Gracious Shri Raghavendra Swamiji books and stories free download online pdf in Marathi

कृपाळू श्री राघवेंद्र स्वामीजी

ॐ श्री राघवेंद्राय नमः
पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म रतायच भजतां कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे |
श्री राघवेंद्र स्वामी हे श्री हंस नामक परमत्म्याच्या साक्षात परंपरा असलेल्या श्री मनमध्वचार्य यांच्या मूलमहासंस्थान म्हणून तसेच श्रीविद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री राघवेंद्र स्वामी यांच्या मठाच्या गुरूपरंपरेतील 32 वे पीठाधीपती.
स्वामींचा जन्म भुवनगिरी येथे ई. स 1595 ते बीग मुद्र घराण्यातील.स्वामींचा विवाह सन 1621 पुढे स्वामींनी सन्यास ई स 1621 मध्ये घेतला. त्यांचे गुरु श्री सुधीद्रतीर्थ. स्वामींनी वयाच्या 76 व्या वर्षी वृदावनात प्रवेश केला,सात शतके वृंदावनात राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण करीन शिवाय वृंदावनात देखील होऊन अनुग्रह करीन असे जे आस्वासन श्री स्वामींनी दिले आहे त्याचा अनुभव सर्व भक्तांना येतच आहे.
आंध्रप्रदेशातील करनुल जिल्ह्यात मंत्रालय रोड स्टेशन नजीक, तुंगभद्रा नदीच्या तीरावर मंचाले येथे श्री राघवेंद्र स्वामींचे मूल वृन्दावन स्थळ आहे.प्रसिद्ध आहे. दर वर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात.
श्री राघवेंद्र स्वामींचे आम्हा देशपांडे कुटुंबावर अनेक उपकार आहेत.
माझे आजोबा श्री श्रीनिवासराव देशपांडे यांनी उपकाराची स्मृती म्हणून लोकापूर, जिल्हा विजयपूर कर्नाटक येथे श्री स्वामींचा मठ स्थापन केला. आजोबा, अनंतकाका, लक्ष्मणकाका, आत्या व माझे वडील आणि समस्त कुटुंबियांनी स्वामींची नित्य सेवा केली. त्या सेवेचे फळ म्हणून स्वामींची आम्हा कुटुंबीयांवर सदैव कृपा अनुभवास येते.
मी माझ्यावर झालेल्या कृपा नमूद करू इच्छितो.
मी 2-3 वर्षाचा असतांना खूप आजारी असायचो तेंव्हा माझ्या सुब्बाका मावशीने राघवेंद्र स्वामींना प्रार्थना करून माझी मुंज मंत्रालय क्षेत्री करण्याचा संकल्प केला व स्वामींच्या कृपेनें मी लवकरच पूर्णपणे स्वस्थ झालो. स्वामींच्या कृपेनें पुढे पण आरोग्य ठणठणीतच आहे,पण काही कारणास्तव माझी मुंज लांबणीवर पडत गेली. पुढे इंजिनीरिंगला पण स्वामींच्या कृपेनें चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली. चांगली नोकरीं मिळाली पण मुंज करण्याचे मागे पडत गेले. मग लग्नासाठी मुली बघायला सुरुवात झाली पण योग्य स्थळ येईना मग माझ्या वडिलांना मुंजी बद्दल मावशींनी केलेला संकल्प आठवला. तो पर्यंत माझी मावशी आणि आई दोघे कालवश झाले होते आम्ही मग लगबगिने मंत्राल्याला येऊन केलेला संकल्प पूर्ण केला. परतण्या साठी बस मध्ये बसताच आमचे एक कुटुंब स्नेही भेटले ते एक सुशील व उच्च पदावर नोकरी करणारे सदग्रहस्त. त्यांच्या मध्यस्थी मुळे माझे लग्न ठरले आणि पार पडले.हा मला जाणवलेला पाहिला आशीर्वाद.
सुरवातीची काही वर्ष सुखाने गेली. माझी पत्नी सुनीता पण चांगली नोकरी करीत होती. आम्हाला एक मुलगा झाला नाव आदित्य. पण आमच्या आयुष्यात एक वाईट काल होता त्यात एकदा तीची नोकरी जायची तर एकदा माझी जायची पण स्वामीच्या कृपेनें एकाची तरी नोकरी असायचीच एकदा तर आज माझी नोकरी गेली आणि उद्यापासून सुनीता ला नोकरी मिळाली. ही स्वामींची आम्हावार कृपाच. इतक्या कठीण काळी पण स्वामींच्या कृपेनेंच आम्हाला कुणाकडून एक पैसा पण मागावा लागला नाही.आदित्य पण जरा बिनधास्त स्वभावाचा होता. अभ्यासात लक्ष कमीच आणि परत स्वामीजीची कृपा झाली आणि आदित्यला अशा कठीण परिस्थितीचीं जाणीव झाली आणि त्याच्या स्वभावत अमूलाग्र बदल झाला.पुढे त्याचे सर्व खूपच चांगल झाले. US मध्ये शिक्षण होऊन तो सेटल झाला.
त्याचा मुलगा अरुष. खूप गोड आहे.
आम्ही दर वर्षी मंत्रालय ला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटत.
आज पण आम्ही काही अडचणीतून जातं आहोत पण श्री स्वामीजीच्या कृपेनें सर्व काही नीट होईल अशी खात्री आहे.
स्वामींची अशीच कृपा सदैव भक्तांवर राहो हीच आशा.
ॐ श्री राघवेंद्राय नमः
----------------------------
मंत्रालय क्षेत्रा संबंधी अधिक माहिती :
मंत्रालंयला जाण्यासाठी मुंबई, बंगलूरू, थिरुवान्तपुराम इत्यादी कडून ट्रेन आहेत तसेच बसेस पण आहेत.
मंत्रालयात भक्तीनिवास मध्ये भक्तांसाठी राहण्याची कमी दरात उत्तम सोय आहे.


मंत्रालयच्या परिसरात असलेली पवित्र स्थळे:
श्री पंचमुखी क्षेत्र
बिच्चाले
क्ललूर

इतर रसदार पर्याय