Janu - 27 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 27

समीर जानू ला बोलला की तो तिचं सर्व ऐकेल ..आणि ती प्रेम वेडी तेच खर धरून बसली..पणं तिचं तो आनंद एका दिवसा पुरताच होता..दुसऱ्या दिवशी जेव्हा ती समीर सोबत बोलली .

जानू : हॅलो

समीर : हा बोल .. आज कोणती धमकी देणार आहेस ?मला कधीच वाटलं नव्हतं तु अस करशील..काही ही करून तुला मी हवा आहे ना ? तुला फक्त मला मिळवायचा आहे ना ..?वागतो मी तुला हवा तसा पणं हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतं आहे..माझ्या मनात थोडी जागा होती तुझ्या साठी पण ती ही तू आता घालवली स...सोडतो सगळं सोडतो मी माझं घर दार नोकरी .. माझा आनंद ..का तर द ग्रेट जानू ला मी हवा आहे ना. .काही ही करून ..वासना भरली आहे तुझ्यात .

जानू : समीर ,तोंड सांभाळून बोल ..काय म्हणाला स?वासना ? अरे कोणत्या देशाच्या राजकुमार आहेस तू ..? तू प्रेम करत नसशील तर ते मान्य आहे पण आज तू माझ्या निस्वार्थ प्रेमा चा अपमान केला आहेस ..अरे मला तर वाटलं होत ..माझं प्रेम बदलेल तुला ..तुला ही प्रेम करायला शिकावे ल ..पणं तू तर त्या प्रेमाला च वासनेच नाव दिलास..?

समीर : माझीच चूक जे तुझ्या सोबत बोलायला पुन्हा तयार झालो... मी च काही तरी पाप केलं असणार म्हणून तू अस माझ्या मागे हात धुवून लागली आहेस.

जानू : चूक तुझी नाही माझीच ..मी प्रेम केलं ना.. तू तर ते कधी केलाच नाहीस ना ?

जानू ने समीर सोबत बोलणं बंद केलं ..समीर ला ही तेच हवं होतं ..त्याने जानू ला सर्व ठिकाणी ब्लॉक केलं...जानू ने प्रेम करून मात्र त्या प्रेमाचा अपमान करून घेतला.

समीर च प्रेम नसेल तर नसे दे पणं त्याने आपल्या प्रेमाचा अपमान केला हा धक्का जानू ला सहन होत नव्हता ..ती पूर्ण तुटली होती ..तिच्या निरागस आणि निर्मळ प्रेमाला समीर ने वासणेच नाव दिलं होत ..त्याच्या बोलण्याने ...जानू च हृदय जे आधीच तुटलं होत ..ते पुन्हा लाखो तुकड्यांन मध्ये विस्कळीत झालं होत.

किती तरी वेळ जानू शून्यात पाहत बसली होती आणि अचानक उठून तिने रूम मध्ये असणारी विषारी औषधाची बाटली उचलली ..तोंडाला लावणार च होती की ..तिला कोपऱ्यातून आवाज आला..तिने त्या दिशेला पाहिलं तर तिथे तिचा आतला आवाज उभा होता..तिचं दुसरं मन.
माणसाला खरंच दोन मन असतात ..एक जे त्याला प्रत्येक गोष्टीत पुढे ढकलत आणि दुसरं जे त्याला त्या गोष्टी पासून मागे खेचत असत...माणूस जेव्हा पूर्ण पने खचून जातो ..तेव्हा त्याला ..कोणी किती ही समजावलं ..तरी तो कोणाचं ऐकत नाही ..पणं जेव्हा त्याला स्वतः च मन त्याचा आतला आवाज समजावू लागतो ..तेव्हा माणसाचं मन पुन्हा उभारी घेत ..जगात तेव्हा त्याच्या साठी त्याचं मन च सर्वात जवळचं असत...पणं आपल्या त्या आतल्या आवाजाने वेळीच आपल्याला सावरलं तरच आपण अशा प्रसंगातून सावरू शकतो ..नाही तर मग एक चुकीचा निर्णय आपल जीवन संपवू शकतो.आजच्या जानू च्या निर्णयाला विरोध करायलाच तिचा आतला आवाज तिच्या समोर येऊन उभा राहिला होता.

आवाज : अरे वा मरणाची तयारी चालू आहे वाटत..

जानू : हो ..

आवाज : हो तुझं बरोबर आहे..तुला खरंच मरायलाच हवं ?

जानू : तू माझं मन आहेस की दुश्मन ?

आवाज : काय चुकीचं बोललो मी ? आता तो समीर च म्हंटला ना सायको आहेस तू ? हो खरंच सायको आहेस तू ..त्याला तर तुझी पर्वा ही नाही आणि तू मात्र मारायला निघालीस ? व्वा ग्रेट..

जानू रडू लागली होती ..तिचे डोळे वाहत होते ..तोंडातून हुंदके येत होते ..

जानू : काय करू मग ? मी खरंच समीर वर खूप प्रेम करते..

आवाज : तिच्या आवाजाला ही आता भरून आल होत ..तिची अवस्था पाहवत नव्हती..जानू माझं ऐकशील.

जानू : हम्म..

आवाज : प्रेमात मरावं ग ..पणं त्या माणसा साठी मरावं ज्याचं खरंच आपल्यावर जीवापाड प्रेम असेल..ज्याच्या नजरेत आपली कदर असावी ..आपल्या सारखाच निस्वार्थ आणि निर्मळ प्रेम जर समोरच्याच असेल तर त्याच्या साठी जीव द्यायला काहीच हरकत नाही.. लैला मजनू..हिर रांझा ..हे प्रेमी ही तर एक मेका साठी मेले ना ..पणं त्याचं प्रेम तितकं च महान होत ग..

जानू : तुला आज च मला हे समजावू वाटलं ? तू मला तेव्हा का थांबवलं नाहीस ..जेव्हा मी वाहत होते ?

आवाज : जानू खरंच एकदा तू स्वतः ला विचार ..मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का ? जेव्हा तू समीर ला पहिल्यांदा भेटायचं ठरवलं होतं तेव्हा मीच होतो ज्याने तुला नको जानू म्हणून विरोध केला होता..जेव्हा तू समीर वरच्या प्रेमाची कबुली दिली होती स तेव्हा ही मी तुला नको जानू थांब ..म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला होता..पणं दर वेळी तू तुझ्या बाह्य मनाचं ऐकलं स ..आणि माझा आवाज नेहमी तू दाबलास..

जानू ला तिच्या आतल्या आवाजच बोलणं पटू लागलं होत..ती थोडी शांत झाली होती.

जानू : मग मी काय करावं ?

आवाज : एक समीर गेला म्हणून काय संपलं का आयुष्य ? तुला तुझं काहीच अस्तित्व नाही का ? इतकी लाचार आहेस का तू ? की तुला समीर कडे प्रेमाची भीक मागावी लागली ? कोण समीर ? कोणता समीर ? विसरून जा सर्व ..आणि स्वतः च अस्तित्व निर्माण कर...अग ..तू स्वतः ला दोष देऊ नकोस ..त्या समीर च नशीब खराब म्हणून तुझ्या सारख्या प्रेम वेडी ला तो समजू शकला नाही.

जानू ला तिच्या आतल्या आवाजच बोलणं पटलं होत ..तिने ती बाटली पुन्हा होती तशी जाग्यावर ठेवली..समीर च नाव तिने मनाच्या कोपऱ्यात दाबून टाकलं ..आणि पुन्हा एक नविन जानू ने जन्म घेतला.

जानू ने आता स्वतः ला सावरलं होत पणं आताची जानू खूप वेगळी होती..प्रेम या शब्दा ला तिच्या आयुष्यात जागा नव्हती...जगातली सर्व मुल समीर सारखी असतात हा तिचा पक्का निर्धार झाला होता.. अळी चा सुरवंट होतो आणि तो स्वतः भोवतीच एक कोश विणून त्यात बंधिस्त होतो..तसचं जानू ने ही स्वतः भोवती एक कोश करून घेतला होता..ती कोणा सोबत च मन मोकळे पणाने बोलत नव्हती..एखादा मुलगा तिच्या सोबत बोलायला जरी आला तरी ती ...इतकी चिडत असे की समोर चा पुन्हा तिच्या सोबत बोलण्याचा विचार ही टाळत असे..या जगात हळवं होऊन चालत नाही ..हे जणु तिच्या मनातच बिंबल होत..एकलकोंडी झाली होती जानू..समिधा सोबत ही तिने बोलणं जणु सोडूनच दिलं होत..कोणाशी मैत्री नाही की कोणती च फिलिंग नाही ..जानू च मन च जणू दगड झालं होत.प्रेम वेडी च रुपातर heartless ..जानू त झालं होत.

क्रमशः


इतर रसदार पर्याय