Vithoba of Shri Kshetra Pandharpur - 5 books and stories free download online pdf in Marathi

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 5

संत कबीरां प्रमाणे इस्लामी संत शेख महंमद सुद्धा विठ्ठलाचे भक्त होते. हे मागे सांगितले आहे.

शेख महंमद यांचे भजन ऐकण्यासारखे आहे.

देवावरी कां रुसावे। देव ठेवील तैसे रहावे।। १।।
कोणी दिवशी खावी तूपसाखर । कोणे दिवशी मिठासंगे भाकर।
खाऊन पिऊन बसावे।शेख महंमद म्हणे रे बापा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।।

विठोबा माऊलीला भाषेचे, धर्माचे, जातीचे, सीमेचे कसलेही वावडे नव्हते . विठू माऊली सर्वांना समान मानते. सारी लेकुरे विठ्ठलाची पोरे.
विठ्ठलाची शिकवण थोर वैचारीक होती .

संत मीराबाईची श्रीकृष्णावर खूपच भक्ती होती. ती त्याला म्हणायची मी तुमची चाकरी करन. तुम्ही मला आपली दासी म्हणून ठेवा. तुमच्या बागेची मी काळजी घेईन. सकाळी उठून तुमचे दर्शन घेईन. तुम्हाला ताजी फुले वाहीन. तुमचे गुणगान करीन. तुमचे स्मरण हेच माझे वेतन .मला आणखी काही नको. मला तुमच्या भक्तीची जहागीर द्या. त्या जागिरी मध्ये मी मरेपर्यंत आनंदाने राहील. तुमच्या दर्शनास मी रोज येईल .तुमच्या चरणाशी मला जागा द्या...
संत मीराबाईची भक्ती निस्सीम होती. तिचे नाते कट्टर भक्तीचे होते. संत मीरेचे आडनाव राठोड होते. जय मल्हार राठोड मीरेचा चुलत भाऊ होता. मीराने मेवाड सोडल्यानंतर मेवाडात काही काळ अंदाधुंदी माजली. बहादूरशहाने चितोडगडावर स्वारी केली. त्यामध्ये खूपच मनुष्यहानी झाली. श्रीहरीचे गुणगान करीत मिरा मथुरा आणि गोकुळ याठिकाणी जीवन व्यतीत करीत होती. मीरा महाप्रभू चैतन्याच्या संप्रदायातील होती. मिरीला द्वारकेतील रणछोडदासची मूर्ती अतिशय आवडली त्या रूपातच मीरा विलीन झाली.

संत मीराबाईंचे गुरु संत रोहिदास महाराज होते. संत रोहिदास महाराज जातीयता मानत नव्हते. संत रोहिदास यांच्या उपदेशामुळे आईवडिलांची सेवा देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे लोकांना कळले. रोहिदास यांना लहानपणापासून विठ्ठलाचे वेड होते आणि त्यांना त्यांचा व्यवसाय शिकवला .परंतु त्यांचे लक्ष नामस्मरणात होते. साधू संतांची सेवा करणे, भजन-कीर्तन करणे यातच ते दंग असत .
त्यांची पत्नी सुद्धा त्यांना देवाच्या भक्तीत मदत करी. प्रथम देवाची पूजा करून नंतर ते आपल्या व्यवसायाला आरंभ करीत. काम करताना ते सतत देवाचे स्मरण करीत .भजन म्हणीत. रोहिदास आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करून त्यांना आनंद देत.
मात्र त्या वेळी पुंडलिक होते. ते पुंडलिक त्याच्या उलट वागत. ते आई-वडिलांना खूप त्रास देत होते .भक्त पुंडलिकाचे जोडे रोहीदासांनी शिवले. परंतु त्यांच्याकडून एक पैसा घेतला नाही. तो पैसा काशीला गेल्यावर गंगा नदीत पुंडलिकाला अर्पण करण्यास सांगितले. भक्त पुंडलिकाने नंतर रोहिदासा प्रमाणे स्वतःच्या आईवडिलांची सेवा केली.
संत रोहिदास व सर्व महान संतांना कोटी कोटी प्रणाम.

संत रोहिदासांच्या वाणीचे रूपांतर श्री गुरू ग्रंथसाहिब मध्ये केलेले आहे. संत रोहिदास यांच्या कडून मीराबाईला खऱ्या देवाची ओळख झाली. संत महिमा अपरंपार आहे हे तिला त्यांच्यामुळे कळले.
.
संत मीरा रणछोडदासच्या पूजेने सर्वस्व विसरून गेली. मेवाडच्या विरम देवाच्या मुलाने जयमलाने मीरेला घेऊन जाण्यासाठी काही लोकांना पाठवले. तेव्हा मीरा म्हणाली. मी रणछोडदासची आज्ञा घेऊन येते .त्यांच्या परवानगीने मी हे मंदिर सोडते . संत मीरा गाभाऱ्यात गेली . रणछोडदासच्या मूर्ती कडे टक लावून पहात राहिली . ती ऊर्जेची मूर्ती पाहून तिचा जीव तृप्त झाला.
ती रणछोडदासला विणवू लागली .तुझ्या हृदयात मला जागा दे .मी आता मागे वळणार नाही. मला तुझ्यात विलीन होऊन दे .तीने अंत:करणापासून केलेली विनवणी रणछोडदासने ऐकली. त्याने मीरेला आपल्यात सामावून घेतले. मीरेच्या जीवनाचा प्याला कृष्ण कृपेच्या अमृताने भरून गेला. तिला हरिकृपेचे अखंड फळे मिळालीत. तिचे जीवन धन्य झाले .मीरा हरी चरणी विलीन झाली . जीवात्मा परमात्म्यात विलीन झाली . तिच्या मृत्यूनंतर पन्नास-साठ वर्षानी तिची गणना श्रेष्ठ संतांमध्ये झाली. संत मीराबाई श्रीकृष्णाच्या प्रेमापोटी राजस्थान सोडून द्वारकेला आली . श्रीकृष्णा रूपात मिसळून गेली....
संत मीराबाई मेवाडचा राजा रतन सिंग यांची मुलगी. मीराबाईचे आई-वडील अध्यात्म मार्गातील होते. साधुसंतांची सेवा करणे, मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणे, असा त्यांचा अध्यात्म मार्ग होता. मीराबाईचा पती युद्धात मारला गेला. तेव्हापासून ती योगिनी सारखी राहू लागली .मीराबाई सर्व लोकांत भजन-कीर्तन करत होती. त्यावेळी स्त्रियांना तशी परवानगी नव्हती .
त्यामुळे तिचा अतिशय छळ झाला. तिच्या दिराने तिला मारण्यासाठी विषाचा प्याला दिला. तो विषाचा प्याला तिच्या ननंदेने मीराला आणून दिला. तो विषाचा प्याला श्रीकृष्णा पुढे तिने ठेवला. आणि कृष्णापर्णमस्तू म्हणून पिऊन टाकला.मीराबाईला पण काहीच झाले नाही....

मीरा के प्रभु गिरिधर नागर। चरणकमल बलहारी


संत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या भगिनी होत्या. मुक्ताबाईंच्या अंगावर वीज पडली आणि मुक्ताबाई नाहीशा झाल्या. संत ज्ञानेश्वरांनी समाधि घेतली. त्यांचे वडील विठ्ठलपंत होते . आईचे नाव रुक्मिणी. त्यांचा साक्षात विठ्ठल रुक्मिणीचा जोडा शोभत होता.

लोकमाता इंद्रायणी नदी छोटीशीच आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगरात उगम पावते.कोकणामधील कार्ला डोंगरा जवळून इंद्रायणी नदीचा प्रवाह वाहतो. कार्ला येथे एकवीरा देवीचे स्थान आहे. एकविरा देवी आगरी कोळी बांधवांची कुलदेवता आहे. एकविरा मातेचा आशीर्वाद इंद्रायणीच्या पाण्यातून सर्वत्र वाहत राहतो आणि भक्तांच्या पर्यंत पोचतो. देहू गावाजवळ वाहताना इंद्रायणी नदीला संतश्रेष्ठ तुकारामाच्या सहवास तिला लाभला. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम इंद्रायणीच्या काठावरचे सुपुत्र होते.
पुणे जिल्ह्यातील दहा बारा किलोमीटर अंतरावर आळंदी गावी नदीकाठी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला.

भगवान श्री विठोबाची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. लिहिता वाचता न येणारा खेडूत ही दिवसभर कष्ट करून थकल्यानंतर रात्री मनशांतीसाठी विठ्ठल भजन करतो आणि विठ्ठल नामस्मरणाने निवांतपणे झोपी जातो समानतेचा संदेश देणारा भागवतधर्म इंद्रायणी काठी वाढला बहरला त्या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वरांनी घातला.

ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना समाजाने खूपच त्रास दिला. ज्ञानेश्वरांना व त्याच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं गेले.
त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता. त्यांनी त्यांचे स्वतःचे नाव चैतन्याश्रम स्वामी ठेवले. त्यांचे गुरु रामानंद स्वामी होते. रामानंद स्वामींच्या सांगण्याने त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम घेतला. विठ्ठलपंत संसारात रमले .त्यामुळ समाजाने त्यांना सांगितले की तू संन्यास घेतला होतास .पुन्हा तू गृहस्थाश्रमी झालास. तुला आम्ही वाळीत टाकत आहोत. तुला आम्ही समाजाबाहेर टाकत आहोत.
विठ्ठलपंतांनी समाजाची खूप मनधरणी केली . परंतु काही उपयोग झाला नाही.

ही गोष्ट त्यांच्या गुरूंना कळली . तेव्हा त्यांनीही विठ्ठलपंतांना विचारले .
संन्यास घेण्यापूर्वी तुझ्या पत्नीची परवानगी घेतली होतीस कां?
विठ्ठल पंत म्हणाले नाही. मी पत्नीची परवानगी घेतली नव्हती.
पत्नीच्या परवानगीने संन्यास घेतला नसेल, तर तू इथे राहू नकोस .त्याना ते म्हणाले. त्यांनी त्याना सांगितले . समाजात परत जा आणि पुन्हा गृहस्थाश्रम कर.
तू संन्यासी म्हणून राहू नकोस कारण तू नियम मोडला आहेस.

त्यांचे वर्तन त्या काळातल्या समाजाच्या पचनी पडले नाही. ते धर्मशास्त्र व समाजाला मान्य झाले नाही. त्यांनी विठ्ठलपंताना त्याला सांगितले तू शुध्दीपत्र घेऊन ये . पैठणला जा आणि ब्राह्मण सभे कडून शुद्धिपत्र घेऊन ये. विविध प्रकारे त्यांना खूपच त्रास होऊ लागला .त्यामुळे ते गावा बाहेर झोपडी बांधून राहिले. त्यांना त्रास देण्यामध्ये विसोबा चाटे उर्फ विसोबा खेचर अग्रणी होते. विसोबा चाटे उर्फ विसोबा खेचर यांनी सर्वांना त्यांच्यावर बहिष्कार टाकायला सांगितले. सर्वजण त्यांना संन्यासाची मुले.. संन्यासाची मुले असे चिडवत. त्यांना कोणी स्पर्श करीत नसे.त्यांना आपल्या घरासमोर थांबू देत नसे. त्यांना कुठेही बसू देत नसे. त्यांच्या मुलांची तोंड पाहणे सुद्धा अशुभ अभद्र मानत. अशा अपमान वेदना सहन करीत सर्वांचे दिवस ढकलणे चालू होते.

आजच्या आधुनिक काळात संन्याशाच्या मुलांना आदराने पाहिले जाते. संन्याशाला देव मानले जाते. खरोखरच काळ बदलला आहे.
त्यानंतर त्र्यंबकेश्वरला ते सर्वजण प्रदक्षिणा घालण्यासाठी पायी निघाले . नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी नाशिक मध्ये आहे. ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो त्रंबकेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे . ते शिव मंदीर बारा ज्योतिर्लिंगा प्रमाणे एक आहे .त्रिंबक म्हणजे तीन डोळे असलेला भगवान शंकर... या पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा मारली. छत्तीस किलोमीटरचे अंतर त्यांनी जंगलातून फिरून प्रदक्षिणा पूर्ण केली. त्याच ठिकाणी निवृत्तीनाथांना सद्गुरु भेटला. साक्षात् गहिनीनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. त्यानंतर निवृत्तीनाथांनी सोपानदेव मुक्ताई यांना गुरुपदेश केला. यावेळी निवृत्त नाथ पंधरा वर्षाचे होते. ज्ञानेश्वर बारा वर्षाचे होते. सोपान दहा वर्षाचे होते.

सर्वात लहान असलेल्या मुक्ताबाईचा शिष्य विसोबा चाटे उर्फ विसोबा खेचर बनला . तो पुढे प्रसिद्ध झाला.
पैठणला धर्मपीठातून ग्रामसभे कडून शुद्धिपत्र आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव आला. संन्याशाच्या मुलांना व्रतबंधाची अनुमती नाही .असे कर्मठांनी सांगितले. त्यांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित यांचा मार्ग स्वीकारला .सर्व भावंडांची जबाबदारी निवृत्तीनाथांनी स्वीकारली. धर्माच्या खोट्या कृत्याने समाजात अवडंबर माजले होते . ज्ञानेश्वरांनी समाजाला समाजाचे सत्यरूप सांगितले . पैठण वरून शुद्धिपत्र जर तुम्ही आणले तर तुमचे बहिष्कार आम्ही मागे घेऊ. तुम्हाला समाजात मुक्तपणे वागण्यास परवानगी देऊ असे त्यांना सांगण्यात आले.
निवृत्तिनाथांनी त्यांच्या भावंडांना सांगितले . आपण शुद्धिपत्रक आणू या...
तेव्हा सर्व भावंडे रागावली. सोपानदेव बोलला .आपण मूळचे शुद्ध आहोत. मग शुद्धिपत्र कशाला पाहिजे. आपण पवित्र आहोत मग ज्ञानी लोकांना शुद्ध करून घ्यायचा हा शुद्ध वेडेपणा आहे.

निवृत्तीनाथ सुद्धा विचार करत होते. काय करायचे... शुद्धिपत्र घेऊन .आम्हाला समाजात घेतले नाही तर काय बिघडणार आहे .आम्ही आमचे ज्ञानी आणि स्वयंपूर्ण आहोत .आम्हाला समाज नको . आम्ही तप साधनेमध्ये आयुष्य काढू. आम्हाला कोणी नको. समाजाची आम्हाला गरज नाही. काही आवश्यकता नाही. पैठण येथे जाऊन शुद्धिपत्र आणण्याची.

परंतु ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितले.
आपण ज्ञानी आहोत. मुक्त आहोत. हे जरी खरं असलं तरी समाजाची, धर्माची काही बंधनं असतात. समाजाचे काही नियम असतात. ते पाळायला पाहिजे. ज्ञानी पुरुषांनी समाजाला शांतीचा मार्ग दाखवायला पाहिजे. प्रगतीचा ,प्रेमाचा ,मांगल्याचा मार्ग दाखवायला पाहिजे. ती जबाबदारी ज्ञानी पुरुष यावर फार मोठी असते. म्हणून त्यांनी आधी समाजाचे नियम पाळला पाहिजे. आपली योग्यता समाजाला कळली पाहिजे. तेव्हा समाज आपल्यासोबत येईल. अशा वागण्यामुळे विश्व कल्याणाचा मार्ग समाजाला दाखवता येईल. यावर एकमत होऊन सर्व भावंडे पैठणला शुद्धिपत्र आणण्यासाठी गेले. तिथले लोक ज्ञानदेवाना म्हणू लागले तुमचे नाव ज्ञानदेव आहे. तुम्ही कुठे ज्ञान घेतले .आम्हाला दाखवा. तुम्ही एवढे ज्ञानी आहात तर रेड्याला बोलते करा असे त सांगण्यात आले .तेथे ज्ञानेश्वरांकडून रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेण्यात आले. रेड्याच्या पाठीवर चाबकाने मारून रेड्याच्या पाठीवरुन उठलेले वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उठतात की नाही हे पाहण्यात आले. रेड्याच्या पाठीवरचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उठल्यामुळे .तिथल्या लोकांना ते खरोखर ज्ञानी पुरुष आहेत.हे मनोमन पटले. सर्व समाज त्यांच्या व त्यांच्या विचार भावनांच्या मागे आला.समाजाने त्यांची माफी मागितली .सर्व पैठण सभेने एक मुखाने शुद्धीपत्र तयार करून ज्ञानेश्वरांना दिले. ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या सर्व भावंडांना पुन्हा समाजात घेतले. त्यांच्यावर बहिष्कार काढून टाकण्यात आला....

चांगदेव पासष्टी बद्दल सर्वांनी खूप ऐकले असेल. तापी नदीच्या काठी पुणतांबे नावाचे छोटे गाव आहे. तिथे चांगदेव रहात होते. चांगदेव दिसायला सुंदर होता. चांगदेव गोदावरी नदी काठी सत्संग करायचा. त्याला चौदाशे शिष्य होते. त्यामुळे चांगदेव चौदाशे वर्षे जगले असे म्हटले जाते. मृत माणसाला सुद्धा चांगदेव जिवंत करत होते. एवढी त्यांच्याकडे विद्या होती. ज्ञानेश्वरांच्या सहित त्यांच्या भावंडाची महती त्यांनी ऐकली होती. त्यांनी त्या भांवडांना त्यांनी पत्र लिहायला घेतले. परंतु पत्रांमध्ये मायना काय लिहायचा याबद्दल त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला.

चिरंजीव असे शब्द लिहायचे की तीर्थरूप असे शब्द लिहायचे. हे न समजल्यामुळे त्यांनी कोरा कागदच त्या चौघा भावंडाकडे पाठवून दिला. तो कोरा कागद बघून निवृत्तींनी ज्ञानदेवांना चांगदेवाला पत्र लिहिण्याचा आदेश दिला. ज्ञानदेवांनी पासष्ट ओळींचे पत्र लिहिले. चांगदेवांच्या कृतीच्या पत्राचे उत्तर म्हणून ते पत्र चांगदेवांच्या शिष्याच्या हातात दिले. चांगदेवांच्या शिष्याने ते चांगदेव यांना दिले. ते वाचून चांगदेव भांबावले .त्यांना त्याचा अर्थबोध होईना. वाघाच्या पाठीवर बसून चांगदेव चौघा भावंडाना भेटायला आले. ते ऐकून निवृत्तीनाथांनी भिंतीला आदेश दिला.चौघां भावां सहित भिंत चालू लागली आणि चांगदेवा समोर जाऊन उभी राहिली. ते बघून चांगदेव वरमले आणि ज्ञानदेवांचे शिष्य झाले. चांगदेवांना दिलेले पत्र पुढे चांगदेव-पासष्टी म्हणून प्रसिद्ध झाले.
या घटनेने चौघा भावडांची कीर्ती सर्वदूर पसरली. दूरदूरहून लोक त्या भावंडांच्या दर्शनाला येऊ लागले त्यांना आपल्या गावी येण्याचा आग्रह धरू लागली किर्तन सांगण्यासाठी, प्रवचन सांगण्यासाठी बोलावू लागले.

चौघेही भावंडे समाजाला कथापुराणे सांगत होती. भक्तिमार्गाचा प्रसार करीत होती.तीच भागवत धर्माची सुरुवात झाली होती.
रोज देवाचं नाव घ्या. सतत देवाचे स्मरण करा. तोच तुम्हाला तारून नेईल अशी साधी शिकवण सोप्या भाषेत ज्ञानेश्वर लोकांना देऊ लागले. कर्मकांड करू नका. फक्त चिंतनातून नामस्मरणातून भक्ती करा .असं म्हणत भक्तीसाठी संन्यास घेऊ नका घरदार सोडून जायची गरज नाही प्रपंचात राहून परमार्थ करता येतो. कोणी छोटा नाही .कोणी मोठा नाही. कोणी श्रेष्ठ नाही. कोणी कनिष्ठ नाही .गरीब नाही की श्रीमंत नाही. जाती पात किंवा कसलाही भेद नाही. सर्वांसाठी भागवत धर्माचा मार्ग खुला आहे .ज्ञानेश्वरांनी जो भक्तिमार्ग सांगितला तो लोकांना पटला .त्यामुळे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. भागवत धर्माचा प्रसार जोराने झाला. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे.
निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना गीतेची मराठीमध्ये रचना करायचे आदेश दिले. ज्ञानेश्वरांनी त्यांचा शिष्य सच्चिदानंद याला सोबत घेऊन गीतेचे मराठी भाषांतर करायला सुरुवात केली. सच्चिदानंदचा अर्थ आहे .
सत चित् आनंद... अर्थात ज्याला मृत्यू अशक्य आहे असा सच्चिदानंद...
नेवासा या ठिकाणी मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी संस्कृत मधून मराठी मध्ये सांगितली. तो खांब अद्यापही त्या मंदिरात आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके मेळविन
या सुंदर ओळी त्यांच्या मुखातून बाहेर पडल्या. नेवासा येथून भावंडे पंढरपूरला आले. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले .त्यावेळी विठ्ठलाचे दर्शन करताना ते म्हणतात
दोन्ही बाही संतांची सभा। सिंहासनी उभा श्री विठ्ठल।। गाती नारद तुंबर प्रेमे। हरीचे नाम गर्जताती।। बाप रखुमादेवी वरु ।श्री विठ्ठल उभा
चैतन्याची शोभा । शोभतसे

पंढरपूर वरून गावोगावी फिरत कीर्तन-प्रवचन हरिकथा पारायण करीत ते फिरू लागले कीर्तन व भजन या सारखे दुसरे साधन विठ्ठलाचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी नाही असे ते म्हणत

सर्व धर्माचे कारण। नामस्मरण हरिकीर्तन
दया क्षमा समाधान। संत जन साधिती ।।

कीर्तनावर ज्ञानेश्वरांचा भर होता. ते सर्व भारतभर फिरले. अनेक शिष्य प्राप्त झाले. भीमाशंकर ,देहू यात्रा करून ते पुन्हा पंढरपूरला आले. तेव्हा ज्ञानेश्वरांना वाटले की आपण पांडुरंग चरणावर समाधि घ्यावी.

आळंदीला जिथे समाधी घ्यायची आहे. ती जागा त्यांनी स्वच्छ करून घेतली . ज्ञानेश्वर समाधी घेणार म्हटल्याने सर्व भावंडे दुःखी झाली. ज्ञानेश्वरांनी इंद्रायणी नदीत शेवटचे स्नान केले. सिद्धेश्वर व पांडुरंगाचे दर्शन घेतले. बरोबर संत मंडळी यांचा मेळा होता. लोक भजन नामस्मरण करीत होते .त्यांच्या गळ्यात फुलांचे हार होते. ज्ञानदेव शांतपणे संथपणे पावले टाकीत समाधी च्या जागेवर गेले. समाधीच्या आत मध्ये पांढरेशुभ्र वस्त्र घातले होते .फुले अंथरली होती. उदबत्त्यांचा सुगंध बरसत होता .समयां प्रसन्नपणे तेवत होत्या. समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला. ज्ञानदेवांनी सर्वांना नमस्कार केला. गुरु निवृत्तीनाथांच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. भावंडांना आलिंगन दिले. निवृत्तींच्या हाताला धरून ते उतरले. खाली आसनावर जाऊन बसले. पद्मासन घालून समाधी लावली . ज्ञानेश्वरांना पूर्ण समाधी लाभली. निवृत्तिनाथांनी समाधीच्या तोंडावर जड अंतकरणाने मोठी शिळा, दगड ठेवला. समाधीचे तोंड बंद केले त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. एवढ्या लहान वयात त्यांनी जगाला ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ठेवा मागे ठेवला. सर्वांसाठी पसायदान मागितले... अशी विठ्ठल भक्ती फक्त आणि फक्त सच्चे भक्त करू शकतात...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED