Raghunath Master .. A terrifying experience books and stories free download online pdf in Marathi

रघुनाथ मास्तर.. एक भयानक अनुभव

रमेश मुंबई वरून गावी आला होता ,
तो जवळपास पंधरा वर्षानंतर परत आला होता ,
पण आज त्याला शेताच्या खरेदीसाठी गावी यावे लागले होते ........

गाव फार बदलले होते ,
गावची नदी , गावातील घरे , टेकड्या पार बदलल्या होत्या ...........

गावात त्याचे बालपण गेले होते , पण नोकरी साठी त्याला फॅमिली सहित मुंबईला जावे लागले ......

त्याची अजूनही गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती .....

काकांच्या घरी तो मुक्कामी राहिला ......

वाटले की गावात एखादं एकर शेती असावी , जेणेकरून गावी येणे जाणे राहील .......

म्हणून त्याने गावाकडे एक एकर शेती घ्यायची ठरवली ,
त्याने एका दिवसात खरेदीचा कार्यक्रम उरकला ......

त्याने फिरता फिरता एक फेरफटका गावाकडे मारला ......

त्याला शाळेतील दिवस आठवले , शाळा आता बंद पडली होती .........
पण बालपणीच्या आठवणी त्याच्या समोर उभ्या राहत होत्या .......

आपण शाळेत असताना केलेल्या खोड्या , गमती जमती त्याला आठवत होत्या ......

शाळेजवळच नदी होती .......
तिकडे बरीच झाडे होती ........

तिकडे कुणाचेही मन रमेल असे वातावरण होते , अगदी गावच्या बाहेर रघुनाथ मास्तरांचे घर होते ......

रघुनाथ मास्तर म्हणजे पहिली ते पाचवी पर्यन्त रमेशचे वर्गशिक्षक होते ..........

रमेशला वाटले चला एकदा रघुनाथ मास्तरांची भेट घेऊयात आणि उद्या सकाळच्या बसने मुंबईला निघून जाऊ ....................

गावात फिरता फिरता , सायंकाळचे पाच वाजून गेले होते ...........

रघुनाथ मास्तरचे घर हे गावच्या अगदीच बाहेर होते .......

रमेश झपाझप पावले टाकत मास्तरांच्या घराकडे निघाला ..........

चालताना त्याचे मन त्याला म्हणत होते , की नको जाऊ तिकडे .......
मास्तर घरी असतील किंवा नसतील .......???

पण त्याला चालताना आठवले की आज गुरुपौर्णिमा आहे , जावेच लागेल ......
आणि मास्तरांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मला चैन पडायची नाही .......
ज्याने आपल्याला घडवले अशा गुरुची भेट घ्यायला नको का ?????

तो आणखी वेगाने मास्तरांच्या घराकडे निघाला .......

मास्तरचे घर आता ,
जवळ च आले होते ........

त्याला तिथे जाऊन नवल वाटले ,
कारण मास्तरांच्या घराला जे लाकडाचे फाटक होते .....
ते आता मोडून पडले होते ........

रमेशने हाताने ते बाजूला करून ,
आत अंगणात प्रवेश केला .......

मास्तरांच्या घराला , आता घरपण राहिलेच नव्हते .........

व्हरांड्यात कोळ्यांचे जाळे ........
घराचा रंग मालिन झालेला .....
धूळ इतकी साचलेली की जणू किती तरी वर्षे इथे कुणीच राहत नसावं ............

त्याला बालपणीचे एक एक क्षण आठवू लागले , की कसे आपण मास्तरांच्या घरी यायचो ......
इथे व्हरांड्यात बसून , मास्तरांशी गप्पा मारायचो .......

मास्तरला एक मुलगी होती , बायको तर मुलगी झाली तेव्हाच वारलेली ........
पण तिचे बहुतेक लग्न झालेले असावे .......

कारण रमेशच तर तीस वर्षाचा झाला होता .........

रमेश दरवाजावर ठाक ठाक करून ठोकत होता .......

पण आतून काहीच आवाज आला नाही ,
ते घर खूप शांत वाटत होते .....

जणू आतमध्ये कुणीच नव्हते .......

न राहावून रमेशने दरवाजा लोटला ......

