जानू त्याचं कॉफी शॉप मध्ये समीर ची वाट पाहत असते जिथे ते पहिले भेटलेले असतात..समीर येतो ..दोघे ही एकमेकांना पाहून स्माईल करतात...जानू समीर ला स्वीटू म्हणजेच त्याने तिच्यासाठी घेतलेली डॉल कुठे आहे अस विचारते .
समीर : अग तुझी स्वीटू आज जाळली होती..पणं वाचली.
जानू : काय ?
समीर : बॅग मध्ये घालून बॅग बाईक ला अडकवली होती आणि बघ बॅग बाईक तापून थोडी जाळली आहे .बघ डॉल ला कुठे लागलं आहे का ?
अस म्हणून तो ती डॉल जानू ला देतो ..जानू ती पटकन घेते आणि तिला पहाते ..खूप मऊ मऊ असते डॉल ..जानू तिला आपल्या गाला जवळ नेऊन तिचा म ऊ स्पर्श अनुभवते ..हे पाहून समीर खूप हसतो..
समीर : अग इतकी मोठी झाली आहेस तरी अजून कस ली तुझी आवड ?
जानू: आता मोठ झालं म्हणून का डॉल अवडू नये ? मला तर लहानपणा पासूनच आवडतात.. असू दे अशीच आहे माझी आवड ..
समीर : बर बाई .. ती तुझी डॉल...आणि तू माझी गुडिया.
जानू : गुडीया काय ? मी काय गुडी या आहे ?
समीर: हो,तू गुडीया च आहेस ..माझी गुडी या...आज पासून मी तुला माझी गुडी या च म्हणणार.
जानू : बर बाबा म्हण जशी तुझी इच्छा.
समीर : ये आज नाश्ता करायचं गेल्या वेळी सारखं फक्त कॉफी नाही ..मला तर खूप भूक लागली आहे.
जानू : ok बर.
दोघे नाश्ता करतात.. व नंतर घरी जातात.जानू तर आज खूप खुश असते कारण आज ..समीर ने तिला निक नेम दिलेल असत आणि तिला डॉल ही भेटलेली असते आणि समीर ही..समीर किती आवडतो आपल्याला..खरंच पणं फक्त आवडतो का ? नाही आवडी पेक्षा ही जास्त ..म्हणजे खरंच मी प्रेमात पडली की काय समीरच्या ? हो ..पणं त्याला ही मी आवडत असेन का ? अरे आवडत असशील ना ..तो किती काळजी घेतो.. इतारा न साठी तो अँग्री बॉय आहे पणं आपल्या सोबत किती प्रेमाने वागतो..काय करावं ? समीर शिवाय तर एक क्षण ही जात नाही आज काल आपला..पणं सांगावं का त्याला आपण त्याच्या वर किती प्रेम करतो ते ..पणं इतक्या लवकर ?नको लगेच नको..आधी आपण समीर ला आवडतो का ते तर बघू..आणि तस हि त्याला आपण आवडत असलो तरी तो कधी बोलणार नाही..शेवटी खडूसच ना तो ..आपल्यालाच बोलावं लागेल.. पण मी तर ऐकलं होत की मुलच मुलींना प्रपोज करतात ..पणं इथे मला करावं लागेल ? हे देवा ..अस का रे .. नॉर्मल मुली सारखं मला ही का प्रेम मिळत नाही..मी कशाला विचारू पणं ..मी विचारले नाही तर मी म्हातारी होयीन पणं तो काय बोलणार नाही ..आणि मी त्याची वाट पाहत बसून गाडी सुटायची ना ..पणं विचारू च पणं थोडा वेळ तर जावू दे.जानू आपल्याच विचारात झोपी जाते.
दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जाते तर खूप गर्दी असते ..त्यातून ती पाहू लागते काय झालं आहे तर एक मुलगा दुसऱ्या मुलाला खूप मारत असतो आणि तो गप्प मार खात असतो ..समिधा ही तिथे असते .
जानू :काय झालं ग ..समिधा.
समिधा: अग ,त्या मुलाचा चुकून धक्का लागला आपल्या कॉलेज मधील मुलीला..बिचारा कधीच सांगतोय पणं त्याचं ऐकुन घेत..नाही.. स..
समिधा च बोलणं चालू च होत की जानू त्या मारणाऱ्या मुलाचा चेहरा पहाते..आणि शॉक होते ..तो तर समीर असतो..तिच्या तोंडून समीर ..अस बाहेर येत.
समिधा: अग हो समीर च मारत आहे त्याला..बिचाऱ्या मुलाची चुकी नाही ग .धक्का लागला तेव्हा मी ही होते तिथे पणं हा समीर काही ऐकतच नाही..एकदा रागात आला की सगळं विसरतो ..
समीर च अस वागणं पाहून जानू ची तर घाबरून गेली होती..किती भयानक मारतो हा..किती राग ..बापरे..आणि आपण याला प्रपोज करायला चाललो होतो..आपल्या ला च एक ठेऊन दिली त्याने तर आपण तर इथेच बेशुद्ध होवू ..जानू आपल्या विचारात असते ही सर्व जण समीर पासून त्या मुलाची सुटका करतात व समीर ला तिथून घालवतात..जानू त्या मुला जवळ जावून ठीक आहेस का म्हणून विचारते ..तो हो म्हणतो ..जानू कॉलेज हुन घरी येते ..समीर शी बोलायची व त्याला मॅसेज करायची तिची हिम्मत च होत नसते..शेवटी समीर चा च मॅसेज येतो.
समीर : हाय,आज दिसली नाहीस ..लवकर गेलीस का ?
जानू : हो.( आता तुला काय सांगू तुझा अवतार पाहून च तर पळ काढला होता)
समीर : काय करतेस ..? झालं का जेवण ..?
जानू : हो झालं,
जानू विचार करते कॉलेज मध्ये जे झालं त्या बद्दल बोलाव का ? पण बघू बोलून .
जानू : समीर ,तू त्या मुलाचं ऐकुन तर घ्यायचं ना रे ..किती मारल तू त्याला.
समीर : काय ऐकुन घ्यायचं? आणि तुला ही वाटत का माझीच चूक होती? ok बरं तुला ही वाटत असेल ना माझी चूक असेल तर ..bye मला बोलायची इच्छा नाही.
बापरे याला समजवायला गेलं तर हा तर आपल्यावरच राग काढत आहे ..नको बोलायला ..अस म्हणून जानू ही त्याला काही च रिप्लाय देत नाही.
जानू दुसऱ्या दिवशी ही समीर सोबत बोलत नाही..मग पुन्हा समीर तिला मॅसेज करतो .
समीर : ये गुडी या ..इतका राग का ग ? ok sorry माझं चुकलं.
बस मग काय इतकं बोलल्यावर झालं जानू पिघळली ना..का पिघळणार नाही..शेवटी समीर वर तिचं खूप प्रेम होत.पुन्हा दोघे पहिल्या सारखे बोलू लागतात..आणि प्रेमाचं भूत जानू च्या डोक्यावर चढुन बसत.
क्रमशः