Padchhaya - 6 books and stories free download online pdf in Marathi

पडछाया - भाग - ६ - अंतिम भाग



रविवारची सकाळ.. आई तयार झाली.. तिने डब्यात शिरा करुन घेतला.. थर्मासमध्ये कॉफी बनवून घेतली.. बैठकीत येऊन घड्याळ पाहिले.. सकाळचे दहा वाजून गेले होते.. इतक्यात मोबाईल वाजला...
" अभिनंदन आई.. तू आजी झाली आहेस.. मुलगी झालीये.. दोघीही सुखरुप आहेत.. " पलीकडून विहान बोलतं होता.
" छान झालं.. मी निघतेच आहे.. येताना काही आणायचं असलं तर सांग?.. " आई आनंदात म्हणाली.
" काही नको.. तू ये लवकर.. तुझ्या नातीने आजीचा धोसरा लावला आहे.. " विहान म्हणाला.
आईने कॉल कट केला.. आत जावून हॉटपॉट मध्ये शिरा भरला.. आणि तो घेऊन ती बाहेर आली, दाराला कुलूप लावले अन बाहेर पडली.. टॅक्सी करुन ती दवाखान्यात आली. ती नाव नोंदवून स्टेलाच्या रुममध्ये आली.. स्टेला खिडकीतून आकाशाकडे पहात होती .. आईने दरवाजा बंद केला.. ती हळूच स्टेला जवळ गेली अन तिच्या खांद्यावर हात ठेवला.. ती अनोळखी नजरेने आईकडे पाहू लागली .
आईने पिशवीतून डबा काढून घेतला.. झाकण उघडून त्यातील चमचाभर शिरा तिला भरवला..
" अभिनंदन तूझ्या विहान,मानसीला मुलगी झाली.. " आई.
हे ऐकुन तिचे डोळे चमकले.. तिच्या नजरेतून आनंद व्यक्त होऊ लागला.
" घे.. स्वतःच्या हाताने खा.. " आई डबा पुढे करत म्हणाली.
तिने तो डबा उचलला आणि खाली फेकणारं इतक्यात आईने तिचा हात पकडला.. हातातून डबा सोडवून घेतला.
आपल्या हाताने तिला भरवू लागली..
" बाळा.. माझ्यासमोर नाटकं करायची गरज नाही.. " आई.
" तूला गं कसं कळलं.. " स्टेला म्हणाली .
" मी आई आहे.. तूला जन्म दिला नाही म्हणून काय झालं.. आईच्या नजरेतून काही सुटत नाही. " आई म्हणाली.
" मला कुणालाही कळू द्यायचं नव्हतं गं.. अगदी तुलाही नाही.. " स्टेला म्हणाली .
" तू आमच्या सोबत पण राहू शकली असतीस ? मग हे वेडाच नाटकं? " आईने विचारलं.
" आई मी विहानला आधीच कबूल केलं होतं.. त्याचं लग्न झालं की मी दूर कुठे निघून जाईन...पण त्याच्या हट्टपुढे कमजोर पडले ... मी तेव्हाच निघून गेले असते तर.. " स्टेला म्हणाली.
" माझी चूक झाली बाळा.. मला मानसीच्या त्यागाबद्दल माहितच नव्हतं.. मला वाटलं तू विहानला सोडून जायला तयार नव्हतीस म्हणून माझी सून निघून गेली.. तेव्हा आधी मानसीला बोलले असते तर.. तुझ्यावर आरोप केले नसते..माझ्यामूळे तूझ्या डोक्यावर परिणाम झाला.. मला माफ कर.. " आई म्हणाली.
" नाही आई त्यात तुमचा काय दोष.. तुमच्याजागी मी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं.. " स्टेला म्हणाली .
" पण आता तर सारं सुरळीत झालंय.. सुनबाईने सुद्धा तूला स्वीकारलंय.. मग आता का? सारे एकत्रित आलो असताना तूला सर्व सोडून का यावं वाटलं ?.. " आईने विचारलं.
" आई.. लग्न झाल्यावर आलेला विहान पूर्णपणे माझ्यात गुंतलेला होता.. तेव्हा त्याला सोडून गेले असते तर कदाचित तो मानसीच्या इतका जवळ गेला नसता. कदाचित हेच कारण असेल, माझ्या मनात दूर जायचा विचार आला नाही. पण आता मी परतले तेव्हा विहान पूर्णपणे मानसीचा झाला होता.. तूला सांगते त्याच्या मिठीत गेल्यावर मला जाणवले.. की तो माझा राहिला नाही. पण तो माझी काळजी घेऊ लागला.. पण पूर्वीसारखी ओढ त्याच्याकडुन जाणवत नव्हती.. रात्री माझा डोळा लागला.. सकाळी तो बेडवर, रुममध्ये नव्हता.. मी दुर्लक्ष केलं.. मानसी अन तो.. दोघे दाखवत नसले तरी त्यांच्यात असणारी ओढ, त्यांच्या डोळ्यात एकमेकांविषयी असणारं प्रेम दिसतं होतं. पण दोघेही मान्य करत नव्हते. एक दिवस मी गोळी घेतलीच नाही.. मी झोपले समजून विहान रुम मधून बाहेर पडला.. मी त्याचा पाठलाग केला.. तो मानसीच्या रुममध्ये शिरला.. दरवाजा बंद झाला..त्या क्षणी मला खूप राग आला.. मी रुममध्ये येऊन गोळी घेऊन झोपले . त्या दिवशी कॉफी घेऊन गेले अन दोघांचं बोलणं ऐकलं.. दोघेही माझ्यासाठी प्रेमाला लपवत होते, वेळप्रसंगी ते एकमेकांपासून दूर जायला तयार होते. माझा राग निवळला.. पूर्वीच सारं आठवलं.. मानसी अन त्याचं झालेलं लग्न.. आमच्या प्रेमासाठी बाजूला झालेली मानसी.. मी विहानकडून वचन घेतलं.. तो मानसीला तिचा हक्क, अधिकार सर्व देईन.. पण ती निघून गेलीच.. मग मला अपराध केल्यासारखं वाटू लागलं.. अन तूम्ही आलात .. तुमचं बोलणं ऐकुन मी खूप सैरभैर झाले .. हा ताण माझा मेंदू सहन करु शकला नाही.. " स्टेला बोलता बोलता शांत झाली .
" पण आता का असं केलंस.. तू माझी मुलगी बनून, मानसीची बहीण बनून राहू शकतेस . तसही मानसी विहूची सावली न बनता पडछाया बनली आहे.. विहूच्या प्रियसीची छाया. " आई म्हणाली.
" शॅडो.. पण शॅडो तर स्वतःची असते? " स्टेलाने विचारले.
" हिंदू संस्कृतीत बायकोला नवऱ्याची सावली समजतात.. पण मानसीने तूला ती सावली मानलंय अन तुझी सावली स्वतःला मानते.. दुसऱ्याची सावली.. छाया.. पडछाया.. " आई म्हणाली.
स्टेला दोन सेकंद स्तब्ध झाली.. अन पुढे बोलायला लागली.
" माझ्या येण्याने मानसीने आपली बेडरुम सोडली.. मुळात विहानने असं करायला नको होतं.. नेहमी साथ देण्याचं वचन दिलं होतं.. आणि विहान देखील अपराधी भावनेने आमचं नातं, त्याचं ओझं घेऊन वावरु लागला.. त्याची फरफट माझ्याच्याने पहावत नव्हती. मी सांगून मानसी अन विहान ऐकले नसते. शेवटी हाच उपाय माझ्या मनात आला.. मी इथे आले तर दोघे हळूहळू पूर्वीसारखे वागू लागतील. " स्टेला म्हणाली .
" पण बाळा.. स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन तूला काय भेटलं? विरह.. एकाकी जीवन अन.. " आईने डोळ्याला पदर लावला.
" मला आई मिळाली, मानसी सारखी बहीण मिळाली.. विहानच असणारं प्रेम.. हया शिदोरीवर मी आयुष्य काढू शकतो.. " स्टेला म्हणाली .
" पण तू वेडा नाहीस हे डॉक्टरना माहित झाल्यावर.. " आई म्हणाली.
" मला पूर्ण कल्पना आहे आईसाहेब..! तिने सारी कल्पना आधीच दिली होती.. मी जर मदत नसती केली तर ती काहीही करेल.. अगदी आत्महत्या सुद्धा.. म्हणून हिला मदत केली.. काही दिवसात हिला बाहेर पाठवून देईन.. " डॉक्टर आत येतं म्हणाले.
" तू काय करशील बेटा?.. या आईला सतत तुझी काळजी लागलेली असेल. " आई तिच्या चेहेऱ्यावर हात फिरवत म्हणाली.
" मी आता हे जीवन प्रभू येशूच्या सेवेत घालवायचं ठरवलं आहे.. मिशनरी इन्स्टिट्यूट मध्ये भरती होईल.. कदाचित नन, मदर होईन.. " स्टेला म्हणाली .
" संन्यासी होणार? नको बेटा .. तूला जोडीदार मिळेलच.. आणि मी आहे की.. आपण दोघे राहू.. त्याला करु दे त्याचा संसार.. पण तू विरक्त होऊ नकोस.. " आई डोळ्यांना पदर लावत म्हणाली.
" ठरलं.. मी स्टेबल झालो की तूला घेऊन जाणारं.. " स्टेला म्हणाली .
आईने मायेने तिच्या डोक्यावरुन, चेहऱ्यावरुन मायचं हात फिरवला अन घट्ट मिठी मारली.
" अजून एक विनंती.. तुमची आठवण आली तर फोन करेन.. पण तूम्ही परत इकडे येऊ नका .. विहानला संशय येईल. आणि त्यांच्या प्रेमाच्या पाशात अडकायचं नाही मला. " स्टेला म्हणाली .
तिचा निरोप घेऊन आई आपल्या नातीला बघायला निघाली.

आईला पाहून विहान लगबगीने तिच्या जवळ गेला.. तिच्या हातातील पिशवी घेऊन तो तिच्या सोबत रुममध्ये गेला.
" कशी आहेस बाळा? " आई मानसी जवळ बसत म्हणाली.
" मी ठिक आहे आई.. हिचा चेहेरा बघून.. कुशीत घेऊन सारा त्रास, दुखणं विसरले. " चेहऱ्यावर हसू आणत मानसी म्हणाली.
" खूप त्रास झाला आई..! मी तर घाबरलो होतो. " विहान.
" आईपण असचं मिळतं नसतं विहू.. स्त्रीचा दुसरा जन्म असतो.. हया क्षणात तू तिच्या सोबत होतास.. असचं प्रेम करा एकमेकांवर.. " आई म्हणाली.
आईने त्या चिमुर्डीला मांडीवर घेतलं.. तिला पाहून ती आनंदून गेली.
" रंग आईचा घेतलाय.. चेहरा.. नाक मात्र बापासारखं आहे.. भाग्यवान आहे हो माझी नातं.. म्हणतात ना मुलगी असावी पितृमुखी.. मुलगा असावा मातृमुखी.. " आई म्हणाली.
" आई.. स्टेला ..? " मानसी म्हणाली.
" आता तू फक्त आराम कर बाई माझी.. कुठलंही टेन्शन.. काळजी करायची नाही.. " आई म्हणाली..
विहान आपल्या छकुलीला घेऊन बसला होता.. त्यांना पाहून मानसी आनंदली होती..
आई मात्र आपल्या मानसकन्येच्या.. स्टेलाच्या विचारत गढून गेली..
" स्टेला .. तू सुखी रहा बाळा.. " तिने मनोमन आशीर्वाद दिला.

|| समाप्त ||

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED