जानू - 43 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जानू - 43

जानू सकाळी सकाळी तयार झाली होती दिवाळी ला घेतलेला अबोली रंगाचा ड्रेस तिने आज घातला होता..कारण अभय ला तो ड्रेस खूपच आवडला होता..ती आवरून नाश्ता करण्यासाठी बाहेर येतच होती की प्रधान काका बडबड करतच घरात आले..आईने विचारल की काय झालं ?
प्रधान काका: ते नाडकर्णी भेटले होते..स्नेहा बद्दल विचारत होते..असू दे ..सोडा माफ करा पोरीला..तुम्हाला खूपच अभिमान होता जातीचा पणं पोरीन केलं ना स्वतः च्या मनाचं..म्हणत होते..खरंच आज वाटत मुली असण्यापेक्षा एखादा मुलगा असता तर बर झालं असतं..
जानू ने बाबा न चे शब्द ऐकले होते ..खूपच वाईट वाटलं होत तिला..तशीच आवरून तिने ऑफिस गाठलं ..काम आवरून..हाफ डे घेऊन अभय ला ही भेटायचं होत तिला..कामात वेळ जात होता ...आता शेवटचं राहिलेलं हे एक काम पूर्ण करायचं आणि जायचं अस तिने ठरवल होत..पणं ऐन वेळेला तिला अजून एका कामाची फाईल देण्यात आली..तिने टाळण्याचा प्रयत्न केला पण अर्जंट आहे करावच लागेल म्हणून मग ती तयार झाली.. अभय चे फोन ही येत होते तिला .. कुठे आहेस ..? मी कधीचा आलो आहे ..?दोन ला भेटतो बोलली होतीस साढे तीन होत आहेत..कधी येणार आहेस ? फक्त अजून थोडा वेळ म्हणून तिने त्याला सांगितला.. व फोन बाजूला ठेऊन तिने कामाला सुरुवातही केली .. सा ढे ..चार ला तिचं काम पूर्ण झालं ..फोन पाहि ला तर अभय चे ७..८मिस कॉल येऊन गेले होते .. शीट यार हे काम ही आजच यायचं होत ..किती वाट पाहायला लागली अभय ला म्हणून तिला स्वतः चा च राग येत होता..तिने त्याला पांच मिनिट मध्ये पोहचेल म्हणून सांगितलं.. पणं अभय नी मी येतो न्यायला पत्ता सांग म्हणून तिला फोर्स केला ..शेवटी ..मग ती तयार झाली .. अभय येण्याची वाट पाहू लागली...बराच वेळ वाट पाहिल्यावर एक बाईक दिसली तिला जी तिच्या समोर येऊन थांबली.. व्हाईट शर्ट.. ब्ल्यू जीन्स.. येलो जॅकेट..डोळ्यावर गॉगल.. सात आठ वर्षां पूर्वी एकदम सुकडा असणारा अभय आता एकदम बदलला होता.. वेल मेन्टेन बॉडी.. काळा सावळा असणारा अभय आता थोडा का होईना उजळला होता..तो आला ..त्याने तिला बस म्हणून बाईक कडे ईशा रा केला..ती ही काही न बोलताच बसली ही..बाईक सुरू झाली.. त स अभय बोलू लागला..

अभय: काय ग किती उशीर ?

जानू : सॉरी अचानक काम आल त्यामुळे झाला वेळ.

अभय: मी सकाळी दहा ला च येऊन बसलो आहे..

जानू : पणं तुला इतक्या लवकर कोणी यायला सांगितलं होतं ?

अभय: घरात पाऊल थांबत नव्हते तर काय करणार.?

जानू या वर काहीच बोलली नाही.. अभय च बोलत होता..बोलता बोलता तो एकदम म्हणाला..

अभय: ये असच पळवून नेऊ का तुला ? ना ऑफिस च टेन्शन .. ना कामाचं..ना घरचेंचा त्रास..

अभय तर चेष्टा करत होता पणं जानू ला जस खरंच वाटलं..ती घाबरली ..

जानू : ये अभय मी इथूनच बाईक वरून उडी मा रेन..

अभय: इतकाच काय विश्वास माझ्या वर ?

जानू: कोण विश्वास ? तो तर केव्हाच मेला पानिपत च्या युद्धात ..

अभय: अवघड आहे बाबा..साधा विश्वास ही नाही माझ्यावर तुझा..पणं घाबरू नकोस..तुझ्या मर्जी शिवाय मी काही ही करणार नाही.

जानू: बर कुठे घेऊन जात आहेस ? खूप उशीर झाला आहे रे ...माझी बस जाईल.

अभय: किडन्याप करत आहे तुला..

जानू : ये गप्प सांग ना..

अभय: अग नाश्ता करू चल ना कुठे तरी..तू ही काही खाल्लं नसेल..

जानू : नको नको..नाश्ता नको..मला अजिबात भूक नाही..तुला खायचं असेल तर तू खा..

अभय एका ठिकाणी गाडी थांबवून उतरतो ..चल इथे नाश्ता करू ..पणं जानू काही तयार होत नाही..तू खा मला काहीच खायचं नाही..म्हणून ती नकार देते.

अभय: हो मी खातो तू मला पाहत बस..

जानू : ठीक आहे चालेल म्हणून ती खाली उतरते..
पणं अभय पुन्हा गाडी सुरू करतो आणि राहू दे मला ही नाही खायचं म्हणून बसतो..जानू ला वाईट वाटलं.

अभय: बर सांग कुठे जायचं?

जानू: अभय खरंच उशीर झाला आहे ..आपण बस स्टँड वर जावू तिथेच थोडा वेळ बोलू नंतर तू परत जा..मी ही घरी जाते ..परत बस नाही मिळाली तर उशीर होईल.

अभय: अवघड आहे बाबा..एक तर इतक्या वर्षांनी भेटलीस आणि मी इतक्या लांबून आलो आहे आणि तू मला जा म्हणून सांगतेस ? बोल बोल तुझे दिवस आहेत.

जानू : सॉरी रे पणं काय करणार झाला उशीर ..आपण पुन्हा भेटू .

अभय: अजिबात नाही बस चुकली तर चुकू दे ..मी सोडतो तुला बाईक नी ..ते ही तुझ्या वेळात..

जानू : नाही मी नाही येणार बाईक नी..मी बस नी च जाणार उगाच त्रास नको तुला प्लीज .

अभय: का बाईक नको ? माझ्यावर विश्वास नाही का ?

जानू : विश्वास आहे रे पणं बाईक नी नको मी येणार नाही.

अभय: अस का करतेस ..एक तर तू आलीस लेट वरून ..जात ही आहेस लगेच आपण अजून बोलली ही नाही नीट..राहू दे बाईक ..मी येतो सोबत तुझ्या बस नी.

जानू: पणं कशाला ? आणि तुला परत जायला उशीर होईल.

या वर दोघांची बरीच चर्चा होते ..शेवटी अभय जानू सोबत बस नी जाणं फिक्स होत .

अभय: बर चल बस येऊ पर्यंत काही तरी खाऊ..

जानू : तुला खाण्या शिवाय काही सुचत की नाही..

अभय: मी तुझ्या साठीच बोलत आहे..आणि तस मी माझं पोट तर भरल आहे तुला पाहूनच..

जानू: ठीक आहे आईस क्रीम खा उ..चल म्हणून दोघे बस स्टँड बाहेर असलेल्या शॉप कडे जातात पणं तिथे ही आईस क्रीम नसत..पुन्हा दोघे स्टँड मध्ये येतात.. समोर एक ज्यूस सेंटर असत ..मग अभय तिला ज्यूस पियु चल बोलतो..जानू ही जाते .. अभय एक खुर्ची बसण्यासाठी देतो तिला व स्वतः त्या शॉप वाल्याला ऑर्डर देत उभा राहतो...जानू ऑरेंज ज्यूस घेते.. अभय मिक्स फ्रूट ज्यूस घेतो..जानू पित असते की तोपर्यंत तिथे एक भिकर्याची छोटी मुलगी येते अभय ला पैसे मागू लागते अभय एक दहा ची नोट काढून तिला देतो .. व तिला थांबवून तो ज्यूस चा ग्लास त्या मुलीला देतो व स्वतः साठी दुसरा मागवतो...ती मुलगी तो ग्लास घेते पणं तिच्या मना त काय येत काय माहित ती अभय ला म्हणते बांध के देव घर जाकें पियुगी..पणं अभय ला तिचं बोलणं ऐकूच येत नाही..त्याला वाटत ती कॅडबरी मागत आहे..तो म्हणतो इथे नाही मिळतं कॅडबरी हेच पी..ती मुलगी त्याला परत बोलते बांध के देव..
जानू ला कळलं होत की ती मुलगी काय म्हणत आहे आणि तिला अभय च बोलणं ऐकून हसू येत होत ..ती हसत होती..मग तिचं त्याला सांगते की ती ज्यूस पॅक करून मागत आहे .. अभय ही मग तो ज्यूस शॉप वाल्याला पॅक करून द्यायला सांगतो..त्याला ही हसू येत आणि जानू तर अजून हसत असते तसा तो जानू च्या दंडावर एक ठोसा देतो ..जानू दंड चोळत च हसू लागते..ज्यूस पियुन दोघे ही बस ची चौकशी करायला जातात तर थोड्या वेळात येईल म्हणून समजत मग दोघे ही तिथेच स्टँड वर बसतात.

जानू : तुझ्या बायको च काही खर नाही बाबा..

अभय: का ग?

जानू : किती लागतो रे हात तुझा ? किती मारशील बायको ला काय माहित.?

अभय हळूच म्हणतो ..तुला कशाला मारेन? तू तर जीव आहेस माझा..पणं जानू ला ऐकू जात नाही..

जानू : काही म्हणालास का ?

अभय: काही नाही खूप जोरात लागलं का ? सॉरी म्हणालो.

जानू : इट्स ओके.

मग अभय पुन्हा बस ची वेळ विचारायला जातो.. व येताना एक मोठीशी कॅडबरी घेऊन येतो व जानू ला देतो..कॅडबरी पाहून जानू नको बोलते अभय दे फेकून बोलतो ..मग शेवटी ती घेते.. पणं त्यातली अर्धी अभय ला देते..दोघे ही खातात..थोड्या वेळात बस येते..पणं बस ला खूपच गर्दी असते ..जागा मिळा न..कठीण होत ..आज रोज पेक्षा थोडा उशीर झाला होता..मग अभय ड्रायव्हर सिट बाजूने आत चढून सिट धरतो..नाही तर मग जागा मिळाली च नसती.. अभय ची हरकत पाहून जानू ला पुन्हा हसू येत..मग तीही त्याच्या बाजूला बसते खिडकी च्या बाजूला बसणार म्हणून तिथे बसते ..गाडी सुरू होते..आणि दोघांच्या ही गप्पा सुरू होतात.. चाळ सोडुन गेल्या नंतर काय काय झालं हे जानू त्याला सांगत होती ..आणि तो तिला पाहत ऐकत बसला होता..मग जानू शात होते व मीच कधी च बडबड करते तू ही काही तर बोल म्हणून अभय ला सांगते..
अभय जॅकेट मधून एक गुलाबाचा बुके काढून देतो..हे आणि कधी घेतलास ? तुला यायला वेळ होत होता तेव्हा असच फिरत असताना घेऊ वाटला घेतला..जानू थँक्यु म्हणून बुके घेते..नंतर अभय पुन्हा एक गिफ्ट देतो तिला ..त्यात ..एक खूप छान रेड कलर चा पेन असतो..थँक्यु ..अस म्हणून जानू तो ही घेते.

जानू : झालं की अजून काही आहे ? आणि कशाला हे सर्व ?

अभय: खूप काही आणायचं होत पणं सुचलं काहीच नाही .. ह्मन आहे अस म्हणून अभय पुन्हा एक बॉक्स तिला देतो..जानू तो बॉक्स उघडून बघते तर त्यात एक ब्ल्यू कलर च खूप सुंदर हातातलं असत..

जानू: अभय नको.मला हे ..कोण बोललं होत तुला आण ?

अभय: ठीक आहे खिडकी उघडी आहे फेक मग बाहेर आता तुझ्या साठी घेतलं होतं तुलाच नको तर त्या वर दुसऱ्या कोणाचा हक्क नाही.

जानू मग नाईलाजास्तव ते घेते.. अभय तिचा हात हातात घेऊन ते हातातलं तिच्या मनगटावर घालतो..जानू ला खूप कस तरी वाटत होत अभय नी हात हातात घेतला तर पणं ..आता ती हात काढून तर कसा घेणार..मग तिचं बोलते मला ही घालता येत अभय..

अभय: अरे बाबा रे बाबा ..मी विसरलोच ..चूक झाली मॅडम घाला तुम्हीच ..
मग दोघे ही हसतात..आता अभय बोलायला सुरू करतो.

अभय: जानू मी तुझ्या वर खूप प्रेम करतो तू तर मला माझा प्रोजेक्ट घेतल्या पासून ओळखत असशील पणं मी तुला तू आली होतीस अगदी त्या दिवसा पासून ओळखत होतो ..तुला पाहत होतो....तू होतीस तेव्हा मी खूप खूष होतो..पणं तू गेलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं ..मी जयपूर ला ही गेलो तुला विस राव म्हणून पणं नाही जमल मला..पणं मला विश्वास होता एक ना एक दिवस तू मला भेटशील..आता तू पुन्हा माझ्या लाईफ मध्ये आली आहेस..आणि मी नाही सांगू शकत की तू आल्या पासून मी किती खुश आहे..शब्दात सांगताच येत नाही मला..आणि मला आता तुला परत गमवयच नाही..तू कायम साठी मला माझ्या लाईफ मध्ये हवी आहेस..मला तुझ्या सोबत लग्न करायचं आहे..

आता पर्यंत खुश असणारी जानू मात्र अभय च बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग च उडून जातो.

जानू : अभय तुला सांगितलं होतं ना की प्रेमाचं नाव नको काढू माझ्या समोर ? आणि लग्न ? माझं प्रेमच नाही तुझ्या वर तर मी लग्न कसं करेन ?

अभय: लग्न तर कर प्रेम आपोआप होईल..

जानू : तुला सर्व सोपं कसं वाटतं रे ? आणि तुझी जात वेगळी आहे ..बाबा कधी तयार होणार नाहीत.

अभय: जाती पातीचा विचार कोण करत ग आता ?मी तर मानत नाही जात बीत.

जानू: तू नसशील मानत पणं माझ्या घरचे मानतात..आणि मी बाबा विरुद्ध नाही जाणार.

अभय: जात च अडचण आहे ना ? मग मी बदलतो जात..

जानू ला अभय च बोलणं ऐकून खूप राग येत होता..

जानू : तुला किती सोपं वाटतं सर्व ?माझे बाबा कधीच तयार होणार नाहीत.

अभय: मी समजावतो बाबा ना ..मी येऊ का घरी..सांगतो त्यांना.

अभय च बोलणं ऐकून तर जानू घाबरून जाते..

जानू : नको नको तुझ्या पाया पडते मी तू काही येऊ नकोस आणि बाबा ना ही काही बोलू नकोस.

अभय: आता मीच तुझ्या पाया पडतो..मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय इतकी वर्ष कशी काढली मला माहित.

जानू : अभय तू चांगला आहेस ..तुला चांगली मुलगी भेटेल..आणि मी नाही भेटले म्हणून काय आयुष्य संपत का ?

अभय: मला तूच हवी आहेस..दुसरं कोणी नको..

जानू च डोक आता खरच फिरल होत..

जानू : मी नाही भेटू शकत तुला ..प्रेमा वर माझा विश्वास च नाही..आणि प्रेम माणसाला बरबाद करत..मी अनुभवलं आहे..पुन्हा तीच चूक नाही करायची.मला.

अभय: तू नाही भेटलीस तर बरबाद होईन मी जानू..माझं सर्वस्व आहेस तू.. कसं ही कर पणं मला तुझ्या सोबत च लग्न करायचं आहे..बाबांना न सांगता करू..तू म्हणशील तस करू..

आता मात्र जानू चा राग अनावर होतो..

जानू : तुला समावण्यात काहीच अर्थ नाही..तुला काही कळतच नाही तर काय बोलू ? माझं नाही प्रेम तुझ्या वर ..फक्त फ्रेन्ड आहेस तू माझा..पणं तुला काही ऐकायचं नसेल तर सॉरी या पुढे तू माझ्या सोबत बोलू ही नकोस ..आणि मी ही बोलणार नाही..फ्रेन्ड शिप ही विसर आता..माझी च चूक झाली जे मी बोलले तुझ्या सोबत..

अभय तर जानू च बोलणं ऐकून तुटुन गेला होता..त्याच्या तोंडातून फक्त इतकेच शब्द निघाले होते..

अभय: विसर आणि बोलू नको बोलण्या पेक्षा ..तू मला जीव द्यायला का सांगत नाहीस ? ते सोपं आहे माझ्या साठी..

जानू ने मात्र त्याच्या या बोलण्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही...बस थांबली आणि जानू अभय ला एक ही शब्द न बोलता त्याच्या कडे न पाहता.. खाली उतरून निघून गेली.. अभय ही तिच्या पाठीमागे खाली उतरला ..आणि ती गेली त्या दिशेने किती तरी वेळ पाहत उभा राहिला..

क्रमशः