नमस्कार वाचक मंडळी ..
सगळे बरे आहेत ना ?
काळजी घ्या , आणि बाहेर जास्त फिरू नका ....
ही एक सत्य कथा आहे , फक्त नाव बदलले आहे ...
सचिनने माझ्या नाईट मेयर , लटकलेले भूत आणि आणखी काही कथा वाचल्या .....
आणि नंतर त्याचा आलेला अनुभव तुमच्या समोर ...
खरे तर सचिनचा भूत , देव आणि चकवा या अंधश्रध्दा पसरविणाऱ्या बाबी वर मुळीच विश्वास नव्हता ..
13 तारखेला नीट चा पेपर झाला ,
गेले दोन वर्ष सचिन नीट म्हणजे वैद्यकीय पात्रता परीक्षेचा अभ्यास करत होता ...
पेपर एकदम छान गेला होता , आज त्याच्या डोक्यावर काहीच टेंशन नव्हते ....
तो पेपर देऊन रूमवर आला , तो शहराच्या ठिकाणी एका अडगळीत पडलेल्या चाळीमध्ये राहत होता ...
पेपर झाला , आणि त्याचे डोक्यावर असलेले अभ्यासाचे ओझे कमी झाले होते ....
आज छान एन्जॉय करावा असे त्याला वाटत होते ...
आज तर खोली मालक सुद्धा नव्हते , ते कुठेतरी नातेवाईकांकडे गेले होते ....
सचिन ने मित्रांना फोन केला ,पण त्याची पार निराशा झाली ....
मित्र म्हणाले की आज पेपर मुळे फार थकलो आहोत , आपण उद्या काहीतरी पार्टी करूयात .....
खरे तर एक दोन दिवस एन्जॉय करून मग रूम सोडायची , असा सचिनचा बेत होता ...
पण मित्रांनी प्लॅन ची पार वाट लावल्याने , त्याचा मूड थोडा ऑफ झाला होता ...
झालं सचिनने जेवण केले आणि आपल्या मोबाईल वर मित्रांशी फोनवर गप्पा मारत बसला .....
बघता बघता वेळ कसा निघून गेले ते सुद्धा त्याला कळले नाही ,
रात्रीचे दोन वाजले होते .....
आणि अचानक लाईट गेली ....
रूम मधला लाईट बंद झाला होता , म्हणून फोनवर बोलता बोलता त्याने मोबाईल ची टॉर्च लावली ....
आणि फोन स्पीकर वर टाकून तो बोलू लागला ...
मित्राचा आवाज अचानक मध्येच अडकु लागला , आणि फोन आपोआप कट झाला ...
त्याला वाटलं की स्क्रीन ला धक्का लावून फोन कट झाला असणार , त्याने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला ...
पण त्याचे नेटवर्क पूर्णतः गेले होते ...
त्याने सहज बाजूला टॉर्च दाबली ....
बाजूला अंधारात चार जण बसले होते ,
काहीही हालचाली न करता ........
त्याला प्रथम वाटले की भास असावा ....
त्याने त्याकडे दुर्लक्ष केले ....
पुन्हा टॉर्च दाबली .....
ते चार जण त्याच्या सोबतच खोली मधे होते .....
अगदी क्षणाचीही हालचाल न करता ते मान झाली घालून बसले होते ......
सचिनच्या तोंडचे पाणीच पळाले होते ......
त्याने त्या चौघांचे चेहरे बघण्यासाठी टॉर्च दाबली ....
लपकन मोबाईलची टॉर्च बंद झाली ....
त्याने मोबाईल ची टॉर्च पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला ...
पण काहीच उपयोग झाला नाही ....
त्याला दरदरून घाम फुटला .....
त्याने मोबाईल बेडवर ठेऊन बाथरूम मधे पळ काढला ...
त्याची बोबडीच वळली होती ....
तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता ....
अंधश्रद्धेवर किंचितही विश्वास न ठेवणारा सचिन आता चांगलाच घाबरला होता .....
त्याचे हातपाय लट लट कापत होते .....
तो बाथरूम मध्ये उभा होता ...
त्याने दरवाजा आतून बंद करून टाकला होता .....
लाईट गेली असल्याने ,
इतका अंधार होता की .........
त्याला त्याचे हात सुद्धा दिसत नव्हते ......
आता दुष्काळात तेराव महिना म्हणजे ,
नळ अचानक चालू झाला होता .......
त्याच्या मनात आता एवढी भीती निर्माण झाली होती ...
की तो राम राम राम राम राम राम नावाचा जप करू लागला होता ...
मध्येच तो आबड धोबड का होईना हनुमान चालीसा म्हणत होता .....
जय हनुमान गाणं गुण सागर ........
पुढचे काही त्याला येत नव्हते , तरीही तो काहीच्या काही म्हणत होता ....
आणि देवाला वाचव अशी प्रार्थना करत होता .....
त्याने चाचपून नळ बंद केला .....
पण नळा मधून बादलीत पडणाऱ्या टपक टपक आवाजामुळे त्याला आणखीनच भीती वाटत होती ......
तो टपक तपक आवाज त्या शांत अशा बाथरूम मध्ये त्याला जीवघेणा वाटत होता ....
म्हणून त्याने अंधारात एखाद्या नेत्रहीन व्यक्तिसारखे चाचपून बाथरूम चा दरवाजा उघडला .....
त्याने खोलीमध्ये धूम ठोकली ........
मोबाईल चाचपून बघितला .......
आता मात्र मोबाईलची टॉर्च लागली होती ......
त्या अंधाऱ्या खोलीत त्याच्याशिवाय कुणीही नव्हते .....
त्याने सुटकेचा निःश्वास टाकला ......
चला वाचली बुवा ......
असे म्हणून त्याने सहज थोड्या शंकेने मोबाईल ची टॉर्च भिंतीवर दाबली ........
तो जीवाच्या आकंताने ओरडला .......
पण घरात खोली मालक नसल्याने त्याची ती आरोळी त्या खोलीत घुमुन घुमून विरून गेली ........
त्या भिंतीवर ........
एक लहान मुल एखाद्या पालिसारखे चढत होते .....
आता तो दरवाजा खोलून बाहेर जाणार होता ....
पण जोरात कुणीतरी धाड धाड धाड दरवाजा ठोकत होते ...
आता त्याच्याकडे खोलीत अंगावर चादर ओढून घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता ....
तो अंगावर चादर ओढून झोपू लागला ....
पण दरवाजा ठोकण्याचा आवाज काही कमी होत नव्हता ....
त्याने सहज जोरात विचारण्याचा प्रयत्न केला , पण त्याच्या तोंडातून शब्द च फुटत नव्हते .....
तरीही प्रयत्न करून त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला ...
"" को .......को न ......???
कोण हे ?""""
त्याचा आवाज दरवाजा पर्यंत पोहोच ला असेल की नाही तेही माहित नव्हते .......
पण आता दरवाजा ठोकणे बंद झाले होते .....
त्याने पुन्हा चादर अंगावर ओढून झोपण्याचा प्रयत्न केला ....
पण त्याल काही झोप लागत नव्हती ....
अजुनही लाईट काही आली नव्हती ....
सगळ्या खोलीत भयानक अशी शांतता पसरली होती .....
पण ती शांतता फक्त पाच मिनिटा पर्यंतच होती ......
त्या शांततेला भंग करणारा आवाज त्याच्या कानावर येत होता ........
काहीतरी चावण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता ....
तो आवाज आता त्याच्या जवळ जवळ येत होता ......
तो आवाज आणखीनच वाढत होता ....
सचिन आता घामाने पूर्ण ओला झाला होता ........
त्याला वाटले की कोणीतरी आपल्याला खाणार तर नाही ना ...
म्हणून त्याने मोबाईल ची टॉर्च लाऊन .......
खोली मधे तो बघू लागला ....
त्या अंधाऱ्या खोलीत काहीच नव्हते ........
त्याच्या हृदयाची धडधड आता कमी होत होती .....
त्याचे लक्ष सहज बेडवर बाजूला गेले ......
तो पुन्हा एकदा जोरात ओरडला ......
कानाचे पडदे फाटेल ....
असे त्याचे ओरडणे होते .....
कारण त्याच्या शेजारी एक माणूस झोपलेला होता .....
तो त्याच्या जबड्या ची सतत हालचाल काहीतरी चावत होता .........
त्याचा चेहरा पूर्ण जळालेला होता ...
चेहऱ्याचे मांस खाली टपकत होते .......
सचिन बेड वरून उठला ....
आणि
त्या आपल्या खोलीच्या बाहेर पळाला .....
खोलीच्या बाहेर सुद्धा अंधार होता ....
पण त्याला त्याची पर्वा नव्हती ....
बाहेर कुत्र्यांचा भुंकण्या चा .....
तो भयानक असा आवाज त्याच्या कानाला असह्य वाटत होता ....
तरीही तो धावत होता ....
जोराची धाप लागू न तो थांबला ...
त्याची छाती धड धड करीत होती .....
तो आता रोड वर होता .....
त्याने आपली सुटका झाली असा सुटकेचा निःश्वास टाकला होता .....
तो रोडवर एखाद्या वेड्या सारखा फिरत होता.....
रोडच्या बाजूला एका हॉटेल च्या समोर एक भिकारी माणूस झोपला होता ....
तो आधार म्हणून त्याच्या बाजूला जाऊन बसला ....
एव्हाना सकाळचे चार वाजले होते .......
अजुनही उजेड पडला नव्हता , सचिन आपल्या मोबाईल वरून फोनवर फोन लावत होता ....
पण त्याचा एकही फोन लागला नव्हता ..
भावाला फोन लागला पण त्याचा आवाज सचिनला ऐकु येत नव्हता .....
सचिन देवाला हीच प्रार्थना करत होता की लवकर सकाळ व्हावी.....
सचिन चे डोळे आता पाणावले होते ...
तो रडायला ही लागला होता ....
तो सारखे फोन लावत होता ,आणि कुणाचाच आवाज त्याला येत नव्हता ....
आता तर मोबाईल वर फुल नेटवर्क होते ....
झालं जे व्हायचे नव्हते तेच झाले ......
त्याचे लक्ष बाजूला झोपलेल्या त्या भिकाऱ्याकडे गेले ......
त्याच्या काळजाला हादरा बसला .....
तो एका क्षणासाठी चक्रावून गेला होता ....
तो भिकारी अचानक नाहीसा झाला होता ....
सचिनने आता हात जोडले होते ...
दुधाचे पाकिटे घेऊन येणारा ...
अमूल दुधाचा ट्रक हॉटेल समोर येऊन थांबला होता .....
आता हॉटेल नेमकी उघडली होती .....
आणि दूध पाकिटचा ट्रे घेण्यासाठी हॉटेल वाला त्या ट्रक जवळ आला होता ...
सचिन त्याच्या जवळ गेला , आणि त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला .....
हॉटेल मालकाला तो ज्या घरात राहत होता , त्या घराबद्दल विचारले असता ........
त्याने जे सांगितले ते ऐकु न सचिनने त्याच दिवशी खोली सोडून दिली .....
कारण त्या घराचे बांधकाम करताना एका मजुरांचे कुटुंब , त्याठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन मरण पावले होते ....
असे लोक म्हणतात हे त्याने सचिनला सांगितले होते ...
आपले सामान आणायला सुद्धा त्याने त्याच्या घरच्यांना सांगितले .......
हा अनुभव सांगताना सुद्धा सचिन थरथर कापत होता ..........
सचिनला असा भयानक अनुभव येण्याचे कारण माझ्या भयकथा होते .....
की खरच तो राहत असलेल्या ठिकाणी भूत होते .......???
हे मात्र अजुन एक रहस्य च आहे .......
....................................समाप्त...............