जानू - 7 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जानू - 7

चाळीच्या मधोमध कट्ट्यावर दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना झाली..सर्वांनी मिळून आरती केली.अभय खूप श्रध्देने सर्व कामे करायचा..नवरात्रीला दररोज नव नवीन कार्यक्रम घेतले जायचे .एकदम छान वातावरण असायचं.
मस्त दिवस जात होते ..रोज जानू ला पाहणं दिवसातून किमान एकदा का होईना तिच्या सोबत बोलणं ..खूप खुश होता अभय .

नवीन वर्ष सुरू झाल. मकसंक्रांती दिवशी तर जानू काही बाहेर येईना म्हणून अभय ,संजू,बिट्टू तिच्या घरी गेले ..दारातून आत जाणार तोच समोर जानू चे बाबा दिसले ..संजू आणि बिट्टू ने तर तिथून पळ काढला ..अभय ही आत न जाताच मागे वळून जावू लागला की इतक्यात जानू च्या बाबांनी त्याला पाहिलं ..

बाबा: काय रे अभय ?

अभय खूप घाबरला ..घाबरतच तो बोलला.

अभय:काका ते मी तिळगुळ द्यायला आलो होतो .

बाबा :अरे मग आत ये ..चाललास का ?

अभय आत गेला त्याने बाबा ना तिळगुळ दिलं त्यांचा आशीर्वाद घेतला ..जानू त्याला कुठेच दिसली नाही..तो वळून चालू लागला ..दारातून बाहेर गेलाच होता की जानू ने अभय ला आवाज दिला.
जानू ने आतून तो आलेलं पाहिलं होत..ती बाहेर येऊ पर्यंत हा निघून चालला ही होता.

जानू : तिळगुळ घ्या गोड बोला..आमचं तीळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको..

म्हणून जानू हसू लागली..

अभय: तुला पण तिळगुळ घे गोड बोल..तुझ्याशी कशाला भांडेन जानू ?

जानू परत आत निघून गेली .अभय ही खुशीत घरी गेला ..दुसऱ्या दिवशी संजू आणि बिट्टू त्याला चिडवत होते ..,"दिलेस का रे तिळगुळ ..? "

अभय : तुमच्या सारखे मित्र असले की झालं कल्याण .. नालयकानो मला एकट्याला सोडून पळून गेला?

संजू: अरे नाही रे तिच्या बाबा ना पाहून भीती वाटली रे ?

आता दोघे ही १०वी ला होते हे वर्ष खूप महत्त्वाचं होत ..दोघे ही मन लावून अभ्यास करत होते .. अभय तर जानू आपल्या आस पास आहे इतक्या नेच खुश होता..जानू ने मात्र कधीच अभय चा विचार मित्रा पलीकडे केला नव्हता त्यामुळे त्याला आपण आवडतो याची कल्पना ही नव्हती तिला..तो ही आपल्याला मैत्रीण समजतो असच तिला वाटे.

१० वी पूर्ण झाली दोघांना ही चांगले मार्कस पडले ..जानू ज्या कॉलेज ला जाईल तिथेच आपण जायचं अस अभय ने आधीच ठरवून ठेवलं होत..पण आपण विचार करतो त स..होत मात्र नसत..अभय ला बाबांनी वाणिज्य शाखेतून प्रवेश घ्यायला लावला.. व जानू विज्ञान शाखे ला गेली..दोघांची कॉलेज वेगवेगळी..वेळा ही वेगवेगळ्या..अभय खूपच हिरमुसला ..त्याला त्याची कॉलेज लाईफ जानू बरोबर एन्जॉय करायची होती ..पण झालं उलट ..कॉलेज ला जाताना कधी कधी जानू आणि अभय एकाच बस ला असत ..अभय च कधी कधी मुद्दाम लवकर जात असे ..जानू साठी ..पण दररोज जाणं त्याला होत नसे.त्यात कॉलेज सुटलं की जानू तिच्या मैत्रिणी बस स्टँड ला येत असत ..कारण कॉलेज जवळ बस थांबली की त्यांना जागा मिळत नसे ..त्यामुळे बस चुकत असे ..अभय ही कधी कधी कॉलेज चे तास चुकवून जानू घरी जाण्याच्या वेळेत बस स्टँड वर पोहचत असे..तिच्या मागच्या सीट वर बसून तिला पाहण्यात दंग होत असे..अभय च्या या अशा हरकती आता जानू च्या ही लक्षात येऊ लागल्या होत्या आणि तिला त्याचा खूप राग येऊ लागला होता ," ..हा का वेड्या सारखा एकटक पाहत असतो आपल्याला ..? हा तर आपला फक्त मित्र आहे ...याला का कळत नाही आता आपण मोठे झालो आहोत .? .शेजारचे लोक काही पण बोलू लागलेत त्याच्या अशा पाहण्याने शेजारचे मला चिडवतात.."

जानू चा अभय वरचा राग वाढत चालला होता..आणि अभय च प्रेम किती तरी पटीने वाढू लागलं होत.
क्रमशः