जानू - 32 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जानू - 32

जानू तर अभय सोबत बोलायचा विचार टाळते.. पणं नशिबाने त्यांना भेटा व्हायचं ठरवलं होत..मग ते कसं टळू शकेल? नशीबा पुढे कोणाचं काही चालत का ? मग जानू च तरी कसं चालेल?
आकाश ला कळत की उमा ला जान्हवी ला भेटली होती..तिने एक फ्रेण्ड्स सर्कल ग्रुप वर सांगितलं होतं..पणं अभय त्या ग्रुप मधून थोड्या दिवसा पूर्वी च लेफ्ट झाला होता त्यामुळे ते त्याला कळलच नाही..पणं आकाश असतो त्या ग्रुप मध्ये ..पाहिलं तर त्याला खर वाटत नाही..पणं नंतर तो उमा ला फोन लावून विचारतो तेव्हा त्याला पटत..आता अभ्या ची गाडी रुळावर येईल असा विचार करून खूप खुश होतो तो..रात्र झाली आहे आता उद्या च सकाळी सकाळी सांगू त्याला म्हणून तो ही झोपी जातो.

अभय अजून झोपेतच असतो..आज त्याच्या स्वप्नात जानू आली होती..तो तिच्या सोबत बोलणार ही होता की अचानक त्याच्या फोन ची रिंग ऐकुन त्याला जाग येते..इतका राग येतो त्याला की वाटत फोन फोडून टाकावा..पणं नंतर तो फोन उचलतो..आकाश चा फोन असतो तो..

अभय: आक्या तुला काही अक्कल दिली आहे की नाही ? किती लवकर फोन करतोस ? यार किती छान स्वप्नं पडलं होत ..आणि तिथे ही तू मधी कडमड ला स?

आकाश: तुझ्याच कामा साठी फोन केला आणि तू मला च ओरडतो ? वा भलाई चा जमाना राहिला..नाही..

अभय: माझं काम ? एवढ्या सकाळी ?

आकाश: आणि तू नुसता स्वप्न पाहणार आहेस की ती खरी ही करणार आहेस ?

अभय:आधी सांग माझं कोणत काम ?

आकाश: आधी पार्टी हवी तुझ्या कडून..

अभय: आक्षां मला तुझं काही कळतं नाही जेव्हा पहावं तेव्हा कोड्यात बोलतोस..सरळ सांग नाही तर मी झोपतो थोडा वेळ ..आणि आवरून ऑफिस गाठावं लागेल..

आकाश: अरे उमा ला जानू भेटली होती..आणि जानू चा नंबर ही मिळाला आहे..

अभय: आकया आता तू माझा मार खावू नकोस..एक तर आता एप्रिल फुल पणं नाही आज आणि तुला माहित आहे जानू माझा विक पॉइंट आहे..उगाच सकाळी सकाळी माझी झोप मोड केलीस आणि त्यात असली चेष्टा करतोस ?

आकाश : अरे खर बोलतोय मी..

अभय: होय तू खरचं बोलतोस ..अपूर्वा च लग्न होत तेव्हा पाहिलं मी तुझं खरं..
अभय चा आवाज एकदम उदास होतो ..आकाश ला ते जाणवत..

आकाश: अरे सॉरी रे तेव्हा मला समजलं होत ते मी सांगितलं होत तुला..पणं आज मी खर बोलत आहे रे तू आपल्या फ्रेंड्स ग्रुप मधून बाहेर पडला आहेस ..नाही तर तुला रात्रीच खर कळलं असत ...आणि मी उमा ला खात्री करून च जानू चा नंबर घेऊन मग च तुला फोन केला आहे.

आता मात्र अभय ची झोप कुठल्या कुठे पळून जाते आणि तो ताडकन उठून बसतो..एक वेळ त्याला खर वाटून खूप आनंद होत असतो आणि दुसऱ्या बाजूला अजून ही त्याला आकाश च बोलणं खर वाटत नसत..

अभय : पाठव बघू नंबर.. आणि जर ही चेष्टा असेल ना .. तर एक खून तर माझ्या हातून नक्की होणार ..तो ही तुझा अक्क्या..

आकाश: ती वेळ येणार नाही..कारण मी खर बोलत आहे ..आणि जर खर असेल तर मात्र तुला मला पार्टी द्यायला हवी.

अभय: ते बघू पुन्हा आधी नंबर पाठव..

आकाश त्याला नंबर पाठवतो.. अभय एक मिनिट ही न घालवता..तो नंबर सेव्ह करतो.. व्हॉट्स ऍप ला ..तो नंबर चेक करतो तर त्या नंबर वर एक डॉल चा डीपी असतो.. त्या डॉल नी केसात बरीच फुल माळले ली होती.. ह..डॉल तर जानू ला आवडत होती...तो त्या अकाउंटला खाली नाव पाहतो ..जान्हवी प्रधान..
अभय: बापरे..खर की काय हा जानू चा च नंबर आहे ...खर ? नाही खोटं असेल ? अरे नाव आहे तर खरंच असेल ...पणं चेष्टा असेल तर ? अभय एकटाच स्वतः सोबत बडबडत असतो..शेवटी तो एक मॅसेज करतो ..हॅलो..पणं पलीकडून बराच वेळ काहीच रिप्लाय येत नाही..किती तरी वेळ तो फोन मध्ये त्या मॅसेज चा रिप्लाय येईल म्हणून वाट पाहतो..पणं काहीच रिप्लाय येत नाही तो फोन ठेवून तसाच आवरायला जातो ..

जानू आवरून आपला मोबाईल पाहत होती सकाळी सकाळी ..की तिला एका अनोळखी नंबर वरून एक मॅसेज आलेला दिसतो ..ती . डी पी .. झूम करून पहाते तर.. अरे अभय ? हा तर अभय आहे ..म्हणजे उमा ने सांगितलं वाटत आपण भेटल्याच ..तिला खूप आनंद होतो अभय चा मॅसेज पाहून ती ही हाय अभय रिप्लाय देते.
अभय तिकडून आवरून येतो तसा पुन्हा मोबाईल चेक करतो..त्याला रिप्लाय आलेला पाहून खूप खुश होऊन तो पुन्हा मॅसेज टाईप करतो.

अभय: हॅलो.

जानू: हॅलो अभय..

अभय: जानू ? ओळखलं स ?

जानू : हो ..खूप वर्ष झाली ना ..पणं डी पी पाहून ओळखलं .

अभय: हो ..७ वर्ष ४ महिने ६ दिवस..

जानू : बापरे तू तर दिवस वर्ष महिने ही लक्षात ठेवला आहेस की..

अभय ला तिला सांगावस वाटलं की तेच तर करत होतो ..तू गेल्या पासून पणं त्याने स्वतः वर ताबा ठेवला..

अभय: माझ्या तर आठवणीत आहे ग.. पणं तू विसरलीस ..एकदा ही बोलावंसं वाटलं नाही का तुला माझ्या सोबत ?

जानू : अरे विसरले असते तर तुझा फोटो पाहून लगेच ओळखलं असत का ? आणि बोलावंसं वाटलं होत पणं माझ्या कडे तेव्हा मोबाईल ही नव्हता ना.

अभय: नशीब माझं निदान ओळख तरी दाखवली स..

जानू : अस का बोलतोस ? का ओळख दाखवणार नाही..बेस्ट फ्रेन्ड होतास माझा..

अभय: होय ,म्हणून तर न बोलता गेलीस ना ?

जानू : अरे मलाच माहीत नव्हत पणं तू ही तर तेव्हा नव्हतास ना तिथे..

अभय: कशी आहेस ? काय करतेस ?

जानू : मी ठीक आहे .. जॉब करते..आणि तू ?

अभय: आता पर्यंत तर ठीक होतो पणं आता जरा जास्तच ठीक आहे ..मी ही जॉब करतो.

जानू : म्हणजे ?

अभय: काही नाही.. ग..तू राहतेस कुठे सध्या ?

जानू : नाशिक ला..

अभय: मी किती तरी वेळा नाशिक ला येऊन गेलो ..तू भेटली नाहीस कधी..?

जानू : प्रोपेर नाशिक नाही रे नाशिक पासून थोड दूर आहे ..आणि तू कशाला आला होतास ?

अभय आता कस सांगणार तुलाच तर शोधत होतो..

अभय: असच एक दूर चे पाहुणे आहेत तिथे .म्हणून आलो होतो त्यांच्या कडे..

जानू : मला तर वाटलं च नव्हत परत आपल कधी बोलणं होईल..

अभय: पणं मला माहित होत आपण एकदा नक्की भेटू..विश्वास होता मला..

जानू : अरे बापरे ..ये कधी माझी आठवण येते का रे ? मिहिर कसा आहे ? मोठा झाला असेल ना आता ?

अभय: तू विसरली असशील पणं आम्ही नाही तुला विसरलो ..अजून हि काट्यावर एकत्र जमलो की तुझा विषय निघतो..मिहिर आता मोठा झाला आहे ..कॉलेज ला आहे..
अभय एक जानू नावाचा व्हिडिओ जानू ला सेंड करतो...जानू पहाते..

त्यात जानू नाव मोठ्या अक्षरात असत आणि साईड नी स्टार्स चमकत असत आणि त्या सोबत एक गाणं असत..

तुझे भूल जाना जाना
मुमकिन न ही...
तू याद ना आये ऐ सां
कोई दिन न ही..

जानू : छान आहे व्हिडिओ..तुला अजुन आठवत मला घरी जानू म्हणतात ते ?

अभय: सांगितलं ना ..मी काहीच विसरलो नाही..तूच विसरली आहेस..

जानू : आहे रे माझ्या ही लक्षात.. बर आपण नंतर बोलू ..ऑफिस ला उशीर होत आहे .

अभय ला ही उशीर झाला होता पणं त्याला अजून हि जानू सोबत बोलायचं होत ..तिला पाहायचं होत..पणं फोटो कसा मागणार ? काय वाटेल तिला ? चला नंतर बोलू बोलली आहे तेव्हा च मागू ..आता आपण ही आवरू.

अभय: ok ठिक आहे.

अभय खर तर जानू सोबत इतकं बोलला होता पणं अजून ही आपण स्वप्नात च आहोत अस त्याला सारखं वाटत होत..इतक्या वर्ष वाट पाहिली होती ती वेळ अशी अचानक येईल अस त्याला वाटलं नव्हत त्या मुळे त्याला विश्वास बसत नव्हता..जानू ही आज खूप दिवसांनी अभय सोबत बोलून खूपच खुश होती..आज दिवस भर ती चाळीतले दिवस आठवत होती.आणि अभय तो तर अजून धुंदी तच होता..आपण जानू सोबत इतक्या वर्षांनी बोललो हे खरच वाटत नव्हते त्याला ..इतका आनंद त्याला झाला होता ..की आता नाशिक ला जावून जानू ला भेटाव अस त्याला खूप वाटू लागलं होत.

क्रमशः