थोड्या वेळाने मेघा दोघांसाठी चहा घेऊन आली. तीने चहाचे कप त्यांच्यासमोर पकडले. दोघेही परत तिच्याकडे बघतच राहिले. मेघाने दोघांनाही चहा दिला. मेघा दोघांनाही बघून गालातल्या गालातच हसत होती. ती चहा देऊन घरात निघून गेली.
अजय - "अर्चू, मला असं वाटते, तू बोलतेय ते खरंच आहे. आपल्याला रंग वेगवेगळे दिसतात की आपले डोळेच रंगबिरंगी झालेत?"
मेघा आणि मीरा दोघीही त्यांचं ऐकून घरात खूप हसत होत्या. अजय आणि अर्चना दोघेही विचारातच पडले होते.
आणि दोघांनाही हसू आलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अजय आणि अर्चना दोघेही बसून चहा पित होते. थोड्या वेळाने मीरा बाहेर आली आणि ती चहाचे कप घेऊन घरात जाऊ लागली. अर्चनाने तिला आवाज दिला.
अर्चना - "मेघा, थांब जरा."
मीरा - "काय झालं ताई? काही हवंय का?"
अर्चना - "मला सांग, नक्की काय चाललंय तुझं. परत ड्रेस चेंज केलास तू?"
मीरा - "नाही ताई, तोच तर ड्रेस आहे."
अर्चना - "कधी पोपटी रंगाचा तर लगेच हिरव्या रंगाचा ड्रेस घालून येतेस, आमचं लक्ष आहे बरोबर तुझ्यावर. काय चाललंय कधीशी तुझं. अशी सारखे कपडे का चेंज करतेस? काही प्लॅन चाललाय का तुझ्या डोक्यांत आम्हाला उल्लू बनवून वेडं बनवण्याचा." यांवर मीराला खूप हसू आलं. ती तोंडावर हात देऊन हसू लागली.
अर्चना - "अगं हसतेस काय? बोल ना. कधीशी आम्ही तोच विचार करतोय."
मीरा - "ताई, खरंच असं काहीच नाहीये. कधीशी मी हेच कपडे घातलेत. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही नीट पाहीलं नसेल." आणि ती हसतच घरात निघून गेली. दोघेपण तीला जाताना बघतच राहिले.
अजय - "अर्चू, घर के अंदर कुछ तो गडबड है. हमें अंदर जाके देखना पडेगा. ये लडकी हमें शायद पागल बना देगी. अपनी आँखे इतना तो धोखा नहीं खा सकती ना." तो हसतच म्हणाला.
अर्चना - "हा दया, शायद दरवाजा तोडना पडेगा." आणि दोघेही खूप हसू लागले.
घरामध्ये मीरा आणि मेघा दोघीही अजय, अर्चनाची गंमत करून खुप हसत होते. सोनाली गुपचूप त्यांची सगळी मजाकमस्ती बघून गालातल्या गालातच हसत होती. थोड्या वेळाने राधिका आणि आई, बाबांना घेऊन आले. अजयने बघताच तो त्यांच्याकडे धावतच गेला. आणि राधिकाच्या बाबांच्या हाताला पकडून घरात घेऊन आला. त्याने त्यांना व्यवस्थित पलंगावर झोपवलं.
राधिका - "अजय, अर्चू, साॅरी, बाबांची तब्येत अचानकच खराब झाली. त्यांना डाॅक्टरकडे न्यावं लागलं. तुम्हाला जास्त वेळ वाट पहावी लागली का? आणि लाडू पण तूझी वाट पाहत असेल ना गं अर्चू. रडणार नाही ना तो?"
अजय - "अगं मग साॅरी का बोलतेस? घेऊन गेली ते बरंच झालं ना. जास्त काही झालं असतं तर बाबांना."
अर्चना - "हो ना, अजय बरोबर बोलतोय आणि जास्त काही वाट पाहावी नाही लागली आम्हाला. आताच थोड्या वेळापूर्वी आलो आम्ही. आणि वाट पाहावी लागली असती तरी इतकं काय गं त्यांत. तू नको वाईट वाटून घेऊस. आणि लाडूची चिंता नको करूस तू. तो आईजवळ छान राहतो. सवय झाली आता त्याला."
राधिका - "बरं ठीक आहे, तुम्ही दोघेही खूप समजून घेता मला."
अर्चना - "अगं आपल्या माणसांना आपणच समजून घ्यायचं असतं ना."
अजय - "राधिका, बाबांना आधी काही तरी खायला दे आणि त्यांना औषधं दे, थोडं बरं वाटेल त्यांना."
राधिका - "हो देते..."
आणि राधिका किचनमध्ये निघून गेली. तिच्या मागे सोनाली पण गेली. दोघीही सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन आल्या. राधिकाने बाबांसोबत सगळ्यांनाच चहा नाश्ता दिला. राधिकाने आईबाबा आणि सोनालीशी दोघांचीही ओळख करून दिली. दोघांनीही आईबाबांना नमस्कार केला.
अजय - "अगं आम्ही नंतर केला असता नाश्ता, आताच थोड्यावेळापुर्वी चहा घेतला आम्ही. बाबांना करू दे नाश्ता आधी, नंतर करू आम्ही."
बाबा - "अहो नाही नाही, तुम्ही पण बसा नाश्ता करायला. सगळे सोबत बसून खातील तर मला पण दोन घास जास्त जातील."
अजय - "बरं ठिक आहे, घेतो आम्ही पण. पण बाबा मला अहोजाओ नका करू. मी पण तुमच्या मुलासारखाच आहे. मला तुम्ही नावानेच आवाज द्या, तेच मला जास्त आवडेल आणि तुमचा मुलगा समजूनच बोला माझ्याशी. आणि आई तुम्ही पण बरं का. तुमच्या मुलासारखंच समजा मला."
अर्चना - "अजय, मला विसरलास तू? माझ्याबद्दल कोण बोलणार आईबाबांना." ती कमरेवर हात देऊन त्याला म्हणू लागली."
अजय - "अरे हो ना तूला विसरलोच मी. आईबाबा हिला तुम्ही अर्चू बोललात तरी चालेल. आणि ही ना माझी शेपुट बनूनच माझ्या सोबतच फिरत असते नेहमी फेव्हीकोल लावल्यासारखी." त्याचं ऐकून सगळेच हसू लागले.
अर्चना - "आईबाबा, तुम्ही याचं काही ऐकू नका. हा काहीही बोलत असतो. त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. आणि मला पण तुमची मुलगीच समजा. हवं तर मला तुमची पाचवी मुलगी समजा."
बाबा - "बरं पोरांनो. छान वाटलं तुमच्याशी बोलून. तरी राधिकाने तुमच्या बद्दल, तुमच्या घरच्यांबद्दल सगळं काही सांगितलंय आम्हाला. आणि अगदी तसेच छान आहात तुम्ही दोघेपण."
राधिकाच्या आईबाबांना दोघांचाही स्वभाव खूप आवडला.
राधिका - "सोनू, अगं मेघा, मीरा कुठे आहेत बोलव त्यांना." सोनाली त्यांना बोलवण्यासाठी गेली.
राधिका - "अर्चू, आल्यावर पाणी विचारलं की नाही गं तुम्हाला मेघा, मीराने. मी तसं सांगून गेली होती त्यांना."
अर्चना - "अगं हो, आम्ही चहा, पाणी घेतलं. छान पाहुणचार केला आमचा मेघाने आणि काय गं राधिका, मेघा दिवसातून किती वेळा कपडे चेंज करते."
राधिका - "नाही गं अर्चू असं काही नाही करत ती, का काय झालं?" मग अजय आणि अर्चना दोघांनीही मघाशी मेघा, मीराने जी गंमत केली होती ती सगळी राधिका आणि आईबाबांना सांगितली. ते ऐकून सगळे खूप हसत होते.
राधिका - "अगं गंमत केलंय तुमची मेघा, मीराने दोघींनी मिळून. मला वाटलंच होतं या दोघी काहीतरी घोळ करतीलच असं."
अर्चना - "म्हणजे कसला घोळ गं?"
राधिका - "थांब दोन मिनिटं, मी आलीच. काय ते सगळं कळेल तुम्हाला." आणि राधिका दोघींना शोधत गेली. तर मागच्या दारी मेघा, मीरा दोघीही चुपचाप तोंडावर हात ठेवून हसत होत्या.
राधिका - "काय गं तुम्हा दोघींना मी सांगून गेली होती ना की अजिबात मस्ती करायची नाही म्हणून आणि तुम्ही तरी दोघांची गम्मत केलीच ना. चला दोघीही घरात."
ती दोघींनाही हाताला पकडून घरात घेऊन आली. त्या दोघींना बघून अजय आणि अर्चनाला आश्चर्यच वाटलं. दोघेही त्यांना बघतच राहिले.
अर्चना - "अजय, या दोघी तर सीता और गीता आहेत."
अजय - "हो ना, म्हणून आपल्याला या दोघी ओळखू नाही आल्या."
अर्चना - "तरी आम्ही हेच विचार करत होतो की ही पटापट ड्रेस का चेंज करून येते? तरी मी हिला विचारलं तसं तर मलाच म्हणते गैरसमज होतोय तुमचा. दोघीही खरंच अगदी खुपच अवली आहेत." ती हसतच म्हणाली.
अजय - "हो ना, आम्ही दोघं तर एवढं गोंधळून गेलो होतो ना खरंच. आम्हाला तर वाटत होतं की आमच्याच डोळ्यांना काहीतरी आजार झालाय. हिच्या कपड्यांचे रंग कसे काय वेगळे दिसतात हाच आम्ही विचार करत होतो." सगळेच खूप हसू लागले. राधिकाने दोघींचे कानच पिरगळले.
"अगं ताई साॅरी ना, ते आम्ही असंच त्यांना बसून कंटाळा आला असता ना, त्यांना बोअर वाटू नये म्हणून आम्ही थोडीशी गंमत केली." मेघा म्हणू लागली.
मीरा - "अगं ताई, हा मेघूचाच प्लॅन होता सगळा. तू हिलाच ओरड."
राधिका - "पण तूही तिच्या प्लॅनमध्ये सामील झालीस ना. मग तूलाही शिक्षा मिळणार. चला दोघींनीही अजय, अर्चूला कान पकडून साॅरी बोला."
"साॅरी जीजू, साॅरी अर्चू ताई" दोघीही बोलू लागल्या.
अजय - "अगं राधिका सोड त्यांना, कान दुखत असतील त्यांचे. आणि आता काय त्यांचं वयच आहे गं गमतीजमती करायचं. आणि आम्हाला पण समजलं ना की दोघी किती हुशार आहेत त्या." आणि तो हसू लागला. राधिकाने दोघींचाही कान सोडला.
आई - "दोघीही अगदी सारख्याच आहेत, सारख्या काही ना काही कुरापती करतच असतात, एका पेक्षा एक सव्वाशेर आहेत दोघी."
अर्चना - "अहो आई, मग चांगलंच आहे ना. कुणीतरी असं मस्तीखोर घरात हवंच असते."
अजय - "हो आई, अगदी खरंय हे... असे कार्टून्स हवेच घरात. कारण त्यामुळे तर घरात आपल्या आनंदी वातावरण राहते आणि सगळे हसतखेळत राहतात. तसं बघायला गेलं तर आमच्या घरात पण एक कार्टून आहे." तो अर्चना कडे बघून बोलू लागला. त्यामुळे सगळ्यांनाच खूप हसू आलं.