तसा कर कर आवाज झाला , आणि दरवाजा उघडल्या गेला ........
जणू तो दरवाजा रमेशच्या ढकलण्याची वाट बघत होता की काय ?????

रमेशने आवाज दिला ......
"" मास्तर ..........
ओ मास्तर ...........कुठाय तुम्ही ????"""

आतून काहीच आवाज आला नाही , आत भयानक अशी शांतता .........
काहीच प्रत्युत्तर नाही ........

रमेशला थोडे अजीब वाटले ,
कारण आत कुणीच नव्हते .........

रमेश घरात हिंडु लागला ,घरात कुबट असा वास येत होता ...........
पूर्ण घर आतून धुळीने माखलेले होते .........

घरातील खुर्च्या तर धुळीने भरून गेल्या होत्या .….....

काय अवस्था करून ठेवली यार मास्तरने घराची , मुलगी होती तेव्हा मास्तर घर स्वच्छ ठेवायचे ......पण आता केवढी ,घाण ही .......

मास्तर म्हातारे झाले असेल बिचारे ........
झोपले तर नसतील ना ...........????

म्हणून रमेश मास्तरांच्या झोपायच्या खोलीत गेला ..................

"""अरे बापरे मास्तर तुम्ही इथे झोपले वाटते ......""
रमेशला पलंगावर कुणीतरी झोपलेले दिसले .........
म्हणून रमेश म्हणाला ....

मास्तर अगदी अंगावर पांघरून घेऊन , झोपले होते ....…............

रमेशने पांघरुणाला हात घातला ........

""मास्तर ओ मास्तर मी रमेश .......
उठा की आज गुरू पौर्णिमा आहे .....
म्हणून भेटायला आलो मी ........
खूप वर्ष झाले आपली भेट नाय ....."""

असे म्हणून रमेशने मास्तरांच्या पायाला हात लावला ................

रमेशने हाताकडे बघितले तेव्हा त्याच्या हाताला धूळ लागली ........

त्या पांघरुनावर चांगलीच धूळ साचली होती .........

""मास्तर .......ओ मास्तर ... ""

पण पांघरुणातुन काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही .....

रमेश थोडा घाबरला ....
त्याला वाटले मास्तर गेले तर नसेल ना ?????

पण त्याने तसल्ली म्हणून पांघरून बाजूला ,
केले .........

त्याची पार निराशा झाली ........

कारण पांघरुणात मास्तर नसून , मास्तरचे बरेच कपडे ,
आणि काही पुस्तके आबडधोबड झाकलेली होती .........
त्यावर धुळीचा थर साचलेला होता .......

पण आता त्याची भीती सुदधा कमी झाली होती .......

""मास्तर नेमके गेले तरी कुठे ??????
जाऊद्या गुरू पौर्णिमा निमित्त काही भेट होत नाही यार मास्तरांची ......."""
असे म्हणून तो हॉल मध्ये आला ......

रमेशला धक्क्काच बसला .......

कारण हॉल मधल्या खुर्चीवर ,
मास्तर बसले होते ..........

मास्तर आता थोडे म्हातारे झाले होते ,
डोळ्यावर चष्मा .......
डोक्यावर धुळीने माखलेली टोपी ......
आणि चेहऱ्यावर बऱ्याच सुरकुत्या .........

पण मास्तरांची नजर अजूनही बदललेली नव्हती .........

तेवढेच तेज ........
अगदी रमेशला वाटले की मी तेवढाच लहान आहे ........

रमेश पटकन मास्तर बसलेल्या खुर्ची जवळ गेला आणि मास्तरचे दर्शन घेतले ........

""" मास्तर आज गुरुपौर्णिमा आहे .....
आशीर्वाद द्या ........."""
असे म्हणून रमेश मास्तरांच्या पाया पडला ......

मास्तर खोकत खोकत रमेशला उठवू लागले .......

""पण कोण रे तू ?????
मी काय ओळखले नाही .. . """

मास्तर त्याला उठवत म्हणाले .....

रमेश मास्तर कडे प्रेमाने बघत म्हणाला ,
""" मास्तर मी शंकर रावचा रमेश ......
मी मुंबई ला असतो ना ....
तुम्हाला जाण्याअगोदर भेटलो होतो ......"""
बोलताना रमेश च्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते .......

"""हा रम्या .......
किती खोडकर होतास रे तू ??
आता केवढा मोठा झालाय ......तू ......""
मास्तर घोगऱ्या आवाजात खोकत खोकत बोलत होते .........

"""मास्तर बरे आहेत ना तुम्ही ???
काय हाल करून ठेवले स्वतःचे ,
कविता कुठाय ????""
रमेशने प्रश्नावर प्रश्न विचारले ....

"""तुला तर जे दिसते तेच खरं आहे रे .......
कविताचे लग्न झाले , कधी कधी बोलावत असते मला तिच्या गावी .......
पण आता मला पहिल्या सारखे काम सुद्धा होत नाही .......
आता फक्त ,
माझी यातून सुटका करू दे .........
मी गुंतून पडलोय रे , लवकर मरण येऊ दे ........""
मास्तर हपापलेल्या स्वरात म्हणाले .......

"""मास्तर आज गुरू पौर्णिमा आहे ,
आज असे नका म्हणू ......
तुम्ही मला खूप काही दिलेले आहे , जसा कच्चा घडा घडवून पक्का केला जातो तसे मला तुम्ही घडवलेत ........
हे घ्या तुम्हाला ......"""
असे म्हणून रमेशने खिशातले पैशाचे बंडल काढले ,
आणि मास्तर च्या हातावर टेकवले ......

बघता बघता मास्तरांच्या डोळ्यातून टचकन अश्रू खाली ओघळले .......

"""नको रे बाबा , तू आलास दोन शब्द बोललास यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती आहे ?
राहू देत ......""
मास्तर रमेशला म्हणाले ....

पण रमेश काही ऐकायला तयार नव्हता ....
बहुतेक दोन हजार रुपये असतील त्या बंडलात ......

त्याने मास्तरांच्या खिशात ते बंडल घातले , काळजी घ्या सर असे म्हणून त्याने मास्तरांची रजा घेतली .......

मास्तर जाता जाता रमेशला म्हणाले .....
"" बाळा रमेश एकदा कविताला भेटून येशील , रायगाव ला आहे ती ........
आणि तिला माझा निरोप नक्की सांगशील की बाबा खुश आहेत म्हणून ......"""

रमेशच्या डोळ्यात पाणी आले ....

आता बाहेर बराच अंधार झाला होता , तो खूप खुश होता ............
कारण आज त्याला गुरू पौर्णिमा निमित्त गुरुची भेट झाली होती .........

तो झपझप पावले टाकत काकांच्या घरी पोचला ............

जेवण आटोपून तो काकाशी शेताच्या खरेदी बद्दल चर्चा करू लागला......
थोड्या वेळाने रमेश काकाला म्हणाला ....

""""काका आज रघुनाथ मास्तरांची भेट झाली होती , त्यांच्या घरी ........"""

काका त्याच्या तोंडाकडे बघतच राहिले .......

त्याने विचारले ...
"" काका काय झाले ?
असे का बघत आहात ???""

काका म्हणाले ....
""" अरे दोन वर्षे झाली मास्तर काही गावात आले नाही .…..
ते त्यांच्या लेकीकडे गेले ....
असे लोक म्हणतात ......
पण ते या दोन वर्षात कधीच दिसले नाही .....""

रमेश हसत म्हणाला .....
"" मला सुद्धा थोड विचित्रच वाटलं त्यांना भेटून , पण ते असतात घरी .....
आणि हा मला उद्या त्यांच्या मुलीच्या घरी जायचंय .....
कविताच्या घरी .........."""

काका मान हलवत दुजोरा देत होते ,

"" चला करतो मी आराम .....खूप थकलोय आज .....
असे म्हणून कपडे बदलून , रमेश झोपी गेला .......

सकाळी उठून सकाळच्या बसने ,
सर्वांचा निरोप घेऊन रमेश रायगावला गेला ......

कविताच्या घराचा पत्ता त्याने मास्तर कडून घेतलाच होता ...........

कविताच्या घरी गेल्यावर त्याची आणि कविताची भेट झाली .........

कविता आता चांगलीच एक गृहिणी स्त्री झाली होती , दोघांच्या बऱ्याच वेळ गप्पा रंगल्या .........

कविताचा नवरा सुद्धा बोलका होता , त्यामुळे .....
जेवण खावन सर्व वेळ त्याच्यातच गेला .......

रमेशला अचानक आठवण झाली .......

""" अरे कविता तुझ्या घरी गेलो होतो ,काल ....."""
रमेश हळूच बोलला ........

तसे कविताच्या डोळ्याला टचकन पाणी आले ......

रमेश पुढे बोलू लागला .....
""बाबा भेटले होते तुझे .........कविताला भेट म्हणे ......
तुझी खूप काळजी करतात ते ......
खूप गप्पा मारल्या आम्ही ......"""

रमेश हसत बोलू लागला ........

कविता आणि तिचा नवरा दोघेही ,
त्याच्या चेहऱ्या कडे बघतच राहिले .......

त्यांना धक्काच बसला .........

कविता म्हणाली .....
""" रमेश तुझी तब्बेत ठीक आहे ना ????"""

रमेश हसत म्हणाला .....
"" हो का काय झालं .......???"""

कविता सरळ उठली , आणि रमेशच्या हाताला पकडून देव्हाऱ्यात घेऊन गेली ..........

रमेशला धक्काच बसला .......

कारण .......
समोर ..........

समोर रघुनाथ मास्तरांचा फोटो भिंतीवर लटकलेला होता ............
त्यावर हार चढवला होता ........

रमेश घाबरत म्हणाला .....
"" अरे जिवंत माणसाच्या फोटोला ........
हा .......हा ......हार ...........""""

कविताचा नवरा ,
रमेशला म्हणाला .......

"""रमेश तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय ..........
बाबा दोन वर्षापूर्वी वारले .....
शेवट त्यांचा आजारी पणातच गेला ....तुम्हाला काहीतरी भास झालाय ........"""

""""अहो मास्तरला पै ..........."""
अर्धवट बोलत रमेशने खिशाला हात लावला ........

कचकन खिशात हात घातला .......

त्याला पुन्हा धक्का बसला .......

कारण त्याच्या खिशात पैशाचे ते बंडल जसेच्या तसे होते .............

त्याने पैसे मोजून बघितले .........

बाकी चिल्लर दुसऱ्या खिशात होती , आणि दोन हजार रुपये ..........
जसेच्या तसे होते .........

त्याचे डोके फुटून जाण्याची वेळ आली होती .......

त्याला दरदरून घाम फुटला .........

त्याचे लक्ष त्या फोटोकडे गेले ........

मास्तरांच्या फोटोत , मास्तर रमेशकडे पाहून स्मित हास्य देत होते .............

रमेशला चक्कर आल्यासारखे वाटले .........

कसाबसा सावरत तो समोरच्या खोलीत येऊन बसला ................

कविताला भेट म्हणून त्याने ते बंडल तिला दिले .............

आणि न राहावून पुन्हा देव्हाऱ्यात जाऊन मास्तरांच्या फोटोचे दर्शन घेतले ...........

पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने कविताचा निरोप घेतला ........

आणि सरळ मुंबईची बस पकडली .........

तो विचार करत होता ......
""" मास्तर तर वारले होते ,
पण काल भेटलेले .......
भु ......भूत होते का ......???""",

""नाही नाही ते मास्तरच होते ..........
काल गुरूपौर्णिमा निमित्त ते मला भेटले .......
त्यांनी मला खरी गुरुपौर्णिमा घडवली ..........
माझे भाग्यच आहे ते .................""""

असे म्हणून रमेशला डोळा लागला ............
थोड्या वेळाने जाग आली तेव्हा ,
रमेश बस मध्येच होता ,
शेजारच्या सीटवर त्याचे लक्ष गेले तेव्हा .......
त्याला पुन्हा धक्काच बसला ..........

कारण एक म्हातारा हुबेहूब रघुनाथ मास्तर सारखाच दिसत होता .........
आणि रमेश कडे पाहून हसत होता ..........

पण रमेशने डोळे चोळले , तेव्हा त्याला कळले की तो म्हातारा रघुनाथ मास्तर नव्हता ..............

..….…............…...............समाप्त...................


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED