गोष्ट एका राजाची ( रिटायर्ड )
एक राजा होता. तसा काही खूप प्रख्यात वगैरे नाही पण राजा छोटा मोठा काही नसतो राजा फक्त आणि फक्त राजा असतो,त्याचे जाच त्याच्या प्रजेलाच माहिती. हा राजा काही वारसा मिळालेला राजा नव्हता. त्याच लग्न झालं,तिला राणी व्हायचं होतं.ती लग्नानंतर राणी झाली म्हणून हा राजा झाला.
लग्नानंतर तो तिला आपले पराक्रम म्हणजे त्याचा सम्राट (boss ) कसा त्याच्यावर मोठ्या मोहिमा(projects )साठी पूर्णपणे अवलंबून आहे. त्याने कशा चतुर्याने इतर राजांना सभेत (management meetings ) निरुत्तर केल आणि त्याचे सरदार(subordinates)कसे त्याच्या control मध्ये आहेत इत्यादी पराक्रम ऐकवायचा. आणि राणी त्याच्या महतीत पूर्णपणे दंग होऊन जायची. ती महत्वाकाक्षी होती तिला फक्त राणी म्हुणुन राहायचे नव्हते तर महाराणी व्हायचे होते.तिला एका गोष्टीची चांगली कल्पना होती कि राजा तितकाच महान असतो जितका त्याचे भाट त्याचे गुणगान करतो. तिने त्याचे गुणगान जोरात चालू ठेवले तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तो एक महाराजा झाला. त्यांनी बरेच प्रदेश( बंगला, गाडी, शेरेस, पैसा अडका इत्यादी) मिळवले. आणि शेवटी होणार ते झालं आणि राजा एक दिवस रिटायर झाला.
राजा नाही तरी ह्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होताच. त्याला गेल्या 35-36 वर्षाच्या routine चा कंटाळा आला होता. वर्षानुवर्षे तीच उठायची वेळ तेच ठराविक वेळा ब्रेकफास्ट, घराबाहेर पडणं, दुपारचा लंच टाइम आणि मग तीच एक घरी परतण्याची वेळ. ह्या सगळ्याच ऊबग आला होता राजाला. चला सुटलो. उद्यापासून आत्ता मी मला काय करायचे ते मी ठरवणार मस्त enjoy करणार, सावकाश उठणार, आरामात पेपर वाचणार, आरामात अंघोळ करणार दुपारी झोपणार रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणार. राजा खूष होता. नंतर त्याने त्याच्या ह्या सगळ्या ईछ्या मनसोक्त पणे भोगल्या.
त्याच प्रमाणे केसरी बरोबर Europe tour केली. भारत भर भ्रमण पण झाल. ह्या सगळ्या चैनीत 8-10 वर्ष सुखानें गेली.
अचानक एक दिवस राजाला चक्कर आली थोडी छातीत धडधड पण झाली. घरातील सगळे बेचैन झाले.
तो पर्यन्त राजकुमार पण एक कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्धी पात्र झाला होता. ताबडतोप तो मैदानात उताराला आणि त्याने राजाला सगळ्यात बेस्ट डॉक्टर कडे उपचार चालू केले.डॉक्टरनी त्यांना एका five star हॉस्पिटल मध्ये ऑबसेर्व्हशन साठी दाखल केलं. वेगवेगळ्या 10-12 टेस्ट केल्या आणि सांगितलं कि तसं काळजी करण्या सारखं काही नाही तरी काही 4-5 औषधी गोळ्या दिल्या आणि 3 महिन्यानंतर परत यायला सांगितले तसेच योग, walk, गोड तेलकट पदार्थ कमी खा आणि काही फिटनेस exercize दिले, खरी कमाल ही आहे कि योग, walk, गोड आणि तेलकट पदार्थ कमी खा हा सल्ला जगातल्या 90% priscription मध्ये असतो पण त्या कडे सगळेच दुर्लक्ष करतात,पण रामबाण उपाय तोच आहे असो. डॉक्टरने लाख दीड लाख बिल केलं आणि discharge दिला.
आता राजकुमारने राजाच्या प्रकृतीचा पूर्णपणे ताबा घेतला. त्यांना जिम चीं मेम्बरशिप घेतली, योगा साठी पर्सनल tutor नेमला, खाण्या पिण्यावर पूर्ण नियंत्रण आणले. बाहेर जाण पार्टी सगळं बंद झालं. दर तीन महिन्यांनी pathological test होऊ लागल्या. राजाची प्रकृतीत चांगली सुधारणा झाली राजकुमाराच्या प्रयतनांना नक्कीच यश लाभले त्याच्या आयुष्यात 10 वर्षाची वाढ नक्कीच झाली पण राजा उदास होता, असं का?
कारण राजा एक robot झाला होता त्याच्या शरीराचे अनेक parameters लॅब टेस्ट द्वारा measure होत होते, एक्स्पर्ट डॉक्टर्स द्वारा मॉनिटर होत होते व राजकुमार, राणी आणि इतर द्वारा कंट्रोल केले जात होते सगळ्यांचं एकच लक्ष होत कि राजाचे आयुष्य वाढावायचं.पण राजाला काय पाहिजे हे कोणीच विचारात नव्हतं.कारण तो किती आनंदी आहे, उत्साही आहे,किती हसरा आहे हे मोजमाप करण्याच्या टेस्ट कुठल्याही लॅब मध्ये नव्हत्या म्हणून ते कुणाच्या मनातही आला नाही, त्यांची तरी काय चूक? राजाला त्याच्या उतार वयात त्याच्या आयुष्याला जमा झालेली वर्ष नको होती. त्याला उर्वरित आयुष्य फक्त आपल्या लोकांन बरोबर मस्त जगायचं होतं सगळयांशी गप्पा मारायच्या होत्या मित्रानं बरोबर पार्टी करायच्या होत्या. रोड side च्या गाडीवर पाणीपुरी, वडापाव खायचा होतं ह्याच सर्व त्याच्या आनंदाच्या कल्पना होत्या कारण त्याच शरीरावरच प्रेम कधीच कमी झाल होतं,पण त्या बोलून दाखवणं म्हणजे एक घोर अपराध होता. बोलला असता तर त्याच्या well wishers नी हाहाकार केला असता. राजाच्या आता एक गोष्ट लक्षात आली होती कि इतक्या मोठया शरीर रक्षक सैन्या पुढे ह्या मनमौजिचा काय टिकावं लागणार. त्याला हे पण कळून चुकलं होत की आपले डोळे आता फक्त camera आहे , कान - साऊंड रेकॉर्डर आणि तोंड - Alexa, फक्त विचारल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची पण रिऍक्ट करायचं नाही .हरी हरी करत बसायच.
राजाला एक मोठा प्रश्न पडला होता की रिटायरमेंट नंतर शिस्तीत राहून दीर्घ काळ शरीर टिकवायचं की शरीर पणाला लावून मनसोक्त जगून आनंद भोगायचा?
असेच राजे आणि राजकुमार पिढ्यानं पिढ्या होत आले आहेत आणि पुढे पण होतील आणि रिटायर्ड राजाची गोष्ट विक्रम आणि वेताळ सारखी अखंड चालूच राहील.