अर्चना - "राधिका, या दोघी जुळ्या आहेत आणि किती सेम टू सेम दिसतात यार. यातली मेघा कोण, मीरा कोण ओळखू पण येत नाही. तुम्ही कसे काय ओळखतात दोघींना ?"
राधिका - "हो जुळ्या आहेत दोघी. मेघा मोठी आणि मीरा लहान. पण एवढ्या वर्षांची आता सवय ना. तर त्यांच्या वागण्या बोलण्यावरून बरोबर ओळखू येतात आम्हांला दोघी आता. हळूहळू तुम्ही पण ओळखू शकतील."
अर्चना - "हो ते पण आहेच. पण आम्ही दोघींना पुर्ण ओळखेपर्यंत तरी आमचा थोडा गोंधळच होईल." ती हसतच म्हणाली. यांवर सगळेच हसू लागले.
राधिकाने बाबांना औषधं दिली आणि त्यांना आराम करायला सांगितलं.
अजय - "हो बाबा, तुम्ही थोडा आराम करा आता. आम्ही बसतो बाहेर..."
बाबा - "नाही नाही, आराम कसला आता आणि मला जास्त काही झालेलं नाही. थोडा ताप आलाय बस. आणि तुम्ही आज पहिल्यांदाच घरी आलात, तुम्हाला माझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं हे माहीती आहे मला आणि मी झोपून राहू का. बरं नाही वाटत ना ते. आणि आता बरा आहे मी. नका काळजी करु तुम्ही...."
अजय - "पण बाबा, आम्ही नंतर पण आलो असतो. आपलं बोलणं काय नंतर पण झालं असतं. आता फक्त तुमची तब्येत सांभाळणं महत्वाचं आहे...."
अर्चना - "हो बाबा, अजय अगदी बरोबर बोलतोय. आम्ही नंतर परत येऊ हवं तर. आता तुम्ही आराम करा."
बाबा - "अरे पोरांनो, असं काही नाही. खरंच बरं वाटतंय मला आता. तुम्ही सगळे माझी एवढी काळजी करतात, मग मला बरं वाटेलच ना. आणि राधीचं तर सांगूच नका खूप काळजी असते तिला माझी. खूप करते सगळ्यांसाठी. बरेच दिवस झाले मी आजारीच आहे. पण अगदी एका मुलाप्रमाणे संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली तीने. खूप अभिमान आहे मला माझ्या मुलीचा. आणि आता तुमच्यासारखा जावई मिळाला आम्हाला. अजून काय हवंय देवाकडून. बस माझ्या मुलीला तुम्ही स्विकारा अजून मला काही नको. तीच्या खुशीतच आमची खुशी आहे." बाबांनी अजयसमोर हात जोडले. तसे अजयने लगेच बाबांचे हात पकडले आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवले.
अजय - "बाबा, तुम्ही माझ्या वडीलांसारखे आहात. तुम्ही फक्त आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी हात उचलायचे. असे हात जोडण्यासाठी नाही. मी तुमच्या मुलासारखाच आहे."
बाबा - "सुखी रहा पोरा. माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी असेल. अजय आज माझं मन जिंकलंस तू. खूप खूश आहे मी आज. अगदी मनासारखं सगळंच चांगलं होतंय."
राधिकाच्या घरच्यांना अजयचा स्वभाव, त्याचं बोलणं वागणं खूपच आवडलं. घरात सगळे शांत बसले होते आणि बाबा आणि अजयचं बोलणं चालू होतं तेच सगळे शांतपणे ऐकत होते.
(राधिकाच्या बाबांचं आणि अजयचं अजून काय काय बोलणं होते ते पाहुया पुढच्या भागात.....)
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
क्रमशः-
(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)
[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]
🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹
💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - १९
➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