श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 1 Chandrakant Pawar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 1

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा उर्फ विठ्ठल अर्थात विठू माऊली थोर आद्य समाज सेवक आहे. भगवंत विठ्ठलाने भक्त किंवा वारकरी यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांची जात पाहिली नाही. त्यांचा धर्म पाहिला नाही. त्यांचे रंग रूप पाहीले नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली . त्यांना आपल्या चरणाशी त्याने घेतले. अनेकांना तर त्याने कित्येकदा मदत केली. त्यांना उराशी कवटाळून आधार दिला. वारकऱ्यांसोबत पंढरपूरला अनेक धारकरी सुद्धा विठ्ठल दर्शनाला येतात. शेतकरी येतात. लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वजण विठ्ठलाचा आशीर्वाद घ्यायला दरवर्षी येतात. श्री भगवंत विठोबा माऊली सर्वधर्मसमभाव राखणारी आहे.

श्री विठोबाने पुरुष आणि महिला असा कधीच भेदभाव केला नाही अथवा लहान मुले यांचा सुद्धा भेदभाव केला नाही. सगळ्यांना स्वतःच्या अंगाखांद्यावर बसवले. कुणावर कधीही शस्त्र चालवले नाही किंवा कुणाला कधी अस्त्र दाखवले नाही .त्याने युगे अठ्ठावीस आपले हात कटेवरी ठेवले. हात कटेवर ठेवून भक्तांना किंवा त्याच्या मदत मागायला आलेल्या लोकांना त्याने मदत केली .असा हा एकमेवाद्वितीय विठ्ठल मोठा थोर समाजसेवक आणि समाजसुधारक आहे.
इथे विठ्ठल समाज सेवक होता हा शब्द न वापरता. समाज सुधारक आहे. हा शब्द वापरला आहे. याचे कारण तो अजूनही तशीच मदत सगळ्यांना करतो आहे. पंढरीच्या मंदिरातून. दीनदुबळ्या गरीब जनतेला. त्याच्या भक्तांच्या तो हाकेला धावून जात आहे.

ज्या काळामध्ये समाजामध्ये अंधश्रद्धा होती. भेदाभेद होता. जनता नाडलेली होती. अशा काळामध्ये श्री भगवंत विठ्ठलाने समाजाला नेमके मार्गदर्शन केले. समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले. इतकेच नव्हे तर स्वतःच्या चमत्कारीक शक्तीने त्याच्या भक्तांना दैवत्व प्राप्त करून दिले. त्याची भक्ती करणारांना संत पदापर्यंत येऊन ठेवले.त्याच्यापाशी जे जे संत आले त्या सर्व संतांना त्यांने अमर केले. ज्या समाजाने काही संताना नाकारले. त्या संतांना स्वत:पाशी विलीन केले. लीन केले. त्यांना स्वतःच्या हृदयात स्थान दिले. त्यांना स्वतःच्या चरणात सामावून घेतले.

त्यामध्ये कान्होपात्रा, मीराबाई ,संत नामदेव यांना त्याने आपल्यापाशी ठेवले.
श्री विठ्ठल अहिंसावादी होते. त्याने हिंसा टाळली. अहिंसेचा कास धरली. स्वतः श्री विठ्ठल, भगवान श्रीकृष्ण यांचा मिलाफ एकत्र झालेल्या महाशक्तीचा महास्त्रोत एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. भगवंत श्रीविठ्ठलाच्या ठायी...

परकीय शक्तींच्या आक्रमणात इस्लाम धर्मातील धर्मांधतेच्या प्रखर आक्रमणात समाजाला एकसंध बांधण्याचे समाज कार्य विठोबा माउलीने केले. समाजाला प्रबोधन दिले. स्वतः ईश्वराचा अवतार असून त्यांनी समाजसेवा केली. भगवंताचा अवतार असून त्याने समाजाचे प्रबोधन केले. या गोष्टीने असामान्य कार्य करणाऱ्या त्याकाळच्या परिस्थितीमध्ये संकटाला तोंड देणाऱ्या लोकांसाठी तो एक आशेचा किरण होता.

मराठी आषाढ महिन्यात दरवर्षी येणारी आषाढी एकादशी आणि शेतकऱ्यांचा राजा बळीराजा याच्या निर्वाणाचा दिवस एकच आहे. बळीराजाच्या निर्वणाचे कारण वेगळे असले तरी त्याचा सुक्ष्म संबंध आषाढी एकादशीच्या दिवसाशी आहे. या दिवशी महाराष्ट्रातील लाखो वारकरी व शेतकरी भक्त श्री विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. वेगवेगळ्या प्रदेशातून पंढरपूरला दिंड्या पताका , पालखी येतात. त्यासाठी त्यांना कुणाच्या आमंत्रणाची गरज भासत नाही. ठरलेल्या दिवशी पायी चालत पंढरपूरची वारी करणारे शेतकरी बांधव एका ईश्वरी धाग्याने एकमेकाशी बांधलेले आहेत. श्री विठ्ठल शेतकऱ्यांचा दैवत आहे. श्री विठोबा माऊली शेतकऱ्यांची माऊली आहे. भगवान विठ्ठल रुख्माई दोघे उभयता महाराष्ट्राची सावली आहे. सर्वसामान्य जनतेची भक्ती विठ्ठल रुक्माईच्या चरणी अर्पण होते.

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, इतर संत मंडळी अशी पायऱ्या पायऱ्यांची माळ विठ्ठलाच्या गळ्यामध्ये आहे. रुक्मिणी मातेच्या चरणाशी आहे. रुक्मिणी मातेच्या पदराचा ओलावा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व स्त्री-पुरुषांच्या दुःखासाठी आणि अश्रूसाठी मायेचा पदर आहे. पंढरपूरमध्ये युगे युगे अठ्ठावीस.

पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर अनेक पायऱ्या आहेत. पहिली पायरी ही पंढरपूरच्या विठ्ठलाचा आवडता भक्त पुंडलिक याची आहे. स्वतः या माय बापाची सेवा करताना पुंडलिकाच्या भेटीला भगवान विठोबा आले.

तेव्हा पुंडलिक म्हणाले.
थांबा विठ्ठल राया तुम्ही तिथेच थांबा. तुम्हाला उभे राहायला ही वीट घ्या.
त्या विटेवर भगवान विठ्ठल कमरेवर हात ठेवून, तोल सावरत त्या विटेवर उभे राहिले . स्वतःच्या माऊली पित्याची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला त्याचे भान राहिले नाही. जेव्हा त्यांची सेवा करून भक्त पुंडलिक उठला . तेव्हा त्याच्या लक्षात आले आपल्या दरवाजाच्या समोरच श्री विठ्ठल रुक्माई विटेवर आपल्या शरीराचा तोल सावरीत कमरेवर हात ठेवून उभे आहेत. तेव्हा त्याला खूपच वाईट वाटले. पश्चाताप झाला. त्याने त्याची माफी मागितली. अशी कथा सांगितली जाते. अशी भक्ती आपल्या भक्ताच्या साठी देणारे भगवंत विठ्ठल रुक्माई थोर आहेत.

विठ्ठलाच्या भक्तीसाठी संत मंडळी सुद्धा एका पेक्षा एक वरचढ आहेत. त्यामध्ये चोखामेळा आहे ,सेना महाराज आहे, सावता माळी आहे. संत सखुबाई आहे. गोरा कुंभार आहे. वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारी संत मंडळी विठ्ठलाच्या ठायी लीन झाले आहेत.

त्यांचे भक्त त्याची मनोभावे इतकी सेवा करतात की गोराकुंभार विठ्ठलाचे नाम जप करताना स्वतःच्या मुलाचा चिखलामध्ये पायाने तुडवून मृत्यू घडवून आणतो . तोच विठुराया गोरा कुंभाराचा मुलाला जीवनदान देतो....

संत सखुबाई जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला गेली . तिच्या घरापासून पंढरपूर खूपच लांब होतो . तिच्या पंढरपूरला जाण्यायेण्या यामध्ये दोन तीन महिन्याचा काळ गेला . त्यामुळे घरच्यांनी तिचा छळ केला. घरच्यांनी तिला घरातून बाहेर काढले. मात्र श्री विठ्ठलाने तिची सेवा धन्य मांडली आणि तिला त्याच्यासोबत अमर केली.

संत कान्होपात्रा एका वेश्येची मुलगी होती. तिच्या सौंदर्यामुळे तिला पकडून नेण्यासाठी जेव्हा मुसलमानी राजा आला. तिला पकडून त्याच्या सरदाराने न्यायला सुरुवात केली. तेव्हा तिने त्याला सांगितले माझ्या विठ्ठलाचे दर्शन मला करु द्या. ती पंढरपूरच्या विठोबा मंदिरात गेली आणि तिथेच विठ्ठलाच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्याच्याशी लीन झाली. मुसलमानी सैनिक तिचा शोध घेत होते .परंतु देवळात शिरलेली कान्होपात्रा बाहेर पडताना कोणी पाहिली नव्हती. ती कुठे गेली कळायला मार्ग नव्हता. मात्र ती विठ्ठलाशी लीन झाली. विठ्ठला मध्ये सामावून गेली. असे जेव्हा समजले तेव्हा मुसलमानी सैनिक सुद्धा स्तंभित झाले. मुसलमानी सेनेने पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराच्या अवतीभोवती खूप शोध घेतला. परंतु कान्होपात्रा कोणालाच सापडली नाही. इतकी जिवंत भक्ती तीची विठ्ठलाच्या जवळ होती. आपल्या भक्तावर संकट आले की त्याच्या मदतीला धावून जाणारा विठ्ठल खरोखरच ग्रेट होता. ग्रेट... त्या काळच्या काळामध्ये विठ्ठल हे नाव नव्हते . तर एक आधारवड होता.


ज्यावेळी दोन वारकरी एकमेकाला भेटतात तेव्हा.
राम कृष्ण हरी असा गजर करतात. '' राम कृष्ण हरी "
हा मंत्र जगद्गुरू तुकोबारायांनी वारकरी जनतेला दिलेला महाशब्द आहे. तुकोबारायांना सुद्धा सालो-मालो हा नकली कवी त्रास देत होता. तुकोबारायांचे अभंग चोरून तो स्वतःच्या नावाने लोकांना सांगायचा. त्या काळच्या प्रस्थापितांनी तुकारामांची अभंगगाथा पाण्यात बुडवली .परंतु चमत्काराने तुकारामाची गाथा जनतेत अमर झाली. याचे कारण एकच संत तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त होते. त्यांच्या मुखी एकच नाम होते. विठ्ठल ...विठ्ठल... विठ्ठल...
विठ्ठल भक्ती मध्ये संत तुकाराम इतके तल्लीन झाले की त्यांनी आपल्या जवळील असलेली श्रीमंती उधळून टाकली . गरीब होऊन ते जगले. संत तुकाराम यांचे स्वतःच्या मालकीचे विठ्ठल मंदिर होते. ते देहू गावात राहत होते. तिथल्या एका डोंगरात अभंग रचत असत. त्यांची पत्नी त्यांना विठ्ठलाच्या भक्तीसाठी वाईट बोलत असे.

परंतु आपले धनी जेवले नाहीत. उपाशी आहेत या चिंतेने ती त्यांना भाकर नेऊन द्यायची . संत तुकाराम जोपर्यंत जेवत नसत तोपर्यंत ती अन्नप्राशन करत नव्हती. तिच्या स्वभावातला हा विरोधाभास खूपच मतिमंद करणारा होता. संत तुकाराम समाज प्रबोधन करीत होते हे त्यांच्या अभंगातून त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या लेखी अंधश्रद्धेला थारा नव्हता. संत तुकारामांनी शतकोटी अभंग लिहिले होते. परंतु त्यांचे फक्त चारहजार अभंग सध्या अभंग गाथेमध्ये आहेत. बाकीचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यामध्ये वाहून गेले असावेत. किंवा त्या काळच्या नतद्रष्टांनी नष्ट केले असावेत. मात्र इतके होऊनसुद्धा संत तुकारामांचे अभंग जनतेच्या तोंडी चपलखपणे बसले. त्यांना त्रास देणाऱ्या लोकांना सामाजिक अभंगाद्वारे त्यांनी मोठी चपराक दिली.
चंद्रभागा आणि इंद्रायणी,भीमा या नद्यांनी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी स्वतःचे पाणी वारकरी संप्रदायाला पिण्यास दिले. त्या पाण्याच्या शक्तीवर असंख्य वारकरी मंडळी भक्त विठोबाच्या दर्शनाला न चुकता दरवर्षी पंढरीच्या वाटेवर येतात.
कोटी कोटी जनतेचा अध्यात्मिक गुरू श्री विठ्ठल आहे.

संत कबीर ,संत जनाबाई, एकनाथ महाराज, नरहरी सोनार, शेख मंहमद, जयदास, ज्ञानदेव ज्ञानेश्वर, मुक्ताबाई. संत विसोबा खेचर... अशी विविध संतमंडळी श्रीविठ्ठलाच्या सानिध्याने महान बनली.
संत कुर्मदास त्यापैकीच एक होते. ते जन्मताच दिव्यांग होते. त्यांना दोन हात आणि दोन पाय नव्हते. त्यांची लहानपणापासून तल्लख बुद्धी होती.दिव्य स्मरणशक्ती होती .त्यांना श्लोक, स्तोत्र, अभंग तोंडपाठ होते. त्यांची बुद्धिमत्ता बघून सर्व लोकांना आश्चर्य वाटे. त्यांची भक्ती हळूहळू फुलत होती. किर्तनाला जाण्याचे नेम ते कधीही चुकवत नसत.

कुर्मदासांना पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनला जायचे होते. पण जाणार कसे. त्यांना नेणार कोण? त्यांनी काही जणांच्या समोर त्यांच्या मनातला हेतू बोलून दाखवला. ते ऐकून त्यांना माणसे चिडवू लागले ‌ तुम्ही कसे जाणार.. तुम्ही तर असे आहात. ते त्यांना हिणवू लागले. मात्र कुर्मदास यांच्या मनात श्रद्धा असल्यामुळे ते निश्चिंत होते .त्याला वाटत होते .पांडुरंग त्यांना निश्चितच पंढरपूरला घेऊन जाईल. पांडुरंगावर त्यांची अगाध श्रद्धा होती. तोच आपला तारणहार आहे .याची त्यांना खात्री होती.

दुसऱ्या दिवशी पहाटेला पंढरपूरला जाण्यासाठी कुर्मदास निघाले. लोकांना आश्चर्य वाटले. सर्व जण त्यांची टवाळी करू लागले .परंतु त्यांचे काहीएक वाटत नव्हते .लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता पंढरीच्या वाटेवरून जाण्याचा निश्चय केला. त्यांचा प्रवास चालू होता .आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचायचे होते .पंढरपूर सोहळा अनुभवायचा होता. पांडुरंगाचे दर्शन अंतःकरणात भरून घ्यायचे होते. एकादशी आली तरी ते अंतर कमी होत नव्हते . त्यांनी देवाची प्रार्थना केली. पांडुरंगा तुझ्या भेटीसाठी मी आलो आहे. मला तुझ्या भेटीसाठी यायचे आहे. मला आता तुझा आधार दे... त्यांची धाव ऐकुन विठोबा खिस्ती नावाच्या व्यक्तीने त्यांना मदत केली.
ते म्हणाले मी विठ्ठलाच्या दर्शनाला चाललो आहे. तुझा निरोप मी विठ्ठलाला देईल...
कुर्मदासांनी पंढरीच्या वाटेवरून जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि विठोबा खिस्तीकडे त्यांचा स्वतःचा निरोप विठ्ठलाला दिला. ते तिथेच थांबले. मात्र आषाढी एकादशीला त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. स्वतः विठोबा खिस्ती म्हणजेच साक्षात पांडुरंग होते...

सावता माळी श्रेष्ठ संत होते आपला जन्म एका माळ्याच्या घरात झाला याबद्दल त्यांना कधीच वाईट वाटले नाही. उलट ते देवाचे आभार मानतात .संत तुकाराम म्हणतात. बरं झालं देवा मला कुणबी केलो. त्याप्रमाणे सावतामाळी म्हणतात.
माळी झालो म्हणून बरं झालं .जर माझा जन्म उच्च कुळामध्ये झाला असता तर मला विठ्ठलाच्या भक्तीचा अर्थ कधीच कळला नसता. ते आपल्या अभंगात म्हणतात

भली केली हीन याती
नाही वाढली मंहती
सावता म्हणे हीन याती
कृपा करावी श्रीपती

संतानी जरी प्रपंच टाकून परमार्थ साधावा अशी शिकवण दिली. तरी संतमंडळी स्वतः संसारात रमली नाहीत. गुरफटले नाहीत. सावता महाराज पंचेचाळीस वर्षाचे समृद्ध आयुष्य जगले ४५ व्या वर्षी त्यांना परमात्म्याशी एकरूप व्हायचे वेध लागले त्यांनी आपला देह पांडुरंग चरणी समर्पित केला. आषाढी महिन्यात ते पांडुरंग चरणी विलीन झाले.

संत सावता माळी यांनी पिकांना पाणी देताना गोठा साफ करताना, शेतीतील कामे करताना, विठ्ठलाच्या नामस्मरणात कधी खंड पडला नाही. दिवसभर मळ्यात राहून सुद्धा त्यांना थकवा कधी आला नाही. रात्री झोपता ते विठ्ठलाचे नामस्मरण केल्या शिवाय झोपत नसत. पंढरपूरला ते नित्यनेमाने जात. पंढरपूरला चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यात त्यांचा खंड पडला नाही. पांडुरंगाच्या सावळ्या गोजिर्‍या रूपाच्या दर्शनाचा नेम कधी त्यांनी चुकवला नाही.

भक्तिमार्गाचा अवलंब करताना कोण श्रेष्ठ आहे. हा प्रश्न निरर्थक आहे. आपण भक्ती कशी करतो याला जास्त महत्त्व आहे. विठ्ठल भावाचा भुकेला असतो. तो जात-पात-धर्म कुळ असा भेदभाव करीत नाही .त्याच्या ठिकाणी त्याचे सर्व भक्त सारखे असतात. ज्या काळी जनतेला खरा भक्तीचा अर्थ माहित नव्हता .त्याकाळी पांडुरंगाने रामकृष्णहरी या नामस्मरणाचा सर्वात साधा सरळ मार्ग भक्तीचा मार्ग संतांच्या मार्फत जनतेच्या मनात रुजवला. त्यासाठी संतांनी अतोनात मेहनत घेतली . ज्या काळामध्ये कडक व्रतवैकल्य उपास-तापास, यज्ञ कर्मकांड करावे अशी ज्यांची समजूत झाली होती अशा काळातल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना विठ्ठल महत्व पटू लागले होते.