Premacha chaha naslela cup aani ti - 58 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५८.





आता पर्यंत आपण बघितले.....

१८ जुलै फायनल सबमिशन... पूर्ण तयारी करून ती कॉलेज साठी रेडी होते..... सर्वांच्या आशीर्वादाने बाहेर पडते..... कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना तिची स्कूटी फीसलते आणि ती जाऊन एका झाडाला आदळते....

झाडाला आदळल्यावर तिची शुद्ध हरपते..... ती तशीच पडून राहते..... तब्बल तीन तास लोटून जातात.... ती अजूनही बेशुद्ध असते.....

जिथे जाऊन सुकन्या आदळते ते क्षेत्र राखीव असतं.... तिथलं सर्वेक्षण करायला आज एक टीम तिथे आलेली असते.... ती टीम आत सर्वेक्षण करण्यात व्यस्त असल्यामूळे त्यांचं लक्ष तिच्याकडे जात नाही.... जेव्हा ऑफिसर्स बाहेर येतात आणि बघतात त्यांना सुकन्या पडून असलेली दिसते..... तिला बघून लगेच ते सर्वांना मोठ्याने आवाज देत बोलावून घेतात..... सगळे लगेच तिथे पोहचतात..... तिथले एक ऑफिसर सचिनचे चांगले मित्र असतात.... ते सुकन्याला ओळखतात....

ऑफिसर : "अरे, सचिनच्या भावांची मुलगी.... हिला काय झालं....?"

दुसरे : "माहीत नाही सर.... मी आता बघितलं तर दिसल्या ह्या मॅडम....."

ऑफिसर : "लगेच ॲमब्युलंस बोलावून घ्या.... खुप वेळ ह्या अशाच पडून असल्याचं समजतंय..... फास्ट....."

ताबडतोब तिथे ॲमब्युलंस बोलावण्यात येते..... सुकन्याला हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात येतं..... सचिनचे मित्र त्याला कॉल करून सगळी कल्पना देतात.... तो लगेच सर्वांना कळवतो आणि सगळे हॉस्पिटलसाठी रवाना होतात.....

सगळ्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकतो.... सर्वांची लाडकी आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं....

आजी : "सल्लू....."

सल्लू : "कुछ नहीं होगा उसे..... टेन्शन मत लें...."

सगळे एकमेकांना धीर देत असतात..... थोड्याच वेळात आजोबा ही तिथे येऊन पोहोचतात..... आजी त्यांना बघून पळतच जाऊन त्यांना बिलगते.....

आजी : "रवी, बघ ना आपली पिल्लू अरे....."

आजोबा : "काहीही होणार नाही तिला.... काळजी नका करू...."

ते आजीला धीर देतात मात्र, त्यांनाही वाईटच वाटतं..... डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू असते..... दीड तास सगळे टक लावून त्या रूम कडे पापणी न हलवता बघत उभे असतात.... दीड तासानंतर डॉक्टर बाहेर येतात....

सगळे काळजीपोटी तिकडे पळत सुटतात.....

आजोबा : "डॉक्टर....??"

डॉक्टर : "डोन्ट वरी...... धोका टळला आहे....."

सगळ्यांच्या जीवात - जीव येतो....

डॉक्टर : "धोका टळला असला तरी, त्यांना सध्या कोणीही भेटू शकणार नाही..... ना कोणाच्या सहवासाने त्या शुद्धीवर येतील..... सो, बी प्रॅक्टिकल.... वेट करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये....."

आजोबा : "बरं....."

डॉक्टर : "पेशंटची काळजी आम्ही घेतो.... तुम्ही स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या..... टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये.... ती स्ट्राँग आहे..... ट्रीटमेंटला लवकर रिस्पॉन्स दिला.... होईल सर्व ठीक.... येतो मी...."

डॉक्टर निघून जातात......

आजोबा : "बरोबर तर बोलले ते..... आपल्याला सिच्युएशन प्रॅक्टिकली विचार करूनच हॅण्डल करावी लागेल..... असं इमोशनल होऊन ती शुद्धीवर येणार नाही.... मला वाटतं सर्वांनी त्यांच्या रूटीन मध्येच राहावं..... उगाच विचार करत बसलो की, सर्व काम बिघडतं..... मी असं म्हणत नाही की, तिची काळजीच करू नका... पण, तिला पेशंट म्हणून ट्रिट केलं तर तिलाच वाईट वाटेल..... सो, आपण नॉर्मल असलो म्हणजे, ट्रिटमेंट झाली की, ती ही नॉर्मल बिहेव्ह करेल...."

सल्लू : "आय थिंक, आजोबा ठीक बोल रहे हैं...."

आजी : "खरंय तुझं..... जमल्यास शांत रहायचं.... कारण, हे बघा जे व्हायचं तेच होईल..... पण, त्यासाठी आपल्या हातात जे आहे ते बिघडायला नको.... म्हणजेच आपली तब्येत... आपण जर तिच्या काळजीत असलो तर, आपल्याला ऍडमिट करायची पाळी येऊ शकते....."

सगळे : "बरोबर आहे...."

आजी : "इथे कोण थांबेल....??"

जया : "मी आणि संजू थांबतो....."

आजी : "गूड.... अशीच स्माईल ठेवायची नेहमी.... जेव्हा आपण सगळे ती बरी झाल्यावर भेटू तेव्हा नॉर्मली भेटायचं म्हणजे, जास्त काही झालंच नाही असं..... नाहीतर उगाच ती टेन्शन घेत बसेल...."

सल्लू : "डोन्ट वरी..... हम सब ध्यान रखेगे....."

जया आणि संजय हॉस्पिटलमध्येच थांबणार असतात..... बाकी सगळे घरी निघून जातात.....

काही दिवस असेच रोज सुकन्याला बघायला सगळे येतात आणि जास्त पॅनिक न होता तिला बघून निघून जातात....

दिवस जातात..... हळू - हळू सुकन्या रिकव्हर होते....... सगळे तिला टेन्शन मध्ये असलेले त्यांचे फेस दाखवत नाहीत..... हॅप्पी फेसेस सोबतच ते तिला जाऊन भेटतात..... पण, तिला सगळं कळतं.......

तिला डिस्चार्ज मिळतो आणि ती घरी येते..... थोडा विकनेस त्यामुळे तिला रेस्ट करायचा असतो...... सगळे तिची खूप काळजी घेतात..... हळू - हळू जो - तो डेली रूटीन मध्ये बिझी होतो...... कलिका कधी तरी सुकन्याला भेटून जाते..... सुकन्या सुद्धा तिला भेटून खूप सुखावते......

असेच दिवस जातात..... एक दिवस आजोबा शौर्यला घेऊन घरी येतात...... सगळे हॉल मध्येच बसून असतात..... त्याला बघून सगळे खुश होतात..... पण, सुकन्या पाहिजे तितका रिस्पॉन्स देत नाही.... नेहमप्रमाणेच..... काही नविन नाही यात.....

आजी : "अरे, शौर्य... बाळा कसा काय आज इकडे??"

शौर्य : "हो मला सुकन्या बद्दल समजलं म्हणून आलो...."

आजी : "बरं केलं.... ये बस...."

तो सगळ्यांसोबत येऊन बसतो..... सगळ्यांच्या गप्पा रंगतात..... शौर्य सुकन्याकडेच बघत असतो..... ती मात्र त्याच्याकडे न बघता शांत खाली मान टाकून बसून असते....

शौर्य : "हॅलो सुकन्या..... कसं फिल होतंय तुला आता....?."

सुकन्या : "गूड...."

अशाच काही वेळ गप्पा रंगतात...... मग सगळे जेवण करतात...... सुकन्या शांत राहूनच सगळं आटोपते.... सगळं झाल्यावर....

सुकन्या : "निन्नि मला झोप येतेय..... मी जाऊ....?"

आजी : "जा बाळा.... आराम कर.... उर्वी.... जा तिला आत घेऊन जा....."

उर्वी : "हो...."

तिला आत घेऊन जात असता, ती एक नजर शौर्यकडे बघते.... तो तिला हलकेच गालात हसून बघतो..... ती पटकन मान वळवते...... उर्वी तिला रूम मध्ये सोडून सर्वांसोबत येऊन बसते..... सगळ्यांच्या थोडा वेळ गप्पा चालतात..... नंतर शौर्य निघून जातो....

आजी : "किती मनमिळावू आहे ना शौर्य...."

सल्लू : "हो ना...."

आजी : "अरे, रवी तू प्रोजेक्ट सुरू करायचं म्हणत होतास त्याचं काय झालं?"

आजोबा : "हो ते बस सुरू होईल काहीच दिवसांत.... शौर्य तेच बोलायला आला होता...."

आजी : "बघ किती क्युरिओसिटी त्याला..... सुकन्या आणि शौर्य मध्ये किती सिमिलारिटीज आहेत ना...... म्हणजे, दोघांनाही नवीन गोष्टी शिकण्यात मज्जा वाटते.... आवडीने करतील ते...... इतका विश्वास दिसतो त्यांच्या बोलण्यातून....."

आजोबा : "हो खरंय....."

काही वेळ सगळ्यांच्या इकडच्या - तिकडच्या गप्पा चालतात.... नंतर सगळे झोपायला निघून जातात.... तिकडे सुकन्या झोपून असते...... नंतर तिला रात्री दोन वाजता जाग येते.... ती उठून गॅलरी मध्ये जाऊन बसते..... खूप वेळ तशीच बाहेर बघत बसून असते..... कुठलेतरी विचार तिला अजूनही छळत असतात.....

सुकन्या : "शौर्य इतकाही वाईट नाही...... मग मी त्याचा इतका का राग करते नेहमी..... माझ्याशी तर तो चांगलाच वागतो...... मग मला असं वागायला नको...... इथून पुढे मी पण त्याच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करेल.... "

ह्या विचारांनी तिचं डोकं आता हलकं वाटू लागतं.... ती मनातच विचार करते.....

सुकन्या : "जेव्हा मी ठरवून शौर्य सोबत वाईट वागायचे.... तेव्हा माझ्या डोक्यात असंख्य विचार असायचे, डोकं भारी वाटायचं.... पण, आज फक्त चांगलं वागण्याच्या निर्णयानेच माझं डोकं हलकं झालं..... मग चांगलं वागून किती फ्रेश वाटेल....."

ह्याच विचाराने तिच्या चेहऱ्यावर एक हसू येतं..... ते इतकं सुखद असतं... की, तिला सगळे दुःख विसरल्यासारखे होतात....

काहीच दिवसांत आजोबांचं प्रोजेक्टचं काम सुरू होतं.....

ठरलेल्या दिवशी सुकन्या @१०:०० वाजता आश्रमात पोहचते.... बाहेरच तिला शौर्य बसून असलेला दिसतो.... ती एक गोंडस हसू चेहऱ्यावर आणत त्याच्या जवळ जाते.....

सुकन्या : "गूड मॉर्निंग....."

शौर्य वर बघतो...... थोडा थबकतो.... इतका भाव खाणारी आज कशी काय स्वतः येऊन बोलली याच गोंधळात तो असतो.....

शौर्य : "आं....."

सुकन्या : "तोंड बंद कर.... माशी जाईल आत...."

तिला इतकं मनमोकळ हसताना बघून तो तिच्यात हरवतो..... ती हसता - हसता थांबते.....

सुकन्या : "हॅल्लो......"

शौर्य भानावर येतो आणि केसातून हात फिरवत.....

शौर्य : "हॅलो....."

सुकन्या : "तुला इतकं लाजायला काय झालं....?"

शौर्य : "तुला नाहीच कळणार ते..... चल..... रवी अंकल म्हणाले होते..... तू आलीस की, तुझ्या सोबत आत यायचं....."

सुकन्या : "अरे, अंकल काय अंकल आजोबा आहेत ते...."

शौर्य : "आजोबा असतील तुमच्यासाठी..... मला त्यांची आयडिओलॉजी यंग वाटते.... सो, मी त्यांना अंकल म्हणतो..... तसंही मी दिसण्यापेक्षा असण्यावरुन लोकांना कुठल्या नावाने हाक मारायची हे ठरवत असतो...."

सुकन्या : "इंटरेस्टिंग....."

दोघेही आत येतात..... सुकन्या जाऊन आजोबांना वन साईड मीठी मारते....

सुकन्या : "आबा....."

आजोबा : "अरे वाह..... आज तर जाम खुश दिसतेय आमचं पिल्लू....."

सुकन्या : "हो..... आपला प्रोजेक्टचा फर्स्ट डे.... सो.... आय एम सो एक्साईटेड....."

आजोबा : "बरोबर...... थोड्याच वेळात टीम येईल.... मग आपण प्रॉजेक्ट काय असेल ते डिस्कस करूया....."

सुकन्या : "ओके....."

आजोबा : "कॉफी घेणार....?"

शौर्य : "श्यूअर्....."

तीन कॉफी मागवण्यात येतात..... तिघांच्या कॉफी सोबतच इकडच्या - तिकडच्या गप्पा चालतात..... थोड्या वेळा नंतर आजोबांना कॉल येतो.....

आजोबा : "हा बोला महाजन..... हो हो.... या ना तिथूनच थोड्या अंतरावर तुम्हाला सेंड केलेला फोटोतला बोर्ड दिसेल.... हो.... तेच आमचं आश्रम..... या वाट बघतोय....."

सुकन्या : "कोण होतं आबा?"

आजोबा : "टिम येते आहे थोड्या वेळात..... त्यांचाच फोन होता..."

सुकन्या : "आबा..... टीम तर खूप एक्सपिरियन्स्ड लोकांची असेल..... अँड त्यात मी तर काहीच नाही...."

आजोबा : "असं कोण म्हणलं..... कधी - कधी न्यू माईंड्स सुद्धा इतके थॉट फुल असतात ना की, त्यासमोर एक्सपिरियन्स्ड काहीच कामात येत नाही..... जेव्हा शौर्य इतकी मोठी कामगीरी करू शकतो.... मग आपण प्रयत्न तर करूच शकतो ना बाळा....."

सुकन्या : "थँक्स आबा.... आय विल ट्राय माय बेस्ट...."

थोड्याच वेळात टीम आश्रमात पोहचते..... मीटिंग साठीची सगळी अरेंजमेंट एका हॉल मध्ये केलेली असते..... सर्वांना तिकडे जायला सांगून हे तिघे ही तिकडे जायला निघतात.....

आजोबा : "चला बाळांनो..... ते आलेत...."

शौर्य, सुकन्या आणि आजोबा जातात.....

आजोबा : "नमस्कार, महाजन..... अरे वाह..... घोरपडे, पेठे, वाघमारे.... बरं केलंत आपण आलात..... चांगलं मार्गदर्शन देता येईल मुलांना आता....."

पेठे : "म्हणजे? आता ही लहान मुलं आपल्या प्रॉजेक्ट सोबत काम करणार....?? थट्टा करताय ना....."

आजोबा : "छे! थट्टा कसली.... हा मुलगा बघताय ना.... शौर्य...... राज्य सरकार कडून काहीच महिन्याआधी सत्कार झालाय त्याचा..... आणि ही माझी नात..... मला वाटतं नेहमी डोकं शांत ठेऊन काम करायला आपण हीच्याकडून शिकायला काही हरकत नाही...."

पेठे : "चला आता तुम्ही इतकी शाश्वती देताय..... तर, मग शंका करण्याचं कारण दिसत नाही....."

आजोबा : "नक्की.... बसा..... रूपरेषा ठरवूया...."

सगळे बसतात.....

वाघमारे : "रवी, मला एक सांगा.... आपल्या आश्रमात वृद्धांची तर आधीचीच सोय आहे.... मग, आता नवीन काय करायचं ठरवलं आहे आपण.....?

आजोबा : "सांगतो..... वृद्धांसाठी इथे सोय आहेच मात्र आता जी मुलं वयोमर्यादा ओलांडून अनाथ आश्रमातून बाहेर पडतील.... त्यांना, आपण भविष्यात कोणत्या संधी उपभोगता येतील याविषयी माहिती द्यायची... इतकेच नाही तर, जे काम शौर्यने केलं ते आपण अधिकारीकपणे सुरू करायचं... म्हणजे काय? तर, माझा मुलगा सचिन आपल्याला यात कायदेशीर मदत करेल जेणेकरून, आपण कुठल्या समस्येत नको फसायला.... जसं की, ते गुन्हेगार असतात तर, पोलिस अधिकारी आपल्याला सुरक्षा देतील......"

घोरपडे : "खूपच छान उपक्रम सुचवलात आपण..... बरं बाळांनो तुम्ही काही सुचवायचं सुचवू शकता...."

आजोबा : "सुकन्या बाळा.... बोल....."

सुकन्या : "आबा मी....!?"

आजोबा : "बोल बाळा.... तसंही पुढे जाऊन तुला ही त्यांच्या सोबत काम करायचं आहेच.... मग आता पासूनच तू सगळ्यांशी संवाद साधलेला बरा...."

पेठे : "हो बाळा..... सांग बिनधास्त.... घाबरु नको...."

सुकन्या : "थँक्यू, आपल्या सर्वांनी मला आज इथे बोलायची संधी दिली..... जसं की, आपण जाणतोच इथून पुढे इथे यंग माईंड्स येतील.... ज्यांची ट्रेनिंग चालेल आणि काही लहान मुलं ज्यांचं संगोपन इथे होईल.... तर आजोबा, माझ्या मते आपण आश्रमाचे नाव बदलुया ना..... नाही म्हणजे, वृध्द संगोपन आधीच आहे पण, आता त्यात लहान मुलं आणि मोठी मुलं इथे येतील.... ज्यांना आपण जगण्याची नवी प्रेरणा देऊ.... तर नाव बदलणं योग्य असं मला वाटतं..... म्हणजे आपण सर्वांना काय वाटतं?"

घोरपडे : "हो छान कल्पना सुचवली..... बाळा मग आता तूच सूचव काय नाव ठेवलं पाहिजे....?"

सुकन्या : "जिजीविषा इट मिन्स, Strong Eternal Desire To Live"






ज्यांनी हे शेअर केलं त्यांची खूप इच्छा होती की, मी आश्रमाला हे नाव द्यावं.... त्यांचे खरंच मनापासून खूप - खूप आभार....

सगळे तिच्याकडे कौतुकाने बघत असतात.....

आजोबा : "खूप सुंदर..... नक्की थोड्या प्रोसेस नंतर काही महिन्यांनी हे नाव देण्यात येईल.... मला वाटतं की, आपलं प्रोजेक्ट सक्सेस झाल्यावर एक छोटी पार्टी ठेऊन ते करून घेऊया....."

सगळ्यांना खूप छान वाटतं......

आजोबा : "चला आता पुढचा प्रवास सुरु करूया....."

पेठे : "हो तुम्ही सगळी प्लॅनिंग सांगा म्हणजे, लवकरच कामालाही लागता येईल....."

आजोबा : "तर, सर्वात आधी आपण आपल्या एरियात हा प्रॉजेक्ट राबवतो आहे..... प्रोजेक्ट नुसार, आपल्या एरियात जितके अनाथालय असतील त्यांच्या परवानगीने तिथून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या नोंदी करून घ्यायच्या.... हे काम सुकन्या बाळा मी तुझ्यावर आणि शौर्यवर सोपवतो...."

दोघे : "हो.... चालेल"

आजोबा : "वाघमारे, घोरपडे, पेठे.... आपण तिघांनी काय करायचं ते सांगतो..... जी मुलं सिग्नल वर थांबून भीक मागतात, त्यांचा मागोवा घ्यायचा आणि त्यांची अचूक माहिती पोलीस अधिकाऱ्यांना द्यायची.... पुढे ही माहिती विधिमंडापर्यंत पोहचवून याकडे कसं लक्ष वेधायचं हे मी आणि महाजन बघतो...."

घोरपडे : "पण, आपल्याला वाटतं? विधिमंडळात हे प्रश्न ऐकले जातील....?"

आजोबा : "जनसामान्यांचे प्रश्न ऐकले जात नसतील तर, मग ते विधीमंडळ कसलं?"

पेठे : "अगदी बरोबर... आपण शेवट पर्यंत प्रयत्न करूया...."

वाघमारे : "नक्कीच आणि खऱ्या मुद्द्यांसाठी झटायचं कसं हे पुज्यनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकवून गेलेच..."

सगळे : "हो....."

आजोबा : "चला मग उद्यापासून कामाला सुरुवात झाली पाहिजे.... बाळा सुकन्या तू कंफर्टेबल आहेस ना....."

सुकन्या : "हो आबा..... तसंही चांगली कामं करायला स्वतःची काळजी कसली....."

आजोबा : "गूड..... हाच कॉन्फिडन्स शेवट पर्यंत टिकवून ठेवायचा आहे...."

सगळे : "नक्की....."

प्रॉजेक्टचं तोंड भरून कौतुक करत सगळे निघून जातात.... शौर्य आणि सुकन्या ही आजोबांचा निरोप घेऊन जायला निघतात..... शौर्य त्याची कार घेऊन बाहेर थांबून असतो..... सुकन्या आश्रमातील वृद्धांचा आशीर्वाद घेऊन बाहेर येते..... पार्कींग मधून आपली स्कूटी काढते आणि आश्रम बाहेर पडते.... तिथे तिला शौर्य थांबलेला दिसतो..... त्याच्या कार शेजारी थांबून त्याला ती आवाज देते.....

सुकन्या : "हे..... गेलास नाही तू......?"

शौर्य : "अग हा..... ते मी टेम्पल जातोय तू येतेस का?"

सुकन्या : "अरे वाह.... मी पण तिकडेच जाणार होते... चल....."

शौर्य : "माझ्या कार ने जाऊयात?"

सुकन्या : "अरे मला परत स्कूटी आत ठेवावी लागेल...."

शौर्य : "ओके.... तू स्कूटी ने ये मग.... पण, मला काय म्हणायचं होतं.... माझ्या कार ने गेलो तर....?"

सुकन्या विचार करत बसते......

शौर्य : "वेट.... एक काम करूया..... तुझ्याच स्कूटी ने जाऊया.... तसं तिथं पार्क करायला जागाच नाहीये....."

सुकन्या : "तुला इतकं सगळं कसं माहितीये..... म्हणजे तू नेहमी जातोस?"

शौर्य : "हो... म्हणजे विकेंड अँड कधी काही चांगलं घडलं तर जात असतो..... आता उद्या प्रॉजेक्टचा श्रीगणेशा होतोय सो...."

सुकन्या : "यू नो व्हॉट... मी जाम एक्साईटेड आहे...."

शौर्य : "हो.... मी पण...."

सुकन्या : "बाय द वे... तू इतकी क्लिअर मराठी?"

शौर्य : "क्लासेस जॉईन केले होते...."

सुकन्या सरप्राइज होऊन त्याच्याकडे बघते.....

सुकन्या : "क्लासेस??!"

शौर्य : "या.... क्लासेस... मला पूर्ण मराठी शिकायची इच्छा होती..... सो....."

सुकन्या : "अरे पण त्यासाठी क्लासेस?"

शौर्य : "मग कोणी शिकवलं असतं....?"

सुकन्या : "त्यात काय एवढं? मी होते ना..... मी शिकवलं असतं....."

तिला कळून चुकतं हे आपण काय बोललो..... आणि ती विषय टाळते......

सुकन्या : "चल आपल्याला लेट होईल....."

शौर्य गालात हसत....

शौर्य : "हो चल......"

दोघेही सोबत मंदिरात जाऊन दर्शन घेतात..... तिथून परत आल्यावर, शौर्य त्याची कार घेऊन येतो..... सुकन्या थांबून असते....

शौर्य : "अच्छा मग उद्या आपण माझ्या कार ने जाऊया..... बाहेर बघ किती उकडतं... उगाच चिडचीड नको ना...."

सुकन्या : "चालेल.... मग तू मला पीक कर...."

शौर्य : "हो...."

सुकन्या : "बाय....."

शौर्य : "बाय....."

दोघेही दोन्ही बाजूला निघून जातात......
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED