Janu - 46 books and stories free download online pdf in Marathi

जानू - 46

रात्र भर रडून जानू ची तब्येत खराब झाली होती..डोळे सुजले होते..अंगात ताप भरला होता..पणं विचार काही संपत नव्हते..आईने ऑफिस ला जात नाही का म्हणून विचारले तेव्हा आई ला कळलं की तिची तब्येत खराब आहे ..मग आई ने ही तिला आराम करायला सांगितला..जानू चे विचार अजून ही चालू च होते..माझ्या च सोबत अस का ? मी काय कोणाचं वाईट केलं आहे..देवा का असं माणसांच्या आयुष्या सोबत खेळ तोस..जर समीर आणि माझं कोणत च नात नव्हत निर्माण होणार तर मग का आणल स..माझ्या आयुष्यात त्याला? देवा खरच ज्याच्या सोबत आपलं आयुष्य जाणार असत अशीच मानस भेटव त जा...समीर ऐवजी अभय ला च थोड लवकर माझ्या आयुष्यात आणल असता स.. तर काय गेलं असत देवा तुझं ? मी ही दुखी नसते.. अभय ला ही त्याचं प्रेम मिळालं असत...का करतोस देवा तू अस ? आज जानू ला अभय पेक्षा समीर च जास्त आठवत होता..त्याने जर heartless बनवलं नसत तर मी कधीच अभय सोबत अस वागले नसते...तिला स्वतः चा ही राग येत होता..समीर चा ही ..देवा वर ही चिडली होती ती आणि आपल्या नशिबा वर ही ...रागाच्या भरात च ..तिने व्हॉट्स ऍप ला एक नवीन नंबर वरून अकाऊंट ओपन करून. त्या वरून समीर ला मॅसेज केले..तिला माहीत होत आपल्या दुःखाने समीर ला काही फरक पडणार नाही..पणं दुःख इतकं अनावर झालं होत की तिने समीर ला इतक्या वर्षांनी मॅसेज केलेच...

जानू : ब्लॉक करण्याआधी थोड ऐकुन घेतलं तर बर होईल.
जेव्हा तू माझ्या लाईफ मधून गेलास मी स्वतः ला खूप जप ल.. इतकं जप ल..की माझी बदललेली लाईफ मलाच कळाली नाही पुन्हा आयुष्याचा समीर होवू नये इतकीच अपेक्षा होती माझी पणं मीच कधी समीर झाले मला कळलं नाही. तुझ्या साठी तर सर्व थोड्या वेळासाठी होत..पणं जिने तुझ्या वर प्रेम केलं तिच्या साठी ते तिचं पूर्ण आयुष्य होत..वाटलं होत तू बदल शील..एक दिवस पणं माझा गैरसमज होता तो तू नाही बदलला स..पणं मी बदलले.
प्रेमाला सर्व काही मानणारी मी पणं तुझ्या वागण्याने प्रेमाचं नाव ही कायमच माझ्या लाईफ काढून टाकलं..प्रेम म्हणजे लाईफ बरबाद करणारी गोष्ट ,गुन्हा आयुष्य प्रक्तीकल होऊन जगायचं ..प्रेम या जगात नाही हेच म्हणून मी माझं सर्व लक्ष आभ्यासात व माझ्या जॉब मध्ये घालवलं..दुसऱ्या कोणत्याच गोष्टी ला किंमत दिली नाही.heartless जानू झाले होते ना.
अशा या heartless जानू च्या लाईफ मध्ये अभय आला त्याचं अगदी लहानपनपासून जानू वर प्रेम होत पण तिने तर फक्त फ्रेन्ड च समजलं होत त्याला .. अभय ने जानू ला खूप समजवायचा प्रयत्न केला विनवण्या केल्या पणं तिने प्रत्येक वेळी त्याच्या प्रेमाचा अपमान केला त्याला कधीच समजून घेतलं नाही.
का समीर तू गेलास पणं तुझ्या विचारांचं विष माझ्या मनात भरून गेलास ..त्याचं विचारांमुळे आज मला मी अपराधी वाटत आहे..जानू कधीच अशी नव्हती ..प्रेमच सर्व काही होत तिच्यासाठी पणं तुझे विचार मनात ,डोक्यात अशे भिनले होते की मी जानू राहिलेच नव्हते.
मला माहित असतं की तुझ्या वर प्रेम होईल तर साधी ओळख ही करून घेतली नसती मी ..तुझ्यासोबत...पणं काय करू हे सर्व घडल.नाही माहित मला बहुतेक देवाला मला अद्दल घडवायची होती म्हणून झालं असेल सर्व ...जन्माची अद्दल
तुझी चुक होती वाटत ना तुला तू माझ्या सोबत बोललास ते पणं काय गेलं तुझं ? फेसबुक ,व्हॉट्स ऍप या सर्वांन वरून एका मुलीला ब्लॉक करण्या पलीकडे काय बिघडलं तुझं ? पणं माझ्या गुन्ह्याची शिक्षा इतकी मोठी कशी मिळाली मला?
तुझ्या विचारांना आवर घाला ..तुझ्या हातून पुन्हा एखादी जानू घडू नये इतकीच अपेक्षा ...इतकं सर्व टाईप करताना ही तिचे डोळे सतत वाहत होते ..समीर ने सर्व मॅसेज वाचले व तिचा तो नंबर ही ब्लॉक करून टाकला..जानू ला हीच अपेक्षा होती त्याच्या कडून ..अजून हि आपण त्याला इतकं चांगलं ओळखतो याच तिला आश्चर्य वाटलं..समीर जर मॅसेज वाचून काही बोलला असता तर त्याच्यात निदान माणुसकी तरी आहे याचा गैरसमज आपल्याला झाला असता अस तिला वाटलं.
तिथे अभय ही खूप दुखी होता..त्याला खूप मोठा धक्का बसला होता..एक तर त्याच्या प्रेमा न त्याच्या सोबत फ्रेन्डशिप तोडून ..त्याला नाकारलं होत ..आणि त्याचे बाबा ही त्याला सोडून गेले होते...आणि आई ही आजारी पडली होती तिच्या साठी च तो लग्न करायला तयार झाला होता ..मुलगी ही पाहून आला होता ..पणं नावालाच. ..तो पाहायला गेला होता..त्याने मुली कडे डोळे वर करून ही पाहिलं नव्हत...लग्नाची पुढची बोलणी करायची होती.
सध्या काळी...काट्या समोरून जाताना ..संजू त्याला पाहून ..काय निशा वहिनी अस बोलला.. अभय ला समजलं च नाही त्याने मागे वळून पाहिलं..पणं मागे तर कोणीच नव्हते.

संजू: तुला ..तुलाच बोलतोय अभ्या..

अभय: कोण निशा ?

संजू: अभ्या तू नसल सांगितलं तरी काकू नी सांगितलं आहे मला तु मुलगी पाहून आलास आणि लग्न ठरत आहे तुझं ..त्याचं मुली च नाव निशा आहे ..

संजू बडबड करत होता ..आणि अभय काहीच न बोलता तिथून निघून गेला..घरी गेल्यावर तो विचार करू लागला खरंच आपण करतो ते बरोबर आहे का ? जानू अजून ही आपल्या मनात आहे आणि आपण दुसऱ्या मुली सोबत लग्न करायला तयार झालो..त्या मुलीचा काय दोष ? आपण जानू ची जागा तर कधीच तिला देणार नाही ..मग तिची फसवणूक का करायची ? आणि अजून आपली ही मनाची तयारी नाही..उगाच भावनेच्या भारत काही पणं निर्णय घेत आहे आपण..तो तसाच उठला.. व आई जवळ गेला ती अजून ही झोपली नव्हती..त्याने आई ला विश्वासात घेऊन सर्व समजावून सांगितल....आई ने ही मग त्याच्या मना विरुद्ध काहीच होणार नाही म्हणून त्याला होकार दिला.
दुसऱ्या दिवशी च अभय ने मुलीच्या घरी फोन करून त्यांना आपला निर्णय कळवला व त्यांची माफी ही मागितली.
आकाश त्याला दुपारी भेटायला आला.

आकाश: अभ्या आज लग्नाची पुढची बोलणी करायला जाणार होता ना ..काय झालं ?

अभय: काही नाही झालं..लग्न कॅन्सल केलं मी.

आकाश: का ?

अभय: का ? काय विचारतोस ? मी जानू ला विसरलो नाही ..आणि उगाच दुसऱ्या मुली सोबत लग्न करून तिचं ही आयुष्य कशाला खराब करू ?आणि अजून थोडा वेळ हवा आहे मला..इतक्यात लग्नाचा विचार नाही होत माझ्या ने..एक तर आताच माझं प्रेम दूर झाल आहे माझ्या पासून आणि मी लग्न करत बसू ?

आता अभ्या ला सांगितलं की जानू चा फोन आला होता आणि तिचं ही प्रेम आहे पणं मी तिला अभ्या पासून दूर राहायला सांगितलं आहे तर अभ्या तर आपला जीवच घेईल असं आकाश ला वाटू लागलं..पणं अभय खूपच उदास झाला होता..त्याच्या पडलेला चेहरा आकाश ला नाही पाहू वाटला..मग त्याने सर्व सांगायचं ठरवल.

आकाश: अाभ्या तू मरणार नसशील तर तुला काही तरी सांगायचं आहे ..

अभय : मीच मेलो आहे तुला काय मारेन रे ?

आकाश: अभ्या...मला जानू चा फोन आला होता...

अभय: आक्या मी तुला चेष्टे च्या मूड मध्ये दिसतोय का ?

आकाश: मी वाटतो का मग तुला ?

अभय आकाश कडे पाहतो तर तो ही त्याला सिरीयस दिसतो ..

अभय: काय खरंच ? जानू चा फोन आला होता का ? मला कसा फोन नाही केला मग तिने ..

आकाश: अरे तुझा फोन फुटला आहे ना...चालू कुठे आहे म्हणून तर मला केला तिने...

अभय: हो रे लक्षात च नाही माझ्या ..काय बोलली रे ?माझ्या बद्दल काही विचारलं का ?

आकाश: तुझ्या सोबत च बोलायला फोन केला होता..तुला सॉरी बोलायचं आहे म्हणत होती ..आणि ..आणि..

अभय: आणि काय ?

आकाश: तुझ्या वर प्रेम करते ही बोलली..

अभय तर ऐकुन दाच कतोच....त्याला विश्वास च बसत नाही ..तो आकाश ला दंडाला धरून बोलतो..

अभय: आ क्या ..तू खर बोलत आहेस ना ? की मी उदास आहे म्हणून काही पणं सांगत आहेस रे ?

आकाश : मी खर बोलतोय अभ्या पणं ..

अभय: आता आणि पणं काय ?

आकाश: पणं मी तिला सांगितलं की तुझं लग्न आहे ..आणि तुझ्या पासून दूर राहायला ..तिने काहीच न बोलता फोन ठेवला..ही ..पणं अभ्या तुझं लग्न ठरलं आहे अस वाटून मी बोललो रे ..मला काय माहीत होत तू लग्न कॅन्सल करशील ते ?

अभय ला तर काही कळतच नव्हतं ..तो इतका खुश झाला होता की त्याने आकाश ला मिठी मारली

अभय: थँक्यु आ क्या तुला माहित नाही तू हे सांगून मला किती आनंद दिला आहेस ..मी तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार ...

आकाश: पणं तुला माझा राग नाही आला का ?

अभय: राग कशाचा रे ? जानू माझ्यावर प्रेम करते हे ऐकल्या वर तर..माझं सर्व दुःख विसरलोय मी ..मग राग कशाचा ? खरंच आक्या ..आता पळत जाऊन जानू ला भेटाव अस वाटत आहे मला तर..

आकाश: भेटायचं राहू दे पणं ..तू आता बोलू शकतोस तिच्या सोबत...थांब मी फोन करतो तिला..

आकाश फोन काढून जानू ला फोन लावतच असतो की .. अभय त्याला नको म्हणून सांगतो..

आकाश : का ? फोन का नाही लावु दिला तू ?

अभय: अरे मला तिच्या कडून समोरा समोर ऐकायचं आहे ..आणि त्या क्षणा ना अविस्मरणीय बनवायचं आहे ..फोन व र पेक्षा उद्याच नाशिक ला जाऊन भेटणार आहे मी तिला..आता नाही वेळ घालवायचा मला..

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED