लग्नप्रवास - 5 सागर भालेकर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नप्रवास - 5

लग्नप्रवास-५

सासरी जाताना तिला बघवत नव्हते. प्रीती खूप बोलकी असल्याकारणाने ती घरात सर्वांची खूप लाडकी होती. अगदी मामा, मामी, काका, आत्या, मावशी सगळेच रडले.पण तिला तिच्या बाबा आणि भावा व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती.आईला जर बघितलं असत तर तिचा पाय निघालाच नसता कारणही तसेच होते त्याला.

गंध तो रंगीन तिच्या कपाळावर चढला,

मोगरा तो सुंगधी तिच्या केसावर मांडला....

नाचत नाचत पैंजण आले,

हसत हसत बांगड्या आल्या.....

शृंगार तिचा करुनि, तो काजळ डोळ्यात बसला,

ओठावरची लाली खुद्कन हसली......

राखुनी मान सर्वांचे,

साजणा ती साजणी तुझ्यासाठीच सजली........

घरी येण्याच्या आधी दोघांनी मंदिरात गाडी थांबवून सर्वजण पाया पडले.त्यानंतर थेट घरीच आले. त्याच्या स्वागतासाठी दरवाजा रोखून काकी आणि मामी ह्यांनी प्रीतीला उखाणा घेण्यास सांगितला. प्रीतीने उखाणा घेतला आणि काकिने दोघांना ओवाळून प्रीतीला माप ओलांडून यायला सांगितले.मामीने दरवाजा पासून ते देवघर पर्यंत लांबलचक चादर अंधेरलेली होती. दोघेही त्यावरून चालत येऊन पाया पडले. गृहप्रवेश झाल्यावर तिचे स्वागत एकदम आनंदात झाले.सर्वजण थकलेले तरीही दिवसभराच्या आठवणींना उजाळा देण्यात मग्न झालेले.कधी २ तास झाले कळेलच नाही. तितक्यात जेवणाची ऑर्डर आली आणि सर्व जन जेवायला बसले.बेत तसा मस्तच होता.दाल, भात, चपाती, भरली वांगी, मटार कुर्मा.
तिच्या सासू-सासऱ्याच्या चेहऱयावर दिसून येत होते. आणि प्रीतीलाही खात्री होती कि आपण सगळं घर जिकूंन घेऊ आणि सर्वाना आपलंस करू.लग्नाचे सर्व सोपस्कार उरकून प्रीती आता संसाराला लागणार होती. तिच्या मनात विचारच सत्रच सुरु होत. सासरी गेल्यावर नवरा सासरे धीर नीट वागतील ना तिच्याशी. आमचा संसार चांगला होईल ना. सासूबद्दल जरब शंका नव्हती तिच्या मनात. तिला सासू आधीच खूप आवडलेली ती जणू प्रीतीची दुसरी आईच होती. घरातील वातावरण खूप चांगलं होत. सर्व खुश होते. प्रीतीला माहेर आणि सासर आता एकच वाटू लागत होते. लग्नचा दिवशी असल्याकारणाने सर्व खूप थकले होते. अशातच रोहनच्या बहिणीने दोघांना उखाणा घ्याला लावला.

प्रीती: हो नाही म्हणता, लग्न जुळले एकदाचे.....

रोहनमुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे........ आणि लगेचच प्रितीने लाजून मान खाली घातली, आणि पाळी होती रोहनची. प्रथम रोहनने नकार दिला पण सगळ्यचा आग्रहातर त्याने पण उखाणा घेतला.

रोहन: मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, प्रितीबरोबर संसार करिन सुखाचा.......

सगळ्यांनी दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या.

रोहनही स्वभावाने खूप चांगला होता. अगदी आजच्या पिढीचा...... नंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यावर हळूच प्रीतीच्या जवळ जाऊन तो म्हणाला, की आपण दोघे हनिमूनला कुठं जायचं म्हणून.........प्रीती अगदी लाजत होती. तिला सुचेना काय बोलव, लगेचच ती म्हणली, तू नेशील तिकडे मी यायला तयार आहे.

नाती जन्मो-जन्माची

परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरल्या,

रेशीम गाठीत बांधलेली,

प्रेमाचे हे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,

समंजसपणा हे गुपित,

तुमच्या सुखी संसाराचे,

संसाराची ही वाटचाल,

सुख-दुःखात मजबूत राहिलेली,

एकमेकांची आपसातील आपुलकी,

माया ममता नेहमीच वाढत राहिलेली.........

त्या दोघांचा सुखाचा संसार चाललेला बघून घरातली सर्व मंडळी खूप खुश होती.

रात्री प्रीती थकून गेल्यामुळे लवकरच झोपी गेली. जेव्हा प्रीती सासरी पोचले तिचा विश्वासच बसत नव्हता की, सगळेजण माझ्या स्वागतासाठी उभे आहेत.सर्व विधी पार पडल्यावर घरातील एकेक पाहुणेमंडळी जाऊ लागली आणि घर रिकामं झालं. त्या घरात फक्त सहाच जण राहत होती.जेव्हा प्रीती खोलीत गेले तेव्हा तिने पाहिलं की, रोहन बेडवर झोपला होता .प्रीतीला खूपच भीती वाटत होती. मी जशी खोलीत आले तशी त्यांना जाग आली आणि ते उठून उभे राहिले. तेव्हाच कदाचित पहिल्यांदा त्या दोघांनी एकमेंकाना इतक्या जवळून पाहिलं. रोहन दिसायला एकदम अकुंश चौधरींसारखे होते पण प्रीतीच्या सावळ्या रंगामुळे तिला त्यांच्या नजरेला नजर द्यावीशा वाटत नव्हती. त्याचवेळी तो अचानक प्रीतीच्या जवळ आला आणि मला म्हणाले की, घाबरू नकोस मी काही तुला खाणार नाहीयं. मान्य आहे की, आपलं लग्न खूपच घाईघाईत झालं. पण हळूहळू प्रेमही होईल. आधी आपण एकमेंकाचे चांगले मित्र बनूया, मग प्रेमी आणि मग जोडीदार. तेव्हाच दोघांना एकांत भेटला आणि दोघांनी हनिमूनला कुठे जायचे ठरवलं. प्रीतीचा म्हणणं होत की, आपण सध्या खूप लांब नको जाऊया. महाबळेश्वर पण चालेल. तेव्हा लगेचच रोहनने होकार्थी मान हलवली. लगेचच रोहनने हनिमून ट्रॅव्हल्सला फोन करून ह्या संबंधी सूचना दिली.

लग्नानंतरची प्रीतीची पहिलीच रात्र होती. तसा रोहनही खुप खुश होता. रात्री दोघेही आपल्या खोलीत गेले. तेव्हा रोहनने तिला विचारले, तुला तुझ्या भावी नवऱ्याबद्दल काय अपेक्षा होत्या. तेव्हा लाजूनच प्रितीने उत्तर दिल. माझी अशी अपेक्षा होती, की माझा नवरा समजूतदार, गोरापान, सुंदर असावा. त्याला नात्याची खूप ओढ असावी. आणि नशीब माझं एवढं चांगलं कि, मला खरंच चांगला नवरा आणि घरातली माणसं ही चांगली मिळाली. दोघेही कधी एकदाच घर सोडत आहेत आणि कधी एकदा प्रवासाच्या दिशेने वाटचाल करू असे झालं होत दोघांना. आणि खरंच तेव्हाच दोघांना एकांत मिळणार होता.
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे रोहन आणि प्रीतीचा उपवास होता. अजुन काही विधी पार पाडायच्या होत्या म्हणून पाहुण्याची ओढ घराकडे येऊ लागली. दोघांना रांगोळी काढलेल्या पाटावर बसून त्या दोघांची हळद उतरवण्याच्या कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर लग्नात दोऱ्याने बांधलेले हळकुंड सोडले.त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अंगठी सोडण्यात आली आणि ती प्रथम कोण शोधतेय ह्याचा कार्यक्रम पार पडला ह्यात प्रीतीने रोहन वर बाजी मारली. अशाप्रकारे सर्व विधी पार पडल्या.
तिसऱ्या दिवशी दोघेही लागले तयारीला. नेहमीप्रमाणे सकाळी रोहन आणि प्रीती नाश्ता आणि चहा घेऊन बसची वाट बघत होते. तेवढ्यातच रोहनच्या आईने एका डब्यात लाडू दिले आणि म्हणाली बस मध्ये भूक लागली. रोहन आणि प्रीती दोघेही आज खूप आनंदांत होते. महाबळेश्वर ह्यापूर्वी दोघांनाही पहिले नव्हते. प्रीतीची आई व बाबा त्याच्या हनिमूनला तिकडे गेले होते. तेव्हा आईने थोडी फार माहिती ह्याबद्दल प्रीतीला दिली होती. प्रीतीला फिरण्याची खूप आवड होती. लहानपणी ती तिच्या मावशीकडे, आत्याकडे राहायला जात असे. एक वेगळाच आनंदाचा क्षण असायच्या तिच्या आयुष्यात.

अल्लड सांज,

अवखळ वारा,

हात तुझा होती,

जणू रेशमी मोहपिसारा,

अशांत सागर,

उधाण लाट,

प्रेमरंगात सजलेले,

अधरे ललाट...........

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला. नक्की आम्हला तुमची प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढील भागात.