Janu - 16 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 16

जानू लायब्ररी मध्ये असते ..सेमीस्टर जवळ आलेले असतात..त्यामुळे ती स्टडी साठी बुक शोधत असते .. बुक शेल्फच्या दुसरी कडे समीर उभा असतो ..तो अचानक जानू समोर येतो आणि जानू अचानक समीर ला पाहून दचकते.

समीर : ये घाबरायला काय झालं पागल पोरी ?

जानू : तूच भुता सारखा समोर येतोस आणि मलाच पागल बोलतोस ?

समीर : हे धर स्टडी साठी बुक ..खूप महत्त्वाचं आहे हे .

इतकं बोलून तो तिथून निघून ही जातो .

जानू विचार करते याला सर्वच कसं कळत ..मी जे बोलत नाही ते सुध्दा हा समजून जातो .

पावसाळ्याचे दिवस असतात ..कॉलेज सुटत आणि अचानक पाऊस सुरू होतो. ..जानू थोडा वेळ वाट पाहते की पाऊस थांबेल व मग घरी जावू..पणं पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही मग जानू पावसातच घरी जायला निघते समीर तिला भिजताना पाहतो ..पणं ती आपल्याच गडबडीत निघून जाते. .अजून घरी पोहचत च होती जानू की तिचा फोन वाजतो ..समीर चा फोन असतो ..अरे आताच तर कॉलेज मधून आले लगेच कशी याला आठवण आली? ती फोन उचलते ..

समीर : हॅलो,ये तू मूर्ख आहेस का ?डोकं आहे की नाही तुला ? कधी तर त्याचा वापर करत जा ?

जानू ला त्याचं बोलणं ऐकून शॉक च बसतो ..हा असा का बोलतोय ? मी काय केलं आता ? मित्र आहे म्हणून काही पणं बोलेल का ? खडूस कुठला ? तरी ती शांत पने विचारते ..खर तर तिला खूप राग आलेला असतो आणि काहीच न बोलता फोन ठेवून द्यावा अस तिला वाटत होत.

जानू : असा का बोलतो आहेस ? काय केलं मी ?

समीर : तू भिजत का गेलीस ? थोडा वेळ थांबता येत नव्हता का ?अस कोणत्या परदेशात राहतेस जे विमान चुकत होत तुझं ? आता भिजलीस आता पडशील ना आजारी आधीच आहेस नाजूक बाहुली.?

आता मात्र जानू ला खूप हसू येत .. हा मी भिजले म्हणून इतकं ओरडत होता ? अरे देवा ? काळजी करतो पण ते ही खडूस पणातच ..जानू फोन वर हसते .

समीर : आता हसायला काय झालं ?

जानू : काही नाही काही नाही .

समीर : काळजी घे ..मी ठेवतो फोन .

समीर फोन ठेवतो पणं जानू मात्र त्याच्याच विचारात गुंग होवून जाते ..असा का आहे हा ? किती काळजी करतो .आणि वरून खडूस बनतो .

दिवस भर भर जात होते आणि जानू समीरच्या वागण्याने,बोलण्याने अजुनच त्याच्या प्रेमात गुरफटून जात होती .आता तिला समीर नेहमी आपल्या सोबत असावा आपल्या सोबत बोलावा आपण त्याच्या कडे पाहत बसाव असच वाटत होत पण कधी कधी त्याच्या खडूस पणाचा तिला खूप राग येई ..उगाच आपण त्याचा विचार करतो ..किती खडूस आहे तो तर ..

समीर च ही जानू सोबत बोलणं खूप वाढलं होत ..तो ही नेहमी तिच्या आस पास असायचा .
रात्री समीरचा जानू ला मॅसेज येतो .

समीर : हाय.

जानू : हा बोल.

समीर : जेवलीस ?

जानू : हो ,तू ?

समीर : मी ही जेवलो ..आज शॉपिंग ला गेलो होतो ग.

जानू : तू किती शॉपिंग करतो रे ? मी मुलगी असून ही मी इतकी शॉपिंग करत नाही ..आणि तू तर सारखा शॉपिंग शॉपिंग करतोस .

समीर : हो तू मुलगी आहेस पणं इतर मुलीनं प्रमाणे तुला शॉपिंग च वेड नाही याचं मला ही आश्चर्य वाटत..अग त्यात काय ..काही अवडल तर घेत जा ना ..बर ते जावू दे ..तुझ्या साठी एक गिफ्ट आणल आहे .

जानू : माझ्या साठी गिफ्ट ? पणं कशाला उगाच ?

समीर : अग पाहिलं आणि तुझी आठवण झाली म्हणून वाटलं घेऊ ..पागल पोरी साठी.

जानू : काय आणल आहेस ?

समीर : आणल तुझ्या आवडीच ,पणं भेटशील तेव्हा च देणार.

जानू : ये दे केव्हा पणं पणं दाखव ना ..काय आहे ते तर सांग .

समीर : अग किती उतावीळ पना तुलाच देणार आहे पहा ना तेव्हा.

जानू : ये तू सांग नाही तर मी बोलतच नाही तुझ्या सोबत .

समीर : ये पागल पोरी ..चिडू नको थांब फोटो पाठवतो ..

आणि समीर त्या गिफ्ट चा फोटो जानू ला पाठवतो .जानू तो फोटो पाहून खूपच खूष असते ..त्या फोटोत एक डॉल असते पिवळ्या रंगाची खूपच सुंदर .

जानू : waow .स्वीटू ..

समीर : कोण स्वीटू ?

जानू :अरे ती डॉल ..तिचं नाव ठेवलं मी .

समीर : अजून ती इथेच आहे तो पर्यंत तू तिझ नाव ही ठेवलीस ?

जानू : हो ..मला तर कधी भेटेन अस झाल आहे तिला.

समीर : अग हो हो ..मग सांग कधी भेटायचं ?उद्या ?

जानू : उद्या नको ..परवा उद्या काम आहे ..राहू दे दोन दिवस स्वी ट्टू ला तुझ्या कडे.

समीर : बर ओके ..

जानू : bye

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED