म्हणाली.
विहान रडायचा थांबला.. त्याने मानसीला मिठी मारली..
" तूझा काहीही दोष नाहीये मनू.. तुझ्याकडून तू चांगलंच करण्याचा प्रयत्न केलास.. माझंच नशीब.. दुसरं काय? " विहान म्हणाला.
" आता कशी आहे ती ? " आईने विचारले.
" जास्तच हायपर झालीय.. सारा दवाखाना डोक्यावर घेतला होता.. तिची अवस्था बघवत नव्हती.. " विहान सुन्नपणे म्हणाला..
हवालदिल झालेली मानसी.. विहानला कसा आधार दयायचा याचा विचार करत होती.. आईने विहानच्या केसांतून हात फिरवला...

|| क्रमशः ||