सतीशला रात्री दोन वाजता काळेगाव च्या बसस्टँड वर सोडल्या गेले .......
आता एवढी रात्र झाली नसती पण त्याला जिल्ह्याच्या ठिकाणाहून यायला बराच उशीर झाला होता ......
सतीशला स्टँड वर सोडले तेव्हा , तिथे काळे कुत्रे सुद्धा नव्हते ........
तो फक्त एकटाच होता ......
त्याला खात्री होती की आपल्याला सकाळी सहा वाजेपर्यंत बस लागणार नाही .......
काळेगाव म्हणजे खेड्यामधून शहरीकरण होऊ पाहणारे गाव .........
पण बसस्टँड शहराच्या थोड अलीकडे अडगळीत पडल्या सारखे होते .....
नेहमी प्रमाणे प्रशासनाने यावेळी सुद्धा बसस्टँड च्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या कारणाने , हे हाल होते .......
सतीश काळेगाव वरून पुन्हा सत्तर किलोमीटर वर असलेल्या खडेगावकडे जाणार होता , जिथे त्याचे घर होते ......
तो जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीला होता .......
सतीशने सहज वर बघितले ,
आज अमावस्येची रात्र होती . ......
काळ्या कुट्ट अंधाराने जणू सर्व आकाशच गिळंकृत केले होते ......
रातकिड्यांची किरकिर अधिकच वाढत होती ....
अधून मधून थंड अशी हवेची झुळूक सतिशच्या अंगावर थंडीने काटा आणत होती ......
स्टॅण्ड वर बराच अंधार होता .....
फक्त बूथ जवळ मात्र एक लाईट तुरळक प्रकाश देत होता ......
तो सुद्धा आपला जीव कधी गमावेल याची शाश्वती नव्हती .....
सतीशने मोबाईलची टॉर्च लावली आणि तो त्या बूथ जवळ जाऊन बसला ......
त्याच्या कडे सकाळची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता .......
त्याला पहिल्यांदा एवढा एकटेपणा जाणवत होता .....
त्याने मोबाईलची टॉर्च बंद करून , गेम खेळू लागला .......
स्टॅण्ड वर एवढी शांतता त्याने पहिल्यांदाच अनुभवली होती , एकही माणूस तिथे नव्हता ......
त्याच्या सोबतीला फक्त आणि फक्त मोबाईलच होता ......
तो गेम मध्ये चांगलाच रमला .......
तो एका बाकावर मस्त मांडी घालून बसला होता .....
वातावरणात थोडा बदल होत आहे असे त्याला जाणवले , आता एवढा गारवा जाणवत नव्हता ......
थोडी ऊब अचानक जाणवू लागली .......
त्याचे लक्ष मोबाईल मधून विचलित झाले , त्याची नजर शेजारच्या बाकावर गेली .........
त्याला धक्का तर बसलाच ......
पण काही क्षणाकरिता तो बघतच राहिला ......
तिला बघून कुणीही भुलले असते ,
तिच्या नजरेच्या बाणातून कुणीच चुकले नसते .......
तिच्या मनमोहक, नेत्रदीपक , आकर्षक असे सौंदर्य बघून सतीश कोण सुटणारा ???
सतीशला ती कशी आली ?
केव्हा आली ?
हे कळलेच नाही .......
काही केल्या सतीशची नजर तिच्या वरून हटत नव्हती ........
तिचा गौरा रंग त्या अमावस्येच्या अंधाराला नाहीसा करत होता ,
अख्ख वातावरण तिच्या यौवनाच्या सुगंधाने भरून गेले होते .........
तिच्या येण्याने वातावरणातील गारवा नष्ट होऊन ऊब जाणवत होती ........
काळेभोरे केस , त्याची एक तिरीप तिच्या गोऱ्या गालावर आलेली ,
तिच्या डोळ्यात जणू अमृत साठवले होते ........
ती लाजून त्या बाकावर बसली होती , जणू एखादी मखमली वस्त्राने माखलेली अप्सरा त्यावर बसली की काय ????
तिच्या पापण्या त्या अमृतरुपी नयनाच्या वर सजवल्या होत्या की काय ???
ती लाजून ओठ दुमडून जेव्हा सतिषकडे तिरक्या नजरेने बघत होती ..
तेव्हा तिच्या गालावर हलकीशी खळी पडली ........
ती आपले अंग चाचपून घेत होती , तरीही तिचे फुगलेले शरीर ती लपून ठेवू शकत नव्हती ..….....
एखाद्या उत्तम चित्रकाराने आपल्या उत्तम अशा कुंचल्याने एखाद्या अप्सरेचे चित्र काढावे एवढी सुंदर अशी तरुणी होती ती ..........
त्यातल्या त्यात लाल साडी तिने घातलेली होती .....
एवढी आकर्षक स्त्री त्याच्या शेजारच्या बाकावर येवून बसली होती .......
सतीश तिच्या कडे डोकावून बघत होता , ती सुद्धा त्याच्या कडे तिरक्या नजरेने बघत होती ......
ती तरुणी नव्हती हे त्याला कळून चुकले होते कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते ......
सतीशला प्रश्न पडला की इतक्या रात्री , बस स्टँडवर कुणीही नसताना इतकी सुंदर स्त्री कशी काय .??
तिला भीती नसेल का वाटत ? जी मला वाटत होती .......
तो विचार करत राहिला ........
त्याची तिला बोलायची हिम्मत होत नव्हती .........
सतीश मात्र आपल्या डोळ्यांनी तिला टिपायचे सोडत नव्हता , तो सारखा तिच्या कडे बघत होता .......
ती सुद्धा त्याच्या कडे बघत होती ....
सतीश मात्र तिला बोलणे योग्य समजत नव्हता .....
कारण त्या ठिकाणी फक्त ती आणि तोच होता ......
जवळपास एक तास कुणीही बोलले नाही ......
सतीश तिच्या कडे सारखा बघत बसला .......
काही केल्या सतीशची तिच्यावरची नजर हटत नव्हती ........
कारण ,
सतीश सुद्धा तरुण होता ......
जवळपास पंचविशी मध्ये असलेला .......
तिचे सौंदर्य बघून तो मोहित झाला होता ,
पण आपल्या भावनांना त्याने बांध घातला होता .......
तिने हळुवारपणे त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला .......
ओठ दुमडले आणि आपल्या गोड अशा आवाजात ती म्हणाली ,
""अहो टाइम काय झाला ?"""
तिचा तो गोड असा आवाज त्याच्या अंगावर शहारे आणून गेला ,
घाई गरबडी मध्ये त्याने मोबाईल उचलला .......
लॉक चे बटन दाबण्याच्या नादात मोबाईल बाकावरून खाली पडला ..........
त्याने तो उचलला आणि पुन्हा बटन दाबून लॉक उघडण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल बंद झाला होता ......
त्याने डोक्यावर हात मारला ,
कारण मोबाईल मध्ये चार्जिंग बरीच होती .......
तो निराशेने म्हटला .....
""यार मोबाईल अचानक बंद पडलाय , काय झाले काय माहीत ???""
तरीही त्याचा लॉक उघडण्याचा प्रयत्न चालूच होता .....
ती त्याच्या कडे पाहून स्मित हास्य करत म्हणाली ....
"" सॉरी हा माझ्या मुळे मोबाईल पडला तुमचा ??""
""नाही हो मीच घाई केली .....
तुम्ही तर फक्त टाइम विचारला होता ...."'
सतीश तिला हसून म्हणाला ..........
तिने त्याला विचारले ...
"" तुम्हाला कुठे जायचे आहे ?""
सतीश म्हणाला ....
"" मला बोरेगावाला जायच आहे , इथून साठ सत्तर किलोमीटर असेल ??
पण रात्री लेट आलो म्हणून थांबावे लागेल सकाळपर्यंत """
ती म्हणाली ....
"" हो ना रात्रीची बससेवा सुरू पाहिजे .....
बघा बरं ,मला सुद्धा थांबावे लागत आहे ........""
सतीशने तिला प्रश्न केला ..
"" तुम्हाला कुठे जायच ?""
ती म्हणाली ..
"" मला पुणे .....ला सकाळपर्यंत मला सुद्धा थांबावे लागणार आता ....""
सतीश तिला सहज म्हणाला ..
"" तुम्हाला भीती नाही वाटत का ??""
""कसली भीती , आणि कुणाची ??""
तिने उलट प्रश्न केला ....
""इतक्या अंधाऱ्या रात्री तुम्ही एकट्या ? ""
सतीश तिला हळू आवाजात म्हणाला ....
""एक काम करा , तुम्ही माझ्या बाकावर येऊन बसा .....""
ती म्हणाली .....
सतीशला धक्काच बसला ....
कारण एवढी सुंदर स्त्री त्याला जवळ बसायला बोलावतेय , अगदी एखाद्या ओळखीच्या माणसा सारखे ........
सतीशला आनंद झाला ......
तो ताडकन उठला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला ......
सतीश म्हणाला ...
""तुम्हाला व्यवस्थित बसता येत ना ??""
ती हसून म्हणाली ....
"" हो हो का नाही , तुम्ही निवांत बसा काळजी करू नका ""
सतिशच्या मनात गुदगुल्या होत होत्या ....
सतीशच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट पणे दिसंत होता .…..
तो तिने हेरला होता ......
"" हा तुम्ही काहीतरी बोलत होता ?
भीती वाटते का वगैरे ??.......""
ती त्याच्या कड पाहून म्हणाली .......
ती आणि सतीश फक्त फूटभर अंतरावर होते ......
सतीश म्हणाला.....
"" हो ते इतक्या अंधारात तुम्ही एकट्या , आणि आजकाल लोक चांगले राहिले नाही .....'"
ती हे ऐकून खो खो हसू लागली .…...
सतीश तिला म्हणाला ....
"" का काय झालं ??""
ती हसत म्हणाली ...
"" भीती तुम्हाला वाटत आहे म्हणून मी बोलावले माझ्याजवळ बसायला ....
मला काही भीती वाटत नाही ......
माझा प्रवास रात्रीच असतो .......""
सतीश तिच्या कडे एकदम पाहून म्हणाला ...
"" रात्रीचा म्हणजे ....""
""मी गंमत करतेय ......
तुमची , किती घाबरता तुम्ही ????"""'
ती पुन्हा हसुन म्हणाली .....
सतीश सुध्दा हसू लागला .....
पण त्याला ती थोडी वेगळीच बाई वाटली .......
तिचे बोलणे त्याला काहीतरी वेगळाच भास करून देत होती ........
""तुमचे नाव काय ???""
सतीशने तिला विचारले .......
तिने आपल्या ओठातून सहज शब्द फेकले ......
""मी माया .....""
""खूप सुंदर नाव आहे तुमचे ....""
सतीश म्हणाला ....
तिने सतीशला विचारले .....
""तुमचे नाव ??""
""सतीश ......""
सतीश म्हणाला ....
ती एकदम सतिशच्या डोळ्यात बघू लागली .....
सतीश सुद्धा इतक्या जवळून तिच्या डोळ्यात बघत राहिला .........
पाच मिनिटे दोघे एकमेकांना सारखे बघत होते .......
सतीश तिच्या डोळ्यात जणू हरवून गेला होता ,
पण भानावर येत त्याने तिला सहज म्हंटले .....
"" तुम्ही खूप सुंदर आहात माया जी .......""
ती लाजून खाली बघू लागली ......
सतीशची नजर तिच्या अंगावरून खेळत होती ......
इतक्या जवळून इतक्या सुंदर स्त्रीला त्याने कधीच बघितले नव्हते .........
ती आता त्याला लाजत होती ........
सतीश मात्र तिच्या कडे बघतच राहिला .......
माया म्हणजे खरच माया होती , आपल्या सौंदर्यांच्या जादूने त्याला तिने मोहित केले होते ........
सतीशला आता कसे कसेच होत होते .....
तो तिला म्हणाला ....
"" तुमचे मिस्टर काय करतात ???'"
माया डोळ्यात पाणी आणून म्हणाली .....
"" बिझनेस आहे त्यांचा पण आता ते सोबत नसतात '''
"" म्हणजे ??""
सतीश तिला विचारत होता .....
तिने सतीशला समजावले ....
"" सतीश तुम्ही विचारू नका यार ???
खूप काही आहे .....जे मी नाही सांगू शकत ......प्लिज माझ्या साठी हे विचारू नका ........
सतीश शांत बसला .....
तिने एकदम सतिशकडे बघितले आणि केविलवाणा चेहरा करून म्हटले .......
"" सॉरी हा .....
मी काही शिल्लक तर नाही ना बोलले ....??""
सतीश तिच्या मांडीवर हात ठेवून म्हणाला .....
"" नाही हो तसे काही नाही .....""
तिच्या मांडीवर त्याने इतक्या सहज हात कसा ठेवला हे सुद्धा त्याला कळले नाही ......
सतीशला धक्काच बसला .....
कारण एक परस्त्रीच्या मांडीवर त्याने इतका सहज हात ठेवला की त्याला भानच राहिले नाही .......
त्याला वाटले की आता माया रागावणार .....
पण तसले काही घडले नाही ......
ती उलट एक स्माईल देत होती ......
सतीश तिला पुन्हा एकदा म्हणाला ....
"" तुम्ही खूप सुंदर आहात माया जी ......""
माया त्याच्या कानात म्हणाली .......
"" तुम्ही पण ........."""
तिच्या गरम अशा स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारे आले .........
सतीश तिच्या डोळ्यात बघत राहिला ,
ती सुद्धा त्याच्या डोळ्यात बघत होती .......
अचानक काहीतरी हालचाल जाणवली आणि माया जोरात ओरडली ..........
"" सतीश ............"""
सतिशच्या डोक्यावर मागून दणकन प्रहार झाला .......
कुणीतरी लाकडाच्या लाठीने त्याच्या डोक्यावर मारा केला होता ...…....
सतीश बाकावरून खाली पडला .....
दोन व्यक्ती मागे उभे होते .......
एकाने मायाच्या तोंडावर रुमाल लावला ........
सतीश अर्धमेला होऊन तिच्या कडे बघतच राहिला ........
तो काहीही करू शकत नव्हता ......
कारण त्याचे डोळे बंद होणार होते , त्याची शुद्ध हरवणार होती .....….....
त्यातल्या दुसर्याने मायाला उचलले आणि सरळ बसस्टँड च्या बाहेर घेऊन गेले .......
त्या दोघा अज्ञात व्यक्तीच्या त्या अंधारात गुडूप होणाऱ्या पाठमोऱ्या आकृती कडे तो पाहत राहीला .......
संपूर्ण शक्ती एकवटून त्याने किंचाळी फोडली ............
""" माया .............माया ...............माया ........"""
त्याच्या तोंडावर कुणीतरी पाणी शिंपडले ......
"" काय पागल माणूस आहे .….....
स्वप्नात काय माया माया ओरडत आहे , उठ रे भो .........
साला इतका झोपतो की इतक्या गर्दीत पण याला जाग येत नाही ..........."""
गर्दीतला एक जण म्हणाला .......
सतीशने डोळे उघडले ......
तो काळेगावच्या त्याच बसस्टँड वर होता .....
त्याच्या बाकाजवळ त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली होती ........
आजूबाजूला बघितले तर माया कुठेच दिसत नव्हती ................
त्याने डोक्याला हात लावला ......
त्याला डोक्याला काहीच मार जाणवला नव्हता .......
सगळे काही नॉर्मल होते .........
त्याने एक दोघांना माया विषयी विचारले ......
पण लोक त्याला काहीच उत्तरले नाही .....
त्याने डोळ्यावरची झाक जाण्यासाठी .....
बसस्टँड वरच्या पाणी पिण्याच्या ठिकाणी जाऊन , डोळ्यावर पाणी मारले ..........
डोळे चोळले .........
गुळण्या केल्या ..........
समोर जेव्हा त्याने पाणपोईच्या भिंतीवर बघितले तेव्हा त्याला धक्काच बसला ............
त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या .........
कारण एक पोस्टर लागलेले होते ....
त्यावर मायाचा सुंदर असा फोटो होता .........
वरती लाल अक्षरात लिहिले होते ..….......
""बेपत्ता ........."""
सदर महिला ही दिनांक 5/1/2000 पासून बेपत्ता आहे .......
त्यामध्ये माया बद्दल सर्व माहिती दिली होती ........
सतीशने थरथरत खिशातला मोबाईल काढला .........
त्याला पुन्हा एक धक्का बसला .......
कारण आज तारीख दहा होती ........
गेल्या पाच दिवसा पासून माया बेपत्ता होती .........
आणि माया तर त्याला रात्रीच या बसस्टँड वर भेटली .................
म्हणजे माया ...........
बापरे ...........
त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला ........
त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ..........
माया त्याची कुणीच लागत नव्हती ...........
तरीही माया मुळे त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते ..............
सतीश मागे वळला आणि सरळ त्याच्या गावाकडे जाणाऱ्या बस मध्ये जाऊन बसला ................
पण जाताना त्याने मायाचे बेपत्ता लिहिलेले पोस्टर मात्र सोबत घेतले ..............
बस बसस्टँड वरून त्याच्या गावाकडे निघाली खरी ,
पण त्याला ते स्टॅण्ड सोडावे वाटत नव्हते .................
त्याच्या अश्रूंनी ते पोस्टर ओले झाले होते ..........
पण माया मात्र त्या पोस्टर मधून त्याच्या कडे पाहून स्मित हास्य करत होती .....…......
ते पाहून सतीश आणखी रडायला लागला ...….........
आज सतीश कोणतीही नोकरी करीत नाही ,
कोणतेही काम करत नाही ...........
तो फक्त एकच काम करतो ...........
रोज गावावरून काळेगावच्या बसस्टँड वर येतो ...........
आणि तिथे कुणी एकटे असले तर त्याची रात्रभर साथ देतो ..........
आणि सकाळी परत गावाकडे निघून जातो …........
आजही बस मध्ये त्याच्या जवळ ते मायाचे पोस्टर असते ,
ज्याच्यावर बेपत्ता लिहिलेले आहे ...........
................…...........समाप्त..............……...............